< Naum 1 >
1 Revelação sobre Nínive. Livro da visão de Naum o elcosita.
१निनवे शहराविषयीची घोषणा. एल्कोशी नहूम याच्या दृष्टांताचे पुस्तक.
2 O SENHOR é Deus zeloso e vingador; o SENHOR é vingador e furioso; o SENHOR se vinga de seus adversários, e que guarda [ira] contra seus inimigos.
२परमेश्वर हा ईर्ष्यावान व सूड घेणारा देव आहे; परमेश्वर सूड घेणारा व क्रोधयुक्त देव आहे. परमेश्वर आपल्या विरोध्यांचा बदला घेतो आणि तो आपल्या शत्रूंसाठी क्रोध राखून ठेवतो.
3 O SENHOR é tardio para se irar, porém grande em poder; e não terá [ao culpado] por inocente. O SENHOR caminha entre a tempestade e o turbilhão, e as nuvens são o pó de seus pés.
३परमेश्वर रागवण्यास मंद आणि महापराक्रमी आहे; त्याच्या शत्रूंना तो निरापराध ठरवणार नाही. परमेश्वर झंझावातातून आणि वादळातून त्याचे मार्ग काढतो आणि मेघ त्याच्या चरणाची धूळ आहेत.
4 Ele repreende o mar, e o faz secar; e deixa secos todos os rios. Basã e o Carmelo se definham, e a flor do Líbano murcha.
४तो समुद्राला दटावतो आणि त्यास कोरडा करतो; तो सर्व नद्या कोरड्या करतो. बाशान व कर्मेलसुद्धा गळून जातील; लबानोनाचा फुलवरा कोमेजून जातो.
5 Os montes tremem diante dele, e os morros se derretem; e a terra se abala em sua presença, e o mundo, e todos os que nele habitam.
५त्याच्या उपस्थितीने पर्वत हलतात आणि टेकड्या वितळून जातात; त्याच्या उपस्थितीने पृथ्वी कोसळते, खरोखर हे जग आणि त्यामध्ये राहणारा प्रत्येक मनुष्य थरथरतो.
6 Quem pode subsistir diante de seu furor? E quem pode persistir diante do ardor de sua ira? Seu furor se derrama como fogo, e as rochas se partem diante dele.
६त्याच्या क्रोधापुढे कोण उभा राहू शकेल? त्याच्या क्रोधाच्या संतापाचा कोण प्रतिकार करू शकेल? त्याचा क्रोध अग्नीप्रमाणे ओतलेला आहे आणि त्याच्यामुळे खडक फुटून जातात.
7 O SENHOR é bom, é fortaleza no dia da angústia; ele conhece os que nele confiam.
७परमेश्वर चांगला आहे, संकटसमयी तो शरणदुर्ग आहे आणि जे त्याच्या ठायी आश्रय घेतात त्यांना तो जाणतो.
8 Mas com inundação impetuosa ele acabará com Nínive, e perseguirá seus inimigos até às trevas.
८पण तो त्याच्या शत्रूंचा पूर्णपणे महापुराने नाश करील; तो त्यांचा पाठलाग करून अंधारात उधळून लावील.
9 O que vós tramais contra o SENHOR, ele mesmo destruirá; a angústia não se levantará duas vezes.
९तुम्ही लोक परमेश्वराविरुध्द काय योजना करत आहात? पण तो त्याचा पूर्ण अंत करील; दुसऱ्यांदा विपत्ती उठणारच नाही.
10 Mesmo estando entretecidos como espinhos, e embriagados como beberrões, eles serão consumidos como a palha seca.
१०ते गुंतागुंत झालेल्या काटेरी झुडपाप्रमाणे, आपल्या स्वत: च्या पिण्याने मस्त झालेले असले तरी ते वाळलेल्या धसकटाप्रमाणे भस्म होतील.
11 De ti saiu um que trama o mal contra o SENHOR, um conselheiro maligno.
११जो परमेश्वराविरुध्द वाईट योजना करतो, दुष्कर्माला बढती देतो असा कोणी एक निनवेतून निघाला आहे.
12 Assim diz o SENHOR: Ainda que sejam prósperos, e muitos em número, mesmo assim eles serão exterminados, e passarão. Eu te afligi, [Judá], porém não te afligirei mais.
१२परमेश्वराने जे काय म्हटले ते हेः जसे परमेश्वराने म्हटले, जरी ते त्यांच्या संपूर्ण बलाने आणि संख्येने पुष्कळ असले तरीसुद्धा ते छेदले जाऊन त्यांचे लोक नाहीसे होतील. परंतु तू यहूदा, जसे परमेश्वराने म्हटले; जरी मी तुला पीडले आहे तरी पुढे मी तुला पीडणार नाही.
13 Mas agora quebrarei seu jugo de sobre ti, e romperei tuas amarras.
१३तर आता मी त्यांचे जोखड तुझ्यावरून मोडून काढीन व तुझी बंधने तोडून टाकीन.
14 Porém contra ti, [assírio], o SENHOR mandou que nunca mais seja gerado alguém de teu nome; da casa de teu deus arrancarei as imagens de escultura e de fundição. Farei para ti um sepulcro, porque tu és desprezível.
१४आणि परमेश्वराने तुझ्याबद्दल आज्ञा दिली आहे की, निनवे, तुझे नाव धारण करणारे तुझ्या वंशातील कोणीही उरणार नाही. मी तुझ्या देवाच्या मंदिरातील कोरलेल्या मूर्ती व ओतीव मूर्ती छेदून टाकीन. मी तुझी कबर खोदून काढील, कारण तू दुष्ट आहेस.
15 Eis que sobre os montes estão os pés daquele que anuncia boas novas, do que faz ouvir a paz. Celebra tuas festas, Judá; cumpre os teus votos, porque nunca mais o maligno passará por ti; ele foi exterminado por completo.
१५पाहा, जो सुवार्ता आणतो, शांती जाहीर करतो! असा जो त्याचे पाय पर्वतांवर आहेत, यहूदा आपले सण साजरे कर, आपले नवस फेड, दुष्ट तुझ्यावर पुन्हा हल्ला करणार नाही, त्याचा समूळ उच्छेद झाला आहे.