< Jana 16 >

1 Tomci wam powiedział, abyście się nie gorszyli.
“तुम्ही अडखळवले जाऊ नये म्हणून मी तुम्हास या गोष्टी सांगून ठेवल्या आहेत.
2 Wyłączać was będą z bóżnic; owszem przyjdzie godzina, że wszelki, który was zabije, będzie mniemał, że Bogu posługę czyni.
ते तुम्हास सभास्थानाच्या बाहेर घालवतील; इतकेच काय पण तुमचा जीव घेणाऱ्या प्रत्येकाला आपण देवाला सेवा सादर करीत आहोत असे वाटेल, अशी वेळ येत आहे.
3 A toć wam uczynią, iż nie poznali Ojca ani mnie.
त्यांनी पित्याला आणि मलाही ओळखले नसल्यामुळे ते असे करतील.
4 Alemci wam to powiedział, abyście gdy przyjdzie ta godzina, wspomnieli na to, żem ja wam opowiedział; a tegom wam z początku nie powiadał, bom był z wami.
मी तुम्हास या गोष्टी अशासाठी सांगून ठेवल्या आहेत की, ती घडण्याची वेळ आली म्हणजे त्या मी तुम्हास सांगितल्या होत्या याची आठवण व्हावी. या गोष्टी मी तुम्हास, प्रारंभापासून, सांगितल्या नाहीत, कारण मी तुमच्याबरोबर होतो.
5 Lecz teraz idę do onego, który mię posłał, a żaden z was nie pyta mię: Dokąd idziesz?
पण ज्याने मला पाठवले त्याच्याकडे मी आता जातो आणि आपण कोठे जाता असे तुमच्यापैकी कोणीही मला विचारीत नाही.
6 Ale żem wam to powiedział, smutek napełnił serce wasze.
पण मी या गोष्टी तुमच्याशी बोलल्यामुळे तुमचे अंतःकरण दुःखाने भरले आहे.
7 Lecz ja wam prawdę mówię, wamci to pożyteczno, abym ja odszedł; bo jeźli ja nie odejdę, pocieszyciel on nie przyjdzie do was, a jeźli odejdę, poślę go do was.
तरीही मी तुम्हास खरे ते सांगतो, मी जातो हे तुमच्या फायद्याचे आहे, कारण मी गेलो नाही, तर कैवारी तुमच्याकडे येणारच नाही; मी गेलो तर मी त्यास तुमच्याकडे पाठवीन;
8 A on przyszedłszy, będzie karał świat z grzechu i z sprawiedliwości, i z sądu;
आणि तो आल्यावर तो जगाची पापाविषयी, नीतिमत्त्वाविषयी आणि न्यायाविषयी खात्री करील.
9 Z grzechu mówię, iż nie uwierzyli we mnie;
पापाविषयी; कारण ते माझ्यावर विश्वास ठेवत नाहीत.
10 Z sprawiedliwości zasię, iż do Ojca mego idę, a już mnie więcej nie ujrzycie;
१०नीतिमत्त्वाविषयी; कारण मी माझ्या पित्याकडे जातो आणि पुढे तुम्हास मी दिसणार नाही.
11 Z sądu, iż książę tego świata już jest osądzony.
११आणि न्यायाविषयी; कारण या जगाच्या शासकाचा न्याय झाला आहे.
12 Mamci wam jeszcze wiele mówić, ale teraz znieść nie możecie.
१२मला तुम्हास अजून पुष्कळ गोष्टी सांगावयाच्या आहेत पण तुम्ही आताच त्या सहन करू शकणार नाही.
13 Lecz gdy przyjdzie on Duch prawdy, wprowadzi was we wszelką prawdę; bo nie sam od siebie mówić będzie, ale cokolwiek usłyszy, mówić będzie, i przyszłe rzeczy wam opowie.
