< 1 Samuel 14 >

1 Succedeu pois que um dia disse Jonathan, filho de Saul, ao moço que lhe levava as armas: Vem, passemos á guarnição dos philisteos, que está lá d'aquella banda. Porém não o fez saber a seu pae
एके दिवशी असे झाले की, शौलाचा मुलगा योनाथान आपल्या शस्त्रवाहक तरुणाला म्हणाला, “चल आपण पलिष्ट्यांचे ठाणे जे पलीकडे आहे त्याकडे जाऊ.” परंतु त्याने आपल्या बापाला हे सांगितले नाही.
2 E estava Saul á extremidade de Gibeah, debaixo da romeira que estava em Migron; e o povo que havia com elle eram uns seiscentos homens.
शौल गिब्याच्या शेवटल्या भागी मिग्रोनांत डाळिंबाच्या झाडाखाली राहत होता त्याच्याजवळचे लोक सुमारे सहाशे होते;
3 E Ahija, filho d'Ahitub, irmão d'Icabod, o filho de Phineas, filho d'Eli, sacerdote do Senhor em Silo, trazia o ephod: porém o povo não sabia que Jonathan tinha ido.
एलीचा मुलगा फिनहास याचा मुलगा ईखाबोद याचा भाऊ अहीटूब याचा मुलगा अहीया शिलोत एफोद घातलेला परमेश्वराचा याजक हाही होता. तेव्हा योनाथान गेला हे लोकांस माहित नव्हते.
4 E entre os passos pelos quaes Jonathan procurava passar á guarnição dos philisteos, d'esta banda havia uma penha aguda, e da outra banda uma penha aguda: e era o nome de uma Bozez, e o nome da outra Senné.
योनाथान ज्या घाटांनी पलिष्ट्यांच्या ठाण्यावर जाण्यास पाहत होता त्याच्या एका बाजूला खडकाळ शिखर व दुसऱ्या बाजूला खडकाळ शिखर होते; त्यातल्या एकाचे नांव बोसेस व दुसऱ्याचे नांव सेने असे होते.
5 Uma penha para o norte estava defronte de Michmas, e a outra para o sul defronte de Gibeah.
एक शिखर उत्तरेकडे मिखमाशासमोर व दुसरे दक्षिणेकडे गिब्यासमोर उभे होते.
6 Disse pois Jonathan ao moço que lhe levava as armas: Vem, passemos á guarnição d'estes incircumcisos; porventura obrará o Senhor por nós, porque para com o Senhor nenhum impedimento ha de livrar com muitos ou com poucos.
योनाथान आपल्या तरुण शस्त्रवाहकाला म्हणाला, “चल, आपण त्या बेसुंत्यांच्या ठाण्यावर जाऊ. कदाचित परमेश्वर आमच्यासाठी कार्य करील; कारण बहुतांनी किंवा थोडक्यांनी सोडायला परमेश्वरास काही अडचण नाही.”
7 Então o seu pagem d'armas lhe disse: Faze tudo o que tens no coração; volta, eis-me aqui comtigo, conforme ao teu coração.
त्याचा शस्त्रवाहक त्यास म्हणाला, “जे तुझ्या मनात आहे ते सगळे कर. तू पुढे जा, पाहा तुझ्या आज्ञा पालन करण्यास मी तुझ्याबरोबर आहे.”
8 Disse pois Jonathan: Eis que passaremos áquelles homens, e nos descobriremos a elles.
तेव्हा योनाथान म्हणाला, “पाहा आपण त्या मनुष्याकडे जाऊन त्यास प्रगट होऊ.
9 Se nos disserem assim: Parae até que cheguemos a vós; então ficaremos no nosso logar, e não subiremos a elles.
जर ते आम्हास म्हणतील, ‘आम्ही तुम्हाकडे येऊ तोपर्यंत थांबा,’ तर आम्ही आपल्या ठिकाणी उभे राहू वर त्याच्याकडे जाणार नाही;
10 Porém, dizendo assim: Subi a nós; então subiremos, pois o Senhor os tem entregado na nossa mão, e isto nos será por signal.
१०परंतु जर ते म्हणतील की, ‘वर आम्हाकडे या,’ तर आम्ही वर जाऊ; कारण परमेश्वराने त्यांना आमच्या हाती दिले आहे. हेच आम्हांला चिन्ह होईल.”
11 Descobrindo-se ambos elles pois á guarnição dos philisteos, disseram os philisteos: Eis que já os hebreos sairam das cavernas em que se tinham escondido.
