< Jeremias 38 >
1 Ouviu pois Sephatias, filho de Mathan, e Gedalias, filho de Pashur, e Juchal, filho de Selemias, e Pashur, filho de Malchias, as palavras que falava Jeremias a todo o povo, dizendo:
१यिर्मयाने सर्व लोकांस जी वचने सांगितली ती मत्तानाचा मुलगा शफाट्या व पशहूरचा मुलगा गदल्या, शलेम्याचा मुलगा युकाल आणि मल्कीयाचा मुलगा पशहूर यांनी ऐकली. तो सांगत होता,
2 Assim diz o Senhor: O que ficar nesta cidade morrerá à espada, à fome e de pestilência: mas o que sair aos caldeus viverá; porque a sua alma lhe será por despojo, e viverá.
२“परमेश्वर असे म्हणतो जो कोणी या नगरात राहतो तो तलवारीने, दुष्काळाने आणि मरीने मारला जाईल. पण कोणी खास्द्यांकडे निघून जाईल तो वाचेल, त्यास आपल्या स्वतःचा जीव लूट असा होईल, कारण तो जिवंत राहील.
3 Assim diz o Senhor: Esta cidade infalivelmente se entregará na mão do exército do rei de Babilônia, e toma-la-á.
३परमेश्वर असे म्हणतो ‘हे नगर बाबेल राजाच्या सैन्याच्या हाती दिले जाईल आणि तो ते हस्तगत करेल.”
4 E disseram os príncipes ao rei: Morra este homem, visto que ele assim enfraquece as mãos dos homens de guerra que ficaram de resto nesta cidade, e as mãos de todo o povo, falando-lhes tais palavras; porque este homem não busca a paz para este povo, senão o mal
४म्हणून अधिकारी राजाला म्हणाले, या मनुष्यास ठार मारावे, कारण याप्रकारे नगरात उरलेल्या लढणाऱ्या मनुष्यांचे आणि सर्व लोकांचे हात दुर्बल करतो. कारण तो ही वचने सांगून, मनुष्यांचे संरक्षण करत नाही पण अरिष्ट करायला पाहतो.
5 E disse o rei Zedekias: Eis que ele está na vossa mão: porque não é o rei que possa coisa alguma contra vós
५मग सिद्कीया राजा म्हणाला, “पाहा, तो तुमच्या हातात आहे कारण राजाला तुम्हास विरोध करता येत नाही.”
6 Então tomaram a Jeremias, e o lançaram no calaboiço de Malchias, filho do rei, que estava no átrio da guarda; e desceram a Jeremias com cordas; porém no calaboiço não havia água, senão lama; e atolou-se Jeremias na lama.
६मग त्यांनी यिर्मयाला घेतले आणि राजाचा मुलगा मल्कीया याच्या पाण्याच्या टाकीत टाकले. पाण्याची टाकी पहारेकऱ्यांच्या चौकात होती. त्यांनी यिर्मयाला दोरीने खाली सोडले. कैदखानेत पाणी नव्हते पण चिखल होता आणि तो त्या चिखलात रुतला.
7 E, ouvindo Ebed-melech, o ethiope, um eunuco que então estava na casa do rei, que puseram a Jeremias no calaboiço (estava porém o rei assentado à porta de Benjamin),
७आता राजाच्या घरात एबद-मलेख हा एक कुशी षंढ होता. त्यांनी यिर्मयाला पाण्याच्या टाकीत टाकले आहे हे त्याने ऐकले. त्यासमयी राजा बन्यामिनाच्या प्रवेशद्वाराशी बसला होता.
8 Logo Ebed-melech saiu da casa do rei: e falou ao rei, dizendo:
८म्हणून एबद-मलेख राजाच्या घरातून निघाला आणि राजाबरोबर बोलला. तो म्हणाला,
9 Ó rei, senhor meu, mal fizeram estes homens em tudo quanto fizeram a Jeremias, o profeta, lançando-o no calaboiço: sendo que morreria no lugar onde se achava à fome, pois já não há mais pão na cidade
९माझ्या स्वामी राजा, या मनुष्यांनी ज्या मार्गाने यिर्मया संदेष्ट्याबरोबर वाईट वागणूक केली. तो भुकेने तेथे मरावा म्हणून त्यांनी त्यास पाण्याच्या टाकीत टाकले, कारण तेथे नगरात काही अन्न नाही.
10 Então deu ordem o rei a Ebed-melech, o ethiope, dizendo: Toma contigo de aqui trinta homens, e tira a Jeremias, o profeta, do calaboiço, antes que morra.
