< Jó 22 >
1 Então Elifaz, o temanita, respondeu, dizendo:
१मग अलीफज तेमानीने उत्तर दिले व तो म्हणाला,
2 Por acaso o homem será de [algum] proveito a Deus? Pode ele se beneficiar de algum sábio?
२“देवासाठी मनुष्य उपयुक्त होऊ शकेल काय? ज्ञानी मनुष्य देवाला उपयोगी होऊ शकतो काय?
3 É útil ao Todo-Poderoso que sejas justo? Ganha ele algo se os teus caminhos forem íntegros?
३तुमच्या धार्मिक जगण्याने सर्वसमर्थाला काही आनंद होतो काय? तू चांगला राहीलास तर त्यास काही लाभ होईल काय?
4 Acaso ele te repreende [e] vem contigo a juízo por causa da tua reverência?
४तो तुझा भक्तीभाव पाहून तुझा निषेध करतो आणि तुला न्यायाकडे नेतो का?
5 [Ou] não será por causa de tua grande malícia, e de tuas maldades que não têm fim?
५तुझे पाप मोठे नाही काय? तुझ्या दुष्टाईला अंत नाही ना?
6 Porque tomaste penhor a teus irmãos sem causa, e foste tu que tiraste as roupas dos nus.
६तू विनाकारण आपल्या भावाचे गहाण अडकवून ठेवले, उघड्यांची वस्त्रे तू हिरावून घेतली.
7 Não deste de beber água ao cansado, e negaste o pão ao faminto.
७तू थकलेल्यास पाणी दिले नाही आणि भुकेल्या लोकांस अन्न दिले नाही.
8 Porém o homem poderoso teve a terra; e o homem influente habitava nela.
८जरी तू, शक्तीमान मनुष्य असशील, सर्व भूमी तुझी असेल, जरी तू एक सन्मानीत मनुष्य असशील.
9 Às viúvas despediste vazias, e os braços dos órfãos foram quebrados.
९तू विधवांना काहीही न देता घालवून दिले असशील, पोरक्याचे बाहू मोडले असशील.
10 Por isso que há laços ao redor de ti, e espanto repentino te perturbou;
१०म्हणूनच तुझ्या भोवती सापळे आहेत आणि अचानक आलेल्या संकटानी तू घाबरुन जात आहेस.
11 Ou trevas, para que não vejas; e inundação de água te cobre.
११म्हणूनच सर्वत्र इतका अंधार आहे की तुला काही दिसत नाही आणि तू पुराच्या पाण्याने चोहोबाजूंनी वेढला आहेस.
12 Por acaso Deus não está na altura dos céus? Olha, pois, para o cume das estrelas, como estão elevadas.
१२देव उंच स्वर्गात नाही काय? तारे किती उंचावर आहेत ते बघ, ते कीती उंच आहेत.
13 Porém tu dizes: O que Deus sabe? Como ele julgará por entre a escuridão?
१३आणि तू म्हणतो देवाला काय माहीती आहे? दाट अंधाराच्या आडून तो कसा न्याय करतो.
14 As nuvens são seu esconderijo, e ele não vê; ele passeia pela abóbada do céu.
१४दाट ढग त्यास झाकत आहेत, म्हणजे त्याने आपल्याला बघू नये.
15 Por acaso deste atenção para o velho caminho que pisaram os homens injustos?
१५तू जूनाच मार्ग धरणार आहेस काय, ज्यावर दुष्टजण चालले.
16 Tais foram cortados antes de tempo; [sobre] o fundamento deles foi derramada uma enchente.
१६त्यांची वेळ येण्यापूर्वीच त्यांचा नाश करण्यात आला, त्यांचा पाया नदीसारखा वाहून गेला.
17 Eles diziam a Deus: Afasta-te de nós! O que o Todo-Poderoso pode fazer por nós?
१७जे देवाला म्हटले, ‘आमच्या पासून निघून जा तो सर्वशक्तिमान देव आम्हास काय करु शकतो?’
18 Sendo ele o que havia enchido suas casas de bens. Seja, porém, longe de mim o conselho dos perversos.
१८आणि त्यानेच त्यांची घरे चांगल्या वस्तूंनी भरली होती. परंतू दुष्टाची योजना माझ्यापासुन दूर आहे.
19 Os justos virão e se alegrarão; e o inocente os escarnecerá,
१९धार्मिक त्यांचा नाश पाहून संतोष पावतील. निर्दोष त्यांचा उपहास करतात.
20 [Dizendo]: Certamente nossos adversários foram destruídos, e o que sobrou deles o fogo consumiu.
२०आणि म्हणतात खरोखरच आमच्या विरूद्ध जे उठले त्यांचा नाश झाला आहे. त्यांची संपत्ती आगीत नष्ट होत आहे.
21 Reconcilia-te, pois, com [Deus], e terás paz; assim o bem virá a ti.
२१तू आता देवाला शरण जा. त्याच्याशी सलोखा कर. तू हे केलेस तर तुला खूप चांगल्या गोष्टी मिळतील.
22 Aceita, pois, a instrução de sua boca, e põe suas palavras em teu coração.
२२मी तुला विनंती करतो त्याच्या तोंडच्या सूचनांचा स्विकार कर. त्याचे शब्द आपल्या हृदयात ठेव.
23 Se te converteres ao Todo-Poderoso, serás edificado; se afastares a maldade de tua tenda,
२३तू सर्वशक्तिमान देवाकडे परत येशील, तर तुझी बांधणी होईल. जर तू अधार्मीकता आपल्या तंबूपासून दूर ठेवशील.
24 E lançares [teu] ouro no pó, o [ouro] de Ofir junto às rochas dos ribeiros,
२४तुझ्याजवळ असलेल्या संपत्तीला मातीमोल मानशील, तू तुझ्या सर्वात चांगल्या ओफीरच्या सोन्याला दरीतल्या दगडाएवढी किंमत देशील.
25 Então o próprio Todo-Poderoso será teu ouro, e tua prata maciça.
२५म्हणजे सर्वशक्तिमान देवच तुझे धन असा होईल आणि तो तुला मोलवान रूपे असा होईल.
26 Porque então te deleitarás no Todo-Poderoso, e levantarás teu rosto a Deus.
२६तेव्हा तू सर्वशक्तिमानच्या ठायी आनंद पावशील, तू तुझे मुख देवाकडे वर करशील.
27 Orarás a ele, e ele te ouvirá; e tu [lhe] pagarás teus votos.
२७तू त्याची प्रार्थना करशील आणि तो तुझे ऐकेल आणि तू आपले नवस फेडशील.
28 Aquilo que tu determinares se cumprirá a ti, e em teus caminhos a luz brilhará.
२८जी गोष्ट तू मनात आणशील तेव्हा ती सिध्दीस जाईल. प्रकाश तुझ्या मार्गात चमकेल.
29 Quando [alguém] for abatido, e tu disseres: Haja exaltação, Então [Deus] salvará ao humilde.
२९देव गर्वीष्ठांना नम्र करील, आणि तो नम्र लोंकाची सुटका करील.
30 Ele libertará até ao que não é inocente, que será livrado pela pureza de tuas mãos.
३०जो निर्दोष नाही त्यालाही तो वाचवतो, तुझ्या हाताच्या निर्मळतेमुळे ते बचावले जातील.”