< Jeremiasza 9 >

1 Oby moja głowa była wodą, a moje oczy źródłem łez, abym dniem i nocą opłakiwał pomordowanych córki mego ludu!
जर माझे मस्तक पाण्याने भरलेले असते आणि माझे डोळे अश्रूंचे झरे असते तर मी माझ्या नाश पावलेल्या लोकांच्या कन्येसाठी अहोरात्र रडलो असतो तर किती बरे झाले असते.
2 Obym miał na pustyni schronisko dla podróżnych, abym mógł opuścić swój lud i oddalić się od nich! Wszyscy bowiem są cudzołożnikami, zgrają zdrajców;
जर वाळवंटात माझासाठी एक ठिकाण असते, तर मी माझ्या लोकांस सोडून त्यांच्यापासून खूप दूर गेलो असतो, कारण ते सर्व व्यभिचारी आणि विद्रोही असे आहेत.
3 I [jak] łuk napinają swój język do kłamstwa. Nie wzmocnili się prawdą na ziemi, bo od zła do zła przechodzą, a mnie nie znają, mówi PAN.
कारण ते त्यांच्या जिभेने खोटे बाण सोडतात, पण ते या पृथ्वीवर विश्वासूपणात मोठे नाहीत. ते एका पापाकडून दुसऱ्या पापाकडे जातात. ते मला ओळखत नाही, परमेश्वर असे म्हणातो.
4 Niech się każdy strzeże swego bliźniego, a bratu nie ufa, bo każdy brat oszukuje podstępnie i każdy bliźni postępuje jak oszczerca.
तुम्ही प्रत्येक आपल्या शेजाऱ्याविषयी सावध असा आणि कोणत्याही भावावर विश्वास ठेवू नका? कारण प्रत्येक भाऊ फसवणारा आहे आणि प्रत्येक शेजारी निंदा करणारा आहे.
5 Każdy też oszukuje swego bliźniego i nie mówi prawdy. Przyuczyli swój język do mówienia kłamstwa, męczą się, aby popełnić nieprawość.
प्रत्येक मनुष्य आपल्या शेजाऱ्याची थट्टा करतो आणि सत्य बोलत नाही. त्यांची जीभ खोटे बोलते. दुष्टाई करण्यासाठी ते आपणाला दमवतात.
6 Twoje mieszkanie jest pośród ludu podstępnego; z powodu podstępu nie chcą mnie poznać, mówi PAN.
तू आपल्या कपटामध्ये राहतो, त्यांच्या कपटामुळे ते मला ओळखायला नाकारतात, असे परमेश्वर म्हणतो.
7 Dlatego tak mówi PAN zastępów: Oto przetopię ich i wypróbuję; jak bowiem mam postąpić z córką mego ludu?
यास्तव सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो: पाहा! मी त्यांची परिक्षा घेईल आणि त्यांना तपासून पाहीन. कारण मी आपल्या लोकांच्या कन्येकरिता आणखी काय करू?
8 Ich język [jest] śmiercionośną strzałą, wypowiada oszustwa. [Jeden] mówi ustami o pokoju ze swym przyjacielem, ale w sercu zastawia [na niego] sidła.
त्यांच्या जिभा टोकदार बाणाप्रमाणे आहेत. त्या अविश्वासू गोष्टी बोलतात. प्रत्येकजण शेजाऱ्याशी वरवर चांगले बोलतो. पण गुप्तपणे ते शेजाऱ्यावर टपून असतात.
9 Czyż za to nie [powinienem] ich nawiedzić? – mówi PAN. Czyż nad takim narodem moja dusza nie powinna się zemścić?
या गोष्टींमुळे मी त्यांना शिक्षा करणार नाही काय? “अशा गोष्टींविषयी या राष्ट्रावर मी सूड उगवू नये का? परमेश्वर असे म्हणतो.
10 Z powodu tych gór podniosę płacz i lament, z powodu pastwisk na pustkowiu – pieśń żałobną. Są bowiem spalone tak, że nikt tamtędy nie przechodzi ani odgłosu bydła nie słychać; ptactwo niebieskie i zwierzęta rozbiegły się i odeszły.
