< Jeremiasza 30 >

1 Słowo, które się stało do Jeremijasza od Pana, mówiąc:
यिर्मयाला परमेश्वरापासून जे वचन आले ते हे आहे आणि म्हणाले,
2 Tak powiada Pan, Bóg Izraelski, mówiąc: Napisz sobie wszystkie słowa, którem mówił do ciebie, na księgach.
परमेश्वर, इस्राएलाचा देव, जे काही बोलला, तो म्हणतो, “मी तुझ्याशी बोललेले सर्व वचने आपणासाठी पुस्तकात लिहून ठेव.
3 Albowiem oto dni idą, mówi Pan, a przywrócę więźniów ludu swego Izraelskiego i Judzkiego, mówi Pan, i przyprowadzę ich do ziemi, którąm był dał ojcom ich, i posiędą ją.
कारण पाहा, परमेश्वराचे हे निवेदन आहे, असे दिवस येतील की, ज्यात मी आपल्या लोकांचे इस्राएल आणि यहूदा यांचे भविष्य प्रस्थापित करील. कारण मी त्यांच्या पूर्वजांना दिलेल्या देशात त्यांना परत आणीन आणि ते त्याचा ताबा घेतील.” असे मी परमेश्वर म्हणत आहे.
4 A teć są słowa, które mówił Pan o Izraelu i o Judzie;
इस्राएलाविषयी व यहूदाविषयी ही परमेश्वराने जाहीर केलेली वचने आहेत.
5 Tak zaiste mówi Pan: Słyszeliśmy głos strachu i lękania, i że niemasz pokoju.
कारण परमेश्वर हे म्हणाला, “आम्ही दहशतीने थरथर कापणाऱ्याची वाणी ऐकली आहे शांतीची नाही.
6 Pytajcież się teraz, a obaczcie, jeźli rodzi mężczyzna; przeczże tedy widzę, że każdy mąż rękami swemi trzyma się za biodra swe jako rodząca, i że się obróciły wszystkich oblicza w bladość?
विचारा व पाहा जर पुरुष बालकाला जन्म देईल. प्रत्येक तरुण पुरुषाचा हात प्रसवणाऱ्या स्त्रीप्रमाणे त्याच्या कमरेवर दिला आहे हे मी का पाहत आहे? त्या सर्वांची चेहरे फिक्के का पडली आहेत?
7 Biada! bo wielki jest ten dzień, tak, że mu nie było podobnego; ale jakiżkolwiek jest czas utrapienia Jakóbowego, przecie z niego wybawiony będzie.
हायहाय! तो दिवस महान आहे, त्याच्यासारखा कोणताही नाही. तो याकोबासाठी चिंतेचा समय आहे, पण त्यातून त्यांचे रक्षण होईल.
8 Stanie się bowiem dnia onego, mówi Pan zastępów, iż skruszę jarzmo jego z szyi twojej, a związki twoje potargam, i nie będą go więcej cudzoziemcy w niewolę podbijać;
सेनाधीश परमेश्वर म्हणतो त्या दिवशी असे होईल की, मी तुमच्या मानेवरील जोखड मोडीन आणि तुमची बंधने तोडीन, यापुढे परके तुला गुलाम करणार नाहीत.
9 Ale służyć będą Panu, Bogu swemu, i Dawidowi, królowi swemu, którego im wzbudzę.
पण परमेश्वर त्यांचा देव याची आणि दावीद त्यांचा राजा ज्याला मी त्यांच्यावर स्थापीन त्याची ते सेवा करतील.
10 Przetoż nie bój się ty, sługo mój Jakóbie! mówi Pan, ani się strachaj o Izraelu! bo oto Ja cię wybawię z daleka, i nasienie twoje z ziemi pojmania ich. I wróci się Jakób, aby odpoczywał i pokój miał, a nie będzie, ktoby go ustraszył;
१०परमेश्वर असे म्हणतो, म्हणून तू याकोबा, माझ्या सेवका, घाबरु नकोस, आणि इस्राएला, हिंमत खचू नको. कारण पाहा, मी तुला दूर स्थानातून परत आणीन आणि तुझ्या वंशजांना बंदिवासाच्या देशातून तारीन. याकोब पुन्हा येईल आणि शांती असेल; तो सुरक्षित राहील आणि तेथे कोणी दहशत घालणार नाही.
11 Bom Ja z tobą, mówi Pan, abym cię wybawił. Ponieważ uczynię koniec wszystkim narodom, między które cię rozproszę, wszakże tobie nie uczynię końca, ale cię miernie karać będę, a cale cię bez karania nie zaniecham.
११कारण परमेश्वर असे म्हणतो, मी तुला तारायला तुम्हाबरोबर आहे. मग मी ज्या राष्ट्रातून तुझी पांगापांग केली आहे. त्या सर्वांचा मी पूर्ण शेवट करीन, पण मी खात्रीने तुझा शेवट करणार नाही, तरी मी तुला न्यायाने शासन करीन आणि खचीत तुला शिक्षा केल्यावाचून सोडणार नाही.
12 Tak zaiste mówi Pan: Ciężkie bardzo będzie skruszenie twoje, nader bolesna rana twoja.
१२कारण परमेश्वर असे म्हणतो, तुझी जखम बरी न होऊ शकणारी आहे; तुझा घाय संसर्गजन्य आहे.
13 Nie będzie, ktoby sądził sprawę twoję ku uleczeniu; lekarstwa ku uleczeniu mieć nie będziesz.
१३तुझा वाद चालवणारा कोणीही नाही; तुझा घाय बरा करण्यासाठी कोणताही उपाय नाही.