१३पण तो सत्याचा आत्मा येईल तेव्हा तो तुम्हास मार्ग दाखवून सर्व सत्यात नेईल, कारण तो आपल्या स्वतःचे सांगणार नाही; तर जे ऐकेल तेच सांगेल आणि होणार्‍या गोष्टी तुम्हास कळवील.
14 On mię uwielbi; bo z mego weźmie, a opowie wam.
१४तो माझे गौरव करील, कारण जे माझे आहे त्यातून घेऊन ते तो तुम्हास कळवील.
15 Wszystko, co ma Ojciec, moje jest; dlategom rzekł: Że z mego weźmie, a wam opowie.
१५जे काही स्वर्गीय पित्याचे आहे ते सर्व माझे आहे; म्हणून मी म्हणालो की, जे माझे आहे त्यांतून घेऊन ते तुम्हास कळवील.
16 Maluczko, a nie ujrzycie mię, i zasię maluczko, a ujrzycie mię; bo ja idę do Ojca.
१६थोड्या वेळाने, मी तुम्हास दिसणार नाही; आणि पुन्हा, थोड्या वेळाने तुम्ही मला पाहाल.”
17 Mówili tedy niektórzy z uczniów jego między sobą: Cóż to jest, co nam mówi: Maluczko, a nie ujrzycie mię, i zasię maluczko, a ujrzycie mię, a iż ja idę do Ojca?
१७तेव्हा त्याच्या शिष्यांपैकी काही एकमेकांस म्हणाले, “हा आम्हास, ‘थोड्या वेळाने मी तुम्हास दिसणार नाही आणि पुन्हा थोड्या वेळाने तुम्ही मला पाहाल,’ शिवाय, ‘कारण मी पित्याकडे जातो.’ असे जे म्हणतो त्याचा अर्थ काय?”
18 Przetoż mówili: Cóż to jest, co mówi: Maluczko? Nie wiemy, co mówi.
१८ते म्हणत होते, हा ‘थोड्या वेळाने’ असे जे म्हणतो याचा अर्थ काय? हा काय बोलतो ते आम्हास समजत नाही.
19 Tedy Jezus poznał, że go pytać chcieli, i rzekł im: O tem się pytacie między sobą, żem rzekł: Maluczko, a nie ujrzycie mię, i zasię maluczko, a ujrzycie mię.
१९आपणाला विचारावे असे त्यांच्या मनात आहे, हे ओळखून येशू त्यांना म्हणाला, “मी म्हणले की, थोड्या वेळाने, तुम्हास मी दिसणार नाही आणि पुन्हा, थोड्या वेळाने, तुम्ही मला पहाल, याविषयी एकमेकांना विचारीत आहात काय?
20 Zaprawdę, zaprawdę powiadam wam: Że wy będziecie płakać i narzekać, a świat się będzie weselił; wy smutni będziecie, ale smutek wasz obróci się wam w wesele.
२०मी तुम्हास खरे खरे सांगतो, तुम्ही रडाल आणि शोक कराल, तरी जग आनंद करील. तुम्हास दुःख होईल, पण तुमचे दुःखच तुमचा आनंद होईल.
21 Niewiasta gdy rodzi, smutek ma, bo przyszła godzina jej; lecz gdy porodzi dzieciątko, już nie pamięta uciśnienia, dla radości, iż się człowiek na świat narodził.
२१स्त्री प्रसूत होते तेव्हा तिला वेदनांचे दुःख होते, कारण तिची प्रसूतीची घटका आलेली असते; पण बालक जन्मल्यावर जगात एक मनुष्य जन्मल्याचा जो आनंद होतो त्यामुळे तिला त्या क्लेशाची आठवण होत नाही.
22 I wy teraz smutek macie; ale zasię ujrzę was, a będzie się radowało serce wasze, a radości waszej nikt nie odejmie od was.
२२आणि म्हणून, आता तुम्हास दुःख झाले आहे; तरी मी तुम्हास पुन्हा भेटेन आणि तुमचे अंतःकरण आनंदित होईल आणि तुमच्यापासून तुमचा आनंद कोणीही हिरावून घेणार नाही.
