< Jana 1 >
1 Na początku było Słowo, a ono Słowo było u Boga, a Bogiem było ono Słowo.
१प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता.
2 To było na początku u Boga.
२तोच प्रारंभी देवासह होता.
3 Wszystkie rzeczy przez nie się stały, a bez niego nic się nie stało, co się stało.
३सर्वकाही त्याच्याद्वारे झाले आणि जे काही झाले ते त्याने केल्यावांचून झाले नाही.
4 W niem był żywot, a żywot był oną światłością ludzką.
४त्याच्यामध्ये जीवन होते; आणि ते जीवन मनुष्यमात्राचा प्रकाश होते.
5 A ta światłość w ciemnościach świeci, ale ciemności jej nie ogarnęły.
५तो प्रकाश अंधारात प्रकाशतो; तरी अंधाराने त्यास स्वीकारले नाही.
6 Był człowiek posłany od Boga, któremu imię było Jan.
६देवाकडून पाठविलेला एक मनुष्य प्रकट झाला; त्याचे नाव योहान.
7 Ten przyszedł na świadectwo, aby świadczył o tej światłości, aby przezeń wszyscy uwierzyli.
७तो साक्षीकरीता, त्या प्रकाशाविषयी साक्ष द्यावी म्हणून आला; यासाठी की सर्वांनी त्याच्याद्वारे विश्वास ठेवावा.
8 Nie byłci on tą światłością, ale przyszedł, aby świadczył o tej światłości.
८योहान तो प्रकाश नव्हता, पण त्या प्रकाशाविषयी साक्ष द्यावी म्हणून आला.
9 Tenci był tą prawdziwą światłością, która oświeca każdego człowieka, przychodzącego na świat.
९जो खरा प्रकाश प्रत्येक मनुष्यास प्रकाशित करतो तो जगात येणार होता.
10 Na świecie był, a świat przezeń uczyniony jest; ale go świat nie poznał.
१०तो जगात होता व जग त्याच्याद्वारे निर्माण झाले, तरी जगाने त्यास ओळखले नाही.
11 Do swej własności przyszedł, ale go właśni jego nie przyjęli.
११जे त्याचे स्वतःचे त्यांच्याकडे तो आला, तरी त्याच्या स्वकीयांनी त्याचा स्वीकार केला नाही.
12 Lecz którzykolwiek go przyjęli, dał im tę moc, aby się stali synami Bożymi, to jest tym, którzy wierzą w imię jego.
१२पण जितक्यांनी त्याचा स्वीकार केला, म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवला, तितक्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला.
13 Którzy nie z krwi, ani z woli ciała, ani z woli męża, ale z Boga narodzeni są.
१३त्यांचा जन्म रक्त किंवा देहाची इच्छा किंवा मनुष्याची इच्छा यापासून झाला नाही, तर देवापासून झाला.
14 A to Słowo ciałem się stało, i mieszkało między nami, i widzieliśmy chwałę jego, chwałę jako jednorodzonego od Ojca, pełne łaski i prawdy.
१४शब्द देह झाला व त्याने आमच्यात वस्ती केली आणि आम्ही त्याचे गौरव पाहीले, ते पित्यापासून आलेल्या एकुलत्या एकाचे गौरव असावे असे कृपेने व सत्याने परिपूर्ण होते.
15 Jan świadczył o nim, i wołał, mówiąc: Tenci był, o którymem powiadał: Który po mnie przyszedłszy, uprzedził mię; bo pierwej był niż ja.
१५योहान त्याच्याविषयी साक्ष देतो आणि मोठ्याने म्हणतो, “ज्याच्याविषयी मी सांगितले की, माझ्यामागून जो येत आहे तो माझ्यासमोर झाला आहे, कारण तो माझ्या पूर्वी होता, तो हाच आहे.”
16 A z pełności jego myśmy wszyscy wzięli i łaskę za łaskę.
१६त्याच्या पूर्णतेतून आपल्या सर्वांना कृपेवर कृपा मिळाली आहे.
