< I Królewska 11 >

1 Król Salomon jednak oprócz córki faraona kochał wiele obcych kobiet: Moabitki, Ammonitki, Edomitki, Sydonitki i Chetytki;
राजा शलमोनाचे अनेक विदेशी स्त्रिंयावर प्रेम जडले होते. फारोच्या मुलीखेरीज, हित्ती, मवाबी, अम्मोनी, अदोमी, सीदोनी अशा परक्या देशातील स्त्रियांनाही त्याने आपलेसे केले.
2 Spośród tych narodów, o których PAN powiedział synom Izraela: Nie łączcie się z nimi i niech one nie łączą się z wami; z pewnością bowiem skłonią wasze serca ku swoim bogom. Salomon przylgnął do nich miłością.
परमेश्वराने पूर्वीच इस्राएल लोकांस सांगितले होते “परक्या देशातील लोकांशी विवाह संबंध ठेवू नका. तसे केलेत तर ते तुम्हास त्यांच्या दैवतांच्या भजनी लावतील.” असे असूनही शलमोन या बायकांच्या प्रेमात पडला.
3 Miał więc siedemset żon, księżniczek, i trzysta nałożnic. A jego żony odwiodły jego serce.
त्यास सातशे स्त्रिया होत्या. (त्या सर्व इतर देशांच्या प्रमुखांच्या मुली होत्या) उपपत्नी म्हणून त्यास आणखी तीनशे दासीही होत्या. या बायकांनी त्यास देवापासून दूर जाण्यास भाग पाडले.
4 Gdy bowiem Salomon się zestarzał, jego żony skłoniły jego serce ku innym bogom. Jego serce nie było więc doskonałe wobec PANA, jego Boga, jak serce Dawida, jego ojca.
तो वृध्द झाला तेव्हा त्याच्या बायकांनी त्यास इतर दैवतांकडे वळवले. आपले वडिल दावीद याच्या प्रमाणे शलमोन परमेश्वराशी एकनिष्ठ राहिला नाही.
5 Salomon bowiem poszedł za Asztartą, boginią Sydończyków, i za Milkomem, obrzydliwością Ammonitów.
सीदोनी लोकांच्या अष्टारोथ देवाची शलमोनाने पूजा केली. तसेच अम्मोन्यांचे अमंगळ दैवत मिलकोम यालाही शलमोनाने भजले.
6 Salomon więc czynił to, co złe w oczach PANA, i nie chodził całkowicie za PANEM jak Dawid, jego ojciec.
अशाप्रकारे शलमोनाने परमेश्वराच्या दृष्टीने वाईट केले. आपले वडिल दावीद यांच्याप्रमाणे तो परमेश्वरास पूर्णपणे अनुसरला नाही.
7 Wówczas Salomon zbudował wyżynę dla Kemosza, obrzydliwości Moabu, na górze naprzeciwko Jerozolimy, oraz dla Molocha, obrzydliwości synów Ammona.
कमोश या मवाबी लोकांच्या अमंगळ दैवताच्या पूजेसाठी शलमोनाने एक पूजास्थळ बांधले. हे यरूशलेम नजीकच्या टेकडीवर होते. त्याच टेकडीवर मोलख या अम्मोनी लोकांच्या अमंगळ दैवतासाठीही एक उंच स्थान बांधले.
8 Podobnie uczynił dla wszystkich swoich żon obcej narodowości, które spalały kadzidła i składały ofiary swoim bogom.
आपल्या इतर, प्रत्येक देशातल्या बायकांसाठीही त्याने अशीच पूजास्थळे बांधली. त्या आपापल्या ठिकाणी धूप जाळत आणि आपापल्या दैवतांसाठी यज्ञ करत.
9 PAN rozgniewał się więc na Salomona [za to], że jego serce odwróciło się od PANA, Boga Izraela, który dwukrotnie mu się ukazał;
इस्राएलचा देव परमेश्वर याच्यापासून शलमोन परावृत्त झाला. तेव्हा परमेश्वराचा शलमोनावर कोप झाला. परमेश्वराने शलमोनाला दोनदा दर्शन दिले होते.
