< Isaías 3 >
1 Porque, eis que o Senhor Deus dos exércitos tirará de Jerusalém e de Judá o bordão e o cajado: a todo o sustento de pão, e a toda a borda d'água;
१पाहा, प्रभू, सेनाधीश परमेश्वर, यरूशलेम व यहूदा यांच्यापासून आधार व टेका काढून घेत आहे, म्हणजे भाकरीचा संपूर्ण साठा आणि संपूर्ण पाणी पुरवठा काढून घेत आहे;
2 Ao valente, e ao soldado, ao juiz, e ao profeta, e ao adivinho, e ao ancião,
२शक्तीमान पुरुष, योद्धा, न्यायधीश, संदेष्टा, ज्योतिषी, वडील,
3 Ao capitão de cincoênta, e ao respeitável, e ao conselheiro, e ao sábio entre os artífices, e ao eloquente.
३पन्नासांचा कप्तान, प्रतिष्ठित नागरिक, मंत्री, कूशल कारागीर व निपुण जादूगार.
4 E dar-lhes-ei mancebos por príncipes, e crianças dominarão sobre eles.
४“मी फक्त युवकास त्यांचे अधिकारी म्हणून नेमीन, आणि युवक त्यांच्यावर राज्य करतील.
5 E o povo será oprimido; um será contra o outro, e cada um contra o seu próximo: o menino se atrevera contra o ancião, e o vil contra o nobre.
५सर्व लोक दडपशाहीमुळे धास्तावतील; प्रत्येकजण दुसऱ्यामुळे, प्रत्येक व्यक्ती त्याच्या शेजाऱ्यामुळे; लेकरे उद्दामपणे वयोवृद्धांचा विरोध करतील, अधोगती झालेले प्रतिष्ठीतांना आव्हान करतील.
6 Quando algum travar de seu irmão da casa de seu pai, dizendo: Capa tens, sê nosso príncipe, e toma sob a tua mão esta ruína;
६आपल्या वडिलाच्याच घरात कोणी आपल्या भावाला जबरदस्तीने म्हणेल, आणि तुझ्याजवळ झगा आहे; तू आमचा शासक हो व तुझ्या हाताखाली हे नाश होऊ दे.
7 Então levantará a sua voz naquele dia, dizendo: Não posso ser médico, nem tão pouco há em minha casa pão, nem vestido algum: não me ponhais por príncipe do povo.
७त्या दिवशी तो ओरडून म्हणेल, ‘मी बरे करणारा होणार नाही, माझ्याजवळ भाकरी व वस्त्रही नाहीत, तुम्ही मला लोकांचा शासक करू नका.’”
8 Porque tropeçou Jerusalém, e Judá é caído; porquanto a sua língua e as suas obras são contra o Senhor, para irritarem os olhos da sua glória.
८कारण यरूशलेमेचा नाश झाला आहे, व यहूदा पतन पावला आहे, कारण त्यांचे बोलणे व कृती परमेश्वराच्या विरोधात आहे, त्याच्या उच्च अधिकाराचा अपमान करत आहे.
9 A aparência das suas faces testifica contra eles; e publicam os seus pecados como Sodoma; não os dissimulam: ai da sua alma! porque se fazem mal a si mesmos.
९त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव त्यांच्याच विरूद्ध साक्ष देतात; आणि सदोमाप्रमाणे ते त्यांच्या पापाविषयीच्या गोष्टी सांगतात; ते त्या लपवीत नाहीत. त्यांचा नाश होवो! कारण त्यांनी स्वतःवर आपत्ती आणली आहे.
10 Dizem ao justo que bem lhe irá; que comerão do fruto das suas obras.
१०नीतिमानास सांगा कि त्यांचे भले होईल; कारण ते आपल्या कृतींचे फळ खातील.
11 Ai do ímpio! mal lhe irá: porque o galardão das suas mãos se lhe dará.
११पाप्याचा नाश होवो! त्याचे वाईट होईल, कारण त्याने आपल्या हाताने जे केले, ते त्यास मिळेल.
12 Os exatores do meu povo são crianças, e mulheres dominam sobre ele: ah, povo meu! os que te guiam te enganam, e devoram o caminho das tuas veredas.
१२माझ्या लोकांनो; लेकरे तुम्हावर जुलूम करतात व स्त्रिया त्यांच्यावर राज्य करतात. माझ्या लोकांनो, तुमचे पुढारी तुम्हास योग्य मार्गापासून दूर नेतात, व तुमच्या मार्गाविषयी तुम्हास गोंधळात टाकतात.
