< Powtórzonego 22 >

1 Jeźlibyś ujrzał wołu brata twego, albo owcę jego obłąkaną, nie mijajże ich, ale je koniecznie odprowadź do brata twego.
आपल्यापैकी कोणाचा बैल किंवा मेंढरू मोकाट भटकलेले आढळले तर तिकडे दुर्लक्ष न करता ते त्याच्या मालकाकडे पोचते करा.
2 Choćciby nie był blisko brat twój, anibyś go znał, przecię zapędzisz je do domu swego, i będzie przy tobie, ażby tego szukał brat twój, i wrócisz mu je.
तो बंधू जर जवळपास राहत नसेल किंवा कोण आहे ते माहीत नसेल तर त्या जनावराला आपल्या घरी आणा. त्याचा मालक शोध करत आला की त्याचे त्यास परत कर.
3 Toż uczynisz osłowi jego; toż też uczynisz szacie jego; toż też uczynisz wszelakiej rzeczy zgubionej brata twego, która by mu zginęła, jeźlibyś ją znalazł, nie mijajże jej.
कोणाचे गाढव, कपडे किंवा इतर कोणतीही वस्तू अशी इकडे तिकडे दिसली तरी असेच करा, व त्या शेजाऱ्याला मदत कर.
4 Jeźlibyś ujrzał osła brata twego, albo wołu jego, że upadł na drodze, nie mijajże ich, ale go zaraz z nim podnieś.
कोणाचे गाढव किंवा बैल रस्त्यात पडलेले आढळले तर तिकडे दुर्लक्ष करु नका. त्यास उठवून उभे राहायला मदत करा.
5 Niech nie bierze niewiasta na się szat męskich, ani niech się nie obłóczy mąż w szatę niewieścią; albowiem jest obrzydliwością Panu, Bogu twemu, kto by to czynił.
बायकांनी पुरुषांचा किंवा पुरुषांनी बायकांचा पेहेराव करु नये. तुमचा देव परमेश्वर ह्याला तसे करणाऱ्या प्रत्येकाचा विट आहे.
6 Gdybyś trafił gniazdo ptasze przed sobą w drodze, na jakiemkolwiek drzewie, albo na ziemi, a w niem ptaszęta albo jajka, a matka by siedziała na ptaszętach albo na jajkach, nie bierzże macierzy z dziećmi;
वाटेत तुम्हास झाडावर किंवा जमिनीवर पक्ष्याचे घरटे आढळले आणि मादी अंडी उबवत किंवा पिल्लांवर बसलेली दिसली तर पिल्लांसकट तिला नेऊ नका.
7 Ale wolno puściwszy matkę, dzieci weźmiesz sobie, abyć się dobrze działo, i żebyś przedłużył dni twoich
हवी तर फक्त पिल्ले घ्या पण आईला सोडा. हे नियम पाळलेत तर तुमचे कल्याण होईल व तुम्ही चिरायू व्हाल.
8 Gdy też zbudujesz dom nowy, tedy uczynisz blanki po kraju dachu twego, abyś nie przywiódł krwi na dom twój, gdyby kto spadł z niego.
नवीन घर बांधलेत तर त्याच्या छताला कठडा अवश्य करा. म्हणजे वरुन तोल जाऊन कोणी पडल्यास त्याच्या हत्येचे पातक तुम्हास लागणार नाही.
9 Nie posiewaj winnicy twojej, różnem nasieniem, byś snać nie splugawił pożytku nasienia, któreś siał, i urodzaju winnicy.
द्राक्षमळ्यात इतर धान्याचे बियाणे पेरू नये. त्यामुळे संपूर्ण कापणी पवित्र ठिकाणी दिली जाईल. धान्य आणि द्राक्षे यापैकी काहीच तुम्हास वापरता येणार नाही.
10 Nie będziesz orał wołem i osłem pospołu.
१०बैल आणि गाढव एका नांगराला जुंपू नका.
11 Nie obleczesz szaty utkanej z wełny i ze lnu pospołu.
११लोकर आणि ताग यांच्या मिश्र विणीचे वस्त्र वापरू नका.
