< II Królewska 7 >
1 Tedy rzekł Elizeusz: Słuchajcie słowa Pańskiego. Tak mówi Pan: O tym czasie jutro miara mąki pszennej będzie za sykiel, a dwie miary jęczmienia za sykiel, w bramie Samaryjskiej.
१अलीशा म्हणाला, परमेश्वराचा हा संदेश लक्षपूर्वक ऐका, परमेश्वर म्हणतो या वेळेपर्यंत अन्नधान्याची रेलचेल होईल. शिवाय ते स्वस्तही असेल. शोमरोनच्या वेशीजवळच्या बाजारपेठेत एका शेकेलला मणभर मैदा किंवा दोन मण सातू सहज मिळेल.
2 I odpowiedział książe, na którego się ręce król wspierał, mężowi Bożemu i rzekł: By też Pan poczynił okna w niebie, izaliby to mogło być? Który mu rzekł: Oto ty ujrzysz oczyma twemi; ale tego jeść nie będziesz.
२तेव्हा राजाच्या अगदी निकट असलेला एक अधिकारी अलीशाला म्हणाला, “परमेश्वराने आकाशाला खिंडारे पाडली तरी असे घडणे शक्य नाही.” अलीशा त्यास म्हणाला, “आपल्या डोळ्यांनी तू ते बघशीलच पण तू मात्र त्यातले काही खाऊ शकणार नाहीस.”
3 A byli czterej mężowie trędowaci u wyjścia bramy, którzy rzekli jeden do drugiego: Pocóż tu mieszkamy, ażbyśmy pomarli?
३वेशीजवळ कोड झालेली चार माणसे बसलेली होती. ती आपापसात बोलताना म्हणाली, आपण मृत्यूची वाट पाहत इथे कशाला बसलो अहोत?
4 Jeźli wnijdziemy do miasta, głód w mieście, i pomrzemy tam, a jeźli tu zostaniemy, przecię pomrzemy. Teraz tedy pójdźcie, a zbieżmy do obozu Syryjskiego; jeźli nas żywo zostawią, będziemy żywi; jeźli nas też zabiją, pomrzemy.
४शोमरोनात अन्नाचा दुष्काळ आहे. आपण तिथे गेलो तरी मरणारच आहोत. इथे थांबलो तरी मरणार आहोत. तेव्हा आपण अरामी छावणीवरच जावे. त्यांनी जीवदान दिले तर जगू. त्यांनी मारले तर मरुन जाऊ.
5 Wstali tedy, gdy się zmierzchać poczęło, aby szli do obozu Syryjskiego; a przyszedłszy na koniec obozu Syryjskiego, oto tam nie było nikogo.
५तेव्हा ते चौघेजण संध्याकाळी अरामी सैन्याच्या तळाजवळ आले आणि अगदी टोकाशी जाऊन पाहतात तर तिथे कोणाचाच पत्ता नाही.
6 Albowiem sprawił Pan, że słychać było w obozie Syryjskim grzmot wozów i tenten koni, i huk wojska wielkiego, i rzekli jeden do drugiego: Oto najął za pieniądze przeciwko nam król Izraelski króle Hetejskie, i króle Egipskie, aby przypadli na nas.
६परमेश्वराच्या करणीने अरामी लोकांस आपल्यावर घोडे, रथ, विशाल सेना चालून येत आहे असा भास झाला तेव्हा ते आपापसात म्हणाले, “इस्राएलाच्या राजाने हित्ती आणि मिसरी राजांना द्रव्य देऊन आपल्यावर चाल करण्यास पाठवलेले दिसते.”
7 A tak wstawszy uciekli w zmierzch, zostawiwszy namioty swe, i konie swe i osły swe, i obóz jaki był, a uciekli, chcąc zachować duszę swoję.
७आणि अरामी लोकांनी फार उशीर व्हायच्या आत संध्याकाळीच तेथून पळ काढला. आपले तंबू, घोडे, गाढवे सगळे जसेच्या तसेच टाकून ते ते आपला जीव घेऊन तेथून पळाले.