११मग त्या दोघांनी आपणांला पलिष्ट्यांच्या ठाण्यातील मनुष्यांना प्रगट केले. पलिष्ट्यांनी म्हटले, “पाहा ज्या गुहांमध्ये इब्री लपले होते त्यातून ते निघून येत आहेत.”
12 E os homens da guarnição responderam a Jonathan e ao seu pagem d'armas, e disseram: Subi a nós, e nós vol-o ensinaremos. E disse Jonathan ao seu pagem d'armas: Sobe atraz de mim, porque o Senhor os tem entregado na mão d'Israel.
१२ठाण्याच्या मनुष्यांनी योनाथान व त्याचा शस्त्रवाहक यांना उत्तर देऊन म्हटले, “वर आम्हाकडे या म्हणजे आम्ही तुम्हास काही गोष्टी दाखवू.” तेव्हा योनाथान आपल्या शस्त्रवाहकाला म्हणाला, “माझ्यामागे वर ये; कारण परमेश्वराने त्यांना इस्राएलाच्या हाती दिले आहे.”
13 Então trepou Jonathan com os pés e com as mãos, e o seu pagem d'armas atraz d'elle: e cairam diante de Jonathan, e o seu pagem d'armas os matava atraz d'elle.
१३मग योनाथान आपल्या हातांनी व आपल्या पायांनी चढून गेला आणि त्याचा शस्त्रवाहक त्याच्या मागोमाग चढून गेला. तेव्हा योनाथानासमोर पलिष्टी पडले व त्याच्यामागून त्याचा शस्त्रवाहक त्यांना मारीत गेला.
14 E succedeu esta primeira desfeita, em que Jonathan e o seu pagem d'armas feriram até uns vinte homens, quasi no meio de uma geira de terra que uma junta de bois podia lavrar.
१४जो पहिला वध योनाथानाने केला त्यामध्ये एक बिघा भूमीवर सुमारे वीस माणसे पडली.
15 E houve tremor no arraial, no campo e em todo o povo; tambem a mesma guarnição e os destruidores tremeram, e até a terra se alvoroçou, porquanto era tremor de Deus.
१५छावणीत शेतात व सर्व लोकांमध्ये कंप झाला, ते ठाणे व छापे मारणारेही कापले व भूमी कापली. तेथे तर फार घबराट पसरली होती.
16 Olharam pois as sentinellas de Saul em Gibeah de Benjamin, e eis que a multidão se derramava, e fugia batendo-se.
१६तेव्हा बन्यामिनातील गिब्यांतल्या शौलाच्या पहारेकऱ्यांनी पाहिले की पलिष्टी सैन्याचा जमाव पांगत आहे आणि ते इकडे तिकडे पळत आहेत.
17 Disse então Saul ao povo que estava com elle: Ora numerae, e vêde quem é que saiu d'entre nós. E numeraram, e eis que nem Jonathan nem o seu pagem d'armas estavam ali
१७मग शौल आपल्याबरोबरच्या लोकांस म्हणाला, “आमच्यामधून कोण गेला आहे? मोजून पाहा.” मग त्यांनी मोजून पाहिले तर योनाथान व त्याचा शस्त्रवाहक तेथे नव्हते.
18 Então Saul disse a Ahija: Traze aqui a arca de Deus (porque n'aquelle dia estava a arca de Deus com os filhos d'Israel).
१८शौलाने अहीयाला म्हटले, “देवाचा कोश इकडे आण.” कारण त्या वेळी देवाचा कोश इस्राएल लोकांच्यामध्ये होता.
19 E succedeu que, estando Saul ainda fallando com o sacerdote, o alvoroço que havia no arraial dos philisteos ia crescendo muito, e se multiplicava, pelo que disse Saul ao sacerdote: Retira a tua mão.
१९असे झाले की शौल याजकाशी बोलत असता पलिष्ट्यांच्या छावणीतला गलबला वाढत वाढत मोठा झाला. तेव्हा शौलाने याजकाला म्हटले, “आपला हात काढून घे.”
20 Então Saul e todo o povo que havia com elle se convocaram, e vieram á peleja; e eis que a espada d'um era contra o outro, e houve mui grande tumulto.
२०तेव्हा शौल व त्याच्याजवळ ते सर्व लोक जमून लढाईला गेले. आणि पाहा प्रत्येक पलिष्टी मनुष्याची तलवार आपल्या सोबत्याच्या विरूद्ध झाली म्हणून फार मोठी दाणादाण उडाली.
21 Tambem com os philisteos havia hebreos, como d'antes, que subiram com elles ao arraial em redor; e tambem estes se ajuntaram com os israelitas que estavam com Saul e Jonathan.
