< Dzieje 1 >
1 Pierwsze wprawdzie księgi napisałem, o Teofilu! o wszystkiem, co począł Jezus i czynić, i uczyć.
१हे थियफिला, येशूने जे शिकवले आणि केले, व ज्या विषयी मी पहिल्या ग्रंथात नमुद केले,
2 Aż do dnia onego, którego dawszy rozkazanie Apostołom, które był przez Ducha Świętego obrał, wzięty jest w górę.
२त्या दिवसापर्यंत जेव्हा तो वर घेतला गेला. या आज्ञा त्याने पवित्र आत्म्याच्या द्वारे त्याच्या निवडलेल्या प्रेषितांना दिल्या.
3 Którym też samego siebie po męce swojej żywym stawił w wielu niewątpliwych dowodach, przez czterdzieści dni ukazując się im i mówiąc o królestwie Bożem.
३मरण सोसल्यानंतरही येशूने त्यांना पुष्कळ प्रमाणांनी आपण जिवंत आहोत. हे दाखवून चाळीस दिवसपर्यंत तो त्यांना दर्शन देत असे, व देवाच्या राज्याच्या गोष्टी सांगत असे.
4 A zgromadziwszy je przykazał im, aby nie odchodzili z Jeruzalemu, ale iżby czekali obietnicy ojcowskiej, o którejście mówić słyszeli ode mnie.
४नंतर तो त्यांच्याशी एकत्र असता त्याने त्यांना आज्ञा केली की, “यरूशलेम शहर सोडून जाऊ नका तर पित्याने देऊ केलेल्या, ज्या देणगी विषयी, तुम्ही माझ्याकडून ऐकले आहे त्याची वाट पाहा.
5 Albowiemci Jan chrzcił wodą; ale wy będziecie ochrzczeni Duchem Świętym po niewielu tych dniach.
५कारण योहानाने पाण्याने तुमचा बाप्तिस्मा केला खरा; थोडया दिवसानी तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने होईल.”
6 A tak oni zszedłszy się, pytali go, mówiąc: Panie! izali w tym czasie naprawisz królestwo Izraelskie?
६मग सर्वजण एकत्र जमले असताना शिष्यांनी येशूला विचारले, “प्रभूजी, याच काळात आपण इस्राएलाचे राज्य पुन्हा स्थापित करणार काय?”
7 Lecz on rzekł do nich: Nie wasza rzecz jest, znać czasy i chwile, które Ojciec w swojej mocy położył.
७तो त्यांना म्हणाला, “पित्याने स्वतःच्या अधिकारात काळ व समय ठेवले आहेत ते जाणणे तुम्हाकडे नाही.
8 Ale przyjmiecie moc Ducha Świętego, który przyjdzie na was; i będziecie mi świadkami i w Jeruzalemie, i we wszystkiej Judzkiej ziemi, i w Samaryi, aż do ostatniego kraju ziemi.
८परंतु पवित्र आत्मा तुम्हांवर येईल, तेव्हा तुम्ही सामर्थ्य प्राप्त कराल, आणि यरूशलेम शहरात सर्व यहूदीया आणि शोमरोन प्रांतात, व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल.”
9 A to rzekłszy, gdy oni patrzali, w górę podniesiony jest, a obłok wziął go od oczów ich.
९असे सांगितल्यावर त्यांच्या डोळ्यासमोर तो वर घेतला गेला, आणि मेघांनी त्यास दृष्टीआड केले.
10 A gdy za nim do nieba idącym pilnie patrzali, oto dwaj mężowie stanęli przy nich w białem odzieniu,
१०नंतर तो जात असता ते आकाशाकडे निरखून पाहत होते, तेव्हा पाहा, शुभ्र वस्त्रे परिधान केलेले दोन पुरूष त्यांच्याजवळ उभे राहिले.
11 I rzekli: Mężowie Galilejscy! przecz stoicie, patrząc w niebo? Ten Jezus, który w górę wzięty jest od was do nieba, tak przyjdzie, jakoście go widzieli idącego do nieba.
११आणि ते असे बोलले, “अहो गालीलकारांनो, तुम्ही आकाशाकडे का पाहत उभे राहिले आहात? हा जो येशू तुम्हापासून वर आकाशात घेतला गेला आहे? तुम्ही त्यास जसे आकाशात जातांना पाहता तसाच तो परत येईल.”
12 Tedy się wrócili do Jeruzalemu od góry, którą zowią oliwną, która jest blisko Jeruzalemu, mając drogi przez jeden sabat.
१२मग यरूशलेम शहराजवळ म्हणजे शब्बाथ दिवसाच्या मजलेवर असलेल्या जैतुनांच्या डोंगरावरून ते यरूशलेम शहरास परत आले.
13 A gdy weszli, wstąpili na salę, gdzie mieszkali Piotr, i Jakób, i Jan, i Andrzej, i Filip, i Tomasz, Bartłomiej, i Mateusz, Jakób Alfeuszowy, i Szymon Zelotes, i Judas Jakóbowy.
