< Wyjścia 3 >
1 Mojżesz pasał stado swego teścia Jetra, kapłana Midianitów. Zaprowadził stado na drugą stronę pustyni i przyszedł do góry Bożej, do Horebu.
१तेव्हा मोशे आपला सासरा इथ्रो जो मिद्यानी याजक याचा कळप चारत होता. मोशे रानाच्या मागे, देवाचा डोंगर होरेब येथवर आपला कळप घेऊन गेला.
2 I Anioł PANA ukazał mu się w płomieniu ognia, ze środka krzewu. Spojrzał, a oto krzew płonął ogniem, lecz nie spłonął.
२तेव्हा परमेश्वराच्या दूताने त्यास एका झुडपातून निघणाऱ्या अग्नीच्या ज्वालेत दर्शन दिले. मोशेने पाहिले की, झुडूप अग्नीने जळत होते, परंतु ते जळून भस्म होत नव्हते.
3 Wtedy Mojżesz powiedział: Podejdę i zobaczę to wielkie zjawisko, dlaczego ten krzew się nie spala.
३मोशे म्हणाला, “मी त्या बाजूला वळतो आणि हे मोठे आश्चर्य जाऊन पाहतो की, हे झुडूप जळून नष्ट का होत नाही.”
4 A gdy PAN widział, że podchodził, aby to zobaczyć, zawołał do niego Bóg ze środka tego krzewu: Mojżeszu, Mojżeszu! A on odpowiedział: Oto jestem.
४मोशे झुडूपाजवळ येत आहे हे परमेश्वराने पाहिले. तेव्हा झुडपातून देवाने त्यास हाक मारून म्हटले, “मोशे! मोशे!” आणि मोशे म्हणाला, “हा मी इथे आहे.”
5 Wtedy powiedział: Nie zbliżaj się tu. Zdejmij buty z nóg, bo miejsce, na którym stoisz, jest ziemią świętą.
५देव म्हणाला, “तू इकडे जवळ येऊ नकोस, तर तुझ्या पायातल्या चपला काढ; कारण ज्या जागी तू उभा आहेस ती भूमी पवित्र आहे.
6 I dodał: Ja jestem Bogiem twego ojca, Bogiem Abrahama, Bogiem Izaaka i Bogiem Jakuba. I Mojżesz zakrył twarz, bo bał się patrzeć na Boga.
६तो आणखी म्हणाला, मी तुझ्या पित्याचा देव-अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव व याकोबाचा देव आहे.” तेव्हा मोशेने आपले तोंड झाकून घेतले. कारण देवाकडे पाहायला तो घाबरला.
7 PAN powiedział: Przyjrzałem się utrapieniom mojego ludu, który jest w Egipcie, i słyszałem ich krzyk z powodu nadzorców, gdyż znam jego cierpienia.
७परमेश्वर म्हणाला, “मिसरामध्ये माझ्या लोकांचा जाच मी खरोखर पाहिला आहे; आणि मुकादमांच्या त्रासामुळे त्यांनी केलेला आकांत मी ऐकला आहे; त्यांचे दु: ख मी जाणून आहे.
8 Dlatego zstąpiłem, aby wybawić go z ręki Egipcjan i wyprowadzić z tej ziemi do ziemi dobrej i przestronnej, do ziemi opływającej mlekiem i miodem, na miejsce Kananejczyków, Chetytów, Amorytów, Peryzzytów, Chiwwitów i Jebusytów.
८त्यांना मिसऱ्यांच्या हातून सोडवून त्यांना त्या देशातून चांगल्या व मोठ्या देशात, दुधामधाचे प्रवाह ज्यात वाहत आहेत, कनानी, हित्ती, अमोरी, परिज्जी, हिव्वी व यबूसी यांच्या प्रदेशात घेऊन जावे म्हणून मी उतरलो आहे.
9 Teraz oto dotarł do mnie krzyk synów Izraela. Widziałem też ucisk, jakim dręczą ich Egipcjanie.
९तर आता पाहा, मी इस्राएली लोकांचा आक्रोश ऐकला आहे आणि मिसरी ज्या जुलूमाने त्यांना जाचत आहेत तेही मी पाहिले आहे.
10 Dlatego teraz idź, poślę cię do faraona, abyś wyprowadził mój lud, synów Izraela, z Egiptu.
१०तर आता, माझ्या इस्राएली लोकांस मिसर देशामधून बाहेर काढण्यासाठी मी तुला फारोकडे पाठवत आहे.”
11 Mojżesz powiedział do Boga: Kimże ja jestem, abym miał iść do faraona i wyprowadzić synów Izraela z Egiptu?
११परंतु मोशे देवाला म्हणाला, “फारोकडे जाऊन इस्राएली लोकांस मिसर देशामधून काढून आणणारा असा मी कोण आहे?”
12 Bóg odpowiedział: Oto ja będę z tobą, a to będzie znakiem dla ciebie, że ja cię posłałem: gdy wyprowadzisz ten lud z Egiptu, będziecie służyć Bogu na tej górze.
१२देवाने उत्तर दिले, “खचीत, मी तुझ्याबरोबर असेन, मी तुला पाठवत आहे याची खूण हीच असेल; तू इस्राएली लोकांस मिसरमधून बाहेर आणल्यावर याच डोंगरावर तुम्ही देवाची उपासना कराल.”
13 Mojżesz powiedział do Boga: Kiedy pójdę do synów Izraela i powiem im: Bóg waszych ojców posłał mnie do was, a oni zapytają mnie, jakie jest jego imię, cóż im odpowiem?