13 O Senhor se apresenta a pleitear, e se põe a julgar os povos.
१३परमेश्वर न्याय करण्याकरिता न्यायसभेत उभा राहिला आहे, त्याच्या लोकांचा न्याय करण्याकरिता तो उभा राहिला आहे.
14 O Senhor vem em juízo contra os anciãos do seu povo, e contra os seus príncipes; porque vós consumistes esta vinha, o despojo do aflito está em vossas casas.
१४परमेश्वर वडील जन व त्याच्या लोकांचे अधिकारी यांच्यावर न्याय प्रकट करील. तुम्ही द्राक्षीचा मळा खाऊन टाकला आहे; गरिबांची लुटलेली मालमत्ता तुमच्या घरांमध्ये आहे.
15 Que tendes vós, que atropelais o meu povo e moeis as faces dos aflitos? diz o Senhor, o Deus dos exércitos.
१५तुम्ही माझ्या लोकांचा संपूर्ण नाश का करीता व गरिबांना अतिशय यातना का देता? असे प्रभू, सेनाधीश परमेश्वर म्हणतो.
16 Diz ainda mais o Senhor: Porquanto as filhas de Sião se exalçam, e andam com o pescoço emproado, fazendo acenos com os olhos, e, indo andando, andam como dançando, e cascavelando com os pés
१६परमेश्वर म्हणतो सियोनेच्या कन्या अहंकारी आहेत, आणि त्या ताठ मानेने आपले डोके उंचावून चालतात व आपल्या डोळ्यांनी प्रणयचेष्टा करतात, जातांना त्या चोखंदळपणा करतात व आपल्या पायांनी पैंजणाचा रुणझुण आवाज करतात.
17 Portanto o Senhor fará calva a mioleira das filhas de Sião, e o Senhor descobrirá as suas vergonhas.
१७म्हणून सियोनेच्या कन्यांच्या डोक्यात प्रभू देव रोगग्रस्त खरूज उत्पन्न करील, आणि परमेश्वर त्यांचे टक्कल करील.
18 Naquele dia tirará o Senhor o enfeite das ligas, e as redezinhas, e as luetas,
१८त्या दिवशी प्रभू त्यांचे सुंदर असे पायातील दागिने, डोक्याचे बंध, गळयातील चंद्रकोरी हार,
19 Os pendentes, e as manilhas, e os vestidos resplandecentes,
१९कर्णफुले, कंकणे, आणि घुंगट;
20 Os diademas, e os enfeites dos braços, e os cendaes, e as bocetas cheirosas, e as arrecadas,
२०शिरभूषणे, पैंजणे, कमरपट्टे, सुगंधी द्रव्यांचा डब्ब्या, आणि भाग्यवान आकर्षणे काढून टाकील.
21 Os anéis, e as jóias pendentes do nariz,
२१तो अंगठ्या, नथी दागिने;
22 Os vestidos de festa, e os mantos, e as coifas, e os alfinetes,
२२सणाचे वस्त्रे, आवरणे, ओढण्या, हातातील बटवे;
23 Os espelhos, e as capinhas de linho finíssimas, e as toucas, e os véus.
२३हातातले आरसे, तलम सणाचे वस्त्र, डोक्यावरील वस्त्रे, आणि ओढण्या काढून टाकील.
24 E será que em lugar de cheiro suave haverá fedor; e por cinto uma corda; e em lugar de encrespadura de cabelos, calva; e em lugar de veste larga, cingimento de saco; e queimadura em lugar de formosura.
२४तेथे गोड सुगंधा ऐवजी दुर्गंध; कमरपट्ट्या ऐवजी रस्सी, आकर्षक केशरचने ऐवजी टक्कल, झग्याऐवजी तरटाचे वस्त्र, आणि सौंदर्याच्या जागी डाग राहतील.
25 Teus varões cairão à espada, e teus valentes na peleja.
२५तुझे पुरुष तलवारीने पडतील व वीर पुरुष युद्धात पाडले जातील.
26 E as suas portas gemerão e prantearão; e ela, ficando desolada, se assentará no chão.
२६यरूशलेमेच्या वेशी शोक व विलाप करतील; आणि ती एकटी असेल व जमिनीवर बसून राहील.