< Jeremias 26 >

1 No princípio do reinado de Joaquim, filho de Josias, rei de Judá, veio esta palavra do Senhor, dizendo:
योशीयाचा मुलगा, यहोयाकीम, यहूदाचा राजा ह्याच्या राज्याच्या आरंभी परमेश्वराकडून हे वचन आले, ते म्हणाले,
2 Assim diz o Senhor: Põe-te no átrio da casa do Senhor e fala a todas as cidades de Judá, que veem a adorar na casa do Senhor, todas as palavras que te mandei que lhes falasses; palavra nenhuma deixes:
परमेश्वर म्हणाला, “यिर्मया, परमेश्वराच्या मंदिराच्या प्रांगणात उभा राहा आणि परमेश्वराच्या मंदिरात उपासना करण्यास येणाऱ्यांना हा सर्व यहूदातील नगरांना तुला त्यांच्याजवळ बोलायला आज्ञापितो ती बोल, एक शब्द कमी करु नको.
3 Bem pode ser que ouçam, e se convertam cada um do seu mau caminho, e eu me arrependa do mal que intento fazer-lhes por causa da maldade das suas ações.
कदाचित् ते ऐकतील आणि प्रत्येक जण त्याच्या कुमार्गापासून वळेल, त्यांच्या कर्मांच्या दुष्टपणाबद्दल त्यांना शिक्षा करण्याच्या माझ्या बेतांबद्दल मीही कदाचित् पुनर्विचार करीन.
4 Dize-lhes pois: Assim diz o Senhor: se não me derdes ouvidos para andardes na minha lei, a qual tenho posto diante de vós,
तू त्यांना सांग ‘परमेश्वर असे म्हणतो: जर तुम्ही माझ्या नियमशास्त्राप्रमाणे ऐकले नाही, जे मी तुम्हा समोर ठेवले आहे,
5 Para que ouvísseis as palavras dos meus servos, os profetas, que eu vos envio, madrugando e enviando, mas não ouvistes;
जर तुम्ही माझ्या सेवकांचे जे संदष्टे आहेत, ज्यांना मी तुम्हाकडे नित्याने पाठवत आलो आहे, त्यांचे ऐकले नाही.
6 Então farei que esta casa seja como Silo, e farei desta cidade uma maldição para todas as nações da terra.
तर मी हे घर शिलोसारखे करीन, पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांच्या देखत मी या नगराला शाप असे करीन.”
7 E ouviram os sacerdotes, e os profetas, e todo o povo, a Jeremias, falando estas palavras na casa do Senhor.
परमेश्वराच्या मंदिरातील यिर्मयाचे हे बोलणे याजकांनी, संदेष्ट्यांनी आणि सगळ्या लोकांनी ऐकले.
8 E sucedeu que, acabando Jeremias de dizer tudo quanto o Senhor lhe havia ordenado que dissesse a todo o povo, pegaram nele os sacerdotes, e os profetas, e todo o povo, dizendo: Certamente morrerás,
परमेश्वराने आज्ञा केल्याप्रमाणे, यिर्मयाने, परमेश्वराने सांगितलेली प्रत्येक गोष्ट सांगितली, नंतर याजकांनी, संदेष्ट्यांनी आणि लोकांनी यिर्मयाला धरले. ते म्हणाले, तू खचित मरशील!
9 Porque profetizaste no nome do Senhor, dizendo: Como Silo será esta casa, e esta cidade será assolada, de sorte que não haja morador nela. E ajuntou-se todo o povo contra Jeremias, na casa do Senhor.
शिलोच्या मंदिराप्रमाणे या घराचा नाश होईल आणि हे नगर निर्जन असे होईल, ज्यात कोणीच राहत नाही, परमेश्वराच्या नावाने तू हे भविष्य का सांगितले? आणि परमेश्वराच्या मंदिरात सर्व लोक यिर्मयाभोवती जमले.
10 E, ouvindo os príncipes de Judá estas palavras, subiram da casa do rei à casa do Senhor, e se assentaram à entrada da porta nova do Senhor.
