< Zachariasza 8 >
1 Potem stało się słowo Pana zastępów, mówiąc:
१सेनाधीश परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले.
2 Tak mówi Pan zastępów: Zapaliłem się nad Syonem gorliwością wielką, owszem, rozgniewaniem wielkiem zapaliłem się.
२सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “मी सियोनेसाठी खूप ईर्ष्यावान झालो आहे. तिच्या करीता क्रोधाने व आवेशाने ईर्ष्यावान झालो आहे.”
3 Tak mówi Pan: Nawróciłem się do Syonu, i mieszkam w pośród Jeruzalemu, aby Jeruzalem zwano miastem wiernem, a górę Pana zastępów, górą świętobliwości.
३सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “मी सियोनेत परत आलो आहे आणि यरूशलेमेत राहीन. यरूशलेम ‘सत्य नगरी’ म्हणून ओळखली जाईल. सेनाधीश परमेश्वराचा पर्वत हा ‘पवित्र पर्वत’ म्हणून ओळखला जाईल.”
4 Tak mówi Pan zastępów: Jeszcze siadać będą starcy i baby na ulicach Jeruzalemskich, mając każdy z nich laskę w ręce swej dla zeszłości wieku.
४सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “वृध्द स्त्री आणि वृध्द पुरुष यरूशलेमेच्या रस्त्यावर पुन्हा दिसू लागतील. लोक इतके दीर्घायुषी होतील की चालतांना त्यांना काठीच्या आधाराची गरज भासेल.
5 Ulice także miasta pełne będą chłopiąt i dziewcząt grających na ulicach jego.
५रस्त्यावर खेळणाऱ्या मुलांनी ती नगरी गजबजून जाईल.
6 Tak mówi Pan zastępów: Izali, że się to niepodobna widzi przed oczyma ostatków ludu tego tych dni, będzie też to niepodobna przed oczyma mojemi? mówi Pan zastępów.
६सेनाधीश परमेश्वर म्हणतो, त्या दिवसात या अवशिष्ट देशाला आश्चर्य वाटेल, म्हणून मलाही आश्चर्य वाटेल का?” असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.
7 Tak mówi Pan zastępów: Oto Ja wybawię lud mój z ziemi na wschód, i z ziemi na zachód słońca.
७सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “पाहा! पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील देशातून मी माझ्या लोकांची मुक्तता करीन.
8 I przywiodę ich zaś; a będą mieszkać w pośród Jeruzalemu, i będą ludem moim, a Ja będę Bogiem ich w prawdzie i w sprawiedliwości.
८मी त्यांना घेऊन येईन आणि ते यरूशलेमेमध्ये राहतील. ते सत्याने व धर्माने पुन्हा माझे लोक होतील आणि मी त्यांचा देव होईन.”
9 Tak mówi Pan zastępów: Niech się zmocnią ręce wasze, którzyście słuchali w tych dniach słów tych z ust proroków, którzy byli ode dnia, którego założony jest dom Pana zastępów, że kościół ma być dobudowany.
९सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “आपले हात दृढ करा! सेनाधीश परमेश्वराने मंदिराच्या पुनर्निर्मितीच्या वेळी पाया घालताना, संदेष्ट्यांमार्फत जो संदेश दिला, तोच तुम्ही आज ऐकत आहात.
10 Bo się przed temi dniami praca ludzka i praca bydląt nie nagradzała, nawet wychodzącemu i wchodzącemu nie było pokoju dla nieprzyjaciela; bom Ja spuścił wszystkich ludzi jednego z drugim.
१०त्या दिवसापूर्वी, लोकांस काम मिळत नसे वा भाड्याने जनावरे घ्यायला लोकांजवळ पैसा नसे. जाणे येणे शत्रूंमुळे सूरक्षित नव्हते. मी प्रत्येकाला आपल्या शेजाऱ्याविरुध्द भडकविले होते.
11 Lecz teraz nie tak jako za dni przeszłych czynię ostatkowi ludu tego, mówi Pan zastępów:
११पण आता तसे पूर्वीच्या दिवसासारखे नसेल. मी उर्वरित लोकांबरोबर असणार.” असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.
12 Ale siewy macie spokojne; winna macica wydaje owoc swój, i ziemia wydaje urodzaj swój, niebiosa także wydawają rosę twoję, a to wszystko daję w osiadłość ostatkom ludu tego.
१२“ते लोक शांततेत लागवड करतील. त्यांच्या द्राक्षवेलींना द्राक्षे लागतील. जमीन चांगली पिके देईल आणि आकाश पाऊस देईल. मी या सर्व गोष्टी माझ्या उर्वरित लोकांस वतन देईन.