17 Albowiem zakon przez Mojżesza jest dany, a łaska i prawda przez Jezusa Chrystusa stała się.
१७कारण नियमशास्त्र मोशेच्याद्वारे देण्यात आले होते; कृपा व सत्य ही येशू ख्रिस्ताच्या द्वारे झाली.
18 Boga nikt nigdy nie widział: on jednorodzony syn, który jest w łonie ojcowskiem, ten nam opowiedział.
१८देवाला कोणीही कधीहि पाहिले नाही. जो देवाचा एकुलता एक पुत्र पित्याच्या उराशी असतो त्याने त्यास प्रकट केले आहे.
19 A toć jest świadectwo Janowe, gdy posłali Żydzi z Jeruzalemu kapłany i Lewity, aby go pytali: Ty ktoś jest?
१९आणि योहानाची साक्ष ही आहे; जेव्हा यहूदी अधिकाऱ्यांनी यरूशलेम शहराहून याजक व लेवी यांना त्यास विचारायला पाठवले की, “तू कोण आहे?”
20 I wyznał, a nie zaprzał, a wyznał, żem ja nie jest Chrystus.
२०त्याने उघडपणे कबूल केले, नाकारले नाही, “मी ख्रिस्त नाही,” असे त्याने कबूल केले.
21 I pytali go: Cóżeś tedy? Elijasześ ty? A on rzekł: Nie jestem. A oni: Prorokiemeś ty? i odpowiedział: Nie jestem.
२१तेव्हा त्यांनी त्यास विचारले, “तर मग आपण कोण आहात? एलीया आहात का?” तो म्हणाला, “मी नाही.” “आपण तो संदेष्टा आहात काय?” त्याने उत्तर दिले, “मी नाही.”
22 Rzekli mu tedy: Któżeś jest, żebyśmy odpowiedź dali tym, którzy nas posłali? Cóż wżdy powiadasz o sobie?
२२यावरुन ते त्यास म्हणाले, “आपण कोण आहा? म्हणजे ज्यांनी आम्हास पाठवले त्यांना आम्ही उत्तर देऊ. स्वतःविषयी आपले काय म्हणणे आहे?”
23 Rzekł: Jam jest głos wołającego na puszczy: Prostujcie drogę Pańską, jako powiedział Izajasz prorok.
२३तो म्हणाला, “यशया संदेष्ट्याने सांगितल्याप्रमाणे ‘परमेश्वराचा मार्ग नीट करा ज्याच्या वाट सरळ करा, असे अरण्यात ओरडणाऱ्याची वाणी’ मी आहे.”
24 A ci, którzy byli posłani, byli z Faryzeuszów.
२४आणि पाठविलेली माणसे परूश्यांपैकी होती.
25 I pytali go i rzekli mu: Czemuż tedy chrzcisz, jeźliżeś ty nie jest Chrystus, ani Elijasz, ani prorok?
२५आणि त्यांनी त्यास प्रश्न करून म्हटले, “आपण जर ख्रिस्त नाही किंवा एलीया नाही किंवा तो संदेष्टाही नाही, तर आपण बाप्तिस्मा का करता?”
26 Odpowiedział im Jan, mówiąc: Jać chrzczę wodą; ale w pośrodku was stoi, którego wy nie znacie.
२६योहानाने त्यांना उत्तर दिले, “मी पाण्याने बाप्तिस्मा करतो, पण तुम्ही ज्याला ओळखित नाही असा एकजण तुम्हामध्ये उभा आहे.
27 Tenci jest, który po mnie przyszedłszy, uprzedził mię, któremum ja nie jest godzien, żebym rozwiązał rzemyk obuwia jego.
२७तो माझ्यामागून येणारा आहे, त्याच्या वहाणांचा बंद सोडावयास मी योग्य नाही.”
28 To się stało w Betabarze za Jordanem, gdzie Jan chrzcił.
२८यार्देनेच्या पलीकडील बेथानीत योहान बाप्तिस्मा करीत होता तेथे या गोष्टी घडल्या.
29 A nazajutrz ujrzał Jan Jezusa idącego do siebie, i rzekł: Oto Baranek Boży, który gładzi grzech świata.
२९दुसर्या दिवशी येशूला आपल्याकडे येताना पाहून योहान म्हणाला, “हा पाहा, जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा!