१०नंतर एबद-मलेख कुशीला राजाने आज्ञा दिली. तो म्हणाला, “येथून तीस माणसे बरोबर घे आणि यिर्मया संदेष्टा मरण्यापूर्वी त्यास पाण्याच्या टाकीतून बाहेर काढ.”
11 E tomou Ebed-melech os homens consigo, e foi à casa do rei, por debaixo da tesouraria, e tomou dali uns trapos velhos e rotos, e trapos velhos apodrecidos, e desceu-os a Jeremias no calaboiço com cordas.
११म्हणून एबद-मलेख याने त्या मनुष्यांचा ताबा घेतला आणि त्याच्या ताब्यातील मनुष्यांना घेऊन व कपड्यासाठी राजाच्या घरातील भांडारात खाली गेला. तेथून त्याने चिंध्या व झिजलेले कपडे घेतले आणि दोरांनी त्या पाण्याच्या टाकीत खाली सोडल्या.
12 E disse Ebed-melech, o ethiope, a Jeremias: Põe agora estes trapos velhos e rotos, já apodrecidos, debaixo dos sobacos de teus braços, por debaixo das cordas. E Jeremias o fez assim.
१२एबद-मलेख कुशी यिर्मयाला म्हणाला, “त्या चिंध्या आणि झिजलेले कपडे तुझ्या काखेखाली व दोरांच्यावर ठेव. मग यिर्मयाने तसे केले.
13 E tiraram a Jeremias com as cordas, e o subiram do calaboiço; e ficou Jeremias no átrio da guarda.
१३नंतर त्यांनी यिर्मयाला दोरांनी ओढून पाण्याच्या टाकीबाहेर काढले. मग यिर्मया पहारेकऱ्यांच्या चौकात राहिला.
14 Então enviou o rei Zedekias, e fez trazer a si a Jeremias, o profeta, à terceira entrada, que estava na casa do Senhor; e disse o rei a Jeremias: Pergunto-te uma coisa, não me encubras nada.
१४नंतर सिद्कीया राजाने निरोप पाठवला आणि यिर्मया संदेष्ट्याला परमेश्वराच्या घराच्या तिसऱ्या प्रवेशद्वाराजवळ आपल्याजवळ बोलावले. मग राजा यिर्मयाला म्हणाला, मी तुला काही विचारायचे आहे. माझ्यापासून काही लपवू नकोस.”
15 E disse Jeremias a Zedekias: declarando-ta eu, porventura não me matarás certamente? e, aconselhando-te eu, não me darás ouvido.
१५यिर्मया सिद्कीयाला म्हणाला, “जर मी तुला सांगितले, तर तू मला खचित मारणार नाहीस काय? आणि जर मी तुला सल्ला दिला, तरी तू माझे ऐकणार नाहीस.”
16 Então jurou o rei Zedekias a Jeremias, em segredo, dizendo: Vive o Senhor, que nos fez esta alma, que não te matarei nem te entregarei na mão destes homens que procuram a tua morte.
१६पण सिद्कीया राजाने गुप्तपणे यिर्मयाकडे शपथ घेतली व म्हणाला, परमेश्वर ज्याने आमचा जीव उत्पन्न केला, तो जिवंत आहे, मी तुला मारणार नाही किंवा जी मनुष्ये तुझा जीव घ्यायला पाहतात त्यांच्या हातात मी तुला देणार नाही.
17 Então Jeremias disse a Zedekias: Assim diz o Senhor, Deus dos exércitos, Deus de Israel: Se voluntariamente saires aos príncipes do rei de Babilônia, então viverá a tua alma, e esta cidade não se queimará a fogo, e viverás tu e a tua casa.
१७मग यिर्मया सिद्कीयाला म्हणाला, “परमेश्वर, सेनाधीश देव, इस्राएलाचा देव, असे म्हणतो, जर तू बाबेलाच्या राजाच्या अधिकाऱ्याकडे गेलास तर तू मग जिवंत राहशील आणि हे नगर जाळले जाणार नाही. तू आणि तुझा परीवार जिवंत राहील.
18 Porém, se não saires aos príncipes do rei de Babilônia, então será entregue esta cidade na mão dos caldeus, e queima-la-ão a fogo, e tu não escaparás da mão deles.
१८पण जर बाबेलाच्या राजाच्या अधिकाऱ्याकडे गेला नाहीस तर हे नगर खास्द्यांच्या हाती दिले जाईल. ते जाळून टाकतील आणि तू त्यांच्या हातातून सुटणार नाहीस.”
19 E disse o rei Zedekias a Jeremias: Receio-me dos judeus, que cairam para os caldeus; que porventura me entreguem na sua mão, e escarneçam de mim.
