< I Tesaloniczan 2 >
1 Albowiem wy sami wiecie, bracia! że przyjście nasze do was nie było próżne;
१बंधूनो, तुम्हामध्ये आमचे येणे व्यर्थ झाले नाही, हे तुम्हासही माहीत आहे.
2 Ale chociażeśmy i przedtem cierpieli, i zelżeni byli (jako wiecie) w mieście Filipach, wszakże bezpiecznieśmy sobie poczęli w Bogu naszym, w opowiadaniu u was Ewangielii Bożej z wielkim bojem,
२परंतु पूर्वी फिलिप्पैत आम्ही दुःख भोगून व अपमान सोसून, हे तुम्हास माहीतच आहे, मोठा विरोध असता, देवाची सुवार्ता तुम्हास सांगण्याचे धैर्य आपल्या देवाकडून आम्हास मिळाले.
3 Albowiem napominanie nasze nie było z oszukania, ani z nieczystości, ani z zdrady;
३कारण आमचा बोध फसवण्याने अथवा अशुद्धपणा ह्यांतून निर्माण झालेला नसून कपटाचा नव्हता;
4 Ale jako nas Bóg sobie upodobał, żeby nam była zwierzona Ewangielija, tak mówimy, nie jako ludziom się podobając, ale Bogu, który sobie upodobywa serca nasze.
४तर सुवार्ता आमच्यावर सोपवून देण्यास देवाने आम्हास पारखून पसंत केल्यामुळे आम्ही ती सांगतो; आम्ही मनुष्यांना खूश करण्यासारखे न बोलता आमची अंतःकरणे पारखणारा देव हा ज्यामुळे खूश होईल तसे बोलतो.
5 Albowiem nigdyśmy nie używali mowy pochlebnej, jako wiecie; aniśmy pod zasłoną czego łakomstwu dogadzali; Bóg jest świadkiem;
५कारण आम्ही खुशामत करणारे भाषण कधी करीत नव्हतो, हे तुम्हास माहीत आहे तसेच लोभ ठेवून ढोंगीपणाने वागलो नाही. देव साक्षी आहे;
6 Aniśmy szukali od ludzi chwały, ani od was, ani od inszych, mogąc wam być ciężkimi, jako Apostołowie Chrystusowi;
६आम्ही ख्रिस्ताचे प्रेषित असल्यामुळे जरी आम्हास आपला विशेष अधीकार चालवता आला असता तरी आम्ही मनुष्यांपासून, तुम्हापासून किंवा दुसऱ्यांपासून गौरव मिळविण्याची खटपट करीत नव्हतो;
7 Aleśmy byli skromnymi między wami, jako gdy mamka odchowuje dziatki swoje.
७तर आपल्या मुलांबाळांचे पालनपोषण करणाऱ्या आईसारखे आम्ही तुम्हामध्ये सौम्य वृत्तीचे होतो.
8 Tak wam życzliwymi będąc, gotowiśmy byli użyczyć wam nie tylko Ewangielii Bożej, ale też i dusz naszych, dlatego iżeście nam miłymi byli.
८आम्हास तुमच्याविषयी कळकळ वाटत असल्यामुळे आम्ही तुम्हास केवळ देवाच्या सुवार्तेचे दानच देण्यास नव्हे, तर तुम्हावरील आमच्या अत्यंत प्रीतीमुळे तुम्हाकरिता आपला जीवही देण्यास तयार होतो.
9 Albowiem pamiętajcie, bracia! pracę naszę i trudy, gdyż w nocy i we dnie robiąc, abyśmy żadnego z was nie obciążyli, kazaliśmy u was Ewangielię Bożą.
९बंधूनो, आमचे श्रम व कष्ट याची आठवण तुम्हास आहे; तुम्हातील कोणाला आमचा भार होऊ नये म्हणून आम्ही रात्रंदिवस उद्योग करून तुम्हापुढे देवाच्या सुवार्तेची घोषणा केली.
10 Wyście świadkami i Bóg, żeśmy świętobliwie i sprawiedliwie, i bez nagany żyli między wami, którