< Ezechiela 30 >
1 I stało się słowo Pańskie do mnie mówiąc:
१परमेश्वराचे वचन मजकडे आले आणि म्हणाले,
2 Synu człowieczy! prorokuj a mów: Tak mówi panujący Pan; kwilcie mówiąc: Ach niestetyż na ten dzień!
२“मानवाच्या मुला, भविष्य सांग आणि म्हण. प्रभू परमेश्वर असे म्हणतो, विलाप करा, मोठ्या शोकाचे दिवस येत आहे!
3 Bo bliski jest dzień, bliski jest mówię dzień Pański; ten będzie dzień chmury, i czas narodów.
३तो दिवस नजीक आहे. परमेश्वराचा दिवस जवळ आहे. तो ढगाळ दिवस असेल. ती राष्ट्रांसाठी न्यायाची वेळ असेल.
4 I przyjdzie miecz na Egipt, a będzie wielka trwoga w ziemi Murzyńskiej, gdy polegną pobici w Egipcie, a zabiorą dostatki jego, i podwrócone będą grunty jego.
४मग मिसराविरूद्ध तलवार येईल आणि जेव्हा मारलेले लोक मिसरात पडतील तेव्हा कूशात वेदना होतील, ते तिची संपत्ती घेऊन जातील आणि तिचे पाये नष्ट होतील.
5 Murzyni i Putejczycy, i Ludczycy, i wszystko pospólstwo, i Kubejczycy, i obywatele innych ziem, w przymierzu będących, z nimi od miecza upadną.
५कूशी, पूटी, लूदी आणि सर्व परदेशी, याजबरोबर करार केलेले लोक त्यासह तलवारीने पडतील.
6 Tak mówi Pan, że upadną, którzy podpierają Egipt, i strącona będzie pycha mocy jego; od wieży Sewene od miecza upadną w niej, mówi panujący Pan.
६परमेश्वर असे म्हणतो, मग जो कोणी एक मिसराला मदत करील तो पडेल आणि तिच्या सामर्थ्याचा गर्व खाली उतरेल. मिग्दोलापासून सवेनेपर्यंतचे त्याचे सैनिक तलवारीने पडतील. असे प्रभू परमेश्वर म्हणतो.
7 I będą spustoszeni nad inne ziemie spustoszone, a miasta ich nad inne miasta poburzone będą;
७ते जे देश ओसाड झाले आहेत त्यांच्यामध्ये ते घृणास्पद होतील आणि त्यांची नगरे नाश झालेल्या नगरात असतील.
8 I dowiedzą się, żem Ja Pan, gdy zapalę ogień w Egipcie, i będą potarci wszyscy pomocnicy jego.
८जेव्हा मी मिसरामध्ये आग लावीन आणि तिच्या सर्व सहाय्यकांचा नाश करीन. तेव्हा त्यांना समजेल की मी परमेश्वर आहे.
9 Dnia onego wynijdą posłowie od oblicza mego w okrętach na postrach ziemi Murzyńskiej bezpiecznej; i będzie wielka trwoga między nimi, jaka była w dzień porażki Egipskiej; bo oto pewnie przychodzi.
९त्या दिवशी, सुरक्षित कूशी लोकांस दहशत बसवायला माझ्यापासून दूत जहाजात बसून निघून जातील; आणि त्या दिवशी तेथे मिसरांच्यामध्ये न चुकणाऱ्या वेदना त्यांच्यावर येतील. कारण पाहा! ती येत आहे!
10 Tak mówi panujący Pan: Uczynię zaiste koniec mnóstwu Egipskiemu przez rękę Nabuchodonozora, króla Babilońskiego.
१०प्रभू परमेश्वर असे म्हणतो, मी मिसराचा समुदाय बाबेलाचा राजा नबुखद्नेस्सर याच्या हाताने नाहीसा करीन.
11 On i lud jego z nimi, najsrożsi z narodów, przywiedzeni będą na wytracenie tej ziemi; bo dobędą mieczów swych przeciw Egiptowi, i napełnią ziemię pobitymi.
११तो व त्याच्याबरोबर त्याची सेना, राष्ट्राची दहशत, देशाचा नाश करण्यासाठी आणण्यात येईल; ते मिसराविरूद्ध आपल्या तलवारी काढतील व देश मरण पावलेल्या लोकांनी भरुन टाकतील.
12 I wysuszę rzeki, a zaprzedam ziemię w rękę złośników; a tak spustoszę ziemię, i pełność jej przez rękę cudzoziemców. Ja Pan mówiłem.
१२मी नद्यांना कोरडी भूमी करीन आणि मी देश दुष्ट मनुष्यांच्या हाती विकत देईन. मी, परमेश्वर, सांगतो की परक्यांच्या हातून हा देश व यातले सर्व काही यांची नासधूस करवीन. मी, परमेश्वर, असे सांगत आहे.
13 Tak mówi panujący Pan: Wytracę też plugawe bałwany, i zniosę obraz z Nof, a książęcia ziemi Egipskiej więcej nie będzie, gdyż puszczę strach na ziemię Egipską;
१३प्रभू परमेश्वर असे म्हणतोः मी मूर्तींचा नाश करीन आणि मी नोफातून कवडीमोलाच्या मूर्त्त्यां नाहीशा करीन. ह्यापुढे मिसर देशामध्ये कोणीही अधिपती होणार नाही आणि मी मिसर देशावर दहशत ठेवीन.
