< Psalmów 145 >
1 Chwalebna pieśń Dawidowa. Wywyższać cię będę, Boże mój, królu mój! i błogosławić będę imieniowi twemu na wieki wieków.
१दाविदाचे स्तोत्र माझ्या देवा, हे राजा, मी तुझी खूप स्तुती करीन; मी सदासर्वकाळ व कायम तुझ्या नावाचा धन्यवाद करीन.
2 Na każdy dzień błogosławić cię będę, a chwalić imię twoje na wieki wieków.
२प्रत्येक दिवशी मी तुझा धन्यवाद करीन. मी सदासर्वकाळ व कायम तुझ्या नावाचे स्तवन करीन.
3 Pan wielki jest i bardzo chwalebny, a wielkość jego nie może być dościgniona.
३परमेश्वर महान आणि परमस्तुत्य आहे; त्याची महानता अनाकलनीय आहे.
4 Naród narodowi wychwalać będzie sprawy twoje, a mocy twoje opowiadać będą.
४एक पिढी दुसऱ्या पिढीपुढे तुझ्या कृत्यांची प्रशंसा करीत राहील, आणि तुझ्या पराक्रमी कृतीचे वर्णन करतील.
5 Ozdobę chwały wielmożności twojej, i dziwne twe sprawy wysławiać będę.
५ते तुझ्या राजवैभवाचा गौरवयुक्त प्रतापाविषयी बोलतील, मी तुझ्या अद्भुत कार्यांचे मनन करीन.
6 I moc strasznych uczynków twoich ogłaszać będą, i ja zacność twoję opowiadać będę,
६ते तुझ्या भयावह कृत्यांच्या पराक्रमाविषयी बोलतील, मी तुझ्या महिमेचे वर्णन करीन.
7 Pamięć obfitej dobroci twojej wysławiać, o sprawiedliwości twojej śpiewać będą, mówiąc:
७ते तुझ्या विपुल अशा चांगुलपणाविषयी सांगतील, आणि तुझ्या न्यायीपणाबद्दल गाणे गातील.
8 Dobrotliwy i miłosierny jest Pan, nierychły do gniewu, i wielkiego miłosierdzia.
८परमेश्वर दयाळू आणि कृपाळू आहे, तो मंदक्रोध व अतिदयाळू आहे.
9 Dobryć jest Pan wszystkim, a miłosierdzie jego nad wszystkiem sprawami jego.
९परमेश्वर सर्वांना चांगला आहे; त्याची कृपा त्याने केलेल्या सर्व कृत्यांवर आहे.
10 Niech cię wysławiają, Panie! wszystkie sprawy twoje, a święci twoi niech ci błogosławią.
१०हे परमेश्वरा, तू केलेली सर्व कृत्ये तुला धन्यवाद देतील; तुझे भक्त तुला धन्यवाद देतील.
11 Sławę królestwa twego niech opowiadają, a o możności twojej niech rozmawiają;
११ते तुझ्या राज्याच्या गौरवाविषयी सांगतील, आणि तुझ्या सामर्थ्याविषयी बोलतील.
12 Aby oznajmili synom ludzkim mocy jego, a chwałę i ozdobę królestwa jego.
१२हे यासाठी की, त्यांनी देवाची पराक्रमी कृत्ये आणि त्याच्या राज्याचे वैभवयुक्त ऐश्वर्य ही मानवजातीस कळवावी.
13 Królestwo twoje jest królestwo wszystkich wieków, a panowanie twoje nie ustaje nad wszystkimi narodami.
१३तुझे राज्य युगानुयुग राहणारे राज्य आहे. आणि तुझा राज्याधिकार पिढ्यानपिढ्या टिकणारा आहे.
14 Trzyma Pan wszystkich upadających, a podnosi wszystkich obalonych.
१४पडत असलेल्या सर्वांना परमेश्वर आधार देतो, आणि वाकलेल्या सर्वांना तो उभे करतो.
15 Oczy wszystkich w tobie nadzieję mają, a ty im dajesz pokarm ich czasu swojego.
१५सर्वांचे डोळे तुझ्याकडे लागतात. आणि तू त्यांना योग्य वेळी त्यांचे अन्न देतोस.
16 Otwierasz rękę twoję, a nasycasz wszystko, co żyje, według upodobania twego.
१६तू आपला हात उघडून प्रत्येक जिवंत प्राण्याची इच्छा तृप्त करतो.
17 Sprawiedliwy jest Pan we wszystkich drogach swoich, i miłosierny we wszystkich sprawach swoich.
१७परमेश्वर आपल्या सर्व मार्गात न्यायी आहे; आणि तो आपल्या सर्व कृत्यात दयाळू आहे.
18 Bliski jest Pan wszystkim, którzy go wzywają, wszystkim, którzy go wzywają w prawdzie.
१८जे कोणी त्याचा धावा करतात, जे सत्यतेने त्याचा धावा करतात, त्या सर्वांना परमेश्वर जवळ आहे.
19 Wolę tych czyni, którzy się go boją, a wołanie ich wysłuchiwa, i ratuje ich.
१९तो त्याचे भय धरणाऱ्यांची इच्छा पुरवतो; तो त्यांची आरोळी ऐकून त्यांना वाचवतो.
20 Strzeże Pan wszystkich, którzy go miłują; ale wszystkich niepobożnych wytraci.
२०परमेश्वर आपल्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांचे रक्षण करतो. परंतु तो वाईटांचा नाश करतो.
21 Chwałę Pańską wysławiać będą usta moje; a błogosławić będzie wszelkie ciało imię święte jego na wieki wieków.
२१माझे मुख परमेश्वराची स्तुती करील. सर्व मानवजात त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद सदासर्वकाळ व कायम करो.