१०यहूदातील राज्यकर्त्यांना ही सर्व हकिकत कळली, म्हणून ते राज्याचा घरातून बाहेर आले व वरती परमेश्वराच्या मंदिरात गेले. तेथे ते परमेश्वराच्या मंदिरात नव्या प्रवेशद्वाराजवळ स्थानांवर बसले.
11 Então falaram os sacerdotes e os profetas aos príncipes e a todo o povo, dizendo: Este homem é réu de morte, porque profetizou contra esta cidade, como o ouvistes com os vossos ouvidos.
११नंतर याजक व संदेष्टे अधिकाऱ्यांशी व सर्व लोकांशी बोलले. ते म्हणाले “यिर्मयाला ठार करावे. यरूशलेम शहराबद्दल तो वाईट भविष्यकथन करतो तुम्ही त्याचे बोलणे तुमच्या स्वत: च्या कानांनी ऐकलेच आहे.”
12 E falou Jeremias a todos os príncipes a todo o povo, dizendo: O Senhor me enviou a profetizar contra esta casa, e contra esta cidade, todas as palavras que ouvistes.
१२मग यिर्मया यहूदाच्या अधिकाऱ्यांशी व इतर लोकांशी बोलला तो म्हणाला, “जी वचने तुम्ही ऐकली, ती या नगरीबद्दल व या मंदिराबद्दल हे भविष्य म्हणून सांगण्यासाठी परमेश्वरानेच मला पाठवले.
13 Agora, pois, melhorai os vossos caminhos e as vossas ações, e ouvi a voz do Senhor vosso Deus, e arrepender-se-á o Senhor do mal que falou contra vós.
१३तर आता तुम्ही आपली कर्मे आणि मार्ग व्यवस्थीत करा, आणि तुमचा परमेश्वर, तुमचा देव, याची वाणी ऐका, म्हणजे तो जे अरिष्ट तुम्हावर आणण्याचा बेत करीत आहे त्यामध्ये तो कदाचीत फेरविचार करीन.
14 Eu, porém, eis que estou nas vossas mãos, fazei de mim conforme o que for bom e reto aos vossos olhos.
१४माझ्याबद्दल म्हणाल, तर मी तुमच्या हातात आहे. तुम्हास योग्य व बरोबर वाटेल ते माझ्यासोबत करा.
15 Porém sabei por certo que, se me matardes a mim, trareis sangue inocente sobre vós, e sobre esta cidade, e sobre os seus habitantes: porque, na verdade, o Senhor me enviou a vós, a falar aos vossos ouvidos todas estas palavras.
१५पण तुम्ही मला ठार मारलेत, तर एका गोष्टीची खात्री बाळगा. निरपराध मनुष्यास मारल्याबद्दल तुम्ही अपराधी ठराल. तुम्ही या नगरीला आणि तिच्यात राहणाऱ्या प्रत्येक मनुष्यासही अपराधी बनवाल. परमेश्वराने खरोखरच मला तुमच्याकडे ह्यासाठी पाठवले आहे की ही सर्व वचने तुमच्या कानात बोलावी.”
16 Então disseram os príncipes, e todo o povo, aos sacerdotes e aos profetas: Não é este homem réu de morte, porque em nome do Senhor, nosso Deus, nos falou.
१६मग अधिकारी आणि सर्व लोक याजकांना व संदेष्ट्यांना बोलले, “यिर्मयाला अजिबात मारु नका. त्याने आपल्याला सांगितलेल्या गोष्टी परमेश्वराच्या नावाने आम्हाला ही वचने घोषीत केली आहे.”
17 Também se levantaram alguns homens dentre os anciãos da terra, e falaram a toda a congregação do povo, dizendo:
१७नंतर काही वडीलधारी उभे राहिले आणि ते सभेतील सर्व लोकांस उद्देशून म्हणाले,
18 Micaias, o morashita, profetizou nos dias de Ezequias, rei de Judá, e falou a todo o povo de Judá, dizendo: Assim disse o Senhor dos exércitos: Sião será lavrada como um campo, e Jerusalém será montões de pedras, e o monte desta casa altos de mato.
