< 1 Crônicas 23 >
1 Sendo pois David já velho, e cheio de dias, fez a Salomão seu filho rei sobre Israel.
१आता दावीद म्हातारा झाला होता आणि त्याच्या आयुष्याच्या शेवटच्या दिवसात होता, तेव्हा त्याने आपला पुत्र शलमोन याला इस्राएलाचा राजा केले.
2 E ajuntou a todos os príncipes de Israel, como também aos sacerdotes e levitas.
२त्याने इस्राएलमधील सर्व पुढारी मंडळी, याजक आणि लेवी यांना एकत्र बोलावून घेतले.
3 E foram contados os levitas de trinta anos e daí para cima: e foi o número deles, segundo as suas cabeças, trinta e oito mil homens.
३तीस आणि त्याहून अधिक वय असलेल्या लेवींची त्याने गणना केली. त्यांची संख्या एकंदर अडतीस हजार होती.
4 Destes havia vinte e quatro mil, para promoverem a obra da casa do Senhor, e seis mil oficiais e juízes,
४त्यांच्यातले, चोवीस हजार लेवी परमेश्वराच्या मंदिराच्या कामावर देखरेख करणारे होते आणि सहा हजार अधिकारी आणि न्यायाधीश होते.
5 E quatro mil porteiros, e quatro mil para louvarem ao Senhor com os instrumentos, que eu fiz para o louvar, disse David.
५चार हजार द्वारपाल होते आणि दावीद म्हणाला, मी जी वाद्ये आराधना करायला करवून घेतली त्याच्या साथीने परमेश्वराची स्तुती करणारे चार हजार होते.
6 E David os repartiu por turnos, segundo os filhos de Levi, Gerson, Kohath e Merari.
६लेवीचे पुत्र गेर्षोन, कहाथ आणि मरारी यांच्या घराण्यानुसार दावीदाने सर्व लेवींची तीन गटांमध्ये विभागणी केली.
7 Dos gersonitas: Ladan e Simei.
७गेर्षोन घराण्यात लादान आणि शिमी हे दोघे होते.
8 Os filhos de Ladan; Jehiel o chefe, e Zetham, e Joel, três.
८लादान याला तीन पुत्र. यहीएल हा थोरला. नंतर जेथाम व योएल.
9 Os filhos de Simei: Selomith, e Haziel, e Haran, três: estes foram os chefes dos pais de Ladan.
९शिमीचे पुत्र असे शलोमोथ, हजिएल व हारान. लादानच्या घराण्यांचे हे प्रमुख होते.
10 E os filhos de Simei: Jahath, Ziza, e Jeus, e Berias: estes foram os filhos de Simei, quatro.
१०शिमीला चार पुत्र. यहथ, जीजा, यऊश आणि बरीया.
11 E Jahath era o chefe, e Ziza o segundo, mas Jeus e Berias não tiveram muitos filhos; pelo que foram contados em casa de seus pais por uma só família.
११यहथ हा त्यांपैकी मोठा, दुसरा जीजा, यऊश आणि बरीया यांना मात्र फार संतती नव्हती त्यामुळे त्यांचे दोघांचे मिळून एकच घराणे धरले जाई.
12 Os filhos de Kohath: Amram, Ishar, Hebron, e Uziel, quatro.
१२कहाथाला चार पुत्र होते: अम्राम, इसहार, हेब्रोन आणि उज्जियेल.
13 Os filhos de Amram: Aarão e Moisés; e Aarão foi separado para santificar a santidade das santidades, ele e seus filhos, eternamente; para incensar diante do Senhor, para o servirem, e para darem a benção em seu nome eternamente.
१३अहरोन आणि मोशे हे अम्रामचे पुत्र अहरोन आणि त्याच्या वंशजाची खास कामाकरता निवड केली गेली होती. परमेश्वराच्या उपासनेच्या पवित्र कामाच्या तयारीसाठी त्यांना कायमचे वेगळे काढले गेले होते. परमेश्वरापुढे धूप जाळणे, परमेश्वराचे याजक म्हणून सेवा करणे, लोकांस आशीर्वाद देणे अशी त्यांची कामे होती.
14 E quanto a Moisés, homem de Deus, seus filhos foram contados entre a tribo de Levi.
१४मोशे हा देवाचा संदेष्टा होता. त्याचे पुत्र लेवीच्या वंशातच गणले जात.
15 Foram pois os filhos de Moisés, Gersom e Eliezer.
१५गेर्षोम आणि अलियेजर हे मोशेचे पुत्र.
16 Dos filhos de Gersom foi Sebuel o chefe.
१६शबुएल हा गेर्षोमचा थोरला पुत्र.
17 E quanto aos filhos de Eliezer, foi Rehabias o chefe: e Eliezer não teve outros filhos; porém os filhos de Rehabias se multiplicaram grandemente.
१७रहब्या हा अलियेजरचा थोरला पुत्र. हा एकुलता एक होता. रहब्याला मात्र बरीच अपत्य झाली.
18 Dos filhos de Ishar foi Selomith o chefe.
१८शलोमीथ हा इसहारचा पहिला पुत्र.
19 Quanto aos filhos de Hebron, foi Jerias o chefe, Amarias o segundo, Jahaziel o terceiro, e Jekamam o quarto.
१९हेब्रोनचे पुत्र याप्रमाणे: यरीया मोठा, अमऱ्या दुसरा, यहजिएल तिसरा, यकमाम चौथा.
