< 1 Crônicas 29 >

1 David o rei disse a toda a assembléia: “Salomão meu filho, a quem só Deus escolheu, ainda é jovem e terno, e a obra é grande; pois o palácio não é para o homem, mas para Javé Deus”.
राजा दावीद सर्व इस्राएल समुदायाला म्हणाला, “माझा पुत्र शलमोन यालाच देवाने निवडले आहे. तो अजून सुकुमार व अनुभवी आहे. पण हे काम फार महत्वाचे आहे. हे भवन काही मनुष्यांसाठी नव्हे तर परमेश्वर देवासाठी आहे.
2 Now Preparei com todas as minhas forças para a casa de meu Deus o ouro para as coisas de ouro, a prata para as coisas de prata, o bronze para as coisas de bronze, o ferro para as coisas de ferro, e a madeira para as coisas de madeira, também pedras de ônix, pedras para fixar, pedras para trabalhos incrustadas de várias cores, todos os tipos de pedras preciosas, e pedras de mármore em abundância.
माझ्या देवाच्या मंदिरासाठी मी माझ्या शक्तीने सर्वोत्तम सोन्याच्या वस्तूंसाठी सोने व चांदीच्या वस्तूसाठी चांदी, पितळेच्या वस्तूसाठी पितळ, लोखंडाच्या वस्तूंसाठी लोखंड, लाकडी सामानासाठी लाकूड, जडावाच्या कामासाठी गोमेद, पाषाण, विविधरंगी मौल्यवाने रत्ने आणि संगमरवरी दगड हे ही विपुलतेने दिले आहे.
3 Além disso, por ter colocado meu afeto na casa de meu Deus, já que tenho um tesouro próprio de ouro e prata, dou-o à casa de meu Deus, acima de tudo o que preparei para a casa santa:
आता कारण मी माझे चित्त देवाच्या मंदिराकडे लावले आहे. म्हणून पवित्र मंदिरासाठी मी जी ही तयारी केली त्याशिवाय आणखी माझा वैयक्तिक सोन्या, रुप्याचा ठेवाही देत आहे.
4 até mesmo três mil talentos de ouro, do ouro de Ophir e sete mil talentos de prata refinada, com os quais sobrepor as paredes das casas;
तीन हजार किक्कार ओफीरचे शुध्द सोने, सात हजार किक्कार निर्भेळ रुपे मी दिले. मंदिराच्या भिंती या रुप्याने झाकायच्या आहेत.
5 de ouro para as coisas de ouro, e de prata para as coisas de prata, e para todo tipo de trabalho a ser feito pelas mãos de artesãos. Quem então se oferece voluntariamente para consagrar-se hoje a Yahweh”?
कुशल कारागिरांनी मंदिरातील तऱ्हेतऱ्हेच्या वस्तू कराव्या म्हणून त्यासाठी लागणारे सोने व रुपे मी दिले. आता तुम्हा इस्राएलीं पैकी किती जण आज परमेश्वरासाठी काही द्यायला तयार आहात?”
6 Então os príncipes das famílias dos pais, e os príncipes das tribos de Israel, e os capitães de milhares e centenas, com os governantes sobre o trabalho do rei, ofereceram voluntariamente;
तेव्हा, वडीलधारी मंडळी, इस्राएल वंशाचे प्रमुख सरदार, अधिकारी, राजसेवेतील कारभारी यासर्वांनी आपापल्या बहुमोल वस्तू देणगीदाखल दिल्या.
7 e deram para o serviço da casa de Deus de ouro cinco mil talentos e dez mil daricos, de prata dez mil talentos, de bronze dezoito mil talentos, e de ferro cem mil talentos.
देवाच्या निवासस्थानाच्या सेवेसाठी त्यांनी दिलेल्या वस्तू पाच हजार किक्कार सोने, दहा हजार किक्कार रुपे, अठरा हजार किक्कार पितळ, आणि एक लाख किक्कार लोखंड दिले.
8 People com quem foram encontradas pedras preciosas deu-as ao tesouro da casa de Iavé, sob a mão de Jeiel, o Gershonita.
ज्यांच्याकडे मौल्यवान रत्ने होती त्यांनी ती परमेश्वराच्या मंदिरासाठी दिली. गेर्षोन घराण्यातील यहीएल याच्या हाती ती दिली.
9 Então o povo se regozijou, porque se ofereceu de bom grado, porque com um coração perfeito se ofereceu de bom grado a Javé; e David, o rei, também se regozijou com grande alegria.
या सर्व लोकांनी अगदी मनापासून स्वखुशीने परमेश्वरास अर्पण दिले. त्यामुळे सर्वानी आनंद केला. राजा दावीदही फार आनंदीत झाला.
10 Portanto, Davi abençoou Javé perante toda a assembléia; e Davi disse: “Tu és abençoado, Javé, o Deus de Israel, nosso pai, para todo o sempre”.