१३मग मोशे देवाला म्हणाला, “परंतु मी जर इस्राएली लोकांकडे जाऊन म्हणालो, ‘तुमच्या पूर्वजांचा देव याने मला तुमच्याकडे पाठवले आहे’ तर मग ते लोक विचारतील ‘त्याचे नाव काय आहे?’ मग मी त्यांना काय सांगू?”
14 Wtedy Bóg odrzekł do Mojżesza: JESTEM, KTÓRY JESTEM. I dodał: Tak powiesz synom Izraela: JESTEM posłał mnie do was.
१४देव मोशेस म्हणाला, “जो मी आहे तो मी आहे. देव म्हणाला. तू इस्राएल लोकांस सांग, मी आहे याने मला तुम्हांकडे पाठवले आहे.”
15 I mówił jeszcze Bóg do Mojżesza: Tak powiesz synom Izraela: PAN, Bóg waszych ojców, Bóg Abrahama, Bóg Izaaka i Bóg Jakuba, posłał mnie do was. To jest moje imię na wieki i takim ma pozostać w pamięci po wszystkie pokolenia.
१५देव मोशेला असे म्हणाला, “तू इस्राएल लोकांस सांग, तुमच्या पूर्वजांचा म्हणजे अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव व याकोबाचा देव परमेश्वर याने मला तुम्हांकडे पाठवले आहे. हेच माझे सर्वकाळचे नाव आहे, व हेच माझे स्मारक सर्व पिढ्यांना होईल;
16 Idź, zgromadź starszych Izraela i mów do nich: Ukazał mi się PAN, Bóg waszych ojców, Bóg Abrahama, Izaaka i Jakuba, i powiedział: Nawiedziłem was i [widziałem], co wam uczyniono w Egipcie.
१६तू जाऊन इस्राएलाच्या वडीलजनांना एकत्रित करून त्यांना सांग की, तुमच्या पूर्वजांचा देव म्हणजे अब्राहाम, इसहाक व याकोब यांचा देव परमेश्वर, याने मला दर्शन देऊन म्हटले की, तुम्हांकडे खरोखर माझे लक्ष गेले आहे व मिसर देशात तुम्हांसोबत काय घडले आहे हे मला कळले आहे.
17 I postanowiłem: Wyprowadzę was z utrapienia Egiptu do ziemi Kananejczyków, Chetytów, Amorytów, Peryzzytów, Chiwwitów i Jebusytów, do ziemi opływającej mlekiem i miodem.
१७आणि मी तुम्हास मिसऱ्यांच्या जाचातून सोडवीन व कनानी, हित्ती, अमोरी, परिज्जी, हिव्वी व यबूसी यांच्या देशात, दुधामधाचे प्रवाह वाहणाऱ्या देशात घेऊन जाईन, असे मी सांगितले आहे हे त्यांना कळव.
18 Wtedy usłuchają twego głosu. I pójdziesz ty i starsi Izraela do króla Egiptu i powiecie do niego: PAN, Bóg Hebrajczyków, spotkał się z nami. Dlatego teraz pozwól nam pójść, proszę, w trzy dni drogi na pustynię, aby złożyć ofiarę PANU, naszemu Bogu.
१८ते तुझे ऐकतील, मग तू व इस्राएलाचे वडीलजन मिळून तुम्ही मिसराच्या राजाकडे जा व त्यास सांगा, इब्री लोकांचा देव परमेश्वर आम्हांला भेटला आहे. आमचा देव परमेश्वर याच्यासाठी यज्ञ करण्यासाठी म्हणून आम्हांला तीन दिवसाच्या वाटेवर रानात जाऊ दे.
19 Wiem, że król Egiptu nie pozwoli wam odejść, chyba że przez potężną rękę.
१९परंतु मला माहीत आहे की, मिसराचा राजा तुम्हास जाऊ देणार नाही. त्यास माझे बाहुबल दाखविले तरी तो तुम्हास जाऊ देणार नाही;
20 Wyciągnę więc rękę i uderzę Egipt wszystkimi moimi cudami, które będę czynił pośród niego. A potem was wypuści.
२०तेव्हा मी मिसर देशात आपले बाहुबल दाखवून, ज्या अद्भुत कृती मी करणार आहे, त्यांचा मारा मी त्याजवर करीन. मग तो तुम्हास जाऊ देईल;
21 Sprawię, że ten lud znajdzie przychylność w oczach Egipcjan. I stanie się tak, gdy będziecie wychodzić, [że] nie wyjdziecie z pustymi rękami.
२१आणि या लोकांवर मिसऱ्यांची कृपादृष्टी होईल असे मी करीन. आणि असे होईल की, तुम्ही निघाल तेव्हा रिकामे निघणार नाही.
22 Ale każda kobieta pożyczy od swojej sąsiadki i od tej, która u niej przebywa, srebrne i złote przedmioty oraz szaty. Włożycie je na waszych synów i na wasze córki i złupicie Egipt.
२२तर प्रत्येक स्त्री आपल्या शेजारणीकडून व आपल्या घरात राहणाऱ्या स्त्रीकडून भेटवस्तू मागून घेईल व ते लोक तिला भेटवस्तू देतील; ते तुम्हा लोकांस सोन्यारुप्याचे दागिने व कपडे भेट म्हणून देतील. तुम्ही ते आपल्या मुलांच्या व मुलींच्या अंगावर घालाल. अशा प्रकारे तुम्ही मिसराच्या लोकांस लुटाल.”