< Ezechiela 47 >
1 Potem mię przywiódł ku drzwiom domu, a oto wody wychodziły z pod progu domu na wschód słońca; bo przednia strona domu była na wschód słońca, a wody one schodziły spodkiem po prawej stronie domu po stronie południowej ołtarza.
१मग त्या मनुष्याने मला पुन्हा मंदिराच्या प्रवेशदाराकडे नेले आणि पाहा! मंदिराच्या उंबरठ्याखालून पाणी पूर्वेकडे वाहत होते, कारण मंदिराचे तोंड पूर्वेला होते. आणि मंदिराच्या उजव्या बाजूने वेदीच्या दक्षिणेस पाणी वाहात होते.
2 Stamtąd mię wywiódł drogą bramy północnej, i obwiódł mię drogą zewnętrzną do bramy zewnętrznej, drogą, która patrzy na wschód słońca; a oto wody wynikły po prawej stronie.
२म्हणून त्याने मला उत्तरेच्या दाराने बाहेर आणले आणि बाहेरच्या रस्त्याने सभोवार फिरवून पूर्वेकडील बाहेरच्या दाराकडे नेले. तो पाहा, पाणी दाराच्या दक्षिणेकडून वाहत होते.
3 A gdy wychodził on mąż na wschód słońca, w którego ręku była miara, i wymierzył tysiąc łokci, i przewiódł mię przez wodę, przez wodę aż do kostek;
३जसा तो मनुष्य हातात मापनसूत्र घेऊन पूर्वेला जात होता. त्याने एक हजार अंतर मोजून मला त्या पाण्यातून चालायला सांगितले. तो पाणी घोट्यापर्यंत होते.
4 Potem wymierzył drugi tysiąc, a przewiódł mię przez wodę, przez wodę aż do kolan; i zaś wymierzył trzeci tysiąc, i przewiódł mię przez wodę aż do biódr.
४मग त्याने आणखी एक हजार हाताचे अंतर मोजून पुन्हा मला पाण्यातून तेथपर्यंत चालण्यास सांगितले, तो तेथे पाणी गुडघ्यापर्यंत होते. आणि आणखी हजार हात अंतर मोजून मला पाण्यातून चालावयास लावले तो तेथे पाणी कमरेपर्यंत होते.
5 A gdy zaś wymierzył tysiąc, był potok, któregom nie mógł przebrnąć; bo były wezbrały wody, wody, które trzeba było przepłynąć, potok, któregom nie mógł przebrnąć.
५त्यानंतर त्याने आणखी हजार हात अंतर मोजले तो त्या नदीतून मला चालता येईना, कारण पाणी फार झाले. मला त्यातून पोहून जाता आले असते; उतरून पार जाता आले नसते. इतकी खोल ती होती.
6 Tedy rzekł do mnie: Widziałżeś, synu człowieczy? I wywiódł mię, i obrócił mię na brzeg onego potoku.
६तो मनुष्य मला म्हणाला, “मानवाच्या मुला, तू हे पाहिले ना?” आणि त्याने मला नदीच्या काठाने परत आणले.
7 A gdym się obrócił, oto na brzegu onego potoku było drzewo bardzo wielkie po obu stronach;
७जसा मी परत आलो तेव्हा पाहा, नदीच्या तीरांवर एका बाजूस व दुसऱ्या बाजूसही पुष्कळ झाडी असलेली पाहिली.
8 I rzekł do mnie: Te wody wychodzą od Galilei pierwszej, a schodzą po równinie, i wchodzą w morze; a gdy do morza wpadną, uzdrowione bywają wody.
८तो मनुष्य मला म्हणाला, “हे पाणी पूर्वप्रदेशाकडे वाहत जाते. आणि तेथून अराबात उतरून क्षारसमुद्राला मिळते, ही नदी समुद्रास मिळून त्याचे पाणी ताजे करते.
9 I stanie się, że każda dusza żyjąca, która się płaza, gdziekolwiek przyjdą potoki, żyć będzie, i będzie ryb bardzo wiele, przeto, że gdy przyjdą tam one wody, oczerstwieją, i żyć będą wszędy, kędykolwiek przyjdzie ten potok.
९मग असे होईल की, जेथे ही महानदी जाईल तेथे तेथे जो प्रत्येक जिवंत प्राणी राहत असेल तो जगेल, कारण तेथील पाणी क्षारसमुद्रास मिळते त्यामुळे ते ताजे होते आणि तेथे विपुल मासे मिळतात, हे पाणी जेथे जाईल तेथे सर्वकाही निरोगी होईल; जेथे कोठे ही नदी जाते प्रत्येकगोष्ट जिवंत राहते.
10 Stanie się i to, że staną podle niego rybitwi od Engaddy aż do zdroju Eglaim, tam będą rozciągać sieci; ryb będzie bardzo wiele rozmaitego rodzaju, jako ryb morza wielkiego.
१०तिच्या तीरी कोळी उभे राहून एन-गेदीपासून एन-इग्लाइमपर्यंत जाळी टाकतील. मोठ्या समुद्रातल्या माशांसारखे त्या क्षारसमुद्रात अनेक प्रकारांप्रमाणे विपुल मासे होतील.
11 Błota jego i kałuże jego nie będą uzdrowine, ale soli oddane będą.
११पण दलदल आणि पाणथळीच्या जागा निर्दोष होणार नाहीत. त्या मिठासारख्या होतील.
