< Psalmów 64 >

1 Przewodnikowi chóru. Psalm Dawida. Wysłuchaj, o Boże, mego głosu, gdy się modlę; zachowaj moje życie od strachu przed wrogiem.
दाविदाचे स्तोत्र हे देवा, माझी वाणी ऐक, माझ्या गाऱ्हाण्याकडे कान दे; माझ्या शत्रूंच्या भीतीपासून माझा जीव सुरक्षित ठेव.
2 Ukryj mnie przed tajemną radą złoczyńców, przed zgrają czyniących nieprawość;
वाईट करणाऱ्याच्या गुप्त कारस्थानापासून, अन्याय करणाऱ्याच्या गोंधळापासून मला लपव,
3 Którzy naostrzyli swój język jak miecz, nałożyli swoje strzały, słowa jadowite;
त्यांनी आपली जीभ तलवारीसारखी धारदार केली आहे. त्यांनी आपले बाण म्हणजे कडू शब्द मारण्यास नेम धरला आहे.
4 Aby strzelać z ukrycia w niewinnego; strzelają znienacka i nikogo się nie boją.
याकरिता ते गुप्त जागेतून जे कोणी निरपराध आहेत त्यांच्यावर मारा करतात; अचानक ते त्यांच्यावर मारा करतात आणि भीत नाहीत;
5 Utwierdzają się w złym zamiarze, zmawiają się, jak ukryć pułapki, i mówią: Któż je zobaczy?
ते आपणाला वाईट योजनेत उत्त्तेजन देतात; ते खाजगीत एकत्रित येऊन सापळा रचण्याचा सल्लामसलत करतात; ते म्हणतात, आपल्याला कोण पाहील?
6 Szukają nieprawości, starannie jej poszukują; ich wnętrze i serce są głębokie.
ते पापी योजना शोधून काढतात; ते म्हणतात, आम्ही काळजीपूर्वक योजना समाप्त केली आहे. मनुष्याचे अंतःकरण आणि अंतरीक विचार खोल आहेत.
7 Ale Bóg wypuści na nich strzałę, nagle odniosą rany;
परंतु देव त्यांच्यावर बाण सोडील; अचानक ते त्याच्या बाणाने जखमी होतील.
8 Własny język doprowadzi ich do upadku; wszyscy, którzy ich zobaczą, uciekną.
त्यांचीच जीभ त्यांच्याविरुद्ध होऊन ते अडखळविले जातील; जे सर्व त्यांना पाहतील ते आपले डोके डोलवतील.
9 I zlękną się wszyscy ludzie, będą opowiadali o dziele Boga i zrozumieją jego czyny.
सर्व लोक भितील आणि देवाची कृत्ये जाहीर करतील. ते सूज्ञतेने त्याने जे काही केले त्याविषयी विचार करतील.
10 A sprawiedliwy będzie się weselić w PANU i będzie mu ufał; i będą się chlubili wszyscy prawego serca.
१०परमेश्वराच्या ठायी नीतिमान आनंद करतील आणि त्याच्यात आश्रय घेतील; सर्व सरळमार्गी त्याच्यात अभिमान बाळगतील.

< Psalmów 64 >