8 A gdy przyszli oni trędowaci aż na przodek obozu, weszli do jednego namiotu, i jedli i pili, a nabrawszy stamtąd srebra i złota, i szat, szli i skryli. Potem się wrócili, i weszli do drugiego namiotu, a nabrawszy także stamtąd, odeszli i pokryli.
८शत्रूच्या छावणीजवळ आल्यावर, कोड झालेली ती चार माणसे एका तंबूत शिरली. तिथे त्यांनी खाणेपिणे केले. तिथले कपडेलत्ते आणि सोनेचांदी त्यांनी उचलली. सगळ्या गोष्टी त्यांनी लपवून ठेवल्या. मग ते दुसऱ्या तंबूत शिरले. तिथली चिजवस्तू बाहेर काढली, दुसरीकडे नेऊन ती लपवली.
9 Zatem rzekł jeden do drugiego: Nie dobrze czynimy. Dzień ten jest dzień dobrej nowiny, a my milczymy? Jeźli będziemy czekali aż do zaranku, będziemy winni grzechu. Przetoż teraz pójdźcie, wnijdźmy, a opowiedzmy to domowi królewskiemu.
९आणि मग ते एकमेकांना म्हणाले, “आपण करतो ते बरे नाही. आज आपल्याजवळ चांगली बातमी असून आपण गप्प आहोत. सकाळी उजाडेपर्यंत जर आपण हे कुणाला सांगितले नाहीतर आपल्याला नक्कीच शासन होईल. तेव्हा आपण आता राजवाड्यात राहणाऱ्या लोकांस या गोष्टीची वर्दी देऊ.”
10 A tak przyszedłszy zawołali na wrotnego miejskiego, i powiedzieli im mówiąc: Przyszliśmy do obozu Syryjskiego, a oto nie było tam nikogo, ani głosu ludzkiego, oprócz koni uwiązanych, i osłów uwiązanych, i namiotów, jako przedtem były.
१०मग कोड झालेली ही माणसे आली आणि नगराच्या रखवालदाराला हाक मारुन म्हणाले, “आम्ही अराम्यांच्या छावणीवर गेलो होतो, पण तिथे कोणाचीच चाहूल लागली नाही. एकही मनुष्य तिथे नव्हता. तंबू मात्र तसेच उभे होते आणि घोडे, गाढवे जशीच्या तशी बांधून ठेवली होती. मनुष्यांचा मात्र पत्ता नव्हता.”
11 Tedy on zawołał na inne wrotne, a ci opowiedzieli to w domu królewskim.
११तेव्हा रखवालदारांनी मोठ्याने पुकारा करून राजाच्या महालातील लोकांस ही खबर दिली.
12 Wstawszy tedy król w nocy, rzekł do sług swoich: Powiem ja wam, co nam uczynili Syryjczycy; wiedzą, żeśmy zgłodniali, przetoż wyszli z obozu, a pokryli się w polu, mówiąc: Gdy wynijdą z miasta, pojmiemy je żywo, i miasto ubieżemy.
१२रात्रीची वेळ होती, पण राजा अंथरुणावरुन उठला आणि आपल्या कारभाऱ्यांना म्हणाला, “या अरामी सैन्याचा डाव काय आहे ते मी तुम्हास सांगतो. आपण भुकेले आहोत हे त्यांना माहित आहे. म्हणून ते छावणी सोडून शेतात दडून बसले आहेत. आपण नगर सोडून बाहेर पडलो की आपल्याला जिवंत पकडायचे आणि त्यांनी नगरात घुसायचे असा त्यांचा मनसुबा दिसतोय.”
13 Tedy odpowiedział jeden z sług jego, i rzekł: Proszę niech wezmą pięć koni pozostałych, które zostały w mieście; (oto one są jako wszystko mnóstwo Izraelskie, które zostało w niem; oto one są mówię jako wszystko mnóstwo Izraelskie, które ginie, ) te wyślijmy a wywiedzmy się.