20 Quanto aos filhos de Uziel, Micha o chefe, e Issias o segundo.
२०उज्जियेलाचे पुत्र: पहिला मीखा आणि नंतरचा इश्शिया.
21 Os filhos de Merari: Maheli e Musi; os filhos de Maheli: Eleazar e Kis.
२१महली आणि मूशी हे मरारीचे पुत्र. एलाजार आणि कीश हे महलीचे पुत्र.
22 E morreu Eleazar, e não teve filhos, porém filhas; e os filhos de Kis, seus irmãos, as tomaram por mulheres.
२२एलाजाराला कन्या रत्नेच झाली. त्यास पुत्र नव्हता. या कन्यांचे विवाह नात्यातच झाले. त्या लग्न होऊन कीशाच्या घराण्यात गेल्या.
23 Os filhos de Musi: Maheli, e Eder, e Jeremath, três.
२३मूशीचे पुत्र: महली, एदर आणि यरेमोथ.
24 Estes são os filhos de Levi, segundo a casa de seus pais, chefes dos pais, segundo foram contados pelo número dos nomes, segundo os seus chefes, que faziam a obra do ministério da casa o Senhor, da idade de vinte anos e daí para cima.
२४हे झाले लेवीचे वंशज आपापल्या घराण्यांप्रमाणे त्यांची मोजणी झाली. ते घराण्यांचे प्रमुख होते. त्यांच्यापैकी प्रत्येकाच्या नावाची नोंद झालेली आहे. जे वीस किंवा त्याहून अधिक वयाचे होते त्यांनी परमेश्वराच्या मंदिरात सेवा करणे हे त्यांचे काम.
25 Porque disse David: O Senhor Deus de Israel deu repouso ao seu povo, e habitará em Jerusalém para sempre.
२५दावीद म्हणाला, “इस्राएलाचा देव परमेश्वर याच्यामुळे लोकांस शांती लाभली आहे. परमेश्वर यरूशलेमेला कायमच्या वास्तव्यासाठी आला आहे.
26 E também, quanto aos levitas, que nunca mais levassem o tabernáculo, nem algum de seus aparelhos pertencentes ao seu ministério.
२६तेव्हा लेवींना निवासमंडप आणि उपासनेतील सेवेचे इतर पात्रे सतत वाहण्याची गरज पडणारहि नाही.”
27 Porque, segundo as últimas palavras de David, foram contados os filhos de Levi da idade de vinte anos e daí para cima.
२७लेवी कुळातील वंशजांची मोजदाद करणे ही दावीदाची इस्राएल लोकांस अखेरची आज्ञा होती. त्यानुसार वीस वर्षे आणि त्यापुढील वयाच्या मनुष्यांची मोजणी झाली.
28 Porque o seu cargo era de estar ao mandado dos filhos de Aarão no ministério da casa do Senhor, nos átrios, e nas câmaras, e na purificação de todas as coisas sagradas, e na obra do ministério da casa de Deus,
२८अहरोनाच्या वंशजांना परमेश्वराच्या मंदीरातील सेवेत मदत करणे हे लेवीचे काम होते. मंदिराचे आवार आणि बाजूच्या खोल्या यांची देखभाल ही त्यांच्याकडे होती. मंदिरातील सर्व पवित्र गोष्टी शुध्द ठेवणे ही त्यांची जबाबदारी होती. देवाच्या मंदिरातील हे काम ते करत असत.
29 A saber: para os pães da proposição, e para a flor de farinha, para a oferta de manjares, e para os coscorões asmos, e para as sartãs, e para o tostado, e para toda a medida e mensura;
२९मंदिरातील समर्पित भाकर मेजावर ठेवणे, पीठ, अन्नार्पण करण्याच्या वस्तू बेखमीर भाकरी यावर त्यांची देखरेख होती. याखेरीज, तव्यावर भाजलेले, मळलेले सर्वकाही सिध्द करणे, मोजून मापून त्या वस्तूंची तयारी करणे हे ही काम त्यांच्याकडे होते.
30 E para estarem cada manhã em pé para louvarem e celebrarem ao Senhor; e semelhantemente à tarde;
३०ते रोज सकाळ संध्याकाळ परमेश्वराचे आभार मानायला आणि त्याची स्तुती करायला उभे राहत.
31 E para cada oferecimento dos holocaustos do Senhor, nos sábados, nas luas novas, e nas solenidades, por conta, segundo o seu costume, continuamente perante o Senhor:
३१आणि परमेश्वरास शब्बाथ दिवशी, चंद्रदर्शनाच्या आणि नेमलेल्या सणाच्या दिवशी ठरलेल्या संख्येप्रमाणे नेहमी परमेश्वरापुढे सर्व होमार्पणे अर्पण करण्यास हजर राहत.
32 E para que tivessem cuidado da guarda da tenda da congregação, e da guarda do santuário, e da guarda dos filhos de Aarão, seus irmãos, no ministério da casa do Senhor.
३२ते दर्शनमंडप, पवित्रस्थानाचे प्रमुख होते. आणि त्यांचे सहकारी अहरोनाचे वंशज यांना ते परमेश्वराच्या मंदिराच्या सेवेत मदत करत होते.