< Salmos 66 >
1 Jubilai a Deus, todas as terras.
१अहो पृथ्वीवरील सर्वजणहो देवाचा जयजयकार करा;
2 Cantai a glória do seu nome; dai glória ao seu louvor.
२त्याच्या नावाचा महिमा गा; त्याची स्तुती गौरवशाली होईल अशी करा.
3 Dizei a Deus: Quão terrível és tu nas tuas obras! pela grandeza do teu poder se submeterão a ti os teus inimigos.
३देवाला म्हणा, तुझी कृत्ये किती भीतिदायक आहेत, तुझ्या महान सामर्थ्यामुळे तुझे शत्रू तुझ्या स्वाधीन होतात.
4 Toda a terra te adorará e te cantará louvores: eles cantarão o teu nome (Selah)
४सर्व पृथ्वी तुझी आराधना करतील; आणि तुझी स्तोत्रे गातील; ते तुझ्या नावाची स्तोत्रे गातील.
5 Vinde, e vede as obras de Deus: é terrível nos seus feitos para com os filhos dos homens.
५अहो या, आणि देवाची कार्ये पहा; तो मनुष्यांच्या मुलांस आपल्या कृत्यांनी धाक बसवतो.
6 Converteu o mar em terra seca; passaram o rio a pé; ali nos alegramos nele.
६त्याने समुद्र पालटून कोरडी भूमी केली; ते नदीतून पायांनी चालत गेले; तेथे आम्ही त्याच्यात आनंद केला.
7 Ele domina eternamente pelo seu poder: os seus olhos estão sobre as nações; não se exaltem os rebeldes (Selah)
७तो आपल्या सामर्थ्याने सर्वकाळ राज्य करतो; तो आपल्या डोळ्यांनी सर्व राष्ट्रांचे निरीक्षण करतो; बंडखोरांनी आपल्यास उंच करू नये.
8 Bendizei, povos, ao nosso Deus, e fazei ouvir a voz do seu louvor:
८अहो लोकांनो, आमच्या देवाला धन्यवाद द्या, आणि त्याची स्तुती ऐकू येईल अशी करा.
9 Ao que sustenta com vida a nossa alma, e não consente que sejam abalados os nossos pés.
९तो आमचा जीव राखून ठेवतो, आणि तो आमचे पाय सरकू देत नाही.
10 Pois tu, ó Deus, nos provaste; tu nos afinaste como se afina a prata.
१०कारण हे देवा, तू आमची परीक्षा केली आहे; रुप्याची परीक्षा करतात तशी तू आमची परीक्षा केली आहे.
11 Tu nos meteste na rede; afligiste os nossos lombos.
११तू आम्हास जाळ्यात आणले; तू आमच्या कमरेवर अवजड ओझे ठेवले.
12 Fizeste com que os homens cavalgassem sobre as nossas cabeças; passamos pelo fogo e pela água; mas nos trouxeste a um lugar copioso.
१२तू आमच्या डोक्यावरून लोकांस स्वारी करण्यास लावले. आम्ही अग्नीतून आणि पाण्यातून गेलो, परंतु तू आम्हास बाहेर काढून प्रशस्त जागी आणले.
13 Entrarei em tua casa com holocaustos; pagar-te-ei os meus votos.
१३मी होमार्पणे घेऊन तुझ्या घरात येईन; मी तुला केलेले नवस फेडीन.
14 Os quais pronunciaram os meus lábios, e falou a minha boca, quando estava na angústia.
१४संकटात असता जे मी आपल्या ओठांनी उच्चारले आणि जे मी आपल्या तोंडाने बोलल,
15 Oferecer-te-ei holocaustos gordurosos com incenso de carneiros; oferecerei novilhos com cabritos (Selah)
१५मी तुला मेंढ्याच्या धूपासहित पुष्ट पशूंचे होमार्पणे मी तुला अर्पीण; बोकड आणि गोऱ्हे अर्पीण.
16 Vinde, e ouvi, todos os que temeis a Deus, e eu contarei o que ele tem feito à minha alma.
१६जे सर्व तुम्ही देवाचे भय धरता, या आणि ऐका, आणि त्याने माझ्यासाठी काय केले ते मी तुम्हास सांगतो.
17 A ele clamei com a minha boca, e ele foi exaltado pela minha língua.
१७मी माझ्या मुखाने त्याचा धावा केला, आणि माझ्या जीभेवर त्याची स्तुती होती.
18 Se eu atender à iniquidade no meu coração, o Senhor não me ouvirá;
१८जर माझ्या मनात अन्यायाकडे मी पाहिले असते, तर प्रभूने माझे ऐकले नसते.
19 Mas, na verdade, Deus me ouviu; atendeu à voz da minha oração.
१९पण देवाने खचित ऐकले आहे; त्याने माझ्या प्रार्थनेच्या वाणीकडे लक्ष दिले आहे.
20 Bendito seja Deus, que não rejeitou a minha oração, nem desviou de mim a sua misericórdia.
२०देवाचा धन्यवाद होवो, त्याने माझ्या प्रार्थनांपासून आपले मुख फिरविले नाही, किंवा त्याच्या कराराच्या विश्वासूपणापासून आपली दृष्टी वळविली नाही.