12 Poczynisz sobie sznurki na czterech rogach szaty twojej, którą się odziewać będziesz.
१२वेगवेगळे धागे एकत्र करून त्यांचे गोंडे आपल्या पांघरायच्या वस्त्राला चारीही टोकांना लावा.
13 Gdyby kto pojął żonę, a wszedłszy do niej, miałby ją w nienawiści;
१३एखाद्या मनुष्यास लग्न केल्यावर पत्नीशी शरीरसंबंध ठेवल्यावर काही काळानंतर पत्नी आवडेनाशी झाली आणि
14 A dałby przyczynę, aby mówiono o niej, i wprowadziłby na nię złą sławę, mówiąc; Pojąłem tę żonę, a wszedłszy do niej, nie znalazłem jej panną:
१४मी या स्त्रीशी लग्न केले पण ती कुमारी नसल्याचे आमच्या शरीरसंबंधाच्या वेळी मला आढळून आले असा खोटा आरोप त्याने तिच्यावर ठेवला तर लोकांमध्ये तिची बदनामी होईल.
15 Tedy weźmie ojciec dzieweczki, i matka jej, i przyniosą znaki panieństwa dzieweczki onej do starszych miasta onego do bramy;
१५तेव्हा त्या मुलीच्या आईवडीलांनी तिच्या कौमार्याचा पुरावा घेऊन गावच्या चावडीवर वडीलधाऱ्या पंचाकडे जावे.
16 I rzecze ojciec onej dzieweczki do starszych: Córkę swoję dałem mężowi temu za żonę; a on ją ma w nienawiści;
१६मुलीच्या वडिलाने वडिलांस म्हणावे या पुरुषाशी माझ्या मुलीचे लग्न लावून दिले आहे. पण आता ती त्यास नकोशी झाली आहे.
17 A oto sam dał przyczynę, aby mówiono o niej, powiadając: Nie znalazłem przy córce twojej panieństwa: ale oto są znaki panieństwa córki mojej. Tedy rozwiną ono prześcieradło przed starszymi miasta onego.
१७त्याने तिच्यावर भलते सलते आरोप केले आहेत. आणि हा म्हणतो की कौमार्याची लक्षणे तिच्या ठायी आढळली नाहीत. पण हा घ्या माझ्या मुलीच्या कौमार्याचा पुरावा, असे मुलीच्या वडिलांनी तेथे सांगून, त्या गावच्या मंडळींना ती चादर दाखववावी.
18 A wziąwszy starsi miasta onego męża skarzą go.
१८यावर गावच्या वडिलांनी त्या नवऱ्याला धरुन शिक्षा करावी.
19 I wezmą z niego winę sto srebrników, które oddadzą ojcu onej dzieweczki, przeto, że puścił złą sławę o pannie Izraelskiej, i będzie ją miał za żonę, i nie będzie jej mógł opuścić po wszystkie dni swoje.
१९त्यास शंभर शेकेल दंड वसुल करावा. एका इस्राएल कन्येवर ठपका ठेवून तिची बदनामी केल्याबद्दल ही रक्कम त्याने मुलीच्या वडीलांना द्यावी. त्याने पत्नी म्हणून तिचा स्विकार केला पाहिजे. तसेच जन्मभर त्याने तिचा त्याग करता कामा नये.
20 Ale byłoliby prawdziwe to obwinienie jej, a nie znalazłyby się znaki panieństwa przy onej dzieweczce;
२०पण पत्नीबद्दल नवऱ्याने केलेला आरोप खराही असू शकतो. तिच्या कौमार्याचा पुरावा तिचे आईवडील दाखवू शकले नाहीत तर;
21 Tedy wywiodą onę dzieweczkę przed drzwi domu ojca jej, i ukamionują ją ludzie miasta onego, i umrze: bo uczyniła hańbę w Izraelu, popełniwszy nierząd w domu ojca swego; tak odejmiesz złe z pośród siebie.
२१गावातील ज्येष्ठ मंडळींनी तिला आपल्या वडिलांच्या घराच्या दारापाशी आणावी आणि गावकऱ्यांनी तिला मरेपर्यंत दगडांनी मारावे. कारण तिने इस्राएलमध्ये ही मूर्खपणाची गोष्ट केली आहे. आपल्या वडिलांच्या घरी असतानाचे तिचे वर्तन वेश्येसमान आहे. हा कलंक आपल्यामधून तुम्ही धुवून काढलाच पाहिजे.
