< Deuteronômio 6 >
1 Estes, pois, são os mandamentos, os estatutos e os juízos que mandou o Senhor vosso Deus para se vos ensinar, para que os fizesseis na terra a que passais a possuir;
१तुमचा देव परमेश्वर ह्याने तुम्हास सांगण्यासाठी सांगितलेले विधी, नियम व आज्ञा दिल्या त्या या आहेत. जो प्रदेश तुम्ही वतन करून घेण्यासाठी यार्देनेच्या पैलतीरी जात आहात तेथे हे नियम पाळा.
2 Para que temas ao Senhor teu Deus, e guardes todos os seus estatutos e mandamentos, que eu te ordeno, tu, e teu filho, e o filho de teu filho, todos os dias da tua vida, e que teus dias sejam prolongados.
२तुम्ही, तुमची मुले व नातवंडे या सर्वांनी आमरण आपला देव परमेश्वर याचे भय धरावे. त्याने घालून दिलेले नियम पाळावे, म्हणजे तुम्ही दीर्घायुषी व्हाल.
3 Ouve pois, ó Israel, e atenta que os guardes, para que bem te suceda, e muito te multipliques, como te disse o Senhor Deus de teus pais, na terra que mana leite e mel.
३इस्राएल लोकहो, काळजीपूर्वक ऐका व हे नियम पाळा. मग तुमचे कल्याण होईल. तुम्ही बहुगुणित व्हाल आणि तुमच्या देशात दुधामधाचे पाट वाहतील. परमेश्वर देवाने कबूल केल्याप्रमाणे सर्वकाही मिळेल.
4 Ouve, Israel, o Senhor nosso Deus é o único Senhor.
४हे इस्राएल लोकहो, ऐका! परमेश्वर हाच आपला देव आहे. परमेश्वर एकच आहे.
5 Amarás pois o Senhor teu Deus de todo o teu coração, e de toda a tua alma, e de todo o teu poder.
५आणि आपला देव परमेश्वर ह्यावर संपूर्ण अंत: करणाने, संपूर्ण मनाने व संपूर्ण शक्तीने प्रेम करा.
6 E estas palavras, que hoje te ordeno, estarão no teu coração;
६मी आज दिलेल्या आज्ञा तुमच्या कायम लक्षात असू द्या.
7 E as intimarás a teus filhos, e delas falarás assentado em tua casa, e andando pelo caminho, e deitando-te e levantando-te.
७त्या आपल्या मुलाबाळांनाही शिकवा. घरी-दारी, झोपता उठता त्याविषयी बोलत राहा.
8 Também as atarás por sinal na tua mão, e te serão por testeiras entre os teus olhos.
८त्या लिहून आठवणीसाठी हाताला चिन्हादाखल बांधा व कपाळावर चिकटवा.
9 E as escreverás nos umbrais de tua casa, e nas tuas portas.
९दरवाजाच्या खांबांवर व फाटकांवर त्या लिहून ठेवा.
10 Havendo-te pois o Senhor teu Deus indroduzido na terra que jurou a teus pais, Abraão, Isaac e Jacob, te daria: grandes e boas cidades, que tu não edificaste,
१०अब्राहाम, इसहाक आणि याकोब या तुमच्या पूर्वजांना तुम्हास हा देश देण्याचे तुमचा देव परमेश्वर ह्याने वचन दिले होते. तो तुम्हास मिळेल. तुम्ही स्वत: वसवलेली नाहीत अशी मोठी, समृध्द नगरे तो तुम्हास देईल.
11 E casas cheias de todo o bem, que tu não encheste, e poços cavados, que tu não cavaste, vinhas e olivais, que tu não plantaste, e comeres, e te fartares,
११उत्तम वस्तूंनी भरलेली घरे परमेश्वर तुम्हास देईल. तुम्हास खोदाव्या न लागलेल्या विहिरी परमेश्वर तुम्हास देईल. तुम्ही लागवड न केलेले द्राक्षांचे आणि जैतून वृक्षांचे मळे तुम्हास देईल. आणि मुबलक अन्नधान्याने तुम्ही तृप्त व्हाल.
12 Guarda-te, e que te não esqueças do Senhor, que te tirou da terra do Egito, da casa da servidão.
१२पण सावध राहा! परमेश्वरास विसरु नका. मिसरमध्ये तुम्ही गुलाम होता पण तेथून त्याने तुम्हास बाहेर आणले.
