< Oséias 13 >
1 Quando Ephraim falava, tremia-se; foi exalçado em Israel; mas quando se fez culpado em Baal, então morreu.
१एफ्राईम बोलत असे तेव्हा लोकांचा थरकाप होई; तो इस्राएलाचा सरदार झाला; पण पुढे बआलमूर्तीमुळे दोषी होऊन तो लोपला.
2 E agora acumularam pecados sobre pecados, e da sua prata fizeram uma imagem de fundição, ídolos segundo o seu entendimento, que todos são obra de artífices, dos quais dizem: Os homens que sacrificam beijem os bezerros.
२आता ते अधिकाधिक पाप करु लागले ते चांदीच्या ओतीव मूर्ती आपल्या कुशलतेने कारागीर बनवतो तसे बनवू लागले. लोक म्हणू लागले, “जे बलिदान करतात त्यांनी वासरांचे चुंबन घ्या”
3 Por isso serão como a nuvem de manhã, e como orvalho da madrugada, que passa: como folhelho que a tempestade lança da eira, e como o fumo da chaminé.
३म्हणून पहाटेच्या ढगासारखे लवकर उडून जाणाऱ्या दवासारखे खळ्यातून वाऱ्याने उडणाऱ्या भुसासारखे आणि धुराडयातून उडणाऱ्या धुरासारखे ते होतील.
4 Eu pois sou o Senhor teu Deus desde a terra do Egito; portanto não reconhecerás outro Deus fora de mim, porque não há Salvador senão eu.
४पण मी तुमचा देव परमेश्वर आहे, ज्याने तुम्हास मिसरातून बाहेर काढले, माझ्याशिवाय तुम्हास अन्य देव नाही, माझ्याशिवाय कोणी तारक नाही.
5 Eu te conheci no deserto, na terra mui seca.
५मी तुम्हास रानात, रुक्ष प्रदेशात जाणून होतो.
6 Depois eles se fartaram à proporção do seu pasto; estando pois fartos, ensoberbeceu-se o seu coração, por isso se esqueceram de mim.
६जेव्हा तुम्हास चारा मिळाला तेव्हा तुम्ही तृप्त झालात, आणि जेव्हा तुमचे पोट भरले तेव्हा तुमचे हृदय उन्मत्त झाले; त्या कारणास्तव तुम्ही मला विसरला.
7 Portanto serei para eles como leão; como leopardo espiarei no caminho.
७म्हणून मी सिंहासारखा तुमच्याशी वागेन, चित्याप्रमाणे तुमच्या वाटेवर दबा धरुन बसेन.
8 Como urso que tem perdido seus filhos, os encontrarei, lhes romperei as teias do seu coração, e ali os devorarei como leão; as feras do campo os despedaçarão.
८जिची पिल्ले चोरी झाली, अशा अस्वली सारखा मी तुमच्यावर हल्ला करीन, मी तुमचे उर फाडीन, आणि सिंहिनीप्रमाणे तुम्हास खाऊन टाकेन, जसा वनपशू तुम्हास फाडून टाकतो.
9 Isso te lançou a perder, ó Israel, que te rebelaste contra mim, a saber, contra a tua ajuda.
९इस्राएला हा तुझा नाश आहे जो येत आहे, कारण तू माझ्या म्हणजे तुझ्या सहाय्यकर्त्यांच्या विरोधात गेला आहेस.
10 Onde está agora o teu rei, para que te guarde em todas as tuas cidades? e os teus juízes, dos quais disseste: Dá-me rei e príncipes?
१०तुझा राजा कोठे आहे? जो तुझ्या सर्व नगरांचे रक्षण करतो तुझे अधीपती कोठे आहेत? ज्याविषयी तू मला म्हटले, “मला राजा आणि अधिपती दे?”
11 Dei-te um rei na minha ira, e to tirarei no meu furor.
११मी क्रोधाने तुला राजा दिला आणि रागाने त्यास काढूनही घेतले.
12 A iniquidade de Ephraim está atada, o seu pecado está entesourado.
१२एफ्राईमाचा अन्याय गोळा केला आहे, त्याच्या अपराधाची रास करण्यात आली आहे.
13 Dores de mulher de parto lhe virão: ele é um filho insensato: porque não permanece o seu tempo na paridura.
१३प्रसूतिवेदना त्याच्यावर येतील, पण तो अक्कलशून्य मुलगा आहे, कारण जन्म घेण्याच्या वेळी तो गर्भातून बाहेर येत नाही.
14 Eu pois os remirei da violência do inferno, e os resgatarei da morte: onde estão, ó morte, as tuas pestes? onde está ó inferno, a tua perdição? o arrependimento será escondido de meus olhos. (Sheol )
१४मी त्यांना खरोखर अधोलोकाच्या बळापासून सोडवीन काय? मी त्यांना खरोखर मरणातून सोडवणार काय? मरणा, तुझ्या महामाऱ्या कोठे आहेत? आणि इथे कळवळा माझ्या समोरुन लपलेला आहे. (Sheol )
15 Ainda que ele dê fruto entre os irmãos, virá o vento leste, vento do Senhor, subindo do deserto, e secar-se-á a sua veia, e secar-se-á a sua fonte: ele saqueará o tesouro de todos os vasos desejáveis.
१५एफ्राईम आपल्या भावांमध्ये जरी प्रगत झाला, तरी पूर्वेचा वारा येईल, परमेश्वराचा वारा रानातून येईल एफ्राईमाचा झरा सुकून जाईल, त्याच्या विहिरीत पाणी राहणार नाही. त्यांचा शत्रू त्याच्या सर्व मौल्यवान वस्तू लुटून नेईल.
16 Samaria virá a ser deserta, porque se rebelou contra o seu Deus: cairão à espada, seus filhos serão despedaçados, e as suas grávidas serão fendidas pelo meio.
१६शोमरोनात दोष येईल, कारण त्याने देवाविरुध्द बंड केले आहे ते तलवारीने पडतील. त्यांची लहान मुले आपटली जातील आणि त्यांच्या गर्भवती स्त्रिया चिरुन टाकण्यात येतील.