< II Kronik 2 >
1 Umyślił tedy Salomon budować dom imieniowi Pańskiemu, i pałac królewski dla siebie.
१परमेश्वराच्या नावासाठी एक मंदिर तसेच स्वत: साठी एक राजमहालही बांधायची शलमोनाने आज्ञा केली.
2 I naliczył Salomon siedmdziesiąt tysięcy mężów, co nosili ciężary, a ośmdziesiąt tysięcy mężów, którzy rąbali drzewo na górze a do nich przystawów trzy tysiące i sześć set.
२डोंगरातून दगडांचे चिरे काढायला ऐंशी हजार लोक आणि ते वाहून नेण्यासाठी त्याने सत्तर हजार मजूर नेमले. मजुरांच्या कामावर देखरेख करण्यासाठी शलमोनाने तीन हजार सहाशे मुकादम नेमले.
3 Wyprawił też Salomon do Hirama, króla Tyrskiego, mówiąc: Jakoś się obchodził z Dawidem, ojcem moim, posyłając mu drzewo cedrowe, aby zbudował sobie dom do mieszkania, tak się obejdź ze mną.
३सोराचा राजा हिराम याला शलमोनाने निरोप पाठवला, “माझे पिता दावीद यांना जशी त्यांचे निवासस्थान बांधायला उपयोगी पडावे म्हणून तुम्ही गंधसरूचे लाकूड पाठवले होते. तशीच मदत मला करा.
4 Oto ja chcę budować dom imieniowi Pana, Boga mego, abym mu go poświęcił, a iżbym kadził przed nim rzeczami wonnemi, i dla ustawicznego pokładania chleba, i dla całopalenia porannego, i wieczornego w sabaty, i na nowiu miesiąców, i w święta uroczys te Pana, Boga naszego, co ma być na wieki w Izraelu.
४मी माझ्या परमेश्वर देवाच्या नावाच्या सन्मानार्थ एक मंदिर बांधणार आहे. तेथे आम्ही रोज परमेश्वरासमोर सुगंधी धूप जाळू तसेच एका खास मेजावर पवित्र भाकर ठेवू. शिवाय, रोज सकाळ संध्याकाळ शब्बाथाच्या दिवशी प्रत्येक नव चंद्रदर्शनी आणि आमचा देव परमेश्वराने नेमून दिलेल्या सहभोजनाच्या दिवशी आम्ही होमार्पणे करु इस्राएल लोकांनी सर्वकाळ पाळायचा हा नियमच आहे.
5 A dom, który budować mam, wielki będzie; albowiem większy jest Bóg nasz nad wszystkich bogów.
५आमचा परमेश्वर हा सर्व इतर देवतांपेक्षा श्रेष्ठ आहे म्हणून मी त्याच्यासाठी भव्य मंदिर उभारणार आहे.
6 Acz któż tak wiele przemoże, aby mu mógł dom zbudować? ponieważ go niebiosa, i nieba niebios ogarnąć nie mogą; a ja cóżem jest, żebym mu dom budować miał? chyba tylko dla kadzenia przed nim.
६परमेश्वरासाठी निवासस्थान बांधणे कोणाला कसे शक्य आहे? जेव्हा स्वर्ग किंवा संपूर्ण विश्वही त्यास सामावून घ्यायला अपुरे आहे. तेव्हा त्याच्यासाठी म्हणून मंदिर बांधणारा मी कोण? मी आपला त्याच्याप्रीत्यर्थ धूप जाळण्यासाठी फक्त एक ठिकाण बांधू शकतो एवढेच.
7 Przetoż teraz poślij mi męża umiejętnego, coby umiał robić złotem, i srebrem, i miedzią, i żelazem, i szarłatem, i karmazynem, i hijacyntem, a coby umiał rysować i rzezać z innymi umiejętnymi, którzy przy mnie są w Judzie i w Jeruzalemie, których sporządził Dawid, ojciec mój.
७तर, सोने, चांदी, पितळ आणि लोखंड या धातुकामात प्रवीण असा कारागिर तुम्ही माझ्याकडे पाठवून दिलात तर बरे. त्यास जांभळे, किरमिजी आणि निळे वस्त्र तयार करता यावे. कोरीव कामाचेही त्यास ज्ञान असावे. माझ्या पित्याने, दावीदाने निवडलेल्या इतर कारागिरांबरोबर तो इथे यहूदा आणि यरूशलेमेत काम करील.
8 Poślij mi też drzewa cedrowego, jodłowego, i almugimowego z Libanu; bo ja wiem, iż słudzy twoi umieją wyrąbywać drzewo na Libanie; a oto słudzy moi będą z sługami twoimi,
८लबानोनातून माझ्यासाठी गंधसरू, देवदार आणि रक्तचंदन यांचे लाकूड इत्यादी पाठवावे. लबानोनातील तुझे लाकूडतोडे चांगले अनुभवी आहेत हे मला माहीत आहे तुमच्या सेवकांसमवेत माझे सेवक राहतील.
9 Aby mi wygotowali drzewa co najwięcej; bo dom, który ja budować chcę, wielki ma być na podziw.
९मी बांधायला घेतलेले मंदिर चांगले विशाल आणि सुंदर होणार असल्यामुळे मला मोठ्या प्रमाणावर लाकूड लागणार आहे.
