< Hioba 33 >

1 Teraz więc, Hiobie, posłuchaj, proszę, mojej mowy i nadstaw uszu na wszystkie moje słowa.
“ईयोब, मी तुला विनंती करतो, माझे बोलने ऐक. माझे सर्व शब्दांकडे लक्ष दे.
2 Oto teraz otworzyłem swoje usta, [a] mój język będzie mówił pod podniebieniem.
पाहा, मी आता बोलायला माझे मुख उघडले आहे, माझी जीभ माझ्या तोंडात हालू लागली आहे.
3 Moje słowa pochodzą ze szczerości mego serca, [a] moje wargi wyraźnie wypowiedzą wiedzę.
माझे शब्दच माझ्या अंत: करणाचे प्रामाणिकपण सांगतील, माझ्या ओठांना जे माहीती आहे, तेच ते प्रामाणिकपणे बोलतील.
4 Duch Boży stworzył mnie, tchnienie Wszechmocnego ożywiło mnie.
देवाच्या आत्म्याने मला निर्माण केले आहे, मला सर्वशक्तिमान देवाच्या श्वासाद्ववारे जीवन मिळाले आहे.
5 Jeśli możesz, odpowiedz mi; przygotuj się i stań przede mną.
तुला शक्य झाले तर मला उत्तर दे, माझ्याशी वाद घालण्याकरता तुझी उत्तरे तयार ठेव.
6 Oto ja, według twoich słów, odpowiem ci za Boga, [chociaż] też jestem z błota ulepiony.
पाहा, देवासमोर मी आणि तू सारखेच आहोत, मलाही माती पासून उत्पन्न केले आहे.
7 Oto mój strach nie zatrwoży cię, a moja ręka nie zaciąży na tobie.
पाहा, माझी दरारा तुला घाबरवणार नाही, माझा दाब तुला जड होणार नाही.
8 Ty jednak powiedziałeś mi do uszu, słyszałem dźwięk [twoich] słów:
तू जे बोललास ते मी निश्चित ऐकले, मी तुझ्या शब्दांचा आवाज असे म्हणतांना ऐकला,
9 Jestem czysty, bez przestępstwa, jestem niewinny i nie ma we mnie nieprawości.
‘मी शुध्द आहे, मी निरपराध आहे, मी काहीही चूक केली नाही मी निर्दोष आहे, आणि माझ्यामध्ये पाप नाही.
10 Oto on znajduje zarzuty przeciwko mnie i uważa mnie za swego wroga.
१०पाहा, देव माझ्यावर हल्ला करण्याची संधी पाहतो देवाने मला शत्रूप्रमाणे वागवले आहे.
11 Zakuł moje nogi w dyby, a zważa na wszystkie moje ścieżki.
११देवाने माझ्या पायला साखळदंड बांधले देव माझी प्रत्येक हालचाल बघतो.’
12 Otóż w tym nie jesteś sprawiedliwy. Powiem ci, że Bóg jest większy od człowieka.
१२पाहा, मी तुला उत्तर देईल तू या बाबतीत चुकतो आहेस, देव कोणत्याही मनुष्यापेक्षा महान आहे.
13 Dlaczego z nim się spierasz? Przecież on nie tłumaczy się z żadnych swoich spraw.
१३तू त्याच्याशी का वाद घालत आहेस? तो आपल्या कोणत्याही करणीचे कारण सांगत नाही.
14 Bóg bowiem mówi raz i drugi, ale człowiek tego nie dostrzega.
१४देव एकदा बोलतो, होय दोनदा बोलतो, तरी मनुष्य त्याकडे लक्ष देत नाही.
15 We śnie, w nocnym widzeniu, gdy twardy sen spada na ludzi, w czasie drzemki na łóżku;
१५देव लोकांशी रात्री ते गाढ झोपेत असताना स्वप्नात किंवा दृष्टांतात बोलत असेल, जेव्हा मनुष्य गाढ झोपेत असतो.
16 Wtedy otwiera ucho ludzkie i pieczętuje ich pouczenie;
१६नंतर देव मनुष्याची कानउघडणी करतो, आणि त्याच्या धमकीने घाबरवितो.
17 Aby odwieść człowieka od [złego] czynu i zabrać od niego pychę.
१७मनुष्यास त्यांना पापाच्या हेतूपासून मागे ओढण्यासाठी, आणि गर्व न करण्याचेही सांगतो.
18 Powstrzymuje jego duszę od dołu, a jego życie [chroni] przed śmiercią od miecza.
१८देव गर्तेतून मनुष्याचे जीवन वाचवितो, त्याच्या जीवनाला मरणापासून वाचवितो.