22 Jeźliby kto znalezion był, obcujący z niewiastą, mającą męża, tedy niech umrą oboje, mąż, który obcował z cudzą żoną, i ona niewiasta; tak odejmiesz złe z Izraela.
२२एखाद्या पुरुषाचे दुसऱ्या विवाहित स्त्री बरोबर लैंगिक संबंध असतील तर दोघांनाही मृत्युदंड द्यावा. आणि इस्राएलातून या दुराचाराचे निमूर्लन करावे.
23 Byłaliby dzieweczka panna poślubiona mężowi, a trafiłby ją kto w mieście, i obcowałby z nią;
२३एखाद्या कुमारिकेची मागणी झालेली असताना गावातील दुसऱ्या एखाद्या पुरुषाने तिच्याशी लैंगिक संबंध ठेवलेले आढळले तर
24 Tedy wywiódłszy ono oboje przed bramę miasta, ukamionujecie je, i umrą; dzieweczkę przeto, iż nie wołała w mieście, a męża przeto, iż zelżył żonę bliźniego swego: tak odejmiesz złe z pośrodku siebie.
२४त्या दोघांना गावाच्या वेशीपाशी भर चौकात आणून दगडांनी मरेपर्यंत मारावे ती दुसऱ्याची पत्नी होणार होती. तिच्याशी शरीरसंबधं ठेवल्याबद्दल पुरुषाला आणि गावांत असून मदतीसाठी आरडाओरडा केला नाही म्हणून त्या मुलीला मरेपर्यंत दगडांनी मारावे. अशाप्रकारे आपल्या लोकांमधून हा दुराचार निपटून टाकावा.
25 A jeźliby na polu trafił mąż dzieweczkę poślubioną a porwawszy ją, zgwałciłby ją, tedy umrze mąż, który obcował z nią, sam tylko.
२५पण अशा वाग्दत्त मुलीला एखाद्याने रानात गाठले आणि तिच्यावर बलात्कार केला तर मात्र फक्त त्या पुरुषाला मारावे.
26 Ale dzieweczce nic nie uczynisz; dzieweczka nie jest winna śmierci; bo jako gdyby kto powstawszy przeciwko bliźniemu swemu, zamordował go, taka to sprawa.
२६त्या मुलीला काही करु नये. देहांत शासन व्हावे असा गुन्हा तिने केला नाही. कोणी आपल्या शेजाऱ्यावर चालून जाऊन त्याचा जीव घ्यावा तसेच हे झाले.
27 Ponieważ ją na polu trafił, a gdy wołała dzieweczka poślubiona, nie był, kto by ją ratował.
२७त्यास ही मुलगी रानात आढळली, त्याने तिच्यावर हात टाकला. कदाचित् तिने मदतीसाठी हाका मारल्याही असतील पण तिच्या बचावासाठी तिथे कोणी नव्हते. तेव्हा तिला शिक्षा करु नये.
28 Gdyby też kto, trafiwszy dzieweczkę pannę, która nie jest za mąż zmówioną, porwał ją, i leżałby z nią, a zastano by je:
२८वाग्दत्त झालेली नाही अशी कुमारिका कोणाला आढळली आणि त्याने तिच्यावर बलात्कार केला हे लोकांनी पाहिल्यास
29 Tedy da on mąż, który obcował z nią, ojcu dzieweczki pięćdziesiąt srebrników, i będzie mu za żonę, przeto że ją zelżył, ani jej będzie mógł opuścić po wszystkie dni swoje.
२९त्याने मुलीच्या वडीलांना पन्नास शेकेल रुपे द्यावी. आता ती त्याची पत्नी झाली. कारण त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवल्याचे पाप केले आहे. तो आता तिचा जन्मभर त्याग करु शकत नाही.
30 Nie pojmie nikt żony ojca swego, i nie odkryje podołka ojca swego.
३०“आपल्या वडलांच्या पत्नीशी गमन करून कोणी त्यांच्या तोंडाला काळे फासू नये.”

< Powtórzonego 22 >