30 Tenci jest, o którymem powiadał, że idzie za mną mąż, który mię uprzedził; bo pierwej był niż ja.
३०ज्याच्याविषयी मी म्हणालो होतो की, ‘माझ्यामागून एकजण येत आहे तो माझ्या पुढचा झाला आहे कारण तो माझ्या पूर्वी होता,’ तो हाच आहे.
31 A jam go nie znał; ale aby był objawiony Izraelowi, dlategom ja przyszedł, chrzcząc wodą.
३१मी त्यास ओळखत नव्हतो; तरी त्याने इस्राएलात प्रकट व्हावे म्हणून मी पाण्याने बाप्तिस्मा करीत आलो आहे.”
32 I świadczył Jan, mówiąc: Widziałem Ducha zstępującego jako gołębicę z nieba, i został na nim.
३२योहानाने अशी साक्ष दिली की, “आत्मा कबुतरासारखा आकाशातून उतरत असतांना आणि त्याच्यावर स्थिर राहिलेला मी पाहिला.
33 A jam go nie znał; ale który mię posłał chrzcić wodą, ten mi rzekł: Na kogo byś ujrzał Ducha zstępującego i zostającego na nim, tenci jest, który chrzci Duchem Świętym.
३३मी तर त्यास ओळखत नव्हतो, तरी मी पाण्याने बाप्तिस्मा करावा म्हणून ज्याने मला पाठवले त्याने मला सांगितले की, ‘तू ज्या कोणावर आत्मा उतरत असतांना आणि स्थिर राहिलेला पाहशील तोच पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा करणारा आहे.’
34 A jam widział i świadczył, że ten jest Syn Boży.
३४मी स्वतः पाहिले आहे आणि साक्ष दिली आहे की, हा देवाचा पुत्र आहे.”
35 Nazajutrz zasię stał Jan i dwaj z uczniów jego.
३५त्यानंतर दुसर्या दिवशी योहान व त्याच्या शिष्यांतील दोघांसह उभा असता;
36 A ujrzawszy Jezusa chodzącego, rzekł: Oto Baranek Boży.
३६येशूला जातांना न्याहाळून पाहून म्हणाला, “हा पाहा, देवाचा कोकरा!”
37 I słyszeli go oni dwaj uczniowie mówiącego, i szli za Jezusem.
३७त्याचे हे म्हणणे त्या दोघा शिष्यांनी ऐकले आणि ते येशूच्या मागोमाग निघाले.
38 A obróciwszy się Jezus i ujrzawszy je za sobą idące, rzekł do nich: Czego szukacie? A oni mu rzekli: Rabbi! (co się wykłada: Mistrzu), gdzie mieszkasz?
३८तेव्हा येशू वळून त्यांना आपल्यामागे येताना पाहून म्हणाला, “तुम्ही काय शोधीता?” ते त्यास म्हणाले, “रब्बी, (म्हणजे गुरूजी) आपण कोठे राहता?”
39 Rzekł im: Pójdźcie, a oglądajcie. I szli i widzieli, gdzie mieszkał, a zostali przy nim onego dnia; bo było około dziesiątej godziny.
३९तो त्यांना म्हणाला, “या म्हणजे पाहाल.” मग त्यांनी जाऊन तो कोठे राहतो ते बघितले आणि ते त्यादिवशी त्याच्या येथे राहिले; तेव्हा तो सुमारे चार वाजले होते.
40 A był Andrzej, brat Szymona Piotra, jeden z onych dwóch, którzy to słyszeli od Jana, i szli byli za nim.
४०योहानाचे बोलणे ऐकून त्याच्यामागे जे दोघे जण गेले, त्यांच्यापैकी एक शिमोन पेत्राचा भाऊ अंद्रिया हा होता.
41 Ten najpierw znalazł Szymona, brata swego własnego, i rzekł mu: Znaleźliśmy Mesyjasza, co się wykłada Chrystus.
४१त्यास त्याचा सख्खा भाऊ शिमोन पहिल्याने भेटला व त्यास म्हणाला, “आम्हास मसीहा (म्हणजे ख्रिस्त) सापडला आहे.”
