< Levítico 22 >
1 Depois fallou o Senhor a Moysés, dizendo:
१परमेश्वर मोशेला म्हणाला,
2 Dize a Aarão e a seus filhos que se apartem das coisas sanctas dos filhos de Israel, que a mim me sanctificam, para que não profanem o nome da minha sanctidade: Eu sou o Senhor.
२“अहरोन व त्याचे पुत्र ह्याना सांग की इस्राएल लोक ज्या वस्तू मला समर्पण करतात त्यापासून त्यांनी दूर रहावे व माझ्या पवित्र नावाला कलंक लावू नये. मी परमेश्वर आहे!
3 Dize-lhes: Todo o homem, que entre as vossas gerações, de toda a vossa semente, se chegar ás coisas sanctas que os filhos de Israel sanctificam ao Senhor, tendo sobre si a sua immundicia, aquella alma será extirpada de diante da minha face: Eu sou o Senhor
३तुझ्या वंशजापैकी कोणी जर अशुद्ध असेल त्याने इस्राएल लोकांनी समर्पीत केलेल्या पवित्र वस्तूंना हात लावू नये, त्यास मजसमोरुन दूर करावे. मी परमेश्वर आहे!
4 Ninguem da semente d'Aarão, que fôr leproso, ou tiver fluxo, comerá das coisas sanctas, até que seja limpo: como tambem o que tocar alguma coisa immunda de cadaver, ou aquelle de que sair a semente da copula,
४अहरोनाच्या वंशापैकी कोणी महारोगी किंवा स्त्राव होणारा असला तर त्याने शुद्ध होईपर्यंत पवित्र केलेले पदार्थ खाऊ नयेत. हा नियम अशुद्ध झालेल्या प्रत्येक याजकाला लागू आहे. प्रेताला स्पर्श केल्यामुळे किंवा वीर्यपातामुळे अशुद्ध झालेला मनुष्य,
5 Ou qualquer que tocar a algum reptil, pelo que se fez immundo, ou a algum homem, pelo que se fez immundo, segundo toda a sua immundicia.
५किंवा जमिनीवर सरपटणाऱ्या कोणत्याही अशुद्ध प्राण्याला स्पर्श केल्यामुळे किंवा कोणत्याही इतर कारणामुळे अशुद्ध झालेल्या मनुष्यास स्पर्श केल्यामुळे
6 O homem que o tocar será immundo até á tarde, e não comerá das coisas sanctas, mas banhará a sua carne em agua.
६याजकाने अशा कोणालाही स्पर्श केला तर त्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध रहावे. त्याने पवित्र पदार्थ खाऊ नयेत; त्याने पाण्याने स्नान केले तरी पवित्र पदार्थ खाऊ नयेत.
7 E havendo-se o sol já posto, então será limpo, e depois comerá das coisas sanctas; porque este é o seu pão.
७सूर्य मावळल्यावरच तो मनुष्य शुद्ध ठरेल; त्यानंतर त्याने पवित्र पदार्थ खावे; कारण ते त्याचे अन्न आहे.
8 O corpo morto e o dilacerado não comerá, para n'elle se não contaminar: Eu sou o Senhor.
८आपोआप मरण पावलेल्या किंवा जंगली जनावरांनी मारुन टाकलेल्या जनावराचे मांस याजकाने खाऊ नये, जर तो ते खाईल तर तो अशुद्ध होईल; मी परमेश्वर आहे!
9 Guardarão pois o meu mandamento, para que por isso não levem peccado, e morram n'elle, havendo-as profanado: Eu sou o Senhor que os sanctifico.
९त्यांनी माझी आज्ञा पाळावी व पवित्र पदार्थ अपवित्र होणार नाहीत याची काळजी घ्यावी; त्यांनी ती घेतील नाही तर आज्ञाभंगाच्या पापामुळे ते मरतील. मी परमेश्वराने त्यांना या पवित्र कामासाठी वेगळे केले आहे.
10 Tambem nenhum estranho comerá das coisas sanctas: nem o hospede do sacerdote nem o jornaleiro comerão das coisas sanctas.
१०फक्त याजकाच्या कुटुंबातील लोकांनी पवित्र अन्न खावे; त्याच्याकडील पाहुण्याने किंवा त्या याजकाने कामाला लावलेल्या मजुराने पवित्र अन्न खाऊ नये;
11 Mas quando o sacerdote comprar alguma alma com o seu dinheiro, aquella comerá d'ellas, e o nascido na sua casa: estes comerão do seu pão.