१३आणि आल्यावर ते माडीवरच्या एका खोलीत जिथे पेत्र, योहान, याकोब, अंद्रिया, फिलिप्प, थोमा, बर्थलमय, मत्तय, अल्फीचा मुलगा याकोब, शिमोन जिलोत व याकोबाचा मुलगा यहूदा हे राहत होते, तिथे गेले.
14 Ci wszyscy trwali jednomyślnie na modlitwie i prośbach, z żonami i z Maryją, matką Jezusową, i z braćmi jego.
१४हे सर्वजण आणि त्यांच्यासह कित्येक स्त्रिया, येशूची आई मरीया, व त्याचे भाऊ एकचित्ताने एकसारखे प्रार्थना करत होते.
15 A w oneż dni, powstawszy Piotr w pośrodku uczniów, rzekł: (A był poczet osób wespół zgromadzonych około sta i dwudziestu):
१५त्या दिवसात पेत्र बंधुवर्गामध्ये, सुमारे एकशेवीस मनुष्यांच्या जमावामध्ये उभा राहून म्हणाला,
16 Mężowie bracia! musiało się wypełnić ono pismo, które opowiedział Duch Święty przez usta Dawidowe o Judaszu, który był wodzem tych, co pojmali Jezusa;
१६“बंधुजनहो, येशूला धरून नेणाऱ्यांना वाट दाखविणाऱ्या यहूदाविषयी पवित्र आत्म्याने दावीदाच्या मुखावाटे जे भविष्य आधीच वर्तवले होते, ते पूर्ण होण्याचे अगत्य होते.
17 Bo był policzony z nami i dostał był cząstki tego usługiwania.
१७तो आपल्या मधलाच एक होता आणि त्यास या सेवेतल्या लाभाचा त्याचा वाटा मिळाला होता.”
18 Tenci wprawdzie otrzymał rolę z zapłaty niesprawiedliwości, a powiesiwszy się, rozpukł się na poły i wypłynęły wszystkie wnętrzności jego.
१८(त्याने आपल्या दुष्टाईची कृतीकरून मजुरीने शेत विकत घेतले. तो पालथा पडल्याने त्याचे पोट मध्येच फुटले, व त्याची आतडी बाहेर पडली.
19 I było to jawne wszystkim mieszkającym w Jeruzalemie, tak iż nazwano onę rolę własnym ich językiem Akieldama, to jest rola krwi.
१९हे यरूशलेम शहरात राहणाऱ्या सर्वांना कळले म्हणून त्यांच्या भाषेत त्या शेताला हकलदमा, म्हणजे रक्ताचे शेत, असे नाव पडले आहे.)
20 Albowiem napisano w księgach Psalmów: Niechaj będzie mieszkanie jego puste, a niech nie będzie, kto by w niem mieszkał, a biskupstwo jego niech weźmie inny.
२०स्तोत्रसंहितेत असे लिहिले आहे की, त्याचे घर उजाड पडो, व त्यामध्ये कोणीही न राहो. आणि, त्याचा हुद्दा दूसरा घेवो.
21 Potrzeba tedy, aby jeden z tych mężów, którzy z nami bywali po wszystek czas, który Pan Jezus przebywał między nami,
२१म्हणून, प्रभू येशू, आमच्यामध्ये आत बाहेर येत जात होता त्या सर्व काळात,
22 Począwszy od chrztu Janowego, aż do tego dnia, którego jest wzięty w górę od nas, był z nami świadkiem zmartwychwstania jego.
२२योहानाच्या बाप्तिस्म्यापासून तर ज्या दिवशी प्रभू येशूला आपल्यापासून वर घेण्यात आले, त्या दिवसापर्यंत तर जी माणसे आपल्या संगतीसोबतीत होती त्यांच्यातून एकाने आपल्याबरोबर त्याच्या पुनरुत्थानाचा साक्षी झाले पाहिजे.
23 I postawili dwóch: Józefa, którego zwano Barsabaszem, którego też nazywano Justem, i Macieja.
२३तेव्हा ज्याचे उपनाव युस्त होते, तो बर्सबा म्हटलेला योसेफ व मत्थिया, या दोघांना त्यांनी पुढे आणले.
24 A modląc się mówili: Ty Panie! który znasz serca wszystkich, okaż z tych dwóch jednego, któregoś obrał;
२४मग त्यांनी अशी प्रार्थना केली, “हे सर्वाची हृदये जाणणाऱ्या प्रभू,
25 Aby przyjął cząstkę usługiwania tego i apostolstwa, z którego wypadł Judasz, aby odszedł na miejsce swoje.
२५हे सेवकपद व प्रेषितपद सोडून आपल्या जागी गेलेल्या यहूदाचे पद ज्याला मिळावे असा या दोघांपैकी तू कोण निवडला आहेस ते दाखव.”
26 I rzucili losy ich. I padł los na Macieja; a przyłączony jest spólnem zdaniem do jedenastu Apostołów.
२६मग त्यांनी त्यांच्यासाठी चिठ्ठ्या टाकल्यावर मत्थियाची चिठ्ठी निघाली; तेव्हा त्यास अकरा प्रेषितांबरोबर गणण्यात आले.