< Juízes 4 >
1 Porém os filhos de Israel tornaram a fazer o que parecia mal aos olhos do Senhor, depois de falecer Ehud.
१एहूद मरण पावल्यावर इस्राएल लोकांनी परमेश्वराच्या दृष्टीने वाईट गोष्टी करून पुन्हा आज्ञा मोडली आणि त्यांनी काय केले हे त्याने पाहिले.
2 E vendeu-os o Senhor em mão de Jabin, rei de Canaan, que reinava em Hazor: e Sisera era o capitão do seu exército, o qual então habitava em Haroseth dos gentios.
२तेव्हा परमेश्वराने कनानी राजा याबीन जो हासोरात राज्य करीत होता त्याच्या हाती त्यांना दिले; सीसरा नावाचा त्याच्या सैन्याचा सेनापती होता आणि तो परराष्ट्रीयांचे नगर हरोशेथ येथे राहत होता.
3 Então os filhos de Israel clamaram ao Senhor, porquanto ele tinha novecentos carros ferrados, e vinte anos oprimia os filhos de Israel violentamente.
३त्याच्याकडे नऊशें लोखंडी रथ असून त्याने वीस वर्षे इस्राएल लोकांवर जाचजुलूम करून त्यांचा छळ केला, म्हणून इस्राएल लोकांनी मोठ्याने रडून परमेश्वराच्या मदतीकरिता धावा केला.
4 E deborah, mulher profetiza, mulher de Lappidoth, julgava a Israel naquele tempo.
४त्या वेळी लप्पिदोथाची पत्नी दबोरा भविष्यवादीण ही इस्राएलाचा न्यायनिवाडा करीत होती.
5 E habitava debaixo das palmeiras de deborah, entre Rama e bethel, nas montanhas de Ephraim: e os filhos de Israel subiam a ela a juízo.
५एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशातील रामा व बेथेल यांच्या दरम्यान दबोराच्या खजुरीच्या झाडाखाली तिची बैठक असे; इस्राएल लोक तिच्याकडे त्यांचा वाद सोडवण्यास येत असत.
6 E enviou, e chamou a Barac, filho de Abinoam de Kedes de Naphtali, e disse-lhe: Porventura o Senhor Deus de Israel não deu ordem, dizendo: vai, e attrahe gente ao monte de Tabor, e toma contigo dez mil homens dos filhos de Naphtali e dos filhos de Zebulon?
६तिने अबीनवामाचा पुत्र बाराक ह्याला नफताली लोकांच्या केदेश प्रदेशातून बोलावणे पाठवून म्हटले, “तू नफताली व जबुलून ह्यांच्यातले दहा हजार पुरुष आपणाबरोबर घेऊन ताबोर डोंगराकडे जा अशी आज्ञा इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याने तुला केली आहे.
7 E atrairei a ti para o ribeiro de Kison a Sisera, capitão do exército de Jabin, com os seus carros, e com a sua multidão: e o darei na tua mão.
७तो म्हणतो, याबीनाचा सेनापती सीसरा आपले रथ व आपले सर्व लष्कर घेऊन तुझ्याकडे किशोन नदीपर्यंत येईल असे मी करीन, आणि त्यास तुझ्या हाती देईन.”
8 Então lhe disse Barac: Se fores comigo, irei: porém, se não fores comigo, não irei.
८बाराक तिला म्हणाला, “तू माझ्याबरोबर येशील तरच मी जाईन, पण तू माझ्याबरोबर येणार नसलीस तर मी जाणार नाही.”
9 E disse ela: Certamente irei contigo, porém não será tua a honra pelo caminho que levas; pois à mão de uma mulher o Senhor venderá a Sisera. E deborah se levantou, e partiu com Barac para Kedes
९ती म्हणाली, “मी तुझ्याबरोबर अवश्य येईन, पण ज्या मार्गाने तू जाणार आहेस त्यामध्ये तुझा सन्मान होणार नाही, कारण परमेश्वर सीसरा ह्याला एका स्त्रीच्या हाती देणार आहे.” मग दबोरा उठली आणि बाराकाबरोबर केदेश येथे गेली.
10 Então Barac convocou a Zebulon e a Naphtali em Kedes, e subiu com dez mil homens após de si: e deborah subiu com ele,
१०बाराकाने जबुलून व नफताली येथील पुरुषांना केदेश येथे एकत्रित बोलावले; मग त्याच्या मागोमाग दहा हजार पुरुष निघाले आणि दबोराही त्याच्याबरोबर गेली.
11 E Eber, keneu, se tinha apartado dos keneos, dos filhos de Hobab, sogro de Moisés: e tinha estendido as suas tendas até ao carvalho de Saanaim, que está junto a Kedes.
११मोशेचा सासरा होबाब याचे वंशज केनी त्यांच्यापासून केनी हेबेर हा वेगळा होऊन केदेशाजवळचे साननीम येथल्या एका एला वृक्षाखाली तळ देऊन राहिला होता.
12 E anunciaram a Sisera que Barac, filho de Abinoam, tinha subido ao monte de Tabor.
१२इकडे सीसरा ह्याला खबर लागली की, अबीनवामाचा मुलगा बाराक हा ताबोर डोंगर चढून गेला आहे,
13 E Sisera convocou todos os seus carros, novecentos carros ferrados, e todo o povo que estava com ele, desde Haroseth dos gentios até ao ribeiro de Kison.