42 I przywiódł go do Jezusa. A wejrzawszy nań Jezus, rzekł: Tyś jest Szymon, syn Jonasza; ty będziesz nazwany Kiefas, co się wykłada Piotr.
४२त्याने त्यास येशूकडे आणले; येशूने त्याच्याकडे न्याहाळून पाहून म्हटले, “तू योहानाचा पुत्र शिमोन आहेस. तुला केफा (म्हणजे पेत्र किंवा खडक) म्हणतील.”
43 A nazajutrz chciał Jezus wynijść do Galilei, i znalazł Filipa i rzekł mu: Pójdź za mną.
४३दुसर्या दिवशी त्याने गालील प्रांतात जाण्याचा बेत केला; आणि तेव्हा फिलिप्प त्यास भेटला; येशूने त्यास म्हटले, “माझ्यामागे ये.”
44 A Filip był z Betsaidy, z miasta Andrzejowego i Piotrowego.
४४आता, फिलिप्प बेथसैदाचा, म्हणजे अंद्रिया व पेत्र यांच्या नगराचा होता.
45 Filip znalazł Natanaela i rzekł mu: Znaleźliśmy onego, o którym pisał Mojżesz w zakonie i prorocy, Jezusa, syna Józefowego, z Nazaretu.
४५फिलिप्पाला नथनेल भेटल्यावर तो त्यास म्हणाला, “ज्याच्याविषयी मोशेने नियमशास्त्रात लिहिले व तसेच संदेष्ट्यांनी लिहिले, तो म्हणजे योसेफाचा पुत्र येशू नासरेथकर आम्हास सापडला आहे.”
46 I rzekł mu Natanael: Możesz z Nazaretu być co dobrego? Rzekł mu Filip: Pójdź, a oglądaj!
४६नथनेल त्यास म्हणाला, “नासरेथमधून काहीतरी उत्तम निघू शकेल काय?” फिलीप्पाने त्यास म्हणाला, “येऊन पाहा.”
47 Ujrzawszy tedy Jezus Natanaela idącego do siebie, rzekł o nim: Oto prawdziwie Izraelczyk, w którym nie masz zdrady.
४७नथनेल आपल्याकडे येत आहे हे येशूने बघितले व तो म्हणाला, “पाहा, हा खरा इस्राएली आहे, याच्यात कपट नाही.”
48 Rzekł mu Natanael: Skądże mię znasz? Odpowiedział Jezus i rzekł mu: Pierwej niż cię Filip zawołał, gdyś był pod figowem drzewem, widziałem cię.
४८नथनेल त्यास म्हणाला, “आपणांला माझी ओळख कोठली?” येशूने त्यास उत्तर दिले, “तुला फिल्लीपाने बोलावले त्यापुर्वी तू अंजिराच्या झाडाखाली होतास तेव्हाच मी तुला बघितले.”
49 Odpowiedział Natanael i rzekł mu: Mistrzu! tyś jest on Syn Boży, tyś jest on król Izraelski.
४९नथनेलाने उत्तर दिले, “रब्बी, आपण देवाचे पुत्र आहा, आपण इस्राएलाचे राजे आहात.”
50 Odpowiedział Jezus i rzekł mu: Iżem ci powiedział: Widziałem cię pod figowem drzewem, wierzysz; większe rzeczy nad te ujrzysz.
५०येशूने त्यास उत्तर देऊन म्हटले, “मी तुला अंजिराच्या झाडाखाली पाहिले असे तुला सांगितले म्हणून तू विश्वास ठेवतोस काय? तू याच्यापेक्षा मोठ्या गोष्टी पाहशील.”
51 I rzekł mu: Zaprawdę, zaprawdę powiadam wam: Od tego czasu ujrzycie niebo otworzone i Anioły Boże wstępujące i zstępujące na Syna człowieczego.
५१आणखी तो त्यास म्हणाला, “मी तुम्हास खरे खरे सांगतो, तुम्ही यापुढे आकाश उघडलेले आणि देवदूतांना चढताना व मनुष्याच्या पुत्रावर उतरत असताना पहाल.”