< 1 Crônicas 5 >
1 Quanto aos filhos de Ruben, o primogenito de Israel; --porque elle era o primogenito, mas porque profanara a cama de seu pae, deu-se a sua primogenitura aos filhos de José, filho de Israel; para assim não ser contado na genealogia da primogenitura.
१रऊबेन इस्राएलाचा थोरला पुत्र होता. पण त्याने आपल्या पित्यांचे अंथरूण अशुद्ध केले म्हणून त्याच्या जेष्ठपणाचे अधिकार योसेफाच्या पुत्रांना दिले. म्हणून थोरला पुत्र म्हणून त्याची नोंद नाही.
2 Porque Judah foi poderoso entre seus irmãos, e d'elle vem o principe; porém a primogenitura foi de José; --
२यहूदा आपल्या भावांपेक्षा पराक्रमी होता आणि पुढारीपण त्याच्यापासून आले. पण ज्येष्ठपणाचे अधिकार योसेफाला मिळाले होते.
3 Foram pois os filhos de Ruben, o primogenito de Israel: Hanoch, e Pallu, e Hezron, e Carmi.
३इस्राएलाचा थोरला पुत्र रऊबेन याचे पुत्र हनोख, पल्लू, हेस्रोन आणि कर्मी.
4 Os filhos de Joel: Semaias, seu filho, Gog, seu filho, Simei seu filho,
४योएलाचे वंशज हे होते: योएलाचा पुत्र शमाया होता. शमायाचा पुत्र गोग होता. गोगचा पुत्र शिमी होता.
5 Micha, seu filho, Reaia, seu filho, Baal, seu filho,
५शिमीचा पुत्र मीखा होता. मीखाचा पुत्र राया होता. रायाचा पुत्र बाल होता.
6 Beera, seu filho, o qual Tilgath-pilneser, rei da Assyria, levou preso: este foi principe dos rubenitas.
६बालाचा पुत्र बैरा होता. अश्शूरचा राजा तिल्गथ-पिल्नेसर याने कैद केले. बैरा रऊबेन वंशाचा नेता होता.
7 Quanto a seus irmãos para suas familias, quando pozeram nas genealogias segundo as suas descendencias, foram chefes Jeiel e Zacharias,
७योएलाचे भाऊ आणि त्यांची घराणी यांची नोंद वंशावळींच्या नोंदीवरुनच येथे केली आहे. ईयेल मुख्य, जखऱ्या,
8 E Bela, filho de Azaz, filho de Sema, filho de Joel, que habitou em Aroer até Nebo e Baal-meon,
८योएलाचा पुत्र शमा याचा पुत्र आजाज याचा पुत्र बेला. नबो आणि बाल-मौन पासून ते अरोएर पर्यंत राहत होते.
9 Tambem habitou da banda do oriente, até á entrada do deserto, desde o rio Euphrates; porque seu gado se tinha multiplicado na terra de Gilead.
९फरात नदीच्या जवळ अगदी पूर्वेला वाळवंटाच्या कडेपर्यंत त्यांनी वस्ती केली होती. कारण गिलाद प्रांतात त्यांच्या गुरेढोरांची फार वाढ झाली होती.
10 E nos dias de Saul fizeram guerra aos hagarenos, que cairam pela sua mão: e elles habitaram nas suas tendas defronte de toda a banda oriental de Gilead.
१०शौलाच्या कारकीर्दीत बेलाच्या लोकांनी हगारी लोकांशी लढाई करून त्यांचा पराभव केला. ते गिलादाच्या पूर्वेकडील सर्व देशात त्यांच्याच तंबूत राहिले.
11 E os filhos de Gad habitaram defronte d'elles, na terra de Basan, até Salcha.
११त्यांच्या जवळच गाद घराण्यातील लोक बाशान प्रांतात सलेखा येथपर्यंत राहत होते.
12 Joel foi chefe, e Sapham o segundo: porém Jaanai e Saphat ficaram em Basan.
१२योएल हा बाशानाला मुख्यनायक होता. दुसरा शाफाम. मग यानय व शाफाट.
13 E seus irmãos, segundo as suas casas paternas, foram: Michel, e Mesullam, e Seba, e Jorai, e Jachan, e Zia, e Eber, sete.
१३त्यांच्या पित्याच्या घराण्यातले त्यांचे नातलग मीखाएल, मशुल्लाम, शबा, योरय, याकान, जीया आणि एबर हे सात.
14 Estes foram os filhos de Abiail, filho de Huri, filho de Jaroah, filho de Gilead, filho de Michael, filho de Jesisai, filho de Jahdo, filho de Buz;
१४हे अबीहाईलचे वंशज. अबीहाईल हूरीचा पुत्र. हूरी यारोहाचा पुत्र आणि यारोहा गिलादाचा. गिलाद मीखाएलचा. मीखाएल यशीशा याचा पुत्र. यशीशाया यहदोचा पुत्र. यहदो बूजाचा पुत्र.
15 Ahi, filho de Abdiel, filho de Guni, foi chefe da casa de seus paes.
१५अही हा अब्दीएलचा पुत्र. अब्दीएल गूनीचा पुत्र. अही हा त्या घराण्याचा प्रमुख.
