< Salmos 13 >
1 Até quando te esquecerás de mim, Senhor? para sempre? até quando esconderás de mim o teu rosto?
१मुख्य गायकासाठी; दाविदाचे स्तोत्र. हे परमेश्वरा, तू मला आणखी किती काळ विसरून जाणार आहेस? किती वेळ तू आपले मुख माझ्यापासून लपवणार आहे?
2 Até quando consultarei com a minha alma, tendo tristeza no meu coração cada dia? Até quando se exaltará sobre mim o meu inimigo?
२पूर्ण दिवस माझ्या हृदयात दु: ख असता, किती काळ मी माझ्या जीवाबद्दल चिंता करू? किती काळ माझे शत्रू माझ्यावर वर्चस्व करणार?
3 Atende-me, ouve-me, ó Senhor meu Deus; alumia os meus olhos para que eu não adormeça na morte;
३हे परमेश्वरा, माझ्या देवा, माझ्याकडे बघ, माझ्या प्रश्नांचे उत्तर दे. मला मृत्यू निद्रा येऊ नये म्हणून, माझे डोळे प्रकाशीत कर.
4 Para que o meu inimigo não diga: Prevaleci contra ele; e os meus adversários se não alegrem, vindo eu a vacilar.
४मी त्याच्यावर विजय मिळवला असे माझ्या शत्रूला बोलू देऊ नको. म्हणजे माझा शत्रू असे म्हणणार नाही की, मी त्यावर विजय मिळविला आहे. नाहीतर माझे शत्रू मी ढळलो म्हणून उल्लासतील.
5 Mas eu confio na tua benignidade: na tua salvação se alegrará o meu coração.
५परंतु मी तुझ्या प्रेमदयेवर विश्वास ठेवला आहे. माझे हृदय तुझ्या तारणात हर्ष पावते.
6 Cantarei ao Senhor, porquanto me tem feito muito bem.
६मी परमेश्वरासाठी गाईन, कारण त्याने मला फार उदारपणे वागवले आहे.