२१तेव्हा जे इब्री पूर्वी पलिष्ट्याच्यामध्ये राहिले होते जे चहूकडून त्याच्याबरोबर छावणीत गेले होते तेही शौल व योनाथान याच्याबरोबर जे इस्राएल होते त्याच्याशी मिळाले.
22 Ouvindo pois todos os homens d'Israel que se esconderam pela montanha d'Ephraim que os philisteos fugiam, elles tambem os perseguiram de perto na peleja.
२२जी इस्राएली माणसे एफ्राईमाच्या डोंगराळ प्रदेशांत लपली होती ती सर्व पलिष्टी पळत आहेत हे ऐकून लढाईत त्याच्या पाठीस लागली.
23 Assim livrou o Senhor a Israel n'aquelle dia: e o arraial passou a Beth-aven.
२३असे परमेश्वराने त्यादिवशी इस्राएलास सोडवले आणि लढाई बेथ-आवेनाकडे गेली.
24 E estavam os homens d'Israel já exhaustos n'aquelle dia, porquanto Saul conjurou o povo, dizendo: Maldito o homem que comer pão até á tarde, para que me vingue de meus inimigos. Pelo que todo o povo se absteve de provar pão
२४त्या दिवशी इस्राएली पुरुष निराश झाले कारण शौलाने लोकांस शपथ घालून सांगितले होते, संध्याकाळपर्यंत मी आपल्या शत्रूचा सूड घेईपर्यंत जो पुरुष काही खाईल त्यास शाप लागो. म्हणून लोकांतल्या कोणी काही खाल्ले नाही.
25 E toda a terra chegou a um bosque: e havia mel na superficie do campo.
२५देशातले सर्व लोक वनांत आले आणि भूमीवर मध होता;
26 E, chegando o povo ao bosque, eis que havia um manancial de mel: porém ninguem chegou a mão á bocca porque o povo temia a conjuração
२६वनांत लोक आले तेव्हा पाहा मधाचा ओघ वाहत होता. परंतु कोणी आपला हात आपल्या तोंडाला लावला नाही कारण लोक शपथेला भीत होते.
27 Porém Jonathan não tinha ouvido quando seu pae conjurava o povo, e estendeu a ponta da vara que tinha na mão, e a molhou no favo de mel; e, tornando a mão á bocca, aclararam-se os seus olhos.
२७परंतु जेव्हा त्याच्या वडिलाने लोकांस शपथ घातली तेव्हा योनाथानाने ती ऐकली नव्हती म्हणून त्याने आपल्या हाती जी काठी होती तिचे टोक पुढे करून मधाच्या मोहळात घालून आपल्या तोंडास लावले; मग त्याचे डोळे टवटवीत झाले.
28 Então respondeu um do povo, e disse: Solemnemente conjurou teu pae o povo, dizendo: Maldito o homem que comer hoje pão. Pelo que o povo desfallecia.
२८तेव्हा लोकांतील एकाने उत्तर करून म्हटले, “तुझ्या वडिलाने लोकांस शपथ घालून निक्षून सांगितले की, जो कोणी आज काही अन्न् खाईल त्यास शाप लागो.” लोक तर थकले होते.
29 Então disse Jonathan: Meu pae tem turbado a terra; ora vêde como se me aclararam os olhos por ter gostado um pouco d'este mel,
२९तेव्हा योनाथान म्हणाला, “माझ्या वडिलाने देशास दुखीत करून सोडला आहे. मी हा थोडा मध चाखला आणि पाहा माझे डोळे कसे टवटवीत झाले आहेत?
30 Quanto mais se o povo hoje livremente tivesse comido do despojo que achou de seus inimigos. Porém agora não foi tão grande o estrago dos philisteos.
३०जर लोकांनी आपल्या शत्रूंच्या मिळालेल्या लुटीतून आज इच्छेप्रमाणे खाल्ले असते तर कितीतरी बरे होते! कारण आता पलिष्टांचा आधिक मोठा घात झाला नसता काय?”
31 Feriram porém aquelle dia aos philisteos, desde Michmas até Ajalon, e o povo desfalleceu em extremo.
३१त्या दिवशी ते मिखमाशापासून अयालोनापर्यंत पलिष्ट्यांना मारीत गेले. मग लोक फार थकलेले होते.
32 Então o povo se lançou ao despojo, e tomaram ovelhas, e vaccas, e bezerros, e os degolaram no chão; e o povo os comeu com sangue.
३२तेव्हा लोक लुटीवर तुटून पडले आणि मेंढरे, गुरे व वासरे घेऊन भूमीवर कापून रक्तासहित खाऊ लागले.