14 Wszyscy miłośnicy twoi zapomną cię, ani cię nawiedzą, gdy cię zranię raną nieprzyjacielską, i okrutnem karaniem, dla wielkości nieprawości twojej i niezliczonych grzechów twoich.
१४तुझे सर्व प्रियकर तुला विसरले आहेत. ते तुला शोधत नाहीत, कारण तुझ्या पुष्कळ अन्यायामुळे आणि अगणित पापांमुळे, मी तुला शत्रूप्रमाणे जखम करून आणि क्रूर धन्याप्रमाणे शिक्षा करून, मी तुला घायाळ केले आहे.
15 Przeczże wołasz nad skruszeniem swem i ciężką boleścią swoją? Dla wielkości nieprawości twojej, i dla niezliczonych grzechów twoich uczyniłem ci to.
१५तुझ्या जखमेमुळे तू मदतीसाठी का ओरडतो? तुझ्या यातना बऱ्या न होऊ शकणाऱ्या आहेत. कारण तुझ्या पुष्कळ अन्यायामुळे, तुझ्या असंख्य पापामुळे मी तुला या गोष्टी केल्या आहेत.
16 A wszakże wszyscy, którzy cię pożerają, pożarci będą; a wszyscy, którzy cię ciemiężą, wszyscy, mówię, w niewolę pójdą; a którzy cię plundrują, splundrowani będą; a wszystkich, którzy cię łupią, podam na łup.
१६म्हणून जे प्रत्येकजण तुला खाऊन टाकतील ते खाऊन टाकले जातील, आणि तुझे सर्व शत्रू बंदिवासात जातील. कारण ज्या कोणी तुला लुटले त्यांची लूट होईल आणि तुला लुटणाऱ्या सर्वांना मी लुटीस देईन.
17 Tedyć zdrowie przywrócę, i od ran twoich uleczę cię, mówi Pan, przeto, że wygnaną nazwali cię (mówiąc: ) Tać jest Syon, niemasz nikogo, ktoby ją nawiedził.
१७कारण मी तुला आरोग्य देईन; मी तुमच्या जखमा बऱ्या करीन. हे परमेश्वराचे निवेदन आहे. मी हे करीन कारण की, त्यांनी तुला टाकून दिलेले म्हटले आहे. कोणीही या सियोनेची काळजी घेत नाही.
18 Tak mówi Pan: Oto Ja przywrócę pojmanych z namiotów Jakóbowych, a nad przybytkami jego zmiłuję się; i będzie zaś zbudowane miasto na pagórku swoim, a pałac według porządku swego wystawiony będzie.
१८परमेश्वर असे म्हणतो, पाहा, मी याकोबाच्या डेऱ्याचे भविष्य परत फिरवीन आणि त्याच्या घराण्यावर दया करीन. मग नगर नाशाच्या ढिगाऱ्यावर बांधण्यात येईल आणि ज्याठिकाणी किल्ले होते त्याच जागी पुन्हा होतील.
19 I wynijdzie od nich dziękczynienie, i głos weselących się; bo ich rozmnożę, a nie ubędzie ich, i uwielbię ich, a nie będą poniżeni.
१९नंतर त्यांच्यामधून उपकारस्तुती आणि आनंदोत्सव करणाऱ्यांचा आवाज निघेल, कारण मी त्यांची वाढ करीन आणि ती कमी होणार नाही; मी त्यांचे गौरव करीन म्हणजे ते हलके होणार नाहीत.
20 I będą synowie jego, jako i przedtem, a zgromadzenie jego przedemną utwierdzone będzie; ale nawiedzę wszystkich, którzy ich trapią.
२०मग त्यांचे लोक पूर्वीच्या सारखे होतील आणि त्यांची मंडळी माझ्यासमोर प्रस्थापित होईल जेव्हा त्यांच्या सर्व लोकांना जे कोणी त्यांना आता पीडा देतील त्यांना मी शिक्षा करीन.
21 I powstanie z niego najzacniejszy jego, a panujący nad nim z pośrodku jego wynijdzie, któremu się rozkażę przybliżyć, aby przystąpił przed mię; bo któż jest ten, coby ręczył za się, że przystąpi przed mię? mówi Pan.
२१त्यांचा पुढारी त्यांच्यातलाच होईल. तो त्यांच्यामधूनच निघेल जेव्हा मी त्यास जवळ येऊ देईन आणि जेव्हा तो माझ्याजवळ येईल. कारण जो माझ्याजवळ यायला कोणाची हिंमत आहे? हे परमेश्वराचे निवेदन आहे.
22 I będziecie ludem moim, a Ja będę Bogiem waszym.
२२मग तुम्ही लोक माझे व्हाल आणि मी तुमचा देव होईन.”
23 Oto wicher Pański z popędliwością wynijdzie, wicher trwający nad głową niezbożników zostanie.
२३पाहा, परमेश्वराचे क्रोधरूप तुफान सुटले आहे. ते तुफान निरंतर आहे. ते धुव्वा उडविणारी वावटळ दुष्ट लोकांच्या डोक्यावर आदळेल.
24 Nie odwróci się zapalczywość gniewu Pańskiego, póki nie uczyni tego, a póki nie wykona umysłu serca swego; w ostatnie dni zrozumiecie to.
२४परमेश्वर आपल्या हृदयाचे उद्देश पूर्ण करून सिद्धीस नेईपर्यंत त्याचा संतप्त क्रोध परत जाणार नाही. अंतीम दिवसात, तुम्हास ते समजतील.

< Jeremiasza 30 >