23 A dnia onego nie będziecie mnie o nic pytać. Zaprawdę, zaprawdę powiadam wam: O cokolwiek byście prosili Ojca w imieniu mojem, da wam.
२३आणि त्यादिवशी तुम्ही मला काही प्रश्न विचारणार नाही. मी तुम्हास खरे खरे सांगतो, तुम्ही पित्याजवळ काही मागाल तर तो ते तुम्हास माझ्या नावाने देईल.
24 Dotąd o niceście nie prosili w imieniu mojem; proścież, a weźmiecie, aby radość wasza była doskonała.
२४तुम्ही अजून माझ्या नावाने काही मागितले नाही; मागा म्हणजे तुम्हास मिळेल, यासाठी की, तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा.
25 Tomci wam przez przypowieść mówił; ale idzie godzina, gdy już dalej nie przez przypowieści mówić wam będę, ale jawnie o Ojcu moim oznajmię wam.
२५या गोष्टी मी तुमच्याशी दाखल्यात बोललो आहे; पण जेव्हा मी तुमच्याशी दाखल्यात बोलणार नाही पण मी तुम्हास उघडपणे पित्याविषयी सांगेन अशी वेळ येत आहे.
26 W on dzień w imieniu mojem prosić będziecie; a nie mówię wam: Iż ja będę Ojca prosił za wami;
२६त्यादिवशी तुम्ही माझ्या नावाने मागाल; आणि मी तुमच्यासाठी पित्याजवळ विनंती करीन असे मी तुम्हास म्हणत नाही.
27 Albowiem sam Ojciec miłuje was, żeście wy mię umiłowali i uwierzyliście, żem ja od Boga przyszedł.
२७कारण पिता स्वतः तुमच्यावर प्रीती करतो, कारण तुम्ही माझ्यावर प्रीती केली आहे आणि मी पित्यापासून आलो असा विश्वास धरला आहे.
28 Wyszedłem od Ojca, a przyszedłem na świat; i zasię opuszczam świat, a idę do Ojca.
२८मी पित्यापासून निघून जगात आलो आहे; पुन्हा, जग सोडून पित्याकडे जातो.”
29 Rzekli mu uczniowie jego: Oto teraz jawnie mówisz, a żadnej przypowieści nie powiadasz;
२९त्याचे शिष्य त्यास म्हणाले, “पाहा, आता आपण उघडपणे बोलत आहा, दाखला सांगत नाही.
30 Teraz wiemy, że wszystko wiesz, a nie potrzebujesz, aby cię kto pytał; przez to wierzymy, żeś od Boga wyszedł.
३०आता आम्हास कळले आहे की, आपल्याला सर्वकाही कळते आणि कोणी आपल्याला विचारावे याची आपणाला गरज नाही. यावरुन आपण देवापासून आला आहात असा आम्ही विश्वास धरतो.”
31 Odpowiedział im Jezus: Teraz wierzycie.
३१येशूने त्यांना उत्तर दिले, “तुम्ही आता विश्वास ठेवता काय?
32 Oto przyjdzie godzina; owszem już przyszła, że się rozproszycie każdy do swego, a mię samego zostawicie; lecz nie jestem sam, bo Ojciec jest ze mną.
३२पाहा, अशी वेळ येत आहे किंबहुना आली आहे की, तुमची दाणादाण होऊन तुम्ही सर्व आपआपल्या घरी जाल व मला एकटे सोडाल; पण मी एकटा नाही, कारण पिता माझ्याबरोबर आहे.
33 Tomci wam powiedział, abyście we mnie pokój mieli. Na świecie ucisk mieć będziecie; ale ufajcie, jam zwyciężył świat.
३३माझ्याठायी तुम्हास शांती मिळावी म्हणून मी या गोष्टी सांगितल्या आहेत. जगात तुम्हास क्लेश होतील; तरी धीर धरा, मी जगाच्या शक्तीला जिकले आहे.”

< Jana 16 >