१०त्या समुदायापुढे दावीदाने परमेश्वराचे स्तुतिगीत म्हटले, “हे परमेश्वरा, इस्राएलाच्या देवा, आमच्या पित्या, सदासर्वकाळ तू धन्य आहेस.”
11 Yours, Iavé, é a grandeza, o poder, a glória, a vitória e a majestade! Pois tudo o que está nos céus e na terra é seu. Teu é o reino, Yahweh, e és exaltado como cabeça acima de tudo.
११हे परमेश्वरा, महिमा, पराक्रम, शोभा, विजय आणि वैभव ही सर्व तुझीच आहेत कारण आकाशात व पृथ्वीवर जे काही आहे ते तुझेच आहे. हे परमेश्वरा, हे राज्य तुझेच आहे. या सगळ्याहून उच्च पदास पोहचलेला तूच आहेस.
12 Tanto a riqueza como a honra vêm de você, e você governa sobre todos! Na tua mão está o poder e a força! Está em tua mão fazer grande e dar força a todos!
१२संपत्ती आणि सन्मानही तुझ्याकडून आहेत. तूच सर्वांवर अधिकार करतोस. सत्ता आणि सामर्थ्य तुझ्या हातांत आहे. कोणालाही थोर आणि बलवान करणे तुझ्याच हातात आहे.
13 Agora, portanto, nosso Deus, agradecemos-lhe e louvamos seu glorioso nome.
१३देवा, आम्ही तुझे आभार मानतो आणि तुझ्या प्रतापी नावाची स्तुती करतो.
14 Mas quem sou eu, e o que é meu povo, que devemos ser capazes de oferecer tão voluntariamente como isto? Pois tudo vem de você, e nós lhe demos o que é seu.
१४या सगळ्या गोष्टी स्वखुशीने अर्पण करण्याची शक्ती असणारा मी कोण? किंवा हे लोक तरी कोण? तुझ्यामुळेच त्या आमच्याकडे आल्या. तुझ्याकडून मिळाले तेच आम्ही तुला परत करत आहोत.
15 Pois somos estranhos diante de vocês e estrangeiros, como todos os nossos pais foram. Nossos dias na terra são como uma sombra, e não há mais nenhum remanescente.
१५आमच्या पूर्वजांप्रमाणेच आम्ही सुध्दा परदेशी व प्रवासी आहोत. आमचे पृथ्वीवरचे दिवस सावलीसारखे आहेत आणि पृथ्वीवर टिकून राहण्याची काही आशा नाही.
16 Yahweh nosso Deus, toda esta loja que preparamos para construir-lhe uma casa para seu santo nome vem de sua mão, e é toda sua.
१६हे परमेश्वरा, आमच्या देवा, तुझ्या पवित्र नावाच्या सन्मानासाठी तुझे मंदिर बांधायला या सगळ्या गोष्टी आम्ही जमा केल्या. ही सामग्री तुझ्यामुळेच प्राप्त झालेली आहे. जे आहे ते सगळे तुझेच आहे.
17 Eu sei também, meu Deus, que você experimenta o coração e tem prazer na retidão. Quanto a mim, na retidão do meu coração, ofereci todas estas coisas de bom grado. Agora vi com alegria seu povo, que está aqui presente, oferecer voluntariamente a você.
१७हे देवा, लोकांची अंतःकरणे तू पारखतोस आणि सरळपण तुला आवडते हे मी जाणतो. मी शुध्द आणि प्रामाणिक मनाने हे सगळे तुला आनंदाने अर्पण करत आहे. हे सगळे तुझे लोक इथे हजर आहेत आणि या सर्व वस्तू स्वखुशीने अर्पण केल्या आहेत हे मी आनंदाने पाहिले आहे.
18 Javé, o Deus de Abraão, de Isaac, e de Israel, nossos pais, guarda para sempre este desejo nos pensamentos do coração de teu povo, e prepara o coração deles para ti;
१८हे परमेश्वर अब्राहाम, इसहाक आणि इस्राएल या आमच्या पूर्वजांचा तूच देव आहेस. तू आपल्या लोकांच्या अंतःकरणाच्या ठायी हे विचार व या कल्पना निरंतर राहतील व त्यांची मने तुझ्याकडे लागतील असे कर.
19 e dá a Salomão meu filho um coração perfeito, para guardar teus mandamentos, teus testemunhos e teus estatutos, e para fazer todas estas coisas, e para construir o palácio, para o qual eu providenciei”.
१९माझा पुत्र शलमोन याने तुझ्या आज्ञा, नियम आणि विधी यांचे अंतःकरणपूर्वक पालन करावे, आणि या सर्व गोष्टी कराव्या आणि ज्या मंदिराची मी तयारी केली आहे ते बांधावे.
20 Então David disse a toda a assembléia: “Agora abençoe Yahweh seu Deus”! Toda a assembléia abençoou Javé, o Deus de seus pais, e se inclinaram e se prostraram diante de Javé e do rei.
२०तेथे जमलेल्या सर्व लोकांस दावीद म्हणाला, “आता आपल्या परमेश्वर देवाला धन्यवाद द्या.” तेव्हा आपल्या पूर्वजांनी ज्याची उपासना केली त्या परमेश्वरास लोकांनी धन्यवाद दिले. राजाच्या आणि परमेश्वराच्या सन्मानार्थ ते नतमस्तक झाले.
21 Eles sacrificaram sacrifícios a Iavé e ofereceram holocaustos a Iavé no dia seguinte, mesmo mil touros, mil carneiros e mil cordeiros, com suas ofertas de bebida e sacrifícios em abundância por todo Israel,
२१दुसऱ्या दिवशी लोकांनी परमेश्वरास यज्ञ अर्पण केले. त्यांनी होमार्पणे वाहिली. एक हजार बैल, एक हजार एडके, एक हजार कोकरे आणि त्याबरोबर पेयार्पणे त्यांनी अर्पण केली. शिवाय सर्व इस्राएलासाठी त्यांनी आणखीही पुष्कळच यज्ञ केले.
22 e comeram e beberam diante de Iavé naquele dia com grande alegria. Eles fizeram de Salomão o filho de Davi rei pela segunda vez, e o ungiram diante de Iavé para ser príncipe, e Zadoque para ser sacerdote.
२२मग परमेश्वरासमोर सर्व लोकांनी मोठ्या आनंदाने खाणेपिणे केले. दावीदाचा पुत्र शलमोन याला त्यांनी दुसऱ्यांदा राजा म्हणून परमेश्वरातर्फे अधिपती होण्यासाठी शलमोनाला आणि याजक म्हणून सादोकाला अभिषेक केला गेला.
23 Então Salomão sentou-se no trono de Iavé como rei em vez de Davi, seu pai, e prosperou; e todo Israel lhe obedeceu.
२३त्यानंतर परमेश्वराच्या राजासनावर शलमोन स्थानापन्न झाला. शलमोनाने आपला पिता दावीदाची जागा घेतली. राजा म्हणून तो यशस्वी ठरला. इस्राएलचे सर्व लोक शलमोनाचे आज्ञापालन करत.
24 Todos os príncipes, os homens poderosos e também todos os filhos do rei Davi se submeteram ao rei Salomão.
२४एकूणएक सरदार, सैनिक आणि राजा दावीदाची सर्व अपत्ये शलमोन राजाच्या अधीन झाले.
25 Yahweh engrandeceu Salomão de forma extraordinária aos olhos de todo o Israel, e lhe deu a majestade real que não havia sido sobre nenhum rei antes dele em Israel.
२५परमेश्वरने शलमोनाला सर्व इस्राएलाच्या देखत फार थोर केले. आणि पूर्वी इस्राएलाच्या कोणत्याही राजाला नव्हते असे राजाला ऐश्वर्य मिळाले.
26 Now David, o filho de Jesse, reinou sobre todo Israel.
२६इशायाचा पुत्र दावीद याने संपूर्ण इस्राएलावर चाळीस वर्षे राज्य केले.
27 O tempo em que ele reinou sobre Israel foi quarenta anos; ele reinou sete anos em Hebron, e ele reinou trinta e três anos em Jerusalém.
२७दावीदाने इस्राएलावर राज्य केले तो काळ चाळीस वर्षाचा होता. तो हेब्रोन नगरात सात वर्षे राजा होता. मग यरूशलेमामध्ये त्याची कारकीर्द तेहतीस वर्षांची होती.
28 Morreu com uma boa velhice, cheio de dias, riqueza e honra; e Salomão, seu filho, reinou em seu lugar.
२८पुढे वृध्द झाल्यावर दावीदाला मृत्यू आला. त्यास सफल आणि दीर्घ आयुष्य लाभले. वैभव आणि सन्मान यांची त्यास कमतरता नव्हती. त्यानंतर त्याच्या पुत्र शलमोन राजा झाला.
29 Agora os atos do rei Davi, primeiro e último, eis que estão escritos na história de Samuel, o vidente, e na história de Natã, o profeta, e na história de Gad, o vidente,
२९राजा दावीदाचा इतिहास पहिल्यापासून शेवटपर्यंत संदेष्टा शमुवेल याच्या ग्रंथात आणि संदेष्टा नाथानाच्या ग्रंथात तसेच गाद या संदेष्ट्याच्या ग्रंथात लिहिलेला आहे.
30 com todo seu reinado e seu poder, e os eventos que o envolveram, Israel, e todos os reinos das terras.
३०त्याचे पराक्रम आणि त्याची कारकीर्द, इस्राएल आणि सर्व देश यांच्यावर या काळात आलेले प्रसंग याची हकीकत या ग्रंथांमध्ये आहे.

< 1 Crônicas 29 >