33 E o annunciaram a Saul, dizendo: Eis que o povo pecca contra o Senhor, comendo com sangue. E disse elle: Aleivosamente obrastes; revolvei-me hoje uma grande pedra.
३३तेव्हा कोणी शौलास सांगितले की, “पाहा लोक रक्तासह मांस खाऊन परमेश्वराच्या विरूद्ध पाप करत आहेत.” त्याने म्हटले, “तुम्ही अविश्वासूपणे कृत्ये करत आहात. मोठा दगड लोटून येथे माझ्याकडे आणा.”
34 Disse mais Saul: Derramae-vos entre o povo, e dizei-lhes: Trazei-me cada um o seu boi, e cada um a sua ovelha, e degolae-os aqui, e comei, e não pequeis contra o Senhor, comendo com sangue. Então todo o povo trouxe de noite, cada um com a sua mão, o seu boi, e os degolaram ali.
३४शौलाने म्हटले, “लोकांमध्ये धावत जाऊन त्यांना सांगा की, प्रत्येक मनुष्याने आपला बैल व प्रत्येक मनुष्याने आपली मेंढरे माझ्याकडे आणून येथे कापावी मग खावे; रक्तासह खाऊन परमेश्वराविरूद्ध पाप करू नका.” तेव्हा सर्व लोकांनी प्रत्येक मनुष्याने आपापले बैल आपल्या हाताने त्या रात्री आणून तेथे कापले.
35 Então edificou Saul um altar ao Senhor: este foi o primeiro altar que edificou ao Senhor.
३५मग शौलाने परमेश्वरास अर्पणे अर्पिण्यासाठी वेदी बांधली, जी पहिली वेदी त्याने परमेश्वरास अर्पणे अर्पिण्यासाठी बांधली ती हीच होती.
36 Depois disse Saul: Desçamos de noite atraz dos philisteos, e despojemol-os, até que amanheça a luz, e não deixemos de resto um homem d'elles. E disseram: Tudo o que parecer bem aos teus olhos faze. Disse porém o sacerdote: Cheguemo-nos aqui a Deus
३६मग शौल बोलला, “आपण रात्री पलिष्ट्यांच्यामागे खाली जाऊन उद्या उजाडेपर्यंत त्याच्यांतली लूट घेऊ आणि आपण त्यांच्यातील एकही पुरुष राहू देऊ नये.” ते म्हणाले, “जे तुला बरे वाटेल ते कर.” मग याजकाने म्हटले आपण येथे परमेश्वराजवळ येऊ.
37 Então consultou Saul a Deus, dizendo: Descerei atraz dos philisteos? entregal-os-has na mão de Israel? Porém aquelle dia lhe não respondeu.
३७मग शौलाने देवाला विचारले, “मी पलिष्ट्यांच्या मागे खाली जाऊ काय? तू त्यांना इस्राएलांच्या हाती देशील काय?” परंतु त्या दिवशीं देवाने काही उत्तर दिले नाही.
38 Então disse Saul: Chegae-vos para cá de todos os chefes do povo, e informae-vos, e vêde em que se commetteu hoje este peccado;
३८मग शौल म्हणाला, “अहो लोकांच्या सर्व पुढाऱ्यांनो इकडे या आणि हे पाप कशाने घडले आहे ते शोध करून पाहा.
39 Porque vive o Senhor que salva a Israel, que, ainda que fosse em meu filho Jonathan, certamente morrerá. E nenhum de todo o povo lhe respondeu.
३९कारण परमेश्वर जो इस्राएलाचे रक्षण करतो तो जिवंत आहे. म्हणून हे पाप माझा मुलगा योनाथान याने जरी केले, तरी तो खचित मरेल.” पण सर्व लोकांतील कोणीही त्यास उत्तर दिले नाही.
40 Disse mais a todo o Israel: Vós estareis d'uma banda, e eu e meu filho Jonathan estaremos da outra banda. Então disse o povo a Saul: Faze o que parecer bem aos teus olhos.
४०मग त्याने सर्व इस्राएलांस म्हटले, “तुम्ही एका बाजूला व्हा आणि मी व माझा मुलगा योनाथान दुसऱ्या बाजूला होऊ.” लोक तर शौलाला म्हणाले, “तुला बरे वाटेल ते कर.”
41 Fallou pois Saul ao Senhor Deus d'Israel: Mostra o innocente. Então Jonathan e Saul foram tomados por sorte, e o povo saiu livre.
४१मग शौल परमेश्वर इस्राएलाचा देव, यास म्हणाला, “खरे ते दाखीव.” तेव्हा योनाथान व शौल धरले गेले आणि लोक सुटले.
