< Salmos 56 >
1 Tem misericórdia de mim, ó Deus, porque o homem procura devorar-me; pelejando todo o dia, me oprime.
१दाविदाचे स्तोत्र हे देवा, माझ्यावर दया कर, कारण कोणीतरी मला गिळून टाकण्याची इच्छा करतो; दिवसभर तो माझ्याशी लढतो आणि अत्याचार करतो.
2 Os que me andam espiando procuram devorar-me todo o dia; pois são muitos os que pelejam contra mim, ó altíssimo.
२माझे शत्रू दिवसभर मला गिळून टाकण्याची इच्छा करतात; कारण उद्धटपणे माझ्याविरूद्ध लढणारे अनेक आहेत.
3 Em qualquer tempo que eu temer, me confiarei de ti.
३मी जेव्हा घाबरतो, तेव्हा मी तुझ्यावर भरंवसा ठेवीन.
4 Em Deus louvarei a sua palavra, em Deus pus a minha confiança; não temerei o que me possa fazer a carne.
४मी देवाच्या मदतीने, त्याच्या वचनाची स्तुती करीन, मी देवावर भरवसा ठेवला आहे; मी भिणार नाही. मनुष्य माझे काय करील?
5 Todos os dias torcem as minhas palavras: todos os seus pensamentos são contra mim para o mal.
५दिवसभर ते माझ्या शब्दांचा विपरित अर्थ करतात; त्यांचे सर्व विचार माझ्याविरूद्ध माझ्या वाईटासाठी असतात.
6 Ajuntam-se, escondem-se, marcam os meus passos, como aguardando a minha alma.
६ते एकत्र जमतात, ते लपतात आणि माझ्या पावलावर लक्ष ठेवतात, जसे ते माझा जीव घेण्यासाठी वाट पाहतात.
7 Porventura escaparão eles por meio da sua iniquidade? Ó Deus, derriba os povos na tua ira!
७त्यांना अन्याय करण्यापासून निसटून जाऊ देऊ नको. हे देवा, तुझ्या क्रोधाने त्यांना खाली आण.
8 Tu contas as minhas vagueações; põe as minhas lágrimas no teu odre: não estão elas no teu livro?
८तू माझ्या भटकण्याची ठिकाणे मोजली आहेत आणि माझे अश्रू आपल्या बाटलित ठेवली आहेत; तुझ्या पुस्तकात त्याची नोंद नाही का?
9 Quando eu a ti clamar, então voltarão para traz os meus inimigos: isto sei eu, porque Deus é por mim.
९मी तुला हाक मारीन त्यादिवशी माझे शत्रू मागे फिरतील; हे मला माहित आहे, देव माझ्या बाजूचा आहे.
10 Em Deus louvarei a sua palavra: no Senhor louvarei a sua palavra.
१०मी देवाच्या साहाय्याने त्याच्या वचनाची स्तुती करीन. मी परमेश्वराच्या साहाय्याने त्याच्या वचनाची स्तुती करीन.
11 Em Deus tenho posto a minha confiança; não temerei o que me possa fazer o homem.
११मी देवावर भरंवसा ठेवीन; मी भिणार नाही; मनुष्य माझे काय करील?
12 Os teus votos estão sobre mim, ó Deus: eu te renderei ações de graças;
१२हे देवा, तुझे नवस पूर्ण करण्याचे कर्तव्य माझ्यावर आहे; मी तुला धन्यवादाची अर्पणे देईन.
13 Pois tu livraste a minha alma da morte; não livrarás os meus pés da queda, para andar diante de Deus na luz dos viventes?
१३कारण तू माझे जीवन मृत्यूपासून सोडवले आहे; तू माझे पाय पडण्यापासून राखले, यासाठी की, मी जीवनाच्या प्रकाशात देवापुढे चालावे.