13 O Senhor teu Deus temerás, e a ele servirás, e pelo seu nome jurarás.
१३तुमचा देव परमेश्वर याचे भय धरा व त्याचीच सेवा करा. शपथ घेताना त्याच्या नावाने शपथ वाहा, खोट्या देवांच्या नावाने वाहू नका.
14 Não seguireis outros deuses, os deuses dos povos que houver à roda de vós;
१४तुमच्या आसपासच्या राष्ट्रांतील लोकांच्या दैवतांच्या नादी लागू नका.
15 Porque o Senhor vosso Deus é um Deus zeloso no meio de ti, para que a ira do Senhor teu Deus se não acenda contra ti, e te destrua de sobre a face da terra.
१५कारण तुमच्यामध्ये असणारा तुमचा देव परमेश्वर ईर्ष्यावान आहे. त्याच्या लोकांनी इतर दैवतांची पूजा केलेली परमेश्वरास आवडत नाही. भलत्याच दैवतांची तुम्ही पूजा केल्यास त्याचा कोप होईल. त्या क्रोधाने तो तुम्हास पृथ्वीच्या पाठीवरुन नष्ट करील.
16 Não tentareis o Senhor vosso Deus, como o tentaste em Massah.
१६मस्सा येथे तुम्ही आपला देव परमेश्वर याची परीक्षा पाहिलीत, तसे इथे करु नका.
17 Diligentemente guardareis os mandamentos do Senhor vosso Deus; como também os seus testemunhos, e seus estatutos, que te tem mandado.
१७तुमचा देव परमेश्वर ह्याने दिलेल्या आज्ञा कटाक्षाने पाळा. त्याच्या शिकवणीचे व नियमांचे पालन करा.
18 E farás o reto e o bom aos olhos do Senhor: para que bem te suceda, e entres, e possuas a boa terra, sobre a qual o Senhor jurou a teus pais.
१८उचित आणि चांगले आहे तेच करा. त्यानेच परमेश्वर प्रसन्न होतो. त्याने तुमचे कल्याण होईल. परमेश्वराने जो चांगला प्रदेश तुम्हास द्यायचे तुमच्या पूर्वजांना कबूल केले आहे, त्यामध्ये तुमचा प्रवेश होऊन त्याचे वतन तुम्हास मिळेल.
19 Para que lance fora a todos os teus inimigos de diante de ti, como o Senhor tem dito.
१९परमेश्वराने कबूल केल्याप्रमाणे, तुम्ही आपल्या शत्रूंना हुसकावून लावाल.
20 Quando teu filho te perguntar pelo tempo adiante, dizendo: quais são os testemunhos, e estatutos e juízos que o Senhor nosso Deus vos ordenou?
२०आपल्या परमेश्वर देवाने जी शिकवण दिली, विधी नियम सांगितले त्याचा अर्थ काय असे पुढे तुमची मुले विचारतील.
21 Então dirás a teu filho: éramos servos de faraó no Egito; porém o Senhor nos tirou com mão forte do Egito;
२१तेव्हा त्यांना सांगा की आम्ही मिसरमध्ये फारोचे गुलाम होतो. परंतु परमेश्वराने आपल्या प्रचंड सामर्थ्याने आम्हास तेथून बाहेर आणले.
22 E o Senhor deu sinais grandes, e nocivas maravilhas no Egito, a faraó e a toda a sua casa, aos nossos olhos;
२२परमेश्वराने मिसरी लोक, फारो व त्याचे कुटुंब यांच्याविरूद्ध मोठे प्रभावी चमत्कार करून दाखवले ते आम्ही प्रत्यक्ष पाहिले आहेत.
23 E dali nos tirou, para nos levar, e nos dar a terra que jurara a nossos pais.
२३आपल्या पूर्वजांना कबूल केलेला प्रदेश आपल्याला द्यायला त्याने आम्हांला मिसरमधून बाहेर आणले.
24 E o Senhor nos ordenou que fizessemos todos estes estatutos, para temer ao Senhor nosso Deus, para o nosso perpétuo bem, para nos guardar em vida, como no dia de hoje.
२४ही सर्व शिकवण पाळायची आज्ञा परमेश्वराने आम्हास दिली आहे. आपण आपला देव परमेश्वर ह्याचे भय बाळगावे. मग तो आपल्याला कायम जिवंत ठेवील व आपले भले करील.
25 E será para nós justiça, quando tivermos cuidado de fazer todos estes mandamentos perante o Senhor nosso Deus, como nos tem ordenado.
२५जर आपण काळजीपूर्वक आपला देव परमेश्वर याचे सर्व नियम पाळले तर ते आपले नीतिमत्व ठरेल.