14 Bo spustoszę Patros, a rozniecę ogień w Soan, i wykonam sąd nad No;
१४मी पथ्रोसला ओसाड करीन. व सोअनास आग लावीन. मी नो याला न्यायदंड करीन.
15 Wyleję też popędliwość moję na Syn, obronne miejsce Egipskie, a wytracę mnóstwo z No.
१५कारण मी मिसराचा बालेकिल्ला जो सीन त्यावर मी आपल्या क्रोधाग्नीचा वर्षाव करीन. व नोच्या समुदायाला कापून काढीन.
16 Gdyż rozniecę ogień w Egipcie, Syn bolejąc boleć będzie, i No rozwalone będzie, a Nof na każdy dzień udręczone będzie.
१६मी मिसराला आग लावीन. सीनला खूप वेदना होतील व नो मोडून पडेल. प्रत्येक दिवशी नोफावर शत्रू येतील.
17 Młodzieńcy miasta On i Bubasto od miecza polegną, a panny w pojmanie pójdą.
१७आवेन व पी-बेसेथ येथील तरुण पुरुष तलवारीने पडतील आणि त्यांची नगरे बंदिवासात जातील.
18 Także w Tachpanches zaćmi się dzień, gdy tam pokruszę zawory Egipskie, i ustanie w niem pycha mocy jego, chmura je okryje, a córki jego w pojmanie pójdą.
१८जेव्हा मी तहपन्हेस येथे मिसराची जोखडे तोडीन तेव्हा त्यादिवशी मी त्यांचा प्रकाश धरून ठेवीन आणि त्यांच्या सामर्थ्याचा गर्व नाहीसा होईल. तिला ढग झाकेल आणि तिच्या मुलींना कैद करून नेले जाईल.
19 A tak wykonam sądy nad Egiptem, i dowiedzą się, żem Ja Pan.
१९अशा रीतीने, मी मिसरावर न्यायादंड आणीन, मग त्यांना समजेल की, मी परमेश्वर आहे.”
20 I stało się jedenastego roku, pierwszego miesiąca, siódmego dnia stało się słowo Pańskie do mnie, mówiąc:
२०मग अकराव्या वर्षात, पहिल्या महिन्याच्या सातव्या दिवशी, परमेश्वराचे वचन मजकडे आले आणि म्हणाले,
21 Synu człowieczy! złamałem ramię Faraona, króla Egipskiego; a oto nie będzie zawiązane, aby było uleczone, ani będzie chustkami obwinione, ani będzie związane, aby było zmocnione do trzymania miecza.
२१“मानवाच्या मुला, मिसराचा राजा फारो याचा भुज मी मोडला आहे. पाहा! त्याच्या हाताला तलवार धरण्याची शक्ती यावी म्हणून त्यास बरे करण्यासाठी औषधोपचार करून पट्टी लावून त्यास कोणीही बांधले नाही.
22 Przetoż tak mówi panujący Pan: Otom Ja przeciwko Faraonowi, królowi Egipskiemu, a skruszę ramiona jego, tak mocne jako i złamane, i wytrącę miecz z ręki jego;
२२यास्तव प्रभू परमेश्वर असे म्हणतो, पाहा! मी मिसराचा राजा फारो! याच्याविरूद्ध आहे. मी त्याचे दोन्ही हात एक चांगला असलेला व दुसरा मोडलेला आहे तोही मोडीन. आणि त्याच्या हातातून तलवार गळून पडेल असे मी करीन.
23 I rozproszę Egipczan między narody, a rozwieję ich po ziemiach.
२३मग मी मिसऱ्यांना राष्ट्रांमध्ये विखरुन टाकीन आणि त्यांना देशामध्ये उधळून लावीन.
24 Umocnię zasię ramiona króla Babilońskiego, i dam miecz mój w ręce jego, a ramiona Faraonowe złamię, i będzie stękał przed obliczem jego, jako stęka zraniony na śmierć.
२४मी बाबेलाच्या राजाचे बाहू बळकट करीन. आणि आपली तलवार त्यांच्या हाती देईन. यासाठी की, मी फारोचे बाहू तोडीन. मग तो बाबेल राजासमोर मरणाऱ्या मनुष्याप्रमाणे कण्हण्यांनी कण्हून ओरडेल.
25 Umocnię, mówię, ramiona króla Babilońskiego, a ramiona Faraonowe upadną; i dowiedzą się, żem Ja Pan, gdy dam miecz mój w rękę króla Babilońskiego, aby go wyciągnął na ziemię Egipską.
२५कारण मी बाबेलाच्या राजाचे बाहू बळकट करीन, पण फारोचे बाहू गळून पडतील. जेव्हा मी मिसर देशावर उगारण्यासाठी आपली तलवार बाबेल राजाच्या हातात ठेवीन. मग तो तीने त्यांच्या देशावर हल्ला करील. तेव्हा ते जाणतील की परमेश्वर आहे.
26 A tak rozproszę Egipczan między narody, i rozwieję ich po ziemiach: i dowiedzą się, żem Ja Pan.
२६म्हणून मी मिसऱ्यांना राष्ट्रांत विखरुन टाकीन आणि त्यांना देशातून पांगविन. मग ते जाणतील की मीच परमेश्वर आहे.”