< Rodzaju 5 >

1 To jest księga rodu Adama. W dniu, w którym Bóg stworzył człowieka, uczynił go na podobieństwo Boga.
आदामाच्या वंशावळीची नोंद अशी आहे. देवाने मनुष्य निर्माण केला त्या दिवशी त्याने आपल्या प्रतिरूपाचा म्हणजे आपल्यासारखा तो केला.
2 Stworzył ich mężczyzną i kobietą; błogosławił ich i nadał im imię Adam w dniu, w którym zostali stworzeni.
त्यांना नर व नारी असे उत्पन्न केले. त्यांना आशीर्वाद दिला व त्यांना निर्माण केले त्या वेळी त्यांना आदाम हे नाव दिले.
3 Adam żył sto trzydzieści lat i spłodził [syna] na swoje podobieństwo, na swój obraz, i nadał mu imię Set.
आदाम एकशे तीस वर्षांचा झाल्यावर त्यास त्याच्या प्रतिरूपाचा म्हणजे त्याच्या सारखा दिसणारा मुलगा झाला. त्याने त्याचे नाव शेथ ठेवले;
4 A dni Adama po spłodzeniu Seta było osiemset lat i spłodził synów i córki.
शेथ जन्मल्यानंतर आदाम आठशे वर्षे जगला आणि या काळात त्यास आणखी मुले व मुली झाल्या.
5 A [tak] wszystkich dni, które żył Adam, było dziewięćset trzydzieści lat i umarł.
अशा रीतीने आदाम एकंदर नऊशें तीस वर्षे जगला; नंतर तो मरण पावला.
6 Set żył sto pięć lat i spłodził Enosza.
शेथ एकशे पाच वर्षांचा झाल्यावर त्यास अनोश झाला
7 Po spłodzeniu Enosza Set żył osiemset siedem lat i spłodził synów i córki.
अनोश झाल्यानंतर शेथ आठशेसात वर्षे जगला, त्या काळात त्यास आणखी मुले व मुली झाल्या;
8 Wszystkich dni Seta było dziewięćset dwanaście lat i umarł.
शेथ एकंदर नऊशेंबारा वर्षे जगला, मग तो मरण पावला.
9 Enosz żył dziewięćdziesiąt lat i spłodził Kenana.
अनोश नव्वद वर्षांचा झाल्यावर त्यास केनान झाला;
10 Po spłodzeniu Kenana Enosz żył osiemset piętnaście lat i spłodził synów i córki.
१०केनान झाल्यानंतर अनोश आठशेपंधरा वर्षे जगला; त्या काळात त्यास आणखी मुले व मुली झाल्या;
11 Wszystkich dni Enosza było dziewięćset pięć lat i umarł.
११अनोश एकंदर नऊशेंपाच वर्षे जगला; त्यानंतर तो मरण पावला.
12 Kenan żył siedemdziesiąt lat i spłodził Mahalaleela.
१२केनान सत्तर वर्षांचा झाल्यावर तो महललेलाचा पिता झाला;
13 Po spłodzeniu Mahalaleela Kenan żył osiemset czterdzieści lat i spłodził synów i córki.
१३महललेल झाल्यावर केनान आठशेचाळीस वर्षे जगला; त्या काळात त्यास आणखी मुले व मुली झाल्या;
14 Wszystkich dni Kenana było dziewięćset dziesięć lat i umarł.
१४केनान एकंदर नऊशेंदहा वर्षे जगला, नंतर तो मरण पावला.
15 Mahalaleel żył sześćdziesiąt pięć lat i spłodził Jareda.
१५महललेल पासष्ट वर्षांचा झाल्यावर तो यारेदाचा पिता झाला;
16 Po spłodzeniu Jareda Mahalaleel żył osiemset trzydzieści lat i spłodził synów i córki.
१६यारेद जन्मल्यानंतर महललेल आठशेतीस वर्षे जगला; त्या काळात त्यास आणखी मुले व मुली झाल्या;
17 Wszystkich dni Mahalaleela było osiemset dziewięćdziesiąt pięć lat i umarł.
१७महललेल एकंदर आठशे पंचाण्णव वर्षे जगला; त्यानंतर तो मरण पावला.
18 Jared żył sto sześćdziesiąt dwa lata i spłodził Henocha.
१८यारेद एकशे बासष्ट वर्षांचा झाल्यावर तो हनोखाचा पिता झाला;
19 Po spłodzeniu Henocha Jared żył osiemset lat i spłodził synów i córki.
१९हनोख झाल्यावर यारेद आठशे वर्षे जगला; त्या काळात त्यास आणखी मुले व मुली झाल्या;
20 Wszystkich dni Jareda było dziewięćset sześćdziesiąt dwa lata i umarł.
२०यारेद एकंदर नऊशें बासष्ट वर्षे जगला; त्यानंतर तो मरण पावला.
21 Henoch żył sześćdziesiąt pięć lat i spłodził Matuzalema.
२१हनोख पासष्ट वर्षांचा झाल्यावर त्यास मथुशलह झाला;
22 Po spłodzeniu Matuzalema Henoch chodził z Bogiem trzysta lat i spłodził synów i córki.
२२मथुशलह जन्मल्यावर हनोख तीनशे वर्षे देवाबरोबर चालला. त्या काळात त्यास आणखी मुले व मुली झाल्या;
23 Wszystkich dni Henocha było trzysta sześćdziesiąt pięć lat.
२३हनोख एकंदर तीनशे पासष्ट वर्षे जगला;
24 Henoch chodził z Bogiem, a potem [już] go nie było, bo Bóg go zabrał.
२४हनोख देवाबरोबर चालला, आणि त्यानंतर तो दिसला नाही, कारण देवाने त्यास नेले.
25 Matuzalem żył sto osiemdziesiąt siedem lat i spłodził Lameka.
२५मथुशलह एकशेसत्याऐंशी वर्षांचा झाल्यावर लामेखाचा पिता झाला.
26 Po spłodzeniu Lameka Matuzalem żył siedemset osiemdziesiąt dwa lata i spłodził synów i córki.
२६लामेखाच्या जन्मानंतर मथुशलह सातशे ब्याऐंशी वर्षे जगला. त्या काळात त्यास आणखी मुले व मुली झाल्या.
27 Wszystkich dni Matuzalema było dziewięćset sześćdziesiąt dziewięć lat i umarł.
२७मथुशलह एकंदर नऊशें ऐकोणसत्तर वर्षे जगला. त्यानंतर तो मरण पावला.
28 Lamek żył sto osiemdziesiąt dwa lata i spłodził syna.
२८लामेख एकशेब्यांऐशी वर्षांचा झाल्यावर तो एका मुलाचा पिता झाला.
29 I nadał mu imię Noe, mówiąc: Ten nas pocieszy w naszej pracy i w trudzie naszych rąk, z powodu ziemi, którą PAN przeklął.
२९लामेखाने त्याचे नाव नोहा ठेवून म्हटले, परमेश्वराने भूमी शापित केली आहे तिच्यापासून येणाऱ्या कामात आणि आमच्या हातांच्या श्रमात हाच आम्हांला विसावा देईल.
30 Po spłodzeniu Noego Lamek żył pięćset dziewięćdziesiąt pięć lat i spłodził synów i córki.
३०नोहा झाल्यावर लामेख पाचशे पंचाण्णव वर्षे जगला; त्या काळात त्यास आणखी मुले व मुली झाल्या.
31 Wszystkich dni Lameka było siedemset siedemdziesiąt siedem lat i umarł.
३१लामेख एकंदर सातशे सत्याहत्तर वर्षे जगला. नंतर तो मरण पावला.
32 A gdy Noe miał pięćset lat, spłodził Sema, Chama i Jafeta.
३२नोहा पाचशे वर्षांचा झाल्यावर त्यास शेम, हाम व याफेथ नावाचे पुत्र झाले.

< Rodzaju 5 >