< 1 Crônicas 17 >
1 Sucedeu pois que, morando David já em sua casa, disse David ao profeta Nathan: Eis que moro em casa de cedros, mas a arca do concerto do Senhor está debaixo de cortinas.
१आणि असे झाले की, राजा दावीद आपल्या घरी राहत होता, तो नाथान संदेष्ट्यास म्हणाला, “पहा, मी गंधसरूच्या घरात राहत आहे, पण परमेश्वराचा कराराचा कोश मात्र अजूनही एका तंबूतच राहत आहे.”
2 Então Nathan disse a David: Tudo quanto tens no teu coração faze, porque Deus é contigo.
२तेव्हा नाथान दावीदास म्हणाला, “जा, तुझ्या मनात जे आहे ते कर, कारण देव तुझ्याबरोबर आहे.”
3 Mas sucedeu, na mesma noite, que a palavra do Senhor veio a Nathan, dizendo:
३पण त्याच रात्री देवाचे वचन नाथानाकडे आले व म्हणाले,
4 Vai, e dize a David meu servo: Assim diz o Senhor: Tu me não edificarás uma casa para morar;
४“जा आणि माझा सेवक दावीद याला सांग, परमेश्वर असे म्हणतो, मला राहण्यासाठी तू घर बांधायचे नाही.
5 Porque em casa nenhuma morei, desde o dia em que fiz subir a Israel até ao dia de hoje; mas fui de tenda em tenda, e de tabernáculo em tabernáculo.
५कारण मी इस्राएलांस वर आणले त्यादिवसापासून आजपर्यंत मी मंदिरात राहिलेलो नाही. त्याऐवजी, मी विविध ठिकाणी, तंबूतून व मंडपातूनच राहत आलो आहे.
6 Por todas as partes por onde andei com todo o Israel, porventura falei alguma palavra a algum dos juízes de Israel, a quem ordenei que apascentasse o meu povo, dizendo: Porque me não edificais uma casa de cedros?
६सर्व इस्राएलाबरोबर ज्या ज्या ठिकाणांमध्ये मी फिरत आलो तेथे तेथे ज्यांना माझ्या लोकांचे पालन करण्यासाठी मी नेमले त्या इस्राएलाच्या पुढाऱ्यांतील कोणा एकालाही ‘माझ्यासाठी तुम्ही गंधसरूचे घर का बांधले नाही, असा एक शब्द तरी मी कधी बोललो काय?’”
7 Agora pois assim dirás a meu servo, a David: Assim diz o Senhor dos exércitos: Eu te tirei do curral, de detraz das ovelhas, para que fosses chefe do meu povo Israel.
७“तर आता, माझा सेवक दावीद याला सांग की, ‘सर्वशक्तिमान परमेश्वराचे असे म्हणणे आहे” की, तू माझ्या इस्राएल लोकांचा अधिपती व्हावे म्हणून मी तुला गायरानातून, मेंढरांच्या मागून काढून घेतले.
8 E estive contigo por toda a parte, por onde foste, e de diante de ti exterminei todos os teus inimigos, e te fiz um nome como o nome dos grandes que estão na terra.
८आणि जेथे कोठे तू गेलास त्याठिकाणी मी तुझ्याबरोबर होतो आणि तुझ्या सर्व शत्रूंना तुझ्यापुढून कापून टाकले. आणि पृथ्वीवर जे कोणी महान लोक आहेत त्यांच्या नावासारखे मी तुझे नाव करीन.
9 E ordenei um lugar para o meu povo Israel, e o plantei, para que habite no seu lugar, e nunca mais seja removido de uma para outra parte; e nunca mais os debilitarão os filhos da perversidade, como ao princípio;
९माझ्या इस्राएल लोकांस मी एक जागा नेमून देईन आणि त्यांना त्याठिकाणी स्थिर करीन, म्हणजे ते आपल्या स्वतःच्या जागी राहतील व त्यांना कसलाही त्रास होणार नाही. पूर्वीसारखे दुष्ट लोक त्यांच्यावर जुलूम करणार नाही.
10 E desde os dias em que ordenei juízes sobre o meu povo Israel; porém abati a todos os teus inimigos: também te fiz saber que o Senhor te edificaria uma casa.
१०मी माझ्या इस्राएल लोकांवर न्यायाधीश नेमले होते त्यादिवसापासून ते जसे त्यांना त्रास देणार नाही. आणि मी तुझ्या सर्व शत्रूंचा मोड करीन, मी तुला आणखी सांगतो की, परमेश्वर तुझे घर बांधील.
11 E há de ser que, quando forem cumpridos os teus dias, para ires a teus pais, suscitarei a tua semente depois de ti, a qual será dos teus filhos, e confirmarei o seu reino.
११आणि असे होईल की जेव्हा तुझे दिवस परिपूर्ण होऊन तू आपल्या पूर्वजाकडे गेल्यावर, मी तुझ्यानंतर तुझ्या वंशातून जो तुझा पुत्र, त्यास मी उभे करीन, मी त्याचे राज्य स्थापीन.
12 Este me edificará casa; e eu confirmarei o seu trono para sempre.
१२तो माझ्यासाठी घर बांधील आणि मी त्याचे सिंहासन सर्वकाळ स्थापित करीन.
13 Eu lhe serei por pai, e ele me será por filho: e a minha benignidade não desviarei dele, como a tirei daquele, que foi antes de ti.
१३मी त्याचा पिता होईन आणि तो माझा पुत्र होईल. तुझ्यापूर्वी शौल राज्य करत होता. त्याच्यावरची मी माझी कृपादृष्टी काढून घेतली तशी तुझ्यावरची माझी कृपादृष्टी दूर करणार नाही.
