< Zachariasza 1 >

1 Miesiąca ósmego roku wtórego Daryjusza stało się słowo Pańskie do mnie Zacharyjasza, syna Barachyjaszowego, syna Iddowego, proroka, mówiąc:
पारसाचा राजा दारयावेश याच्या कारकिर्दीच्या दुसऱ्या वर्षाच्या आठव्या महिन्यात, जखऱ्या, जो बरेख्याचा मुलगा, जो इद्दोचा मुलगा, त्यास परमेश्वराकडून वचन प्राप्त झाले ते असे,
2 Rozgniewał się Pan na ojców waszych bardzo.
परमेश्वर तुमच्या पूर्वजांवर फार रागावला होता.
3 Przetoż rzecz do nich: Tak mówi Pan zastępów: Nawróćcie się do mnie, mówi Pan zastępów, a nawrócę się do was, mówi Pan zastępów.
तर त्यांना असे सांग, सैन्यांचा परमेश्वर असे म्हणतो: “तुम्ही माझ्याकडे फिरा!” हे सैन्यांच्या परमेश्वराचे वचन आहे; “म्हणजे मी तुमच्याकडे फिरेन.” असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.
4 Nie bądźcież jako ojcowie wasi, na których wołali ojcowie pierwsi, mówiąc: Tak mówi Pan zastępów: Nawróćcież się teraz od złych dróg waszych, i od złych spraw waszych; ale nie usłuchali, ani dbali na mię, mówi Pan.
संदेष्टे तुमच्या पूर्वजांना पूर्वी संदेश देत म्हणाले, “सैन्याचा देव असे म्हणतो: आपल्या दुष्ट मार्गांपासून आणि वाईट चालीरितींपासून वळा!” परंतु त्यांनी ऐकले नाही आणि माझ्याकडे लक्ष दिले नाही. त्या पूर्वजांसारखे होऊ नका. ही परमेश्वराची वाणी होय.
5 Gdzież są ojcowie wasi, i prorocy? Izali na wieki żyć będą?
“तुमचे पूर्वज, कोठे आहेत? आणि संदेष्टे देखील सर्वकाळाकरता येथे राहतील काय?
6 Wszakże izali słowa moje i ustawy moje, którem rozkazał prorokom, sługom moim, nie zasięgły ojców waszych? tak, że nawróciwszy się rzekli: Jako nam Pan zastępów uczynić umyślił według dróg naszych i według uczynków naszych, tak nam uczynił.
परंतु मी माझ्या ज्या वचनांनी आणि माझ्या ज्या नियमांनी माझे दास, जे माझे संदेष्टे त्यांना आज्ञापिले, ती तुमच्या पूर्वजांवर आली नाहीत काय?” तेव्हा त्यांनी पश्चाताप केला व म्हणाले, “सेनाधीश परमेश्वराच्या योजना या त्याचे वचन आणि त्याची कामे यांच्यानुसार आहेत, त्या त्याने पूर्णतेस नेल्या आहेत.”
7 Dnia dwudziestego i czwartego jedenastego miesiąca (ten jest miesiąc Sebat) roku wtórego Daryjuszowego stało się słowo Pańskie do Zacharyjasza, syna Barachyjaszowego, syna Iddowego, proroka, mówiąc:
दारयावेश ह्याच्या कारकिर्दीच्या दुसऱ्या वर्षाच्या अकराव्या म्हणजे शबाट महिन्याच्या चोविसाव्या दिवशी जखऱ्या, जो बरेख्याचा मुलगा, जो इद्दोचा मुलगा याला, परमेश्वराचा संदेश प्राप्त झाला तो असा:
8 Widziałem w nocy, a oto mąż jechał na koniu rydzym, który stał między mirtami, które były w nizinie, a za nim konie rydze, czarne i białe.
“रात्र असतांना मला दृष्टांतात दिसले ते असे: तांबड्या घोड्यावर आरुढ झालेला एक मनुष्य मी पाहिला आणि तो दरीतल्या मेंदीच्या झुडुपांमध्ये उभा होता. त्याच्यामागे तांबड्या, तपकिरी आणि पांढऱ्या रंगाचे घोडे होते.”
9 Tedym rzekł: Co zacz są ci, panie mój? I rzekł do mnie Anioł rozmawiający zemną: Ja tobie okażę, co zacz są.
मी विचारले, “प्रभू, हे कोण आहेत?” तेव्हा माझ्याशी बोलत असलेला देवदूत मला म्हणाला, “हे कोण आहेत ते मी तुला दाखवतो.”
10 I odpowiedział mąż, który stał między mirtami, i rzekł: Ci są, których posłał Pan, aby przeszli ziemię.
१०मग मेंदीच्या झुडुपांमध्ये उभा असलेल्या मनुष्याने उत्तर दिले व म्हणाला, “पृथ्वीवर इकडे तिकडे संचार करायला परमेश्वराने हे पाठवले आहेत.”
11 I odpowiedzieli Aniołowi Pańskiemu stojącemu między mirtami, i rzekli: Przeszliśmy ziemię, a oto wszystka ziemia bezpieczeństwa i pokoju używa.
