< Wyjścia 14 >
1 I rzekł Pan do Mojżesza mówiąc:
१परमेश्वर मोशेला म्हणाला,
2 Mów do synów Izraelskich, niech się wrócą i położą obozem przed Fihahirot między Migdoł, i między morzem, przeciw Baalsefon, przeciw jemu położycie obóz nad morzem.
२“इस्राएल लोकांस असे सांग की, तुम्ही मागे फिरून मिग्दोल व समुद्र यांच्यामध्ये व बआल-सफोन जवळ असलेल्या पीहहीरोथ येथे तळ देऊन रात्री मुक्काम करावा.
3 Będzie bowiem Farao mówił o synach Izraelskich: Strwożeni są w ziemi, zawarła je puszcza.
३इस्राएली लोकांविषयी फारो म्हणेल, ते रानात भटकत आहेत. रानात त्यांचा कोंडमारा झाला आहे.
4 I zatwardzę serce Faraonowe, że je gonić będzie; i uwielbiony będę w Faraonie i we wszystkiem wojsku jego; a poznają Egipczanie, żem Ja Pan; i uczynili tak.
४मी फारोचे मन कठीण करीन व तो त्यांचा पाठलाग करीन. मी फारो व त्याची सेना यांचा पराभव करून गौरवशाली होईन, मग मिसराच्या लोकांस समजेल की मी परमेश्वर आहे.” त्याप्रमाणे इस्राएल लोकांनी केले.
5 Tedy dano znać królowi Egipskiemu, że lud ucieka; i odmieniło się serce Faraonowe i sług jego przeciw ludowi, i rzekli: Cóżeśmy to uczynili, żeśmy wypuścili Izraela, aby nam nie służył?
५इस्राएल लोक निसटून गेल्याचे मिसराच्या राजाला समजले तेव्हा तो व त्याचे अधिकारी यांचे विचार बदलले व आपण हे काय केले असे त्यांना वाटले. फारो म्हणाला, “आपण इस्राएली लोकांस आपल्या दास्यातून पळून का जाऊ दिले?”
6 Zaprzągł tedy wóz swój, i lud swój wziął z sobą.
६तेव्हा फारोने आपला रथ तयार करण्यास सांगितले आणि आपल्या लोकांस घेऊन तो निघाला.
7 Wziął też sześć set wozów wybornych, i wszystkie wozy Egipskie, i przełożone nad tem wszystkiem.
७त्याने सहाशे उत्तम योद्धे व मिसरातील सर्व रथ त्यांवरील सरदारांसोबत आपल्याबरोबर घेतले.
8 I zatwardził Pan serce Faraona, króla Egipskiego, i gonił syny Izraelskie; lecz synowie Izraelscy wyszli w ręce możnej.
८इस्राएल लोक तर मिसरहून मोठ्या अवसानाने चालले होते, परंतु परमेश्वराने फारो राजाचे मन कठीण केले.
9 I gonili je Egipczanie, a dogonili je w obozie nad morzem, wszystkie konie, wozy Faraonowe, i jezdne jego, i wojska jego, nie daleko Fihahirot, przeciw Baalsefon.
९फारोच्या लष्करात पुष्कळ घोडेस्वार व रथ होते. मिसरी सैन्याने त्यांचा पाठलाग केला व इस्त्राएल लोकांनी लाल समुद्र व बआल-सफोनाच्या दरम्यान पीहहीरोथ येथे तळ दिला होता तेथे त्यांना गाठले.
10 A gdy Farao następował, tedy podnieśli synowie Izraelscy oczy swe, a oto, Egipczanie ciągną za nimi; i bali się bardzo, i wołali synowie Izraelscy do Pana.
१०फारो व मिसरी सैन्य आपणाकडे येताना इस्राएल लोकांनी पाहिले, तेव्हा ते अतिशय घाबरले; आणि मदतीसाठी ते परमेश्वराचा धावा करू लागले.
11 I mówili do Mojżesza: Azaż nie było grobów w Egipcie? wywiodłeś nas, abyśmy pomarli na puszczy; cóżeś nam to uczynił, żeś nas wywiódł z Egiptu?
११ते मोशेला म्हणाले, “आम्हांला मिसरात काय कबरा नव्हत्या म्हणून येथे रानात मरावयास आणले? आम्हांला तू मिसरातून बाहेर का काढले?