११परंतु याजकाने स्वत: चे पैसे देऊन एखादा गुलाम विकत घेतला असेल तर त्या गुलामाने व याजकाच्या घरात जन्मलेल्या त्याच्या मुलाबाळांनी त्या पवित्र अन्नातून खावे.
12 E, quando a filha do sacerdote se casar com homem estranho, ella não comerá da offerta movida das coisas sanctas.
१२याजकाच्या मुलीने याजक वंशाच्या बाहेरच्या मनुष्याबरोबर लग्न केले असेल तर तिने पवित्र पदार्थ खाऊ नयेत.
13 Mas quando a filha do sacerdote fôr viuva ou repudiada, e não tiver semente, e se houver tornado á casa de seu pae, como na sua mocidade, do pão de seu pae comerá; mas nenhum estranho comerá d'elle.
१३याजकाची मुलगी विधवा झाली असेल किंवा तिच्या नवऱ्याने तिला सोडून दिले असेल, तिला एकही मूल झालेले नसेल व परत ती तरुणपणी होती तशीच आपल्या वडिलाच्या घरी राहत असेल तर मग आपल्या वडिलाच्या म्हणजे याजकाच्या घरातील पवित्र अन्नातून तिने खावे, परंतु याजकाच्या घरचे पवित्र अन्न फक्त त्याच्या कुटुंबातील लोकांनीच खावे परकियाने खाऊ नये.
14 E quando alguem por erro comer a coisa sancta, sobre ella accrescentará seu quinto, e o dará ao sacerdote com a coisa sancta.
१४एखाद्याने चुकून पवित्र पदार्थ खाल्ला तर त्याने त्या खाल्लेल्या पदार्थाइतकी व त्या पदार्थाच्या पाचव्या हिश्श्याइतकी किंमत भरपाई म्हणून त्यामध्ये घालून याजकास द्यावी.
15 Assim não profanarão as coisas sanctas dos filhos de Israel, que offerecem ao Senhor,
१५इस्राएल लोक परमेश्वरास अर्पणे देतात तेव्हा ती अर्पणे पवित्र होतात, म्हणून ती पवित्र अर्पणे याजकाने अपवित्र करु नयेत;
16 Nem os farão levar a iniquidade da culpa, comendo as suas coisas sanctas: pois Eu sou o Senhor que as sanctifico.
१६जर याजकांनी त्यांना पवित्र अर्पणे खाण्याची परवानगी दिली तर ते स्वत: वर अपराध ओढवून घेतील. आणि त्या अपराधाबद्दल त्यांना पैसे भरावे लागतील. मी परमेश्वर त्यांना पवित्र करणारा आहे!
17 Fallou mais o Senhor a Moysés, dizendo:
१७मग परमेश्वर मोशेला म्हणाला,
18 Falla a Aarão, e a seus filhos, e a todos os filhos de Israel, e dize-lhes: Qualquer que, da casa de Israel, ou dos estrangeiros em Israel, offerecer a sua offerta, quer dos seus votos, quer das suas offertas voluntarias, que offerecerem ao Senhor em holocausto,
१८अहरोन, त्याचे पुत्र व सर्व इस्राएल लोक ह्याना सांग की तुम्हा इस्राएल लोकांपैकी किंवा तुम्हामध्ये राहणाऱ्या उपरी लोकांपैकी कोणाला आपल्या नवसाचा किंवा काही विशेष कारणासाठी स्वखुशीचा परमेश्वरासाठी यज्ञबली अर्पावयाचा असेल,
19 Segundo a sua vontade, offerecerá macho sem mancha, das vaccas, dos cordeiros, ou das cabras.
१९व तो मान्य असणारा असावा जसे गुरे, मेंढरे किंवा बकरे ह्यापैकी असेल तर तो त्यांच्यातील नर असावा, व त्याच्यात काहीही दोष नसावा!
20 Nenhuma coisa em que haja defeito offerecereis, porque não seria acceita por vós.
२०परंतु दोष असलेली कोणतीही अर्पणे तू स्विकारू नये; त्या अर्पणामुळे मला संतोष होणार नाही!
21 E, quando alguem offerecer sacrificio pacifico ao Senhor, separando das vaccas ou das ovelhas um voto, ou offerta voluntaria, sem mancha será, para que seja acceito; nenhum defeito haverá n'elle.
२१एखाद्या मनुष्यास आपला नवस फेडण्यासाठी किंवा खुशीच्या अर्पणासाठी परमेश्वरास गुरांढोरातून किंवा शेरडांमेंढरातून शांत्यर्पण करावयाचे असेल तर ते दोषहीन असावे म्हणजे ते मान्य होईल.