१३यावर एक कारभारी राजाला म्हणाला, “गावात पाच घोडे अजून कसेबसे जिवंत आहेत. त्यांच्यावर बसून काहीजणांना तिथे जाऊन प्रत्यक्ष परिस्थती पाहून येऊ द्या. इस्राएलाचा जो समुदाय बाकी राहिला आहे त्या मनुष्यासारखी त्यांची गती होईल.”
14 A tak wziąwszy dwa wozy z końmi, posłał król do obozu Syryjskiego, mówiąc: Idźcie a obaczcie.
१४तेव्हा दोन रथ व घोडे जुंपून त्यांना अरामी सैन्यामागे पाठवले. राजाने त्यांना अरामी सैन्याच्या छावणीत पाठवून प्रत्यक्ष परिस्थिती पाहून यायला सांगितले.
15 I szli za nimi aż do Jordanu, a oto po wszystkiej drodze pełno było szat i naczynia, które porzucili Syryjczycy, kwapiąc się. Tedy wróciwszy się oni posłowie, oznajmili to królowi.
१५हे लोक अरामी सैन्याच्या मार्गावर यार्देन नदीपर्यंत गेले. वाटेवर सर्वत्र कपडे आणि शस्त्रे पडलेली त्यांना आढळली. घाईघाईने पळून जाताना अरामी लोक या वस्तू टाकून गेले होते. दूतांनी शोमरोनला परत येऊन हे राजाला सांगितले.
16 Przeto wyszedłszy lud, rozchwycił obóz Syryjski; a była miara pszennej mąki za sykiel, a dwie miary jęczmienia za sykiel, według słowa Pańskiego.
१६तेव्हा ते लोक अरामी छावणीकडे पळत सुटले आणि त्यांनी तेथील मौल्यवान चीजवस्तू पळवल्या. प्रत्येकाला भरपूर वस्तू मिळाल्या परमेश्वर म्हणाला होता तसेच झाले. लोकांस एका शेकेलला मणभर मैदा किंवा दोन मण सातू सहज घेता आला.
17 A król postanowił był onego książęcia, na którego się ręce wspierał, w bramie, którego lud podeptał w bramie, aż umarł, jako mu był powiedział mąż Boży, który o tem mówił, gdy był król przyszedł do niego.
१७आपल्या निकटच्या कारभाऱ्याला राजाने वेशीवर द्वारपाल म्हणून नेमले पण लोक शत्रूच्या छावणीवर अन्नासाठी तूटून पडले तेव्हा त्या द्वारपालाला तुडवून पुढे गेले. त्यामुळे तो मरण पावला. अलीशा या संदेष्ट्याकडे राजा आला होता तेव्हा देवाच्या मनुष्याने जे सांगितले त्यानुसार हे घडले.
18 I stało się według słowa, które był rzekł mąż Boży królowi, mówiąc: Dwie miary jęczmienia za sykiel, a miara pszennej mąki będzie za sykiel, jutro o tym czasie w bramie Samaryjskiej.
१८अलीशाने राजाला सांगितले होते, “लोकांस मणभर मैदा किंवा दोन मण सातू शोमरोनच्या वेशीजवळच्या बाजार पेठेत एका शेकेलला घेता येईल.”
19 Na co był odpowiedział on książe mężowi Bożemu, mówiąc: By też Pan uczynił okna w niebie, izali to będzie według słowa tego? A on mu rzekł: Oto ty ujrzysz oczyma twemi, ale tego jeść nie będziesz.
१९पण या कारभाऱ्याने तेव्हा अलीशाला सांगितले, “परमेश्वराने आकाशाला खिंडार पाडले तरी हे होणार नाही!” यावर अलीशा त्या कारभाऱ्याला म्हणाला, “तू हे सर्व आपल्या डोळ्यांदेखत पाहशील पण तुला त्यातले काहीही खाता येणार नाही.”
20 I stało mu się tak; bo go podeptał lud w bramie, aż umarł.
२०त्या कारभाऱ्याच्या बाबतीत नक्की तसेच झाले. लोक वेशीपाशी त्यास तुडवून त्याच्या अंगावरुन गेले आणि तो मेला.