12 Azaż nie to jest, cośmy do ciebie mówili w Egipcie, mówiąc: Zaniechaj nas, abyśmy służyli Egipczanom? bo lepiej było nam służyć Egipczanom, niżeli pomrzeć na puszczy.
१२मिसरमध्ये आम्ही तुला नव्हतो का म्हणत की आम्ही आहो ते ठीक आहो, आम्ही मिसरामध्ये गुलाम म्हणून राहिलो असतो तर बरे झाले असते. येथे रानात मरून जावे त्यापेक्षा मिसऱ्यांचे दास्य पत्करले.”
13 I rzekł Mojżesz do ludu: Nie bójcie się, stójcie, a patrzajcie na wybawienie Pańskie, które wam dziś uczyni; bo Egipczanów, których teraz widzicie, więcej nie oglądacie na wieki
१३परंतु मोशेने उत्तर दिले, “भिऊ नका! स्थिर उभे राहा आणि परमेश्वर आज तुमचे तारण करील ते पाहा. आजच्या दिवसानंतर हे मिसराचे लोक तुम्हास पुन्हा कधीही दिसणार नाहीत.
14 Pan będzie walczył za was, a wy milczeć będziecie.
१४परमेश्वर तुमच्याकरता त्यांच्याशी लढेल, तुम्ही शांत उभे राहा.”
15 I rzekł Pan do Mojżesza: Cóż wołasz do mnie? Mów do synów Izraelskich, aby ciągnęli;
१५मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “माझा धावा करीत काय बसलास? इस्राएल लोकांस सांग की पुढे चला.
16 A ty podnieś laskę twą, i wyciągnij rękę twoję na morze, i przedziel je; a niech idą synowie Izraelscy środkiem morza po suszy.
१६तू आपली काठी उचल आणि आपला हात समुद्रावर उगारून तो दुभाग म्हणजे इस्राएल लोक भर समुद्रात कोरड्या भूमीवरून चालतील.
17 A oto, Ja, Ja zatwardzę serce Egipczanów, że wnijdą za nimi; a będę uwielbiony w Faraonie, i we wszystkiem wojsku jego, w woziech jego, i w jezdnych jego.
१७आणि पाहा, मी स्वतः मिसऱ्यांची मने कठीण करीन आणि ते तुमचा पाठलाग करतील. आणि फारो व त्याचे सर्व सैन्य, स्वार व रथ यांचा पराभव केल्याने माझा महिमा प्रगट होईल.
18 I dowiedzą się Egipczanie, żem Ja Pan, gdy uwielbiony będę w Faraonie, w woziech jego, i w jezdnych jego.
१८फारो व त्याचे रथ व त्यांचे स्वार यांचा पराभव केल्याने माझा महिमा प्रगट झाला म्हणजे मी परमेश्वर आहे हे मिसरी लोकांस कळेल.”
19 A ruszywszy się Anioł Boży, który chodził przed obozem Izraelskim, szedł pozad ich; ruszył się też słup obłokowy, który szedł przed nimi, i stanął pozad im.
१९इस्राएली सेनेच्या पुढे चालणारा देवाचा दूत सेनेच्या मागे गेला, आणि मेघस्तंभ त्यांच्या आघाडीवरून निघून त्यांच्या पिछाडीस उभा राहिला.
20 A przyszedłszy między obóz Egipski, i między obóz Izraelski, był on obłok Egipczanom ciemny a Izraelczykom oświecający noc, tak, iż przystąpić nie mogli jedni do drugich przez całą noc.
२०अशा रीतीने तो मिसराचे लोक व इस्राएल लोक यांच्यामध्ये उभा राहिला; मेघ व अंधकार होता तरी तो रात्रीचा प्रकाश देत होता. रात्रभर एका पक्षाला दुसऱ्या पक्षाकडे जाता आले नाही.
21 I wyciągnął Mojżesz rękę swoję na morze, a Pan rozpędził morze wiatrem wschodnim gwałtownie wiejącym przez całą noc, i osuszył morze; a rozstąpiły się wody.
२१मग मोशेने तांबड्या समुद्रावर आपला हात उगारला, तेव्हा परमेश्वराने रात्रभर पूर्वेकडून जोराचा वारा वाहवून समुद्र मागे हटविला, असा की पाणी दुभागून मध्ये कोरडी जमीन झाली.
22 I szli synowie Izraelscy środkiem morza po suszy; a wody im były jako mur. po prawej stronie ich, i po lewej stronie ich.