10 I zakazał mu chodzić za innymi bogami. Lecz on nie przestrzegał tego, co PAN przykazał.
१०इतर दैवतांच्या मागे त्याने जाऊ नये असे बजावले होते. पण शलमोनाने परमेश्वराच्या या आज्ञेचे उल्लंघन केले.
11 PAN powiedział więc do Salomona: Ponieważ dopuściłeś się tego i nie przestrzegałeś mojego przymierza ani moich nakazów, które ci przykazałem, na pewno wyrwę ci królestwo i dam je twemu słudze.
११तेव्हा परमेश्वर शलमोनाला म्हणाला, “तू आपण होऊन आपल्या कराराचा भंग केला आहेस. माझी आज्ञा तू पाळली नाहीस. तेव्हा तुझ्याकडून राज्य हिसकावून घेण्याची मी प्रतिज्ञा करतो. तुझ्या सेवकाला मी ते देईन.
12 Lecz nie uczynię tego za twego życia ze względu na Dawida, twego ojca, [ale] wyrwę je z ręki twego syna.
१२पण तुझे वडिल दावीद यांच्यावर माझे प्रेम होते. त्याखातर तू हयात असेपर्यंत मी तुलाच राज्यावर ठेवीन तुझा पुत्र गादीवर बसेपर्यंत वाट पाहीन. मग त्याच्याकडून ते घेईन.
13 Nie wyrwę jednak całego królestwa. Dam jedno pokolenie twemu synowi ze względu na Dawida, mego sługę, i ze względu na Jerozolimę, którą wybrałem.
१३तरी सगळेच राज्य हिसकावून घेणार नाही. एकाच घराण्यावर त्याची सत्ता ठेवीन. दाविदासाठी मी एवढे करीन. तो माझा आवडता सेवक होता. तसेच यरूशलेमेसाठी मला एवढे केले पाहिजे कारण ते नगर मी निवडले आहे.”
14 PAN wzbudził więc Salomonowi przeciwnika, Hadada Edomitę, z rodu królewskiego w Edomie.
१४आणि मग परमेश्वराने अदोमी हदादला शलमोनाचा शत्रू केले. हदाद अदोमाच्या राजघराण्यातला होता.
15 Stało się bowiem tak, że kiedy Dawid był w Edomie, a Joab, dowódca wojska, wyruszył, aby pogrzebać zabitych, gdyż zabił wszystkich mężczyzn w Edomie;
१५त्याचे असे झाले दाविदाने पूर्वी अदोमाचा पराभव केला होता. यवाब तेव्हा दाविदाचा सेनापती होता. तो अदोम येथे मृतांचे दफन करायला गेला. तेव्हा त्याने अदोमातील सर्वांची कत्तल केली होती.
16 (Bo Joab mieszkał tam przez sześć miesięcy wraz z całym Izraelem, aż wytracił wszystkich mężczyzn w Edomie).
१६यवाब आणि सर्व इस्राएल लोक यांनी अदोम येथे सहा महिने मुक्काम केला. त्या काळात त्यांनी अदोम येथे कुणाही पुरुषाला जिवंत ठेवले नाही.
17 Hadad uciekł wraz z pewnymi Edomitami spośród sług swego ojca, aby dostać się do Egiptu; Hadad [był] wtedy małym chłopcem.
१७हदाद त्यावेळी अगदी लहान होता. तेव्हा तो मिसर येथे पळून गेला. त्याच्या वडिलांचे काही अदोमी सेवकही त्याच्याबरोबर गेले.
18 Wyruszyli więc z Midian i przybyli do Paran. Z Paran zabrali ze sobą mężczyzn i przybyli do Egiptu, do faraona, króla Egiptu. Ten dał mu dom, zapewnił mu żywność i dał mu ziemię.