22 O cego, ou quebrado, ou aleijado, o verrugoso, ou sarnoso, ou cheio de impigens, este não offerecereis ao Senhor, e d'elles não poreis offerta queimada ao Senhor sobre o altar.
२२आंधळा, हाड मोडलेला, लुळा, वाहती जखम असलेला किंवा अंगवार मस, चाई, खरुज असा त्वचेचा रोग असलेला असा कोणताही प्राणी परमेश्वरास अर्पू नये, किंवा परमेश्वराकरिता वेदीवर त्याचा अर्पण म्हणून होम करु नये.
23 Porém boi, ou gado miudo, comprido ou curto de membros, poderás offerecer por offerta voluntaria, mas por voto não será acceito.
२३गोऱ्हा किंवा मेंढा ह्याचा एखादा पाय आखुड पूर्णपणे न वाढलेला किंवा प्रमाणाबाहेर लांब असेल तर तो खुशीच्या अर्पणाकरिता चालेल, पण नवस फेडण्याकरिता त्याचा स्वीकार होणार नाही.
24 O machucado, ou moido, ou despedaçado, ou cortado, não offerecereis ao Senhor: não fareis isto na vossa terra.
२४ज्याचे अंड ठेचलेले, चिरडलेले किंवा फाटलेले असेल असा प्राणी परमेश्वरास अर्पण करु नये अशा गोष्टी तुम्ही तुमच्या देशात करु नयेत.
25 Tambem da mão do estrangeiro nenhum manjar offerecereis ao vosso Deus, de todas estas coisas, pois a sua corrupção está n'ellas; falta n'ellas ha; não serão acceitas por vós.
२५देवाला अर्पण करण्यासाठी म्हणून कोणतेही प्राणी तुम्ही परराष्ट्रीय लोकांकडून घेऊ नये कारण त्या प्राण्यांना काही इजा झालेली असेल किंवा त्यांच्यात काही दोष असेल तर; ते प्राणी स्वीकारले जाणार नाहीत!
26 Fallou mais o Senhor a Moysés, dizendo:
२६परमेश्वर मोशेला म्हणाला,
27 Quando nascer o boi, ou cordeiro, ou cabra, sete dias estará debaixo de sua mãe; depois, desde o dia oitavo em diante, será acceito por offerta queimada ao Senhor.
२७वासरू, कोकरु किंवा करडू जन्मल्यावर सात दिवस त्याच्या आईजवळ असले पाहिजे; आठव्या दिवशी व त्यानंतर ते परमेश्वरास अर्पण म्हणून अर्पण करण्यासाठी स्वीकारावयास योग्य ठरेल.
28 Tambem boi ou gado miudo, a elle e a seu filho não degolareis n'um dia.
२८परंतु गाय व तिचे वासरु, मेंढी व तिचे कोकरु ह्याप्रमाणे एखादा प्राणी व त्याची आई ह्यांचा एकाच दिवशी वध करु नये.
29 E, quando sacrificardes sacrificio de louvores ao Senhor, o sacrificareis da vossa vontade.
२९परमेश्वराकरिता तुम्हास उपकारस्तुतीचा यज्ञबली अर्पावयाचा असल्यास तो देवाला संतोष देईल अशाप्रकारे तुम्ही अर्पावा.
30 No mesmo dia se comerá; nada deixareis ficar até á manhã: Eu sou o Senhor.
३०अर्पण केलेल्या पशूचे मांस त्याच दिवशी तुम्ही खाऊन टाकावे; त्यातील काहीही दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत शिल्लक ठेवू नये. मी परमेश्वर आहे!
31 Pelo que guardareis os meus mandamentos, e os fareis: Eu sou o Senhor.
३१तुम्ही माझ्या आज्ञांची आठवण ठेवून त्या पाळाव्या; मी परमेश्वर आहे!
32 E não profanareis o meu sancto nome, para que eu seja sanctificado no meio dos filhos de Israel: Eu sou o Senhor que vos sanctifico;
३२तुम्ही माझ्या पवित्र नांवाचा अनादर करू नये. माझे भय धरावे! इस्राएल लोकांमध्ये मला पवित्र मानण्यात येईल; मी तुम्हास माझे पवित्र लोक केले आहे मी परमेश्वर आहे!
33 Que vos tirei da terra do Egypto, para vos ser por Deus: Eu sou o Senhor.
३३मी तुम्हास मिसर देशातून बाहेर आणले, आणि मी तुमचा देव झालो, मी परमेश्वर आहे!”