14 Mas o confirmarei na minha casa e no meu reino para sempre, e o seu trono será firme para sempre.
१४मी त्यास माझ्या घरात आणि राज्यात सर्वकाळ ठेवीन, त्याचे राजासन सर्वकाळ स्थापीन.
15 Conforme todas estas palavras, e conforme toda esta visão, assim falou Nathan a David.
१५नाथान दावीदाशी बोलला आणि त्याने त्यास सर्व वचने व संपूर्ण दर्शनाबद्दल सविस्तर सांगितले.
16 Então entrou o rei David, e ficou perante o Senhor: e disse: Quem sou eu, Senhor Deus? e qual é a minha casa, que me trouxestes até aqui?
१६नंतर दावीद राजा आत गेला व परमेश्वरासमोर जाऊन बसला; तो म्हणाला, “हे परमेश्वर देवा, मी कोण आहे, आणि माझे घराणे काय की तू मला येथपर्यंत आणले आहे?”
17 E ainda isto, ó Deus, foi pouco aos teus olhos; pelo que falaste da casa de teu servo para tempos distantes: e proveste-me, segundo o costume dos homens, com esta exaltação, ó Senhor Deus.
१७आणि हे देवा, तुझ्यादृष्टीने ही केवळ लहान गोष्ट होती, पण तू तुझ्या सेवकाच्या घराविषयी भविष्यात येणाऱ्या बऱ्याच दिवसांबद्दल बोलला आहेस. व हे परमेश्वर देवा, मला तू भविष्यातील पिढ्या दाखवल्या आहेत.
18 Que mais te dirá David, acerca da honra feita a teu servo? porém tu bem conheces a teu servo.
१८तुझ्या सेवकाचा तू सन्मान केला आहेस. आणखी मी, दावीद, तुला काय बोलू? तुझ्या सेवकाला तू विशेष ओळख दिली आहेस.
19 Ó Senhor, por amor de teu servo, e segundo o teu coração, fizeste todas estas grandezas, para fazer notórias todas estas grandes coisas.
१९हे परमेश्वरा, तुझ्या सेवकासाठी व तुझा स्वतःचा हेतू पूर्ण व्हावा, म्हणून तू या सर्व महान गोष्टी प्रगट करण्यासाठी अदभुत कृत्ये केलीस.
20 Senhor, ninguém há como tu, e não há Deus fora de ti, conforme tudo quanto ouvimos com os nossos ouvidos.
२०हे परमेश्वरा, जे सर्व आम्ही आजवर आमच्या कानांनी ऐकले त्याप्रमाणे तुजसमान कोणी नाही आणि तुझ्याशिवाय कोणीच देव नाही.
21 E quem há como o teu povo Israel, única gente na terra? a quem Deus foi remir para seu povo, fazendo-te nome com coisas grandes e temerosas, lançando as nações de diante do teu povo, que remiste do Egito.
२१आणि तुझ्या इस्राएल लोकांसारखे दुसरे कोठले राष्ट्र पृथ्वीवर आहे ज्यांना तू, आपलेच लोक व्हावेत, म्हणून देव स्वतः त्यांना मिसरातून सोडवण्यास गेला; या तुझ्या लोकांस तू मिसरातून सोडवले तिच्या देखत महान व भयानक कृत्ये करून तू आपले नाव केले. ज्यांना तू मिसरातून सोडवले होते, त्या तुझ्या लोकांपुढून इतर राष्ट्रांस घालवून दिले.
22 E tomaste o teu povo Israel para ser teu povo para sempre: e tu, Senhor, lhe foste por Deus.
२२तू इस्राएलांना आपले स्वतःचे लोक सर्वकाळासाठी करून ठेवले आणि परमेश्वरा तू त्यांचा देव झालास.
23 Agora pois, Senhor, a palavra que falaste de teu servo, e acerca da sua casa, seja certa para sempre: e faze como falaste.
२३म्हणून आता, हे परमेश्वरा, तुझ्या सेवकाला आणि त्याच्या घराण्याला तू हे वचन दिले आहेस, ते सर्वकाळ स्थापित कर. तू बोलला आहेस तसे कर.
24 Confirme-se com efeito, e que o teu nome se engrandeça para sempre, e diga-se: O Senhor dos exércitos, o Deus de Israel, é Deus para Israel; e fique firme diante de ti a casa de David teu servo.
२४तुझे नाव सर्वकाळ स्थापित व्हावे व थोर केले जावे, असे म्हणून, सेनाधीश परमेश्वर इस्राएलाचा देव आहे. दावीद, तुझा सेवक याचे घराणे तुझ्यासमोर स्थापित व्हावे.
25 Porque tu, Deus meu, revelaste ao ouvido de teu servo que lhe edificarias casa; pelo que o teu servo achou confiança para orar em tua presença.
२५कारण, माझ्या देवा, तू आपल्या सेवकास हे प्रगट केले की, तू त्याच्यासाठी घर बांधशील. याकरिता तुझ्या सेवकाला, तुझ्याकडे प्रार्थना करण्याचे धैर्य मिळाले आहे.
26 Agora pois, Senhor, tu és o mesmo Deus, e falaste este bem acerca de teu servo.
२६आता हे परमेश्वरा, तूच देव आहेस आणि तुझ्या सेवकाला हे चांगले अभिवचन दिले आहे.
27 Agora pois foste servido abençoares a casa de teu servo, para que esteja perpetuamente diante de ti: porque tu, Senhor, a abençoaste, e ficará abençoada para sempre.
२७तर आता, संतुष्ट होऊन तुझ्या सेवकाच्या घराण्याला तुझ्यापुढे सर्वकाळ राहण्याचा आशीर्वाद दिला आहे. हे परमेश्वरा, तू, आशीर्वाद दिलास आणि ते सर्वकाळ आशीर्वादित आहे.