< Mateusza 3 >
1 W one dni przyszedł Jan Chrzciciel, każąc na puszczy w ziemi Judzkiej,
१बाप्तिस्मा करणारा योहान त्या दिवसात, यहूदीया प्रांताच्या अरण्यात येऊन अशी घोषणा करू लागला की,
2 A mówiąc: Pokutujcie; albowiem się przybliżyło królestwo niebieskie.
२“पश्चात्ताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे.”
3 Tenci bowiem jest on, o którym powiedziano przez Izajasza proroka, mówiącego: Głos wołającego na puszczy: Gotujcie drogę Pańską, proste czyńcie ścieżki jego.
३कारण यशया संदेष्ट्याच्याद्वारे त्याच्याचविषयी असे सांगितले होते की, “अरण्यात घोषणा करणार्याची वाणी झाली; ‘परमेश्वराचा मार्ग तयार करा,’ त्याच्या ‘वाटा सरळ करा.’”
4 A ten Jan miał odzienie z sierści wielbłądziej, i pas skórzany około biódr swoich, a pokarm jego był szarańcza i miód leśny.
४या योहानाचे वस्त्र उंटाच्या केसाचे होते, त्याच्या कमरेस कातड्याचा कमरबंद होता. त्याचा आहार टोळ व रानमध होता.
5 Tedy wychodziło do niego Jeruzalem i wszystka Judzka ziemia i wszystka kraina około Jordanu;
५तेव्हा यरूशलेम शहर, सर्व यहूदीया प्रांत व यार्देन नदीच्या आसपासचा संपुर्ण प्रदेश त्याच्याकडे आला.
6 I byli chrzczeni od niego w Jordanie, wyznawając grzechy swoje.
६ते आपआपली पापे पदरी घेत असता, त्यांना त्याच्या हाताने यार्देन नदीत बाप्तिस्मा देण्यात आला.
7 A gdy ujrzał wiele z Faryzeuszów i Saduceuszów przychodzących do chrztu swego, rzekł im: Rodzaju jaszczurczy! któż wam pokazał, żebyście uciekali przed przyszłym gniewem?
७परंतु परूशी व सदूकी यांच्यापैकी अनेक लोकांस आपणाकडे बाप्तिस्म्यासाठी येताना पाहून तो त्यांना म्हणाला, “अहो विषारी सापांच्या पिलांनो, येणाऱ्या क्रोधापासून पळावयास तुम्हास कोणी सावध केले?
8 Przynoścież tedy owoce godne pokuty;
८तर पश्चात्तापाला शोभेल असे योग्य ते फळ द्या;
9 A nie mniemajcie, że możecie mówić sami o sobie: Ojca mamy Abrahama; albowiemci powiadam wam, iż Bóg i z tych kamieni wzbudzić może dzieci Abrahamowi.
९आणि अब्राहाम तर ‘आमचा पिता आहे’, असे आपसात म्हणण्याचा विचार आपल्या मनात करू नका; कारण मी तुम्हास सांगतो, देव या दगडांपासून अब्राहामासाठी मुले निर्माण करण्यास समर्थ आहे.
10 A już i siekiera do korzenia drzew przyłożona jest; wszelkie tedy drzewo, które nie przynosi owocu dobrego, bywa wycięte, i w ogień wrzucone.
१०आणि झाडांच्या मुळांशी आताच कुऱ्हाड ठेवलेली आहे; जे प्रत्येक झाड चांगले फळ देत नाही ते तोडले जाईल व अग्नीत टाकले जाईल.
11 Jać was chrzczę wodą ku pokucie; ale ten, który idzie za mną, mocniejszy jest nad mię; któregom obuwia nosić nie jest godzien; ten was chrzcić będzie Duchem Świętym i ogniem.
११मी तुमचा बाप्तिस्मा पश्चात्तापासाठी पाण्याने करत आहे; परंतु माझ्यामागून येणारा आहे तो माझ्याहून अधिक सामर्थ्यवान आहे आणि त्याच्या चपला उचलून घेवून चालण्याची देखील माझी योग्यता नाही; तो तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने व अग्नीने करणार आहे.
12 Którego łopata jest w ręku jego, a wyczyści bojewisko swoje, i zgromadzi pszenicę swoję do gumna, ale plewy spali ogniem nieugaszonym.
१२त्याच्या हातात त्याचे सूप आहे, तो आपले खळे अगदी स्वच्छ करील व आपले गहू कोठारात साठवील; पण भूस न विझणाऱ्या अग्नीने जाळून टाकील.”
13 Tedy Jezus przyszedł od Galilei nad Jordan do Jana, aby był ochrzczony od niego;
१३यानंतर येशू गालील प्रांताहून यार्देन नदीवर योहानाच्या हातून बाप्तिस्मा घेण्याकरीता त्याच्याकडे आला;
14 Ale mu Jan bardzo zabraniał, mówiąc: Ja potrzebuję, abym był ochrzczony od ciebie, a ty idziesz do mnie?
१४परंतु योहान त्यास थांबवत म्हणाला, मला आपल्या हातून बाप्तिस्मा घेण्याची गरज आहे, असे असता आपण माझ्याकडे येता हे कसे?
15 A odpowiadając Jezus, rzekł do niego: Zaniechaj teraz; albowiem tak przystoi na nas, abyśmy wypełnili wszelką sprawiedliwość; tedy go zaniechał.
१५येशूने त्यास उत्तर दिले, “आता हे होऊ दे; कारण याप्रकारे सर्व न्यायीपण पूर्णपणे करणे हे आपणास योग्य आहे.” तेव्हा त्याने ते होऊ दिले.
16 A Jezus ochrzczony będąc, wnet wystąpił z wody, a oto się mu otworzyły niebiosa, i widział Ducha Bożego, zstępującego jako gołębicę, i przychodzącego na niego;
१६मग येशूंचा बाप्तिस्मा झाल्यावर, येशू पाण्यातून वर आले आणि पाहा, त्यांच्यासाठी आकाश उघडले; तेव्हा त्यांनी देवाच्या आत्म्याला कबुतरासारखे उतरताना व आपणावर येताना पाहीले,
17 A oto głos z niebios mówiący: Ten jest on Syn mój miły, w którym mi się upodobało.
१७आणि आकाशातून वाणी झाली की, “हा माझा प्रिय ‘पुत्र’ आहे, याच्याविषयी मी फार संतुष्ट आहे.”