12 A nad potokiem wyrośnie na brzegu jego po obu stronach wszelkie drzewo owoce przynoszące, którego liść nie opada, ani owoc jego ustaje, w miesiącach swoich przynosi pierwociny; bo wody jego z świątnicy wychodzą, przetoż owoc jego jest na pokarm, a liście jego na lekarstwo.
१२नदीच्या दोन्ही काठावर सर्व प्रकाराची खाण्याजोगी फळे देणारे सर्व प्रकारची झाडे वाढतीत. त्यांची पाने कधीच सुकून जाणार नाहीत. त्याचे फळ कधीच थांबणार नाही. ती प्रत्येक महिन्याला फळ देईल, कारण त्या नदीचे पाणी पवित्रस्थानातून निघाले आहे. त्यांची फळे खाण्यासाठी व त्यातील पाने औषधी होतील.”
13 Tak mówi panujący Pan: Tać jest granica, w której sobie dziedzicznie przywłaszczycie ziemię według dwunastu pokoleń Izraelskich; Józefowi się dostaną dwa sznury.
१३प्रभू परमेश्वर असे म्हणतो, तुम्ही इस्राएलाच्या बारा वंशासाठी जमिनीची विभागणी याप्रमाणे करून द्याल, तेव्हा योसेफाला दोन भाग मिळतील.
14 Dziedzicznie, mówię, posiądziecie ją, równie jeden jako drugi, o którą podniosłem rękę moję, że ją dam ojcom waszym; i przypadnie wam ta ziemia w dziedzictwo.
१४आणि तुम्ही, प्रत्येक मनुष्य आणि तुमच्यातील बंधु यांचे ते वतन होईल. ज्या देशाविषयी मी तुमच्या पुर्वजांना द्यावा म्हणून आपला हात उंच करून शपथ घेतली त्याच्या सारखी वाटणी करून घ्याल, त्याचप्रमाणे तो तुमचे वतन होईल.
15 Tać jest tedy granica tej ziemi ku stronie północnej, od morza wielkiego, drogą do Hetlonu, kędy wchodzą do Sedad.
१५जमिनीच्या सीमा अशा असतील. उत्तरेला मोठ्या समुद्रापासून, हेथलोनच्या वाटेने हमाथकडे सदादाच्या सीमेपर्यंत,
16 Emat, Berota, Sybraim, które są między granicą Damaszku i między granicą Emat, wsi pośrednie, które są przy granicy Hawran.
१६हमाथ, बेरोथा, जे दिमिष्क व हमाथाच्या सीमेवरील सिब्राईम, व हौरानच्या सीमेवरील मध्यहासेर.
17 A tak będzie granica od morza Chatzar Enon, będzie granica Damaszek, a północna strona na północy, i granica Emat; a toć jest strona północna.
१७समुद्रापासून ही सीमा म्हणजे दिमिष्काच्या सरहद्दीवरील गांव हसर-एनोन पर्यंत असेल. उत्तरेस हमाथ ही सीमा. ही बाजू उत्तर झाली.
18 A strona wschodnia między Hawran i między Damaszkiem i między Galaad i między ziemią Izraelską przy Jordanie; od tej granicy przy morzu wschodniem mierzyć będziecie; a toć jest strona wschodnia.
१८पूर्वेला सीमारेषा हौरान व दिमिष्क, गिलाद व इस्राएल देश याच्यामधून गेलेली यार्देन नदी.
19 A strona południowa na południe od Tamar aż do wód poswarków w Kades, od potoku aż do morza wielkiego; a toć jest strona południwoa na południe.
१९मग दक्षिण बाजू, तामारपासून पार मरीबोथ कादेशाच्या पाण्यापर्यंत व तेथून मिसरच्या देशाच्या ओढ्याने पुढे मोठ्यासमुद्रापर्यंत, ही दक्षिण बाजू झाली.
20 Strona zaś zachodnia morze wielkie od granicy aż przeciwko kędy się wchodzi do Emat, tać jest strona zachodnia.
२०पश्चिमबाजू दक्षिण सीमेपासून हमाथाच्या प्रवेशाच्या समोरच्या प्रदेशापर्यंत मोठा समुद्र होईल; ही पश्चिम बाजू आहे.
21 A tak rozmierzycie sobie tę ziemię, według pokoleń Izraelskich.
२१“याप्रकारे तुम्ही हा देश आपसांत इस्राएलाच्या वंशांमध्ये वाटून द्या.
22 A gdy ją rozmierzycie, będzie wam w dziedzictwo, i przychodniom, którzyby mieszkali między wami, którzyby spłodzili synów między wami, bo wam będą jako tu zrodzeni między synami Izraelskimi; z wami dziedziczyć będą między pokoleniami Izraelskiemi.
२२तुम्ही तुमच्यात आणि तुमच्यामध्ये राहत असलेल्या परक्यांमध्ये अथवा ज्या परक्यांची मुले तुमच्यात राहत आहेत त्यांच्यात वाटाल. हे परके इस्राएलमध्ये जन्मलेल्या लोकांप्रमाणेच इस्राएलचे रहिवासी आहेत. त्यामुळे इस्राएलाच्या वंशांना दिलेल्या जमिनीतील काही भाग तुम्ही या लोकांस द्यावा.
23 A w któremkolwiek pokoleniu przychodzień przychodniem będzie, tam mu dacie dziedzictwo jego, mówi panujący Pan.
२३हे परके जेथे राहतात, तेथे राहणाऱ्या इस्राएल लोकांनी त्यांना काही जमीन दिलीच पाहिजे.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला.