< Levítico 3 >
1 E se a sua oferta for sacrifício pacífico: se a oferecer de gado macho ou fêmea, a oferecerá sem mancha diante do Senhor.
१जर कोणाला शांत्यर्पणाचा यज्ञ करावयाचा असेल तर त्याने गुरांढोरापैकी दोष नसलेला नर किंवा मादी परमेश्वरासमोर अर्पावा.
2 E porá a sua mão sobre a cabeça da sua oferta, e a degolará diante da porta da tenda da congregação: e os filhos de Aarão, os sacerdotes, espargirão o sangue sobre o altar em roda
२त्याने त्याच्या अर्पणाच्या पशूच्या डोक्यावर आपला हात ठेवावा व दर्शनमंडपाच्या दारापाशी त्याचा वध करावा; मग अहरोनाचे पुत्र जे याजक आहेत त्यांनी त्याचे रक्त वेदीवर व सभोवती शिंपडावे.
3 Depois oferecerá do sacrifício pacífico a oferta queimada ao Senhor; a gordura que cobre a fressura, e toda a gordura que está sobre a fressura.
३परमेश्वरास शांत्यर्पण हे अग्नीद्वारे केलेले अर्पण होय. याजकाने पशूच्या आंतड्यावरील चरबी व त्यास लागून असलेली सर्व चरबी,
4 Então ambos os rins, e a gordura que está sobre eles, e sobre as tripas, e o redenho que está sobre o fígado com os rins, tirará.
४दोन्ही गुरदे, त्यांच्यावरची कमरेजवळची चरबी, आणि काळजाच्या पडद्यावरील चरबी हे सर्व काढावे
5 E os filhos de Aarão o queimarão sobre o altar, em cima do holocausto, que estará sobre a lenha que está no fogo: oferta queimada é de cheiro suave ao Senhor.
५व या सर्वांचा अहरोनाच्या मुलांनी वेदीवरील विस्तवावर रचलेल्या लाकडावरील होमार्पणावर त्याचा होम करावा; हे परमेश्वरासाठी केलेले सुवासीक हव्य होय हे अग्नीद्वारे केलेले अर्पण आहे.
6 E, se a sua oferta for de gado miúdo por sacrifício pacífico ao Senhor, seja macho ou fêmea, sem mancha o oferecerá.
६परमेश्वराकरिता कोणाला शांत्यर्पणासाठी शेरडांमेढरांचे अर्पण आणावयाचे असेल तर ते कळपातून दोष नसलेल्या नराचे किंवा मादीचे असावे.
7 Se oferecer um cordeiro por sua oferta, oferece-lo-á perante o Senhor;
७जर त्यास कोकरू अर्पण करावयाचे असेल तर त्याने ते परमेश्वरासमोर आणून अर्पावे.
8 E porá a sua mão sobre a cabeça da sua oferta, e a degolará diante da tenda da congregação; e os filhos de Aarão espargirão o seu sangue sobre o altar em redor.
८त्याने त्या अर्पणाच्या पशूच्या डोक्यावर आपला हात ठेवावा व दर्शनमंडपासमोर तो वधावा आणि अहरोनाच्या मुलांनी त्याचे रक्त वेदीसभोवती टाकावे.
9 Então do sacrifício pacífico oferecerá ao Senhor por oferta queimada a sua gordura, a cauda toda, a qual tirará do espinhaço, e a gordura que cobre a fressura, e toda a gordura que está sobre a fressura;
९अर्पण करणाऱ्यांने शांत्यर्पणाचा काही भाग परमेश्वरास हव्य म्हणून अर्पण करण्यासाठी द्यावा. त्याने त्या पशूची चरबी व पाठीच्या कण्यातून कापून काढलेले चरबीदार शेपूट, आतड्यावरील भोवतालची चरबी.
10 Como também tirará ambos os rins, e a gordura que está sobre eles, e sobre as tripas, e o redenho que está sobre o fígado com os rins.
१०दोन्ही गुरदे, त्यांच्यावरची कमरेजवळील चरबी व गुरद्यापर्यंतचा चरबीचा पडदा हे सर्व काढावे.
11 E o sacerdote o queimará sobre o altar: manjar é da oferta queimada ao Senhor.
११मग याजकाने त्या सर्वाचा वेदीवर होम करावा; हे शांत्यर्पण अग्नीद्वारे परमेश्वरास केलेले अर्पण आहे.
12 Mas, se a sua oferta for uma cabra, perante o Senhor a oferecerá,
१२“कोणाला जर बकऱ्याचे अर्पण करावयाचे असेल तर त्याने तो बकरा परमेश्वरासमोर अर्पण करावा.
13 E porá a sua mão sobre a sua cabeça, e a degolará diante da tenda da congregação; e os filhos de Aarão espargirão o seu sangue sobre o altar em redor.
१३त्याने त्या बकऱ्याच्या डोक्यावर आपला हात ठेवावा व दर्शनमंडपासमोर त्याचा वध करावा; मग अहरोनाच्या मुलांनी त्याचे रक्त वेदीवर व त्याच्या सभोवती टाकावे.
14 Depois oferecerá dela a sua oferta, por oferta queimada ao Senhor, a gordura que cobre a fressura, e toda a gordura que está sobre a fressura;
१४त्याने त्या शांत्यर्पणाचा काही भाग परमेश्वरासाठी होम करण्याकरिता द्यावा; तसेच त्याने त्याच्या बलीच्या आतड्यावरील व त्यास लागून असलेली चरबी काढावी.
15 Como também tirará ambos os rins, e a gordura que está sobre eles, e sobre as tripas, e o redenho que está sobre o fígado com os rins.
१५दोन्ही गुरदे, त्यावरील कमरेजवळची चरबी आणि गुरद्यापर्यंतचा काळजावरील चरबीचा पडदा हे सर्व काढावे.
16 E o sacerdote o queimará sobre o altar; manjar é da oferta queimada de cheiro suave. Toda a gordura será do Senhor.
१६मग याजकाने वेदीवर त्या सर्वाचा होम करावा या सुवासिक शांत्यर्पणाने परमेश्वरास आनंद होतो; हे अग्नीद्वारे केलेले अर्पण आहे. हे लोकांसाठी अन्न होईल. परंतु त्यातील उत्तम भाग म्हणजे चरबी परमेश्वराची आहे.
17 Estatuto perpétuo é nas vossas gerações, em todas as vossas habitações: nenhuma gordura nem sangue algum comereis.
१७तुम्ही चरबी व रक्त मुळीच खाऊ नये; तुम्ही जेथे कोठे तुमचे घर बांधाल तेथे तुमच्यासाठी हा नियम पिढ्यानपिढया कायमचा चालू राहील.”