१९सिद्कीया राजा यिर्मयाला म्हणाला, “पण जे यहूदी सोडून खास्द्यांकडे गेले आहेत त्यांची मला भीती वाटते, कारण ते मला त्यांच्या हाती देतील, माझी चेष्टा करतील व मला वाईट वागवतील”
20 E disse Jeremias: Não te entregarão: ouve, te peço, a voz do Senhor, conforme a qual eu te falo; e bem te irá, e viverá a tua alma
२०यिर्मया म्हणाला, “ते तुला त्यांच्या स्वाधीन करणार नाहीत. मी तुला सांगत आहे तो परमेश्वराचा संदेश पाळ याकरिता की सर्व गोष्टी तुझ्यासाठी चांगल्या होतील आणि तुझा जीवही वाचेल.
21 Porém, se tu não quizeres sair, esta é a palavra que me mostrou o Senhor.
२१पण जर तू बाहेर जाण्यास नकार दिलास, तर काय होईल, हे परमेश्वराने मला दाखविले आहे.
22 Eis que todas as mulheres que ficaram de resto na casa do rei de Judá serão levadas fora para os príncipes do rei de Babilônia, e elas mesmas dirão: Teus pacíficos te incitaram e prevaleceram contra ti, atolaram-se os teus pés na lama, voltaram para traz.
२२यहूदाच्या घरात ज्या स्त्रिया मागे राहिल्या आहेत त्या सर्वांना बाहेर बाबेलाच्या राजाच्या अधिकाऱ्याकडे आणले जाईल. नंतर पाहा! त्या स्त्रिया तुला म्हणतील, तुला तुझ्या मित्रांनी फसवले आहे; त्यांनी तुझा नाश केला आहे. तुझे पाय आता चिखलात रुतले आहेत आणि तुझे मित्र पळून गेले आहेत.
23 Assim que a todas as tuas mulheres e a teus filhos levarão para fora aos caldeus, e nem tu escaparás da sua mão, antes pela mão do rei de Babilônia serás preso, e esta cidade queimará a fogo
२३कारण तुझ्या सर्व स्त्रिया आणि मुलांना ते बाहेर खास्द्यांकडे नेतील आणि तू स्वतः त्यांच्या हातातून सुटणार नाहीस. तू बाबेलाच्या राजाच्या हातात सापडशील आणि हे नगर अग्नीने जाळण्यात येईल.”
24 Então disse Zedekias a Jeremias: ninguém saiba estas palavras, e não morrerás.
२४मग सिद्कीया यिर्मयाला म्हणाला, या वचनाविषयी कोणालाही कळू देऊ नको. म्हणजे तू मरणार नाही.
25 E quando os príncipes, ouvindo que falei contigo, vierem a ti, e te disserem: Declara-nos agora o que disseste ao rei, não no-lo encubras, e não te mataremos: e que te falou o rei?
२५मी तुझ्याशी बोललो हे अधिकाऱ्यांनी जर ऐकले, ते जर आले आणि तुला म्हणाले, तू राजाबरोबर काय बोललास ते आम्हास सांग. आमच्यापासून लपवून ठेवू नको अथवा आम्ही तुला ठार मारू आणि राजा तुला काय म्हणाला तेही आम्हास सांग
26 Então lhes dirás: Lancei eu a minha súplica diante do rei, que não me fizesse tornar à casa de Jonathan, para morrer ali
२६मग तू त्यांना असे सांग, मी राजाला विनंती करून सांगितले की, मला योनाथानाच्या घरी मरण्यासाठी परत पाठवू नको.
27 Vindo pois todos os príncipes a Jeremias, e perguntando-lhe, declarou-lhes conforme todas as palavras que o rei lhe havia ordenado: e o deixaram, porque não se ouviu o negócio.
२७नंतर सर्व अधिकारी यिर्मयाकडे आले आणि त्यांनी त्यास प्रश्न विचारले आणि त्याने उत्तर दिले, राजाने सूचना केल्याप्रमाणे त्याने उत्तरे दिली. मग त्यांनी त्याच्याशी बोलणे थांबवले कारण त्यांनी यिर्मया व राजा यांच्यात झालेले संभाषण ऐकले नव्हते.
28 E ficou Jeremias no átrio da guarda, até ao dia em que foi tomada Jerusalém, e ainda ali estava quando foi tomada Jerusalém.
२८ह्याप्रमाणे यिर्मया, यरूशलेम जिंकले जाईपर्यंत, पहारेकऱ्याच्या चौकात राहिला.