१८मिद्यानाहून पुढे ते सर्व पारान येथे गेले. तिथे त्यांना आणखी काही जण येऊन मिळाले. मग हे सगळे लोक मिळून मिसरला गेले. मिसरचा राजा फारो याच्याकडे त्यांनी आश्रय घेतला. फारोने हदादला राहायला एक घर आणि थोडी जमीन देऊ केली. त्याच्या अन्नवस्त्राची सोय केली.
19 Hadad znalazł wielką łaskę w oczach faraona, tak że [ten] dał mu za żonę siostrę swojej żony, siostrę królowej Tachpenes.
१९फारोची हदादवर मर्जी बसली. तेव्हा त्याने आपल्या मेहुणीशी त्याचे लग्नही लावून दिले. त्याची राणी तहपनेस हिची ती बहीण होती.
20 Siostra Tachpenes urodziła mu syna, Genubata, którego wychowała Tachpenes w domu faraona. Genubat przebywał więc w domu faraona wśród jego synów.
२०या तहपनेसच्या बहिणीचे हदादशी लग्न झाले. त्यांना गनुबथ नावाचा पुत्र झाला. राणी तहपनेसच्या संमतीने तो राजवाड्यात फारोच्या मुलांबरोबरच वाढला.
21 A gdy Hadad usłyszał w Egipcie, że Dawid zasnął ze swoimi ojcami i że umarł Joab, dowódca wojska, wtedy powiedział do faraona: Pozwól mi wrócić do swojej ziemi.
२१दाविदाच्या मृत्यूची खबर हदादने मिसरमध्ये ऐकली. सेनापती यवाब मरण पावल्याचेही त्यास कळले. तेव्हा हदाद राजा फारोला म्हणाला, “मला माझ्या मायदेशी परत जाऊ दे.”
22 Faraon zapytał go: Czego ci u mnie brakuje, że chcesz wrócić do swojej ziemi? Odpowiedział: Niczego. Pozwól mi jednak wrócić.
२२तेव्हा फारो त्यास म्हणाला, “येथे तुला हवे ते सर्वकाही मी दिले आहे. असे असताना तू परत का जातोस?” तेव्हा “हदादने पुन्हा जाऊ देण्याबद्दल विनंती केली.”
23 Bóg wzbudził mu też przeciwnika [w osobie] Rezona, syna Eliady, który uciekł od swego pana Hadadezera, króla Soby.
२३देवाने शलमोनासाठी आणखी एक शत्रू निर्माण केला. तो म्हणजे रजोन. हा एल्यादाचा पुत्र. सोबाचा राजा हददेर याचा रजोन हा सेवक होता. त्याच्याकडून तो पळाला.
24 Zebrał on wokół siebie ludzi i został przywódcą zgrai, gdy Dawid pobił mieszkańców [z Soby]. Potem udali się do Damaszku, gdzie mieszkali, a [potem] panowali nad Damaszkiem.
२४दाविदाने सोबाच्या सैन्याचा पाडाव केल्यानंतर, रजोनाने काही माणसे जमवली आणि त्या टोळीचा तो नायक बनला. दिमिष्कामध्ये जाऊन मग तो राहिला. तिथला राजा झाला.
25 Był on przeciwnikiem Izraela przez wszystkie dni Salomona, oprócz tego zła, jakie [wyrządził mu] Hadad. Znienawidził Izraela, gdy został królem Syrii.
२५अरामावर रजोनाने राज्य केले. इस्राएलाबद्दल त्यास चीड होती, तेव्हा शलमोनाच्या संपूर्ण कारकिर्दीत त्याचे इस्राएलशी वैरच होते. हदाद आणि रजोन यांनी मिळून इस्राएलाला बराच त्रास दिला.
26 Jeroboam, syn Nebata Efratejczyka z Seredy i sługa Salomona, którego matka miała na imię Serua [i była] wdową, również podniósł rękę przeciw królowi.
२६नबाट याचा पुत्र यराबाम हा शलमोनाचा एक सेवक. हा एफ्राईम घराण्यातला असून सरेदा नगरातील होता. याच्या आईचे नाव सरुवा. त्याचे वडिल वारले होते. हा यराबाम पुढे राजाच्या विरुध्द गेला.