१०मी डोंगरासाठी आकांत व विलाप करीन आणि मी कुरणांसाठी शोकगीत गाईन. कारण ती जाळून टकली आहे, तेथून आता कोणीही प्रवास करीत नाही. त्यांना गुरांचा आवाजही ऐकू येत नाही. आकाशातील पक्षी आणि प्राणी दूर निघून गेले आहेत.
11 I zamienię Jerozolimę w gruzy, w legowisko smoków, a miasta Judy – w pustkowie, [zostaną] bez mieszkańca.
११म्हणून मी यरूशलेम नगरी कचऱ्याचा ढीग करीन. ते कोल्ह्यांचे वसतिस्थान होईल. मी यहूदातील नगरे नष्ट करीन. मग तेथे कोणीही राहणार नाही.”
12 Któż jest tak mądry, aby [mógł] to zrozumieć? A do kogo mówiły usta PANA, aby [mógł] ogłosić, dlaczego ziemia ginie [i] jest spalona jak pustynia, tak że przez nią nikt nie przechodzi?
१२या गोष्टी समजण्याइतका सुज्ञ कोणी आहे का? परमेश्वराच्या मुखाने जे काही घोषीत केले, म्हणजे ते तो कळवू शकेल काय? या भूमीचा नाश का झाला? जेथे कोणीही जात नाही अशा वाळवंटासारखी ती का केली गेली.
13 PAN bowiem mówi: Dlatego że porzucili moje prawo, które im przedłożyłem, a nie słuchali mojego głosu ani nie szli za nim;
१३परमेश्वर म्हणाला, “हे असे झाले कारण, त्यांनी माझ्या शिकवणुकीला सोडून दिले, जे मी त्यांच्या समोर ठेवली होती, आणि त्यांनी माझी वाणी ऐकाण्यास आणि त्यावर चालण्यास नकार दिला.
14 Ale postępowali według uporu swego serca i [szli] za Baalami, jak ich nauczyli ich ojcowie;
१४हे असे झाले कारण ते आपल्या दुराग्रही हृदयाच्या मर्जी प्रमाणे वागले आणि त्यांच्या वडिलांनी त्यांना शिकवल्या प्रमाणे, बालदेवास अनुसरले.”
15 Dlatego tak mówi PAN zastępów, Bóg Izraela: Oto nakarmię ich, ten lud, piołunem i napoję ich wodą żółci.
१५यास्तव सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव असे म्हणतो, “मी या लोकांस कडू दवणा खायला लावीन आणि विषारी पाणी प्यायला लावीन.
16 Rozproszę ich między narodami, których nie znali oni ani ich ojcowie, i poślę za nimi miecz, aż ich doszczętnie wytracę.
१६नंतर मी त्यांना आशा राष्ट्रांमध्ये विखरुन टाकीन त्यांनी किंवा त्यांच्या वडिलांनी पूर्वी कधीही ज्यांच्याबद्दल ऐकले नव्हते. आणि मी सर्व लोकांचा नाश होईपर्यंत त्यांच्या मागे तलवार पाठवीन.”
17 Tak mówi PAN zastępów: Zastanówcie się i wezwijcie płaczki, i niech przyjdą; poślijcie po te, które są wyćwiczone w tym, i niech przyjdą.
१७सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, “या गोष्टींचा विचार करा. प्रेतयात्रेच्या वेळी रडणाऱ्यांना बोलवा, त्यांना येऊ द्या. आक्रंदणात कुशल असलेल्या स्त्रियांना बोलवा, त्यांना येऊ द्या.
18 Niech się pospieszą, niech podniosą nad nami lament, aby łzami spływały nam oczy i powieki ociekały wodą.
१८त्यांनी घाईने आमच्यासाठी विलाप करवा. म्हणजे आमचे डोळे भरुन येतील आणि अश्रूंचा पूर येईल.
19 Głos lamentu bowiem słychać z Syjonu: Jakże jesteśmy spustoszeni! Jesteśmy bardzo zawstydzeni, bo opuściliśmy ziemię, zburzono nasze mieszkania.
१९सियोनमधून विलापाचा आवाज ऐकायला येतो आहे. आम्ही कसे उद्ध्वस्त झालो आहोत, कारण आमची खरोखरच अप्रतिष्ठा झाली. आम्ही आपली भूमी सोडली आहे, कारण त्यांनी आमची घरे पाडून टाकली आहेत.”
20 Słuchajcie więc, kobiety, słowa PANA, niech wasze ucho przyjmie wyrok jego ust, abyście uczyły wasze córki lamentu, a jedna drugą – pieśni żałobnej.
२०तर स्त्रियांनो, परमेश्वराचे वचन ऐका, त्याच्या मुखातील निघणाऱ्या संदेशाकडे चित्त लावा. नंतर तुमच्या मुलींना मोठ्याने विलाप करण्यास शिकव आणि शेजारील प्रत्येक स्त्रीला शोकगीत शिकवा.
21 Śmierć bowiem wtargnęła przez nasze okna, weszła do naszych pałaców, aby wytracić dzieci na rynku i młodzieńców na ulicach.
२१कारण बाहेर असलेली मुले आणि चौकात तरुणांना नाहीसे करण्यास मृत्यू आमच्या खिडक्यातून चढून आला आहे. तो आमच्या राजवाड्यांमध्ये शिरला आहे.
22 Mów: Tak mówi PAN: Nawet trupy ludzkie padną jak gnój na polu i jak snopy za żniwiarzem, a nikt ich nie zbierze.
२२असे सांग: परमेश्वर असे म्हणतो, जसे उघड्यावर खत पडते आणि कापणाऱ्या मागे पेंढीतून गळण पडते, तशी मनुष्याची प्रेते पडतील, आणि ती कोणी गोळा करणार नाहीत.
23 Tak mówi PAN: Niech się nie chlubi mądry swoją mądrością, niech się nie chlubi mocarz swoją siłą i niech się nie chlubi bogaty swoim bogactwem;
२३परमेश्वर म्हणतो, “शहाण्यांनी त्यांच्या शहाणपणाबद्दल, बलवानांनी त्यांच्या बळाबद्दल व श्रीमंतांनी त्यांच्या पैशाबद्दल अभिमान बाळगू नये.”
24 Ale kto chce się chlubić, niech się chlubi tym, że rozumie i zna mnie, [wie], że ja [jestem] PAN, który okazuje miłosierdzie, sąd i sprawiedliwość na ziemi. To bowiem [mi] się podoba, mówi PAN.
२४पण जर कोणाला अभिमान बाळगायचा असेल या गोष्टीत बाळगावा, की तो मला समजतो आणि मला ओळखोतो, कारण मी परमेश्वर आहे, जो प्रामाणिकपणा व न्याय आणि नितीमानता या पृथ्वीवर चालवतो, कारण या गोष्टींमध्ये मला हर्ष वाटतो, परमेश्वर असे म्हणतो.
25 Oto nadchodzą dni, mówi PAN, w których nawiedzę każdego obrzezanego i nieobrzezanego;
२५परमेश्वर असे म्हणतो, ज्यांची फक्त शारीरिक सुंता झाली आहे, अशांना शिक्षा करण्याचे दिवस येत आहेत.
26 Egipt, Judę, Edom, Ammonitów, Moabitów i wszystkich, którzy są w najdalszych zakątkach i mieszkają na pustyni. Wszystkie te narody bowiem [są] nieobrzezane, a cały dom Izraela ma nieobrzezane serce.
२६मिसर, यहूदा, अदोम, अम्मोन, मवाब यातील व वाळवंटात राहणारे, ज्यांनी आपल्या डोक्यावरचे केस कापले त्यांना शासन करीन. कारण ही सर्व राष्ट्रे बेसुनत आहेत, आणि इस्राएलाचे सर्व घराणे बेसुनत हृदयाचे आहेत.

< Jeremiasza 9 >