10 A oto robotnikom sługom twoim, którzy mają wycinać drzewo, dam pszenicy mełtej korcy dwadzieścia tysięcy, i jęczmienia korcy dwadzieścia tysięcy, i wina wiader dwadzieścia tysięcy, i oliwy bareł dwadzieścia tysięcy.
१०लाकडांसाठी वृक्षतोड करणाऱ्या तुमच्या सेवकांना मी पुढीलप्रमाणे मोबदला देईन: वीस हजार कोर गहू, वीस हजार कोर जव, वीस हजार बुधले द्राक्षरस आणि वीस हजार बुधले तेल.”
11 Tedy odpowiedział Hiram, król Tyrski, przez pisanie, które posłał do Salomona: Iż umiłował Pan lud swój, postanowił cię nad nim królem.
११मग सोराचा राजा हिरामाने शलमोनाला लिखीत उत्तर पाठवले. त्यामध्ये त्याने असा निरोप पाठवला की, शलमोना, परमेश्वराचे आपल्या प्रजेवर प्रेम आहे. म्हणून तर त्याने तुला त्यांचा राजा म्हणून नेमले.
12 I przydał Hiram mówiąc: Błogosławiony Pan, Bóg Izraelski, który uczynił niebo i ziemię, który dał Dawidowi królowi syna mądrego, i umiejętnego, rozumnego, i roztropnego, aby budował dom Panu, i pałac królewski dla siebie.
१२हिराम पुढे म्हणाला, “इस्राएलाचा परमेश्वर देव धन्य असो. स्वर्ग आणि पृथ्वीची निर्मिती त्यानेच केली. दावीद राजाला त्याने सूज्ञ पुत्र दिला आहे. शलमोना, तू सूज्ञ आणि समजदार आहेस. तू परमेश्वरासाठी मंदिर तसेच स्वतःसाठी राजवाडा बांधण्याची तयारी करीत आहेस.
13 Posłałem ci tedy męża mądrego, i umiejętnego, i roztropnego, Chirama Abijego.
१३हूरामबी नावाचा एक कुशल व विवेकी कारागीर मी तुझ्याकडे पाठवतो.
14 Syna niewiasty z córek Danowych, którego ojciec był obywatel Tyrski; który umiał robić złotem, srebrem, miedzią, żelazem, kamieniem, i drzewem, i szarłatem, hijacyntem ze lnu subtelnego, i jedwabiu karmazynowego; który umie rzezać wszelkie rzezanie, i wymyślić rozmaitą misterną robotę, którą mu zadadzą z mądrymi twymi, i z mądrymi pana mego Dawida, ojca twego.
१४त्याची आई दान वंशातील असून त्याचे पिता सोर नगरातले होते. हा कारागीर सोने, चांदी, पितळ, लोखंड, दगड आणि लाकूड यांच्या कामात तरबेज आहे. जांभळे, निळे आणि अत्यंत तलम असे उंची किरमिजी वस्त्र करण्यातही तो निपुण आहे. त्यास सांगितलेल्या कोणत्याही गोष्टीची योग्य नक्षी, कोरून काढू शकतो. तो तुझ्या आणि तुझ्या पित्याच्या, माझा स्वामी दावीद याच्या कसबी कारागिरांबरोबर काम करील.
15 Pszenicę tylko, i jęczmień, oliwę, i wino, co obiecał pan mój, niech przyśle sługom swym.
१५माझ्या स्वामींनी गहू, जव, तेल आणि द्राक्षरस देण्याचे कबूल केले आहे ते सर्व आमच्या नोकरांना द्यावे.
16 A my nawycinamy drzewa z Libanu, ileć go będzie potrzeba, i spuścimyć na tratwach po morzu do Joppy, a ty je każesz zwieść do Jeruzalemu.
१६लबानोनातून तुम्हास हवे तितके लाकूड झाडे तोडून पाठवू. ओंडक्यांचे तराफे करून आम्ही ते इथून समुद्रमार्गे यापो येथे पोहोचते करु. तेथून ते तुम्ही यरूशलेमेला न्यावे.”
17 Obliczył tedy Salomon wszystkich cudzoziemców, którzy byli w ziemi Izraelskiej po onem policzeniu, którem ich policzył Dawid, ojciec jego, i znalazło się ich sto i pięćdziesiąt tysięcy, i trzy tysiące i sześć set.
१७शलमोनाचा पिता दावीद याने जशी इस्राएलातील सर्व उपऱ्या लोकांची गणना केली होती, त्याप्रमाणे शलमोनाने गणती केली. या गणनेत त्यांना एक लाख त्रेपन्न हजार सहाशे उपरे लोक मिळाले.
18 A postanowił z nich siedmdziesiąt tysięcy, co ciężary nosili, a ośmdziesiąt tysięcy tych, co wyrąbywali na górze, a trzy tysiące i sześć set przystawów nad robotami ludu.
१८शलमोनाने त्यापैकी सत्तर हजार जणांना ओझी वाहायला निवडले आणि ऐंशी हजार लोकांस डोंगरातून दगड काढायच्या कामासाठी निवडले. उरलेल्या तीन हजार सहाशे उपऱ्यांना या काम करणाऱ्यांवर देखरेख करणारे मुकादम म्हणून नेमले.