< Ezequiel 2 >
1 E Disse-me: Filho do homem, fica de pé, e falarei contigo.
१ती वाणी मला म्हणाली; “मानवाच्या मुला, आपल्या पायांवर उभा राहा; मग मी तुझ्याशी बोलेन.”
2 Então entrou em mim o Espírito enquanto falava comigo, e fez-me ficar de pé, e ouvi àquele que estava falando comigo.
२जेव्हा ती वाणी माझ्याशी बोलली तेव्हा देवाच्या आत्म्याने मला माझ्या पायावर उभे केले आणि मी त्यास माझ्याशी बोलताना ऐकले.
3 E disse-me: Filho do homem, eu te envio aos filhos de Israel, às nações rebeldes que se rebelaram contra mim; eles e seus pais têm transgredido contra mim até este dia de hoje.
३इस्राएलाच्या लोकांजवळ मानवाच्या मुला, मी तुला पाठवत आहे ती वाणी मला म्हणाली. बंडखोर देशाजवळ ज्या राष्ट्रांनी माझ्याशी बंड केले, पहिल्यापासून त्यांनी आणि त्यांच्या पुर्वीच्या पिढ्यांनी माझ्या विरुध्द पाप केले आहे.
4 Pois são filhos duros de rosto e obstinados de coração; eu te envio a eles; e tu lhes dirás: Assim diz o Senhor DEUS.
४त्यांच्या पूर्व पिढीचे लोक हट्टी आणि कठीण मनाचे होते, मी तुला त्यांच्या जवळ पाठवत आहे. आणि हे परमेश्वर देव त्यांच्याशी बोलत आहे. असे त्यांना तू सांग.
5 E eles, quer ouçam, quer deixem [de ouvir], (pois são uma casa rebelde) mesmo assim saberão que houve profeta entre eles.
५ते तुझे ऐकतील किंवा ऐकणार नाही, ते फितुर झालेले आहेत. परंतू संदेष्टा त्यांच्याकडे आला होता असे त्यांना कदाचित कळून येईल.
6 E tu, filho do homem, não os temas, nem temas suas palavras, ainda que estejas entre sarças e espinheiros, e tu habites com escorpiões; não temas suas palavras, nem te espantes pela presença deles, ainda que sejam uma casa rebelde.
६त्यांच्या भोवती काटे विंचवांना व त्यांच्या शब्दांना मानवाच्या मुला भयभीत होऊ नको; त्यांच्या तोंडाकडे बघून तू गोंधळून जाऊ नको; पहील्यापासून ते फितुर आहेत.
7 Tu falarás minhas palavras, quer ouçam, quer deixem [de ouvir]; pois são rebeldes.
७पण तू माझा शब्द त्यांना सांग; ते तुझे ऐको किंवा न ऐको कारण ते फार फितुर आहेत.
8 Porém tu, filho do homem, ouve o que eu te falo; não sejas rebelde como a casa rebelde; abre a tua boca, e come o que eu te dou.
८परंतू मी जे तुला मानवाच्या मुला बोलायला सांगत आहे ते ऐक त्या फितुर जातीच्या लोकांसारखे फितुर होऊ नको. आपले तोंड उघड आणि मी देतो ते खा!
9 Então eu vi e eis que uma mão foi estendida para mim, e eis que nela havia um rolo de livro.
९माझ्याकडे एक हात येत आहे असे मी पाहिले; आणि पाहा, पुस्तकाची एक गुंडाळी त्यामध्ये होती.
10 E o estendeu diante de mim, e estava escrito pela frente, e por detrás: e nele estavam escritas lamentações, suspiros, e ais.
१०तो माझ्या पुढे लांबवर पसरत आला; त्यांच्या मागे पुढे दुःख, आकांताचा लेख लिहिलेला होता.