16 E habitaram em Gilead, em Basan, e nos logares da sua jurisdicção; como tambem em todos os arrabaldes de Saron, até ás suas saidas.
१६ते गिलादात व बाशानाच्या गावात, शारोनच्या गायरानात आपल्या सीमात राहत होते.
17 Todos estes foram registrados, segundo as suas genealogias, nos dias de Jothão, rei de Judah, e nos dias de Jeroboão, rei de Israel.
१७यहूदाचा राजा योथाम याच्या दिवसात आणि इस्राएलाचा राजा यराबाम यांच्या दिवसात या सर्वांची मोजणी वंशावळ्यांवरून झाली होती.
18 Dos filhos de Ruben, e dos gaditas, e da meia tribu de Manassés, homens muito bellicosos, que traziam escudo e espada, e entesavam o arco, e eram destros na guerra: quarenta e quatro mil e setecentos e sessenta, que sahiam á peleja.
१८मनश्शेच्या वंशातील अर्धे लोक आणि रऊबेनी व गादी लोकांमधून ढाली, तलवारी, धनुष्यबाण चव्वेचाळीस हजार सातशे साठ सैनिक युध्द शिक्षण घेतलेले होते.
19 E fizeram guerra aos hagarenos, como a Jetur, e a Naphis e a Nodab.
१९हगारी, यतूर, नापीश, नोदाब या लोकांशी त्यांनी लढाया केल्या.
20 E foram ajudados contra elles, e os hagarenos e todos quantos estavam com elles foram entregues em sua mão; porque clamaram a Deus na peleja, e lhes deu ouvidos, porquanto confiaram n'elle.
२०आणि ते त्यांच्याशी लढत असता त्यांना साहाय्य मिळाले तेव्हा हगारी व त्यांच्याबरोबरच्या सर्व लोकांचाही त्यांनी पराभव केला. कारण त्यांनी लढाईच्या वेळी देवाला हाक मारली व त्यांनी त्याच्यावर भरवंसा ठेवला होता म्हणून त्याने त्यांना प्रतिसाद दिला.
21 E levaram preso o seu gado: seus camelos, cincoenta mil, e duzentas e cincoenta mil ovelhas, e dois mil jumentos, e cem mil almas de homens.
२१त्यांनी त्यांची जनावरे यासह, पन्नास हजार उंट, दोन लाख पन्नास हजार मेंढरे, दोन हजार गाढवे आणि एक लाख माणसे मिळवले.
22 Porque muitos feridos cairam, porque de Deus era a peleja; e habitaram em seu logar, até ao captiveiro.
२२पुष्कळ शत्रू मारले गेले कारण देव त्यांच्यासाठी लढला. त्यांना कैद करून नेईपर्यंत ते तिथेच राहिले.
23 E os filhos da meia tribu de Manassés habitaram n'aquella terra: de Basan até Baal-hermon, e Senir, e o monte de Hermon, elles se multiplicaram.
२३बाशानापासून बाल-हर्मोन, सनीर आणि हर्मोन डोंगर येथपर्यंत मनश्शेच्या अर्ध्या वंशातील लोकांनी वस्ती केली. तेथे त्यांची संख्या बरीच वाढली.
24 E estes foram cabeças de suas casas paternas, a saber: Hepher, e Ishi, e Eliel, e Azriel, e Jeremias, e Hodavias, e Jahdiel, homens valentes, homens de nome, e chefes das casas de seus paes.
२४मनश्शेच्या घराण्याचे प्रमुख, एफेर, इशी, अलीएल, अज्रीएल, यिर्मया, होदव्या, यहदीएल, हे सर्व बलवान, धैर्यवान आणि प्रसिध्द पुरुष, आपापल्या घराण्यांचे ते पुढारी होते.
25 Porém transgrediram contra o Deus de seus paes: e fornicaram após os deuses dos povos da terra, os quaes Deus destruira de diante d'elles.
२५पण ते आपल्या पूर्वजांच्या देवाविरुध्द अविश्वासू राहिले. देवाने त्यांच्यासमोरून ज्यांना नष्ट केले होते त्या देशाच्या लोकांच्या देवामागे लागून त्यांनी व्यभिचार केला.
26 Pelo que o Deus de Israel suscitou o espirito de Pul, rei d'Assyria, e o espirito de Tiglath-pilneser, rei d'Assyria, que os levaram presos, a saber: os rubenitas e gaditas, e a meia tribu de Manassés; e os trouxeram a Halah, e a Habor, e a Hara, e ao rio de Gozan, até ao dia de hoje.
२६इस्राएलाच्या देवाने अश्शूरचा राजा पूल व तिल्गथ-पिल्नेसर याना इर्षेला पेटवले. त्याने मनश्शेचा अर्धा वंश, रऊबेन आणि गाद घराण्यातील लोकांस कैद केले. त्यांना हलह, हाबोर, हारा आणि गोजान नदीजवळ आणले. तेव्हापासून आजपर्यंत ते तेथे राहत आहेत.