27 A taka była przyczyna, dla której podniósł rękę przeciwko królowi: Salomon zbudował Millo i zamknął wyłomy w mieście Dawida, swego ojca.
२७त्याची कथा अशी. मिल्लोचे बांधकाम आणि दावीद राजाच्या नगराच्या तटबंदीला पडलेली खिंडारे बुजवण्याचे काम शलमोन करून घेत होता.
28 A Jeroboam był dzielnym wojownikiem. Gdy Salomon zauważył, że młodzieniec dobrze wykonuje swoją pracę, ustanowił go przełożonym nad wszystkimi sprawami domu Józefa.
२८यराबाम हा अंगापिडाने मजबूत होता. हा या कामाला चांगला असल्याचे शलमोनाने हेरले आणि त्यास योसेफ घराण्यातील कामगारांचा अधीक्षक म्हणून नेमले.
29 I zdarzyło się w tym czasie, gdy Jeroboam wyszedł z Jerozolimy, że spotkał go na drodze prorok Achiasz Szilonita, odziany w nowy płaszcz. I ci dwaj byli sami na polu.
२९एकदा यराबाम यरूशलेमेच्या बाहेर गेला होता. तेव्हा त्यास शिलो येथील अहीया नावाचा संदेष्टा वाटेत भेटला. अहीयाने नवीन अंगरखा घातला होता. या दोघांखेरीज तेव्हा त्या भागात आणखी कोणी नव्हते.
30 Wtedy Achiasz chwycił nowy płaszcz, który miał na sobie, i rozdarł go na dwanaście części.
३०अहीयाने आपला अंगरखा काढला आणि त्याचे फाडून बारा तुकडे केले.
31 I powiedział do Jeroboama: Weź sobie dziesięć części. Tak bowiem mówi PAN, Bóg Izraela: Oto wyrwę królestwo z ręki Salomona, a tobie dam dziesięć pokoleń.
३१मग अहीया यराबामाला म्हणाला, “यातले दहा तुकडे तू स्वत: जवळ ठेव. इस्राएलचा देव परमेश्वर याने सांगितले आहे शलमोनाच्या हातातून राज्य काढून घेऊन त्यातील दहा वंशाचा अधिकार मी तुला देईन.
32 Jemu zaś pozostanie jedno pokolenie ze względu na mego sługę Dawida i ze względu na Jerozolimę, miasto, które wybrałem spośród wszystkich pokoleń Izraela;
३२आणि दाविदाच्या घराण्यात फक्त एकाच वंशाची मालकी शिल्लक ठेवीन. माझा सेवक दावीद आणि हे यरूशलेम नगर यांच्या खातर मी एवढे करीन. इस्राएलाच्या सर्व वंशांतून मी यरूशलेम नगराची निवड केली आहे.
33 Dlatego że opuścili mnie i oddali pokłon Asztarcie, bogini Sydończyków, Kemoszowi, bogu Moabitów, i Milkomowi, bogu synów Ammona, a nie chodzili moimi drogami, aby czynić to, co prawe w moich oczach, i [przestrzegać] moich nakazów i praw, jak [to czynił] Dawid, jego ojciec.
३३शलमोनाने माझा त्याग केला म्हणून मी त्याच्याकडून राज्य काढून घेणार आहे. सीदोन्यांची देवी अष्टारोथ, मवाबाचा कमोश, अम्मोन्याचा मिलकोम या परकीय दैवतांचे तो भजन पूजन करतो. जे योग्य आणि न्याय्य ते आता तो करत नाही. माझ्या आज्ञा आणि नियम तो पाळत नाही. त्याचे वडिल दावीद ज्या पध्दतीने जगले तसे याचे नाही.
34 Nie odbiorę całego królestwa z jego ręki, ale pozostawię go księciem po wszystkie dni jego życia ze względu na Dawida, swego sługę, którego wybrałem i który przestrzegał moich przykazań i nakazów.
३४तेव्हा आता त्याच्या घराण्यातून मी सत्ता काढून घेत आहे. मात्र शलमोन जिवंत असेपर्यंत तोच गादीवर अधिपती राहील. माझा सेवक दावीद याच्याखातर मी एवढे करीन. माझे सर्व नियम आणि आज्ञा दाविदाने पाळल्या म्हणून मी त्यास निवडले.
35 Zabiorę natomiast królestwo z ręki jego syna i dam je tobie – dziesięć pokoleń.
३५पण त्याच्या मुलाच्या हातून मी राज्य काढून घेणार आहे आणि यराबाम, दहा घराण्यावरील सत्ता मी तुझ्या हाती सोपवीन.
36 A jego synowi dam jedno pokolenie, aby Dawid, mój sługa, miał po wszystkie dni pochodnię przede mną w Jerozolimie, w mieście, które sobie wybrałem, aby tam przebywało moje imię.
३६शलमोनाच्या मुलाची एका वंशावरील सत्ता तशीच अबाधित ठेवीन. म्हणजे यरूशलेमामध्ये माझा सेवक दावीद याचा वंशजच सतत राज्य करील. यरूशलेम हे नगर मी आपले स्वत: चे म्हणून निवडले.
37 Ciebie zaś wezmę i będziesz panował nad wszystkim, czego zapragnie twoja dusza, i będziesz królem nad Izraelem.
३७बाकी तुला हवे तेथे तू राज्य करशील. सर्व इस्राएलवर तुझी सत्ता चालेल.
38 Jeśli więc będziesz słuchał wszystkiego, co ci rozkażę, i będziesz kroczył moimi drogami, i czynił to, co prawe w moich oczach, i przestrzegał moich nakazów i przykazań, jak czynił mój sługa Dawid, wtedy będę z tobą, zbuduję ci dom trwały, jak zbudowałem Dawidowi, i powierzę ci Izraela.
३८माझ्या आज्ञांचे पालन करत तू योग्य मार्गाने आयुष्य घालवलेस तर मी हे तुला देईन. दाविदाप्रमाणे माझी सर्व आज्ञा आणि नियम पाळलेस तर माझी तुला साथ असेल. दाविदा प्रमाणेच तुझ्याही घराण्याला मी राजघराणे करीन. इस्राएल तुला देईन.
39 Dlatego upokorzę potomstwo Dawida, jednak nie po wszystkie dni.
३९यामुळे मी दाविदाच्या वर्तणुकीची शिक्षा मी त्याच्या मुलांना करीन. पण काही काळापुरती, सर्वकाळ नव्हे.”
40 Salomon usiłował więc zabić Jeroboama, ale Jeroboam wstał i uciekł do Egiptu, do Sziszaka, króla Egiptu. I pozostał w Egipcie aż do śmierci Salomona.
४०शलमोनाने यराबामाच्या वधाचा प्रयत्न केला. पण यराबामाने मिसरला पलायन केले. मिसरचा राजा शिशक याच्याकडे तो गेला. शलमोनाच्या मृत्यूपर्यंत यराबाम तिथेच राहिला.
41 A pozostałe dzieje Salomona oraz wszystko, co czynił, i jego mądrość, czy nie są zapisane w księdze dziejów Salomona?
४१शलमोनाने सत्तेवर असताना बऱ्याच मोठमोठ्या आणि सुज्ञपणाच्या गोष्टी केल्या. शलमोनचा इतिहास या पुस्तकात त्या सर्व लिहिलेल्या नाहीत काय?
42 A czas, w którym Salomon panował w Jerozolimie nad całym Izraelem, [obejmował] czterdzieści lat.
४२यरूशलेमेतून शलमोनाने सर्व इस्राएलवर चाळीस वर्षे राज्य केले
43 I Salomon zasnął ze swymi ojcami i został pogrzebany w mieście Dawida, swego ojca. I jego syn Roboam królował w jego miejsce.
४३मग शलमोन मरण पावला तेव्हा त्याच्या पूर्वजांशेजारी दावीद याच्या नगरामध्ये त्याचे दफन करण्यात आले. त्याच्या ठिकाणी रहबाम राज्य करू लागला.

< I Królewska 11 >