13 I stanie się, że jakoście byli przeklęstwem między poganami, o domie Judzki i domie Izraelski! tak was zaś będę ochraniał, i będziecie błogosławieństwem; nie bójcie się, niech się zmacniają ręce wasze.
१३शिव्या शाप देण्यासाठी लोकांनी इस्राएल व यहूदाच्या नावाचा वापर करण्यास सुरवात केली होती. पण मी इस्राएलाची व यहूदाची पापातून मुक्तता करीन त्यांची नावे आशीर्वादीत बनतील तेव्हा घाबरू नका! तुमचे हात दृढ ठेवा!”
14 Bo tak mówi Pan zastępów: Jakom wam był umyślił źle uczynić, gdy mię do gniewu pobudzali ojcowie wasi, mówi Pan zastępów, a nie żałowałem tego,
१४सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “तुमच्या पूर्वजांनी मला संतापविले. म्हणून मी त्यांचा नाश करण्याचा निर्धार केला. माझा निश्चय बदलायचा नाही असे मी ठरविले होते.” सेनाधीश परमेश्वर असे म्हणाला.
15 Tak nawróciwszy się umyśliłem w te dni dobrze czynić Jeruzalemowi i domowi Judzkiemu; nie bójcież się.
१५“पण आता मात्र माझे मन: परिवर्तन झाले आहे. आणि म्हणून मी यरूशलेमेवर व यहूदाच्या लोकांशी चांगले वागायचे ठरविले आहे. तेव्हा घाबरु नका!
16 Teć są rzeczy, które czynić będziecie: Prawdę mówcie każdy z bliźnim swoim, prawy i spokojny sąd czyńcie w bramach waszych;
१६पण तुम्हास पुढील गोष्टी करणे भाग आहे! तुमच्या शेजाऱ्याला सत्य सांगा. आपल्या वेशीत शांती, न्याय व सत्याने न्याय करा. त्यामुळे शांतता येईल.
17 A jeden drugiemu nic złego nie myślcie w sercach waszych, a w krzywoprzysięstwie się nie kochajcie; bo to wszystko jest, czego nienawidzę, mówi Pan.
१७आपल्या शेजाऱ्यांना त्रास देण्यासाठी कट करु नका. खोटी शपथ देण्याची आवड धरू नका. कारण या गोष्टींचा मला द्वेष आहे.” परमेश्वराने या गोष्टी सांगितल्या आहेत.
18 I stało się słowo Pana zastępów do mnie, mówiąc:
१८सेनाधीश परमेश्वराकडून मला वचन मिळाले.
19 Tak mówi Pan zastępów: Post czwartego, i post piątego, i post siódmego, i post dziesiątego miesiąca obróci się domowi Judzkiemu w radość i wesele, i w rozkoszne uroczyste święta; ale prawdę i pokój miłujcie.
१९सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “तुम्ही चौथ्या, पाचव्या, सातव्या आणि दहाव्या महिन्याच्या विशिष्ट दिवशी शोक प्रकट करता, उपवास करता. ते यहूदाच्या घराण्यास छान, आनंदाचे, मोठ्या चांगुलपणाचे दिवस होतील. म्हणून तुम्ही सत्य आणि शांती ह्यावर प्रेम केलेच पाहिजे.”
20 Tak mówi Pan zastępów: Jeszczeć będą przychodzić narody i obywatele wielu miast;
२०सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “पुष्कळ नगराचे लोक यरूशलेमेला येतील.
21 Przychodzić, mówię, będą obywatele jednego miasta do drugiego, mówiąc: Pójdźmy ochotnie błagać oblicze Pańskie, a szukać Pana zastępów; i rzecze każdy: Pójdę i ja.
२१निरनिराळ्या नगरातील लोक एकमेकांना भेटतील व म्हणतील, ‘आम्ही सेनाधीश परमेश्वराची कृपा मिळवू व त्यास शोधू.’ मीही येतो.”
22 A tak wiele ludu i narodów niezliczonych przyjdzie szukać Pana zastępów w Jeruzalemie, i błagać oblicze Pańskie.
२२पुष्कळ लोक आणि बलिष्ठ राष्ट्रे, सेनाधीश परमेश्वराच्या शोधात आणि त्याची कृपा मिळवण्यास यरूशलेमेत येतील.
23 Tak mówi Pan zastępów: W one dni uchwycą się dziesięć mężów ze wszystkich języków onych narodów; uchwycą się, mówię, podołka jednego Żyda, mówiąc: Pójdziemy z wami, bo słyszymy, że Bóg jest z wami.
२३सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “त्यावेळी, वेगवेगळ्या भाषा बोलणारे दहा लोक यहूदी मनुष्याकडे येऊन त्याचा झगा पकडून त्यास विचारतील, ‘देव तुम्हाबरोबर आहे’ असे आम्ही ऐकले आहे! आम्ही तुम्हाबरोबर येतो.”