२२आणि इस्राएल लोक कोरड्या वाटेवरून भर समुद्रातून पार गेले. समुद्राचे पाणी त्यांच्या उजव्या व डाव्या बाजूला भिंतीसारखे उभे राहिले.
23 A goniąc Egipczanie, weszli za nimi; wszystkie konie Faraonowe, wozy jego, i jezdni jego, w pośrodek morza.
२३त्यानंतर तेव्हा मिसऱ्यांनी त्यांचा पाठलाग केला. फारोचे सर्व घोडे, रथ व स्वार त्यांच्या पाठोपाठ समुद्रामध्ये गेले.
24 Stało się tedy około straży zarannej, że wejrzał Pan na obóz Egipski z słupa ognia i obłoku, i pomieszał wojsko Egipskie.
२४तेव्हा त्या दिवशी भल्या पहाटे परमेश्वराने मेघस्तंभातून व अग्निस्तंभातून खाली मिसराच्या सैन्याकडे पाहिले आणि त्यांचा गोंधळ उडवून त्यांचा पराभव केला.
25 I porzucał koła wozów ich, że je wlekli z ciężkością; zaczem rzekli Egipczanie: Uciekajmy przed Izraelem, bo Pan walczy za nimi przeciwko Egipczanom.
२५रथाची चाके रुतल्यामुळे रथावर ताबा ठेवणे मिसराच्या लोकांस कठीण झाले; तेव्हा ते मोठ्याने ओरडून म्हणाले, “आपण येथून लवकर निघून जाऊ या! कारण परमेश्वर इस्राएलाच्या बाजूने आम्हाविरूद्ध लढत आहे.”
26 I rzekł Pan do Mojżesza: Wyciągnij rękę twoję na morze, że się wrócą wody na Egipczany, na wozy ich, i na jezdne ich.
२६नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला, “तुझा हात समुद्रावर उगार म्हणजे भिंतीसारखे उभे राहिलेले पाणी पूर्ववत जमून मिसऱ्यावर, त्यांच्या रथावर व स्वारांवर येईल.”
27 I wyciągnął Mojżesz rękę swoję na morze, i wróciło się morze zaraz z rana do mocy swojej; a Egipczanie uciekali przeciw jemu; lecz Pan wraził Egipczany w pośród morza.
२७मोशेने आपला हात समुद्रावर उगारला तेव्हा दिवस उजाडल्यावर पाणी पहिल्यासारखे समान पातळीवर आले; तेव्हा मिसराच्या लोकांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु परमेश्वराने त्यांना समुद्रामध्ये उलथून पाडिले.
28 Wróciwszy się tedy wody, okryły wozy i jezdne, ze wszystkiem wojskiem Faraonowem, które weszło za nimi w morze, tak iż nie zostało z nich i jednego.
२८पाणी पूर्ववत झाले व त्याने घोडे, रथ व स्वारांना गडप केले आणि इस्राएल लोकांचा पाठलाग करणाऱ्या फारोच्या सर्व सैन्याचा नाश झाला, त्यांच्यातले कोणीही वाचले नाही.
29 Synowie zaś Izraelscy szli po suszy środkiem morza, a wody im były jako mur, po prawej stronie ich, i po lewej stronie ich.
२९परंतु इस्राएली लोक कोरड्या भूमीवरून भरसमुद्र ओलांडून पार गेले. ते पाणी त्यांच्या उजव्या व डाव्या हाताला भिंतीप्रमाणे उभे राहिले.
30 I wybawił Pan w on dzień Izraela z ręki Egipczanów; i widzieli Izraelczycy Egipczany pomarłe na brzegu morskim.
३०तेव्हा अशा रीतीने त्या दिवशी परमेश्वराने मिसऱ्यांच्या हातातून इस्त्राएल लोकांस सोडविले आणि मिसरी समुद्रतीरी मरून पडलेले इस्राएल लोकांनी आपल्या डोळ्यांनी पाहिले.
31 Widział też Izrael onę moc wielką, którą uczynił Pan nad Egipczany; a bał się lud Pana, i uwierzyli Panu, i Mojżeszowi, słudze jego.
३१परमेश्वराने मिसऱ्यांना आपला प्रबळ हात दाखविला तो इस्राएल लोकांनी पाहिला, तेव्हा त्यांनी परमेश्वराचे भय धरले आणि परमेश्वरावर व त्याचा सेवक मोशे याच्यावरही विश्वास ठेवला.