< 1 Crônicas 21 >

1 Então Satanaz se levantou contra Israel, e incitou David a numerar a Israel.
आणि सैतान इस्राएलाविरुध्द उठला व त्याने दावीदाला इस्राएलाची मोजणी करण्यास भाग पाडले.
2 E disse David a Joab e aos maioraes do povo: Ide, numerae a Israel, desde Berseba até Dan; e trazei-me a conta, para que saiba o numero d'elles.
दावीद यवाबाला आणि सैन्याच्या अधिकाऱ्यांना म्हणाला, “जा बैर-शेबापासून दानापर्यंत सर्व इस्राएल लोकांची मोजणी करा आणि मग मला त्यांची एकंदर संख्या माहित व्हावी म्हणून मला परत येऊन अहवाल द्या.”
3 Então disse Joab: O Senhor accrescente ao seu povo cem vezes tanto como é; porventura, ó rei meu senhor, não são todos servos de meu senhor? Porque procura isto o meu senhor? Porque seria causa de delicto para com Israel.
यवाब म्हणाला “परमेश्वर आपले सैन्य आहे त्यापेक्षा शंभर पटीने अधिक वाढवो. पण माझ्या प्रभू राजा, ते सर्व माझ्या धन्याचे सेवा करत नाही का? मग माझ्या धन्याला हे का पाहिजे? इस्राएलावर त्याने दोष का आणावा?”
4 Porém a palavra do rei prevaleceu contra Joab; pelo que saiu Joab, e passou por todo o Israel; então voltou para Jerusalem.
पण राजाचा शब्द यवाबाविरुध्द अंतिम होता, यामुळे यवाब निघून गेला आणि सर्व इस्राएलातून फिरला. मग यरूशलेमाला परत आला.
5 E Joab deu a David a somma do numero do povo: e era todo o Israel um milhão e cem mil homens, dos que arrancavam espada; e de Judah quatrocentos e setenta mil homens, dos que arrancavam espada.
मग यवाबाने दावीदाला एकंदर लढाई करणाऱ्यांची मोजणी सांगितली. इस्राएलात अकरा लाख तलवार काढणारे पुरुष होते. यहूदात चार लाख सत्तर हजार पुरुष होते.
6 Porém os de Levi e Benjamin não contou entre elles, porque a palavra do rei foi abominavel a Joab.
पण लेवी आणि बन्यामीन यांच्या घराण्यांची मोजदाद केली नव्हती, कारण यवाबाला राजाच्या आज्ञेचा अत्यंत तिटकारा आला होता.
7 E este negocio tambem pareceu mal aos olhos de Deus: pelo que feriu a Israel.
देवाला या कृतीमुळे वाईट वाटले म्हणून त्याने इस्राएलावर मारा केला.
8 Então disse David a Deus: Gravemente pequei em fazer este negocio; porém agora sê servido tirar a iniquidade de teu servo, porque obrei mui loucamente.
मग दावीद देवाला म्हणाला, “मी ही गोष्ट करून महान पाप केले आहे. आता आपल्या सेवकाचे अपराध दूर कर, कारण मी फार मूर्खपणाची कृती केली आहे.”
9 Fallou pois o Senhor a Gad, o vidente de David, dizendo:
परमेश्वर दावीदाचा संदेष्टा गादला म्हणाला,
10 Vae, e falla a David, dizendo: Assim diz o Senhor: Tres coisas te proponho: escolhe uma d'ellas, para que eu t'a faça.
१०“जाऊन दावीदाला सांग, ‘परमेश्वराचे म्हणणे असे आहे, मी तुझ्यापुढे तीन पर्याय ठेवतो. त्यातील एक निवड.”
11 E Gad veiu a David, e lhe disse: Assim diz o Senhor: Escolhe para ti,
११मग गाद दावीदाकडे गेला व त्यास म्हणाला, “परमेश्वराचे म्हणणे असे आहे, ‘त्यातून एक निवड.
12 Ou tres annos de fome, ou que tres mezes te consumas diante de teus adversarios, e a espada de teus inimigos te alcance, ou que tres dias a espada do Senhor, isto é, a peste na terra, e o anjo do Senhor destruam todos os termos de Israel: vê pois agora que resposta hei de levar a quem me enviou.
१२तीन वर्षाचा दुष्काळ पडावा, किंवा तीन महिने तुझ्या शत्रूने तलवारीने तुझा पाठलाग करावा आणि तुझा नाश करावा किंवा इस्राएलाच्या सर्व देशात परमेश्वराचा दूत लोकांचा संहार करीत असताना देशात तीन दिवस परमेश्वराची तलवार म्हणजे मरी असावी? तर आता, ज्याने मला पाठवले, त्यास मी काय उत्तर द्यावे ते तू ठरवून मला सांग.”
13 Então disse David a Gad: Estou em grande angustia; caia eu pois nas mãos do Senhor, porque são muitissimas as suas misericordias; mas que eu não caia nas mãos dos homens.
१३मग दावीद गादला म्हणाला, “मी गंभीर अडचणीत आहे. मला लोकांच्या हातात पडण्यापेक्षा परमेश्वराच्या हातात पडू दे, कारण त्याच्या दयेची कृती फार महान आहे.”
14 Mandou pois o Senhor a peste a Israel: e cairam d'Israel setenta mil homens.
१४तेव्हा परमेश्वराने इस्राएलावर मरी पसरवली आणि त्यामध्ये सत्तर हजार लोक मृत्युमुखी पडले.
15 E o Senhor mandou um anjo a Jerusalem para a destruir; e, destruindo-a elle, o Senhor o viu, e se arrependeu d'aquelle mal, e disse ao anjo destruidor: Basta, agora retira a tua mão. E o anjo do Senhor estava junto á eira de Ornan, jebuseo.
१५यरूशलेमेचा नाश करण्यास देवाने दूत पाठवला. तो तिचा नाश करणार, हे परमेश्वराने पाहिले व हानी करण्यापासून त्याचे मन बदलले. तो त्या नाश करणाऱ्या दूताला म्हणाला, “पुरे झाले, आता तुझा हात मागे घे.” त्यावेळी परमेश्वराचा दूत अर्णान यबूसी याच्या खळ्याजवळ उभा होता.
16 E, levantando David os seus olhos, viu o anjo do Senhor, que estava entre a terra e o céu, com a sua espada desembainhada na sua mão estendida contra Jerusalem: então David e os anciãos, cobertos de saccos, se prostraram sobre os seus rostos.
१६दावीदाने वर पाहिले व तेव्हा त्यास परमेश्वराचा दूत आकाश व पृथ्वी यांच्यामध्ये उभा असलेला दिसला. त्याच्या हातात उपसलेली तलवार असून त्याने ती यरूशलेमेवर उगारलेली होती. तेव्हा गोणताट घातलेले दावीद आणि वडील जमिनीकडे तोंड करून खाली पडले.
17 E disse David a Deus: Não sou eu o que disse que se contasse o povo? E eu mesmo sou o que pequei, e fiz muito mal; mas estas ovelhas que fizeram? Ah! Senhor, meu Deus, seja a tua mão contra mim, e contra a casa de meu pae, e não para castigo de teu povo.
१७दावीद देवाला म्हणाला, “सैन्याची मोजणी करण्याचा हूकूम मी दिला होता की नाही? मीच हे पाप केले आहे, मीच हे दुष्ट काम केले आहे. पण या मेंढरांनी काय केले आहे? हे परमेश्वरा माझ्या देवा, मी विनंती करतो तुझा हात माझ्यावर व माझ्या घराण्यावर पडून तू आम्हास शिक्षा दे, पण तुझ्या लोकांस या मरीने शिक्षा देऊ नको.”
18 Então o anjo do Senhor disse a Gad que dissesse a David que subisse David para levantar um altar ao Senhor na eira d'Ornan, jebuseo.
१८मग परमेश्वराच्या दूताने गादला आज्ञा केली की, तू दावीदाला सांग, दावीदाने वर जाऊन अर्णान यबूसी याच्या खळ्यात परमेश्वरासाठी एक वेदी बांधावी.
19 Subiu pois David, conforme a palavra de Gad, que fallara em nome do Senhor.
१९मग गादाने परमेश्वराच्या नावाने बोलून जे सांगितले त्यावरून दावीद वरती गेला.
20 E, virando-se Ornan, viu o anjo, e se esconderam com elle seus quatro filhos: e Ornan estava trilhando o trigo.
२०अर्णान तेव्हा गव्हाची मळणी करत होता, तो मागे वळला व त्याने देवदूताला पाहिले. तो व त्याचे चारही पुत्र त्याच्याबरोबर होते ते लपले.