१८“ते म्हणाले, मोरेष्टचा मीखा, हा हिज्कीया यहूदाचा राजाच्या दिवसात भविष्यसांगत असे. तो यहूदाच्या सर्व लोकांस म्हणाला, सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, सियोनेचा नाश होईल सियोन नांगरलेले शेत होईल. यरूशलेम दगडांची रास होईल. मंदिर असलेली टेकडी वनातील उंच टेकडी सारखी होईल.”
19 Porventura logo o mataram, Ezequias, rei de Judá, e todo o Judá? Porventura não temeu ao Senhor, e o não suplicou à face do Senhor? e o Senhor se arrepende do mal que falara contra eles: e nós fazemos um grande mal contra as nossas almas.
१९“तर हिज्कीया यहूदाचा राजा आणि सर्व यहूदाने मीखाला ठार मारले काय? त्याने परमेश्वराबद्दल भय बाळगले की नाही? आणि त्याने परमेश्वराचा राग शांत केला, आणि त्याच्याविरुध्द जे अरिष्ट परमेश्वराने योजिले होते, त्या गोष्टी त्याने घडू दिल्या नाहीत. अशाने तर आम्ही आपल्याच जिवाविरूद्ध मोठे पाप करु.”
20 Também houve um homem que profetizava em nome do Senhor, a saber: Urias, filho de Semaia, de Kiriath-jearim, o qual profetizou contra esta cidade, e contra esta terra, conforme todas as palavras de Jeremias.
२०पूर्वी आणखी एक मनुष्य, किर्याथ-यारीमकर, शमायाचा मुलगा, उरीया, हा परमेश्वराच्या नावाने भविष्य सांगत होता. त्याने या नगरीच्या विरोधात आणि या भूमीच्याही विरोधात, यिर्मयाप्रमाणेच भविष्य सांगितले आहेत.
21 E, ouvindo o rei Joaquim, e todos os seus valentes, e todos os príncipes, as suas palavras, procurou o rei mata-lo; o que ouvindo Urias, temeu, e fugiu, e foi para o Egito;
२१परंतू राजा यहोयाकीम, त्याचे सर्व सैन्य व अधिकाऱ्याने हे वचन ऐकले आणि यहोयाकीम राजा उरीयाला मारु इच्छित होता, हे उरीयाला समजल्यावर तो घाबरला व मिसर देशात पळाला.
22 Porém o rei Joaquim enviou uns homens ao Egito, a saber, Elnathan, filho de Achbor, e outros homens com ele ao Egito,
२२पण यहोयाकीम राजाने एलनाथान नावाच्या मनुष्याबरोबर आणखी काही माणसे देऊन त्यांना मिसरला पाठवले. एलनाथान अखबोरचा मुलगा होता,
23 Os quais tiraram a Urias do Egito, e o trouxeram ao rei Joaquim, que o feriu à espada, e lançou o seu cadáver nas sepulturas dos filhos do povo.
२३त्या मनुष्यांनी उरीयाला मिसरहून परत आणले. ते त्यास यहोयाकीम राजाकडे घेऊन गेले. यहोयाकीमने उरीयाला तलवारीने मारण्याचा हुकूम दिला. नंतर सामान्य लोकांच्या दफनभूमीत त्याचे प्रेत पाठवण्यात आले.
24 A mão pois de Ahicam, filho de Saphan, foi com Jeremias, para que o não entregassem na mão do povo, para o matar.
२४पण अहीकाम या प्रतिष्ठित व्यक्तीने यिर्मयाला पाठिंबा दिला अहीकाम शाफानचा मुलगा होता. त्याने यिर्मयाला याजक व संदेष्टे यांच्या हातातून सोडवले, जे त्यास मारणार होते.

< Jeremias 26 >