19 Każe [go] też cierpieniem na jego łożu i [bólem] we wszystkich jego kościach;
१९मनुष्याला केलेल्या शिक्षेमुळे अंथरुणात पडून दु: ख भोगत असेल वेदनेने त्याची सगळी हाडे तळमळतात.
20 Tak że jego życiu obrzydza chleb, a jego duszy przysmaki.
२०नंतर तो मनुष्य खाऊ शकत नाही चांगल्या अन्नाचासुध्दा त्यास तिरस्कार वाटतो.
21 Jego ciało niszczeje nie do poznania, a wystają jego kości, które nie były widoczne.
२१त्याचे शरीर इतके क्षीण होते की तो जवळ जवळ दिसेनासा होतो. त्याची सगळी हाडे जी कधी दिसली नाही ती आता दिसतात.
22 Jego dusza zbliża się do grobu, a jego życie do niosących śmierć.
२२खरोखर, तो मृत्यूलोकाजवळ येऊन ठेपतो आणि त्याचे जीवन मरणपंथाला लागलेले असते.
23 Jeśli będzie przy nim jakiś anioł, pośrednik, jeden z tysiąca, aby oznajmić człowiekowi jego powinność;
२३परंतू एखादा देवदूत जर त्याचा मध्यस्थ झाला, मध्यस्थ, हजारो देवदुतापैकी एक, त्यास चांगला मार्ग दाखवणारा.
24 Wtedy zlituje się nad nim i powie: Wybaw go od zejścia do dołu, [bo] znalazłem okup.
२४आणि देवदूत त्याच्याशी दयेने वागेल, आणि देवाला सांगेल. ‘या मनुष्यास मृत्युलोकात जाण्यापासून वाचव त्याच्या पापाची किंमत मोजण्याचा दुसरा एक मार्ग मला सापडला आहे.’
25 I jego ciało odzyska dziecięcą świeżość, wróci do dni swojej młodości.
२५मग त्याचे शरीर पुन: बालकासारखे जोमदार बनेल. तो तरुणपणी जसा मजबूत होता तसाच पुन्हा होईल.
26 Będzie się modlił do Boga i on przyjmie go łaskawie, ujrzy jego oblicze z radością i przywróci człowiekowi jego sprawiedliwość;
२६तो देवाची प्रार्थना करेल आणि देव त्यास दया देईल. म्हणजे तो देवाचे मुख आनंदाने पाहील. नंतर तो मनुष्य पुन्हा चांगले जीवन जगायला लागेल.
27 Spojrzy na ludzi i [jeśli ktoś] powie: Zgrzeszyłem, wypaczyłem to, co prawe, i to nie było [dla mnie] korzystne;
२७नंतर तो लोकांस कबुली देईल. तो म्हणेल, ‘मी पापकर्म केले. मी पाप केले चांगल्याचे वाईट केले. पंरतू माझ्या पापाला शिक्षा झाली नाही.
28 On wybawi jego duszę od zejścia do dołu, a jego życie ujrzy światło.
२८त्याने माझ्या आत्म्याला मृत्युलोकात जाण्यापासून वाचवेल. माझ्या जीव नियमीत त्याचा प्रकाश पाहील.
29 Wszystko to czyni Bóg z człowiekiem kilkakrotnie;
२९पाहा, देव या गोष्टी मनुष्यासाठी करतो, दोनदा, होय तीनदा,
30 Aby odwrócić jego duszę od dołu i aby był oświecony światłem żyjących.
३०त्याच्या जीवाला मृत्युलोकात जाण्यापासून वाचवण्यासाठी असे करतो म्हणजे त्याचे जीवन प्रकाशाने प्रकाशीत होते.
31 Zważ na to, Hiobie, słuchaj mnie; milcz, a ja będę mówił.
३१ईयोबा, मी काय म्हणतो त्याकडे लक्ष दे. माझे ऐक! तू गप्प रहा आणि मला बोलू दे.
32 Jeśli [jednak] masz coś do powiedzenia, odpowiedz mi; mów, bo chciałbym cię usprawiedliwić.
३२पण ईयोबा, जर तुला माझे बोलणे पटत नसेल तर तू खुशाल बोल. मला तुझे मुद्दे सांग. कारण मला तुझे बोलणे सुधारायचे आहे.
33 A jeśli nie, słuchaj mnie; milcz, a nauczę cię mądrości.
३३परंतु ईयोबा, तुइयाजवळ बोलण्यासारखे काही नसेल तर माझे ऐक. तू गप्प रहा आणि मी तुला शहाणपण शिकवेन.”

< Hioba 33 >