42 Então disse Saul: Lançae a sorte entre mim e Jonathan, meu filho. E foi tomado Jonathan.
४२मग शौलाने म्हटले, “माझ्यामध्ये व योनाथान माझा मुलगा याच्यामध्ये पण चिठ्ठ्या टाका.” तेव्हा योनाथान धरला गेला.
43 Disse então Saul a Jonathan: Declara-me o que tens feito. E Jonathan lh'o declarou, e disse: Tão sómente gostei um pouco de mel com a ponta da vara que tinha na mão; eis que devo morrer.
४३मग शौल योनाथानाला म्हणाला, “तू काय केले आहेस ते सांग.” योनाथान त्यास म्हणाला, “मी आपल्या हातातल्या काठीच्या टोकाने थोडा मध चाखला खरा, आणि पाहा मला मरण पावले पाहिजे.”
44 Então disse Saul: Assim me faça Deus, e outro tanto, que com certeza morrerás, Jonathan.
४४तेव्हा शौल म्हणाला, “परमेश्वर तसे व त्यापेक्षा अधिकही करो; योनाथाना तुला तर खचित मरण पावले पाहिजे.”
45 Porém o povo disse a Saul: Morrerá Jonathan, que obrou tão grande salvação em Israel? nunca tal succeda; vive o Senhor, que não lhe ha de cair no chão um só cabello da sua cabeça! pois com Deus fez isso hoje. Assim o povo livrou a Jonathan, para que não morresse.
४५मग लोक शौलाला म्हणाले, “ज्याने इस्राएलाचे हे मोठे तारण केले तो योनाथान मरावा काय? ते तर दूरच असो! परमेश्वर जिवंत आहे. याच्या डोक्याचा एक केसही भूमीवर पडणार नाही. कारण याने परमेश्वराच्याबरोबर काम केले आहे.” या प्रकारे लोकांनी योनाथानाला सोडवले म्हणून तो मेला नाही.
46 E Saul deixou de seguir os philisteos: e os philisteos se foram ao seu logar.
४६मग शौल पलिष्ट्यांचा पाठलाग करण्याचे सोडून वर गेला; पलिष्टीही आपल्या ठिकाणी गेले.
47 Então tomou Saul o reino sobre Israel; e pelejou contra todos os seus inimigos em redor: contra Moab, e contra os filhos de Ammon, e contra Edom, e contra os reis de Zoba, e contra os philisteos, e para onde quer que se tornava executava castigos.
४७शौलाने तर इस्राएलावर राज्य करण्याचे हाती घेतले; त्याने चहूकडे आपल्या सर्व शत्रूशी म्हणजे मवाबी यांच्याशी व अम्मोनाच्या संतानाशी व अदोमी यांच्याशी व सोबाच्या राजांशी व पलिष्ट्यांशी लढाई केली आणि जेथे कोठे तो गेला तेथे त्याने त्यांना त्रासून सोडले.
48 E houve-se valorosamente, e feriu aos amalekitas: e libertou a Israel da mão dos que o saqueavam.
४८त्याने पराक्रम करून अमालेकाला मार दिला आणि इस्राएलांना त्यांच्या लुटणाऱ्यांच्या हातातून सोडवले.
49 E os filhos de Saul eram Jonathan, e Isvi, e Malchisua: e os nomes de suas duas filhas eram estes: o nome da mais velha Merab, e o nome da mais nova, Michal.
४९योनाथान, इश्वी व मलकीशुवा हे शौलाचे पुत्र होते, आणि त्याच्या दोघी मुलींची नांवे, प्रथम जन्मलेली, मेरब आणि धाकटीचे नांव मीखल, ही होती.
50 E o nome da mulher de Saul, Ahinoam, filha d'Ahimaas: e o nome do general do exercito, Abner, filho de Ner, tio de Saul.
५०शौलाच्या पत्नीचे नाव अहीनवाम, ती अहीमासाची मुलगी होती. शौलाचा काका नेर याचा मुलगा अबनेर त्याचा सेनापती होता.
51 E Kis, pae de Saul, e Ner, pae d'Abner, eram filhos d'Abiel.
५१शौलाचा बाप कीश; अबनेराचा बाप नेर हा अबीएलाचा मुलगा होता.
52 E houve uma forte guerra contra os philisteos, todos os dias de Saul: pelo que Saul a todos os homens valentes e valorosos que via os aggregava a si.
५२शौलाच्या सर्व दिवसात पलिष्ट्यांशी जबर लढाई चालू होती. शौल कोणी बलवान किंवा कोणी शूर मनुष्य पाही, तेव्हा तो त्यास आपल्याजवळ ठेवून घेई.

< 1 Samuel 14 >