21 E David veiu a Ornan: e olhou Ornan, e viu a David, e saiu da eira, e se prostrou perante David com o rosto em terra.
२१आणि दावीद अर्णानाकडे आला, तेव्हा अर्णानाने वर दृष्टी करून व दावीदाला पाहिले. तो खळ्यातून निघाला आणि त्याने दावीदाला तोंड जमिनीपर्यंत लववून नमस्कार केला.
22 E disse David a Ornan: Dá-me este logar da eira, para edificar n'elle um altar ao Senhor; dá-m'o pelo seu valor, para que cesse este castigo sobre o povo.
२२मग दावीद अर्णानला म्हणाला, “हे खळे मला विकत दे. त्याची पूर्ण किंमत मी तुला देईन. लोकांवरून मरी बंद व्हावी म्हणून तेथे मी परमेश्वराकरता वेदी बांधीन.”
23 Então disse Ornan a David: Toma-a para ti, e faça o rei meu Senhor d'ella o que parecer bem aos seus olhos: eis que dou os bois para holocaustos, e os trilhos para lenha, e o trigo para offerta de manjares: tudo dou.
२३अर्णान दावीदाला म्हणाला, “माझ्या स्वामी राजाला जे काही तुमच्या दृष्टीने जे चांगले आहे ते करा. पाहा, होमार्पण करण्यासाठी मी बैल, तसेच वेदीवरील होमात जाळण्यासाठी मळणीची लाकडे, आणि अन्नार्पणासाठी गहू हे सर्व मी तुम्हास देईन.”
24 E disse o rei David a Ornan: Não, antes pelo seu valor a quero comprar: porque não tomarei o que é teu, para o Senhor; para que não offereça holocausto sem custo.
२४तेव्हा राजा दावीद अर्णानाला म्हणाला, “नाही, मी तुला त्याची पूर्ण किंमत देऊनच विकत घेईन. कारण जे तुझे आहे ते मी परमेश्वरासाठी घेणार नाही. आणि किंमत दिल्यावाचून घेतलेले होमार्पण मी अर्पण करणार नाही.”
25 E David deu a Ornan por aquelle logar o peso de seiscentos siclos de oiro.
२५आणि दावीदाने त्या जागेसाठी अर्णानाला सहाशें शेकेल सोने दिले.
26 Então David edificou ali um altar ao Senhor, e offereceu n'elle holocaustos e sacrificios pacificos: e invocou o Senhor, o qual lhe respondeu com fogo do céu sobre o altar do holocausto.
२६दावीदाने तेथे परमेश्वराकरता वेदी बांधली आणि त्यावर त्याने होमार्पणे आणि शांत्यर्पणे अर्पण केली. त्याने परमेश्वरास हाक मारली व त्याने स्वर्गातून होमार्पणाच्या वेदीवर अग्नी पाठवून उत्तर दिले.
27 E o Senhor deu ordem ao anjo, e elle tornou a sua espada á bainha.
२७मग परमेश्वराने देवदूताला आज्ञा केली आणि त्याने आपली तलवार म्यानात परत घातली.
28 Vendo David, no mesmo tempo, que o Senhor lhe respondera na eira de Ornan, jebuseo, sacrificou ali.
२८त्या वेळेस, जेव्हा दावीदाने पाहिले की अर्णान यबूसीच्या खळ्यात परमेश्वराने आपल्याला उत्तर दिले तेव्हा त्याने तेथे यज्ञ केले.
29 Porque o tabernaculo do Senhor, que Moysés fizera no deserto, e o altar do holocausto, estavam n'aquelle tempo no alto de Gibeon.
२९कारण मोशेने रानात केलेला परमेश्वराचा निवासमंडप आणि होमार्पणाची वेदी, त्याकाळी गिबोनामध्ये उच्च स्थानावर होती.
30 E não podia David ir perante elle buscar ao Senhor; porque estava aterrorisado por causa da espada do anjo do Senhor.
३०पण परमेश्वराच्या दूताच्या तलवारीच्या भीतीने दावीद देवापुढे मार्ग विचारायला जाण्यास घाबरत होता.

< 1 Crônicas 21 >