१३तेव्हा सीसरा ह्याने आपले एकंदर नऊशें लोखंडी रथ आणि आपल्याजवळचे सर्व सैन्य, परराष्ट्रीयांचे हरोशेथापासून किशोन नदीपर्यंत बोलावून एकवट केले.
14 Então disse deborah a Barac: Levanta-te; porque este é o dia em que o Senhor tem dado a Sisera na tua mão: porventura o Senhor não saiu diante de ti? Barac pois desceu do monte de Tabor, e dez mil homens após dele.
१४दबोरा बाराकाला म्हणाली, “ऊठ, आजच परमेश्वराने सीसरावर तुला विजय दिला आहे; देव तुझ्यापुढे निघाला आहे की नाही?” मग बाराक व त्याच्या पाठोपाठ दहा हजार लोक ताबोर डोंगरावरून खाली उतरले.
15 E o Senhor derrotou a Sisera, e a todos os seus carros, e a todo o seu exército ao fio da espada, diante de Barac: e Sisera desceu do carro, e fugiu a pé.
१५परमेश्वराने सीसरा व त्याचे सर्व रथ आणि त्याचे सैन्य ह्यांना गोंधळून टाकले; आणि बाराकाच्या मनुष्यांनी त्यांच्यावर तलवारीने हल्ला केला आणि तेव्हा सीसरा रथावरून उतरून पायीच पळून गेला.
16 E Barac os seguiu após dos carros, e após do exército, até Haroseth dos gentios: e todo o exército de Sisera caiu ao fio da espada, até não ficar um só.
१६पण इकडे बाराकाने विदेश्याच्या हरोशेथपर्यंत रथाचा व सैन्याचा पाठलाग केला; आणि सीसराची सर्व सेना तलवारीच्या धारेने पडली; त्यांच्यातला एकही वाचला नाही.
17 Porém Sisera fugiu a pé à tenda de Jael, mulher de Eber, keneu: porquanto havia paz entre Jabin, rei de Hazor, e a casa de Eber, keneu.
१७सीसरा मात्र केनी हेबेर ह्याची पत्नी याएल हिच्या डेऱ्याकडे पायी पळून गेला; कारण हासोराचा राजा याबीन आणि केनी हेबेराचे घराणे यांचे सख्य होते.
18 E Jael saiu ao encontro de Sisera, e disse-lhe: Retira-te, senhor meu, retira-te a mim, não temas. Retirou-se a ela à tenda, e cobriu-o com uma coberta.
१८तेव्हा याएल सीसराला सामोरी येऊन त्यास म्हणाली, “या स्वामी, या इकडे माझ्याकडे येण्यास भिऊ नका.” तेव्हा तो तिच्याकडे डेऱ्यात गेला व तिने त्यास कांबळीखाली लपवले.
19 Então ele lhe disse: Dá-me, peço-te, de beber uma pouca d'água; porque tenho sede. Então ela abriu um odre de leite, e deu-lhe de beber, e o cobriu.
१९तो तिला म्हणाला, “मला थोडे पाणी प्यायला दे. मला तहान लागली आहे.” तेव्हा तिने चामड्याची दुधाची पिशवी उघडून त्यास दूध प्यावयाला दिले व तिने त्यास पुन्हा झाकले.
20 E ele lhe disse: Põe-te à porta da tenda; e há de ser que se alguém vier, e te perguntar, e disser: há aqui alguém? responde tu então: Não.
२०तो तिला म्हणाला, “डेऱ्याच्या दाराशी उभी राहा आणि कोणी येऊन तुला विचारू लागला की, येथे एखादा पुरुष आहे काय? तर नाही म्हणून सांग.”
21 Então Jael, mulher de heber, tomou uma estaca da tenda, e lançou mão dum martelo, e foi-se mansamente a ele, e lhe cravou a estaca na fonte, e a pregou na terra, estando ele porém carregado dum profundo sono, e já cançado; e assim morreu.
२१मग हेबेराची पत्नी याएल हिने डेऱ्याची मेख आणि हातोडा हाती घेऊन आली पाय न वाजविता त्याच्याजवळ जाऊन त्याच्या कानशिलात ती मेख ठोकली; ती आरपार जाऊन जमिनीत रूतली, तो थकून गेल्यामुळे त्यास गाढ झोप लागली होती आणि तो तसाच मेला.
22 E eis que, seguindo Barac a Sisera, Jael lhe saiu ao encontro, e disse-lhe: Vem, e mostrar-te-ei o homem que buscas. E veio a ela, e eis que Sisera jazia morto, e a estaca na fonte.
२२बाराक सीसराचा पाठलाग करीत आला तेव्हा त्यास याएल सामोरी येऊन म्हणाली, “चला, ज्या मनुष्याचा तुम्ही शोध करीत आहा तो मी तुम्हाला दाखवते.” तो तिच्यासोबत आत जाऊन पाहतो तो सीसरा मरून पडला होता आणि त्याच्या कानशिलात मेख ठोकलेली होती.
23 Assim Deus naquele dia sujeitou a Jabin, rei de Canaan, diante dos filhos de Israel.
२३अशा प्रकारे त्यादिवशी कनानाचा राजा याबीन ह्याला देवाने इस्राएल लोकांपुढे पराजित केले.
24 E continuou a mão dos filhos de Israel a proseguir e endurecer-se sobre Jabin, rei de Canaan: até que exterminaram a Jabin, rei de Canaan.
२४कनानाचा राजा याबीन ह्याच्यावर इस्राएल लोकांची सत्ता अधिकाधिक वाढत गेली व शेवटी त्यांनी कनानाचा राजा याबीन ह्याचा नाश केला.