< Salmos 55 >

1 Inclina ó Deus os teus ouvidos à minha oração, e não te escondas da minha súplica.
मुख्य गायकासाठी; तंतूवाद्दावरचे दाविदाचे स्तोत्र. हे देवा, माझ्या प्रार्थनेकडे कान लाव, आणि माझ्या विणवनीपासून लपू नकोस.
2 Atende-me, e ouve-me: lamento na minha queixa, e faço ruído,
देवा, माझ्याकडे लक्ष लाव आणि मला उत्तर दे माझ्या संकटात मला विसावा नाही.
3 Pelo clamor do inimigo e por causa da opressão do ímpio: pois lançou sobre mim a iniquidade, e com furor me aborrecem.
माझ्या शत्रूंच्या आवाजामुळे, दुष्टाच्या जुलूमामुळे मी कण्हत आहे, कारण ते माझ्यावर संकट आणतात, आणि द्वेषात माझा पाठलाग करतात.
4 O meu coração está dolorido dentro de mim, e terrores da morte cairam sobre mim.
माझे हृदय फार दुखणाईत आहे, आणि मृत्यूचे भय माझ्यावर येऊन पडले आहे.
5 Temor e tremor vieram sobre mim; e o horror me cobriu.
भय आणि थरथरने माझ्यावर आली आहेत, आणि भयाने मला ग्रासले आहे.
6 Pelo que disse: Oh! quem me dera asas como de pomba! porque então voaria, e estaria em descanço.
मला कबूतरासारखे पंख असते तर किती बरे झाले असते. मी दूर उडून गेलो असतो आणि स्वस्थ राहिलो असतो.
7 Eis que fugiria para longe, e pernoitaria no deserto (Selah)
मी खूप दूर भटकत गेलो असतो. मी रानात राहिलो असतो.
8 Apressar-me-ia a escapar da fúria do vento e da tempestade.
वादळी वाऱ्यापासून मला आश्रय मिळावा म्हणून मी लवकर पळालो असतो.
9 Despedaça, Senhor, e divide as suas línguas, pois tenho visto violência e contenda na cidade.
प्रभू, त्यांना नाश कर, आणि त्यांच्या भाषेत गोंधळ निर्माण कर. कारण मी शहरात हिंसा आणि भांडणे पाहिली आहेत.
10 De dia e de noite a cercam sobre os seus muros; iniquidade e malícia estão no meio dela.
१०दिवस रात्र ते भींतीवर चढून जातात; अपराध आणि अनर्थ तिच्यामध्ये आहेत.
11 Maldade há dentro dela: astúcia e engano não se apartam das suas ruas.
११दुष्टपणा तिच्यामध्ये कार्य करत आहे, जुलूम आणि कपट कधीही तिच्या रस्त्यांना सोडत नाही.
12 Pois não era um inimigo que me afrontava: então eu o houvera suportado: nem era o que me aborrecia que se engrandecia contra mim, porque dele me teria escondido.
१२कारण जर माझ्या शत्रूंनी मला दोष लावला असता तर तर मला कळून आले असते, किंवा माझा द्वेष करणारा जो माझ्याविरूद्ध उठला असता, तर मी स्वतःला त्याजपासून लपवले असते.
13 Mas eras tu, homem meu igual, meu guia e meu intimo amigo.
१३परंतु मला संकटात टाकणारा तू आहेस, माझा मित्र, माझा साथीदार, माझा दोस्त.
14 Consultávamos juntos suavemente, e andavamos em companhia na casa de Deus.
१४एकमेकांसोबत आपली गोड सहभागिता होती. आपण समुदायांबरोबर चालत देवाच्या घरात जात होतो.
15 A morte os assalte, e vivos desçam ao inferno; porque há maldade nas suas habitações e no meio deles. (Sheol h7585)
१५मृत्यू त्यांच्यावर अकस्मात येवो. जीवंतपणी ते मृतलोकांत खाली जावोत. कारण त्यांच्या जगण्यात दुष्टपण आहे. (Sheol h7585)
16 Porém eu invocarei a Deus, e o Senhor me salvará.
१६मी तर देवाला हाक मारीन, आणि परमेश्वर मला तारील.
17 De tarde e de manhã e ao meio dia orarei; e clamarei, e ele ouvirá a minha voz.
१७मी देवाशी सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी आपले गाऱ्हाणे करेन आणि कण्हेन. आणि तो माझी वाणी ऐकेल.
18 Livrou em paz a minha alma da peleja que havia contra mim; pois havia muitos comigo.
१८माझ्याविरूद्ध लढाणाऱ्यांपासून त्याने मला खंडूण, माझा जीव शांततेत ठेवला आहे. कारण माझ्याविरूद्ध लढणारे पुष्कळ होते.
19 Deus ouvirá, e os afligirá, aquele que preside desde a antiguidade (Selah) porque não há neles nenhuma mudança, e portanto não temem a Deus
१९देव, जो पुरातन काळापासून आहे, तो ऐकणार आणि त्यांना प्रतिसाद देणार, (सेला) ते मनुष्ये बदलत नाहीत; ती देवाला भीत नाहीत.
20 Ele pôs as suas mãos naqueles que tem paz com ele: quebrou a sua aliança.
२०माझ्या मित्रांनी त्याच्या सोबत शांतीने राहणाऱ्यांवर आपला हात उगारला आहे. त्याने आपला करार मोडला आहे.
21 As palavras da sua boca eram mais macias do que a manteiga, mas havia guerra no seu coração: as suas palavras eram mais brandas do que o azeite: contudo, eram espadas nuas.
२१त्यांचे तोंड लोण्यासारखे आहे, परंतू त्याचे हृदय शत्रुत्व करणारेच आहे. त्यांचे शब्द तेलापेक्षा बुळ्बुळीतआहेत, तरी ते बाहेर काढलेल्या तलवारी सारखे आहे.
22 Lança a tua carga sobre o Senhor, e ele te susterá: não permitirá nunca que o justo seja abalado.
२२तू आपला भार परमेश्वरावर टाक, म्हणजे तो तुला आधार देईल. तो नितीमानाला कधी पडू देणार नाही.
23 Mas tu, ó Deus, os farás descer ao poço da perdição; homens de sangue e de fraude não viverão metade dos seus dias; mas eu em ti confiarei.
२३परंतू हे देवा, तू त्यांना नाशाच्या खांचेत पाडून टाकशील; घातकी आणि कपटी मनुष्ये आपले अर्धे आयुष्यही जगणार नाहीत, परंतू मी तुझ्यावर विश्वास ठेवीन.

< Salmos 55 >