< Psalmów 132 >
1 Pieśń stopni. Pamiętaj, PANIE, Dawida [i] wszystkie jego utrapienia;
१हे परमेश्वरा, दावीदाकरता त्याच्या सर्व दुःखांची आठवण कर.
2 Jak przysiągł PANU [i] ślubował potężnemu [Bogu] Jakuba, [mówiąc]:
२त्याने परमेश्वराकडे कशी शपथ वाहिली, त्याने याकोबाच्या समर्थ प्रभूला कसा नवस केला, याची आठवण कर.
3 Zaprawdę, nie wejdę do przybytku, do mego domu, i nie wstąpię na posłanie mego łoża;
३तो म्हणाला “मी आपल्या घरात किंवा मी आपल्या अंथरुणात जाणार नाही.
4 I nie dam zasnąć swoim oczom ani drzemać swoim powiekom;
४मी आपल्या डोळ्यांवर झोप किंवा आपल्या पापण्यास विसावा देणार नाही.
5 Póki nie znajdę miejsca dla PANA, mieszkania dla potężnego [Boga] Jakuba.
५परमेश्वरासाठी स्थान, याकोबाच्या सर्वसमर्थ देवासाठी निवासमंडप सापडेपर्यंत मी असेच करीन.”
6 Oto usłyszeliśmy o niej w Efrata, znaleźliśmy ją na polach leśnych.
६पाहा, आम्ही याबद्दल एफ्राथात ऐकले; आम्हास तो जारच्या रानात सापडला.
7 Wejdźmy do jego przybytków, oddajmy pokłon u podnóżka jego stóp.
७आम्ही देवाच्या निवासमंडपात जाऊ; आम्ही त्याच्या पदासनापाशी आराधना करू आणि म्हणू.
8 Powstań, PANIE, i [wejdź] do miejsca twego odpoczynku, ty i arka twojej mocy.
८हे परमेश्वरा, ऊठ; तू आपल्या सामर्थ्याच्या कोशासह आपल्या विश्रांतीस्थानी ये,
9 Niech twoi kapłani ubiorą się w sprawiedliwość, a twoi święci niech się radują.
९तुझे याजक नितीमत्तेचे वस्रे पांघरोत; तुझे विश्वासू आनंदाने जयघोष करोत.
10 Ze względu na Dawida, twego sługę, nie odtrącaj oblicza twego pomazańca.
१०तुझा सेवक दावीदाकरिता, तू आपल्या अभिषिक्त राजापासून निघून जाऊ नकोस.
11 Przysiągł PAN Dawidowi prawdę i nie wycofa się z tego: Z owocu twoich bioder posadzę na twoim tronie.
११परमेश्वराने विश्वसनीय दावीदाजवळ शपथ वाहिली आहे; तो त्याच्या शपथेपासून माघार घेणार नाही, मी तुझ्या वंशातून तुझ्या राजासनावर एकाला बसवीन.
12 Jeśli twoi synowie będą strzegli mojego przymierza i moich świadectw, których ich nauczę, to wtedy i ich synowie aż na wieki będą siedzieli na twoim tronie.
१२जर तुझ्या मुलांनी माझा करार पाळला, आणि मी त्यांना शिकवलेले नियम पाळले, तर त्यांची मुलेसुद्धा तुझ्या राजासनावर सर्वकाळ बसतील.
13 PAN bowiem wybrał Syjon i upodobał [go] sobie na mieszkanie:
१३खचित परमेश्वराने सियोन निवडून घेतली आहे; त्याच्या वस्तीसाठी त्याने इच्छा धरली आहे.
14 To będzie mój odpoczynek aż na wieki; tu będę mieszkał, bo go sobie upodobałem.
१४“ही जागा सर्वकाळ माझ्या विसाव्याची आहे; मी येथे राहीन, कारण माझी इच्छा आहे.
15 Będę obficie błogosławił jego żywność, a jego ubogich nasycę chlebem.
१५मी तिला विपुलतेने अन्नसामग्रीचा आशीर्वाद देईन; मी तिच्या गरीबांना भाकरीने तृप्त करीन.
16 Jego kapłanów przyodzieję zbawieniem, a jego święci będą wołać radośnie.
१६मी तिच्या याजकांना तारणाचे वस्त्र नेसवीन; तिचे भक्त आनंदाने मोठ्याने जयघोष करतील.
17 [Tam] sprawię, że zakwitnie róg Dawida; tam zgotuję pochodnię memu pomazańcowi.
१७तेथे दावीदाच्या शिंगाला अंकुर फुटेल असे मी करीन; तेथे मी आपल्या अभिषिक्तासाठी दिवा ठेविला आहे.
18 Okryję jego nieprzyjaciół wstydem, ale nad nim rozkwitnie jego korona.
१८मी त्याच्या शत्रूंला लाजेचे वस्रे नेसवीन, परंतु त्याचा मुकुट चमकेल.”