११नंतर त्यांनी मेंदीच्या झुडुपांत उभ्या असलेल्या परमेश्वराच्या दिव्यदूताला उत्तर दिले व ते म्हणाले, “आम्ही पृथ्वीवर इकडे तिकडे फिरलो आणि पाहा संपूर्ण पृथ्वी शांत व विसावली आहे.”
12 Tedy odpowiedział Anioł Pański, i rzekł: O Panie zastępów! i dokądże się nie zmiłujesz nad Jeruzalemem, i nad miastami Judzkiemi, na któreś się gniewał już siedmdziesiąt lat?
१२मग परमेश्वराच्या दिव्यदूताने उत्तर देऊन म्हटले, “हे सेनाधीश परमेश्वरा, या सत्तर वर्षांपासून यरूशलेमेचे आणि यहूदातील नगरांनी जो क्रोध सहन केला आहे त्याविषयी आणखी किती काळ तू करूणा करणार नाहीस?”
13 I odpowiedział Pan Aniołowi onemu, który mówił zemną, słowy dobremi, słowy pociesznemi.
१३माझ्याशी बोलत असलेल्या परमेश्वराच्या देवदूताला परमेश्वर चांगल्या शब्दांत व सांत्वन देणाऱ्या शब्दांत बोलला.
14 I rzekł do mnie Anioł, który mówił zemną: Wołaj a rzecz: Tak mówi Pan zastępów: Zapaliłem się za Jeruzalemem i za Syonem gorliwością wielką.
१४मग माझ्याशी बोलणाऱ्या परमेश्वराचा दूत मला म्हणाला, “घोषणा करून सांग की, ‘सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो: “मी यरूशलेम व सियोन यांच्यासाठी अती ईर्षावान असा झालो आहे!
15 A gniewam się bardzo na te narody, które używają pokoju; bo gdym się Ja trochę zagniewał, tedy one pomagały do złego.
१५आणि स्वस्थ बसलेल्या राष्ट्रांवर माझा राग पेटला आहे; कारण मी तर थोडासाच रागावलो होतो, पण या राष्ट्रांनी त्यांच्या दुःखात आणखी भर घालण्याची मदत केली.”
16 Przetoż tak mówi Pan: Nawróciłem się do Jeruzalemu w miłosierdziu, dom mój zbudowany będzie w niem, mówi Pan zastępów, i sznur rozciągniony będzie na Jeruzalem.
१६म्हणून परमेश्वर असे म्हणतो, “मी यरूशलेमेकडे करुणामय होऊन परत फिरलो आहे. माझे निवासस्थान तिच्यात पुन्हा बांधले जाईल.” सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “मापनसूत्र यरूशलेमेवर लावण्यात येईल.”
17 Jeszcze wołaj, mówiąc: Tak mówi Pan zastępów: Jeszcze się osadzą miasta moje dla obfitości dobrego; bo jeszcze Pan Syon pocieszy, i obierze jeszcze Jeruzalem.
१७पुन्हा पुकार आणि असे सांग, “सेनाधीश परमेश्वर म्हणतो: ‘माझी नगरे पुन्हा एकदा चांगूलपणाने भरभरून वाहतील, परमेश्वर पुन्हा सियोनचे सांत्वन करील, आणि तो पुन्हा एकदा यरूशलेमची निवड करील.”
18 Tedym podniósł oczy swe i ujrzałem, a oto cztery rogi.
१८मग मी माझे डोळे वर करून पाहिले आणि मला चार शिंगे दिसली!
19 I rzekłem do Anioła, który mówił zemną: Cóż to jest? I rzekł do mnie: Teć są rogi, które rozrzuciły Judę i Izraela i Jeruzalem.
१९माझ्याशी बोलत असलेल्या देवदूताला मी म्हणालो, “ही काय आहेत?” त्याने मला उत्तर दिले, “इस्राएल, यहूदा व यरूशलेम यांना ज्या शिंगांनी विखरले ती ही आहेत.”
20 Ukazał mi też Pan czterech kowali.
२०मग परमेश्वराने मला चार लोहार दाखवले.
21 I rzekłem: Cóż ci idą czynić? I odpowiedział, mówiąc: Teć są rogi, które rozrzuciły Judę, tak, iż żaden nie mógł podnieść głowy swojej; przetoż ci przyszli, aby je przestraszyli, i strącili rogi tych narodów, które podniosły róg przeciwko ziemi Judzkiej, aby ją rozrzuciły.
२१मी विचारले, “हे लोक येथे काय करण्यासाठी आहेत?” त्याने उत्तर दिले आणि म्हणाला, “ज्या शिंगांनी यहूदाच्या लोकांस विखरले आणि कोणाही मनुष्यांस डोके वर करू दिले नाही. परंतू त्या शिगांना घालवून देण्यासाठी ते आले आहेत, ती शिंगे म्हणजे यहूदाच्या लोकांवर हल्ला करून त्यांना परागंदा करणाऱ्या राष्ट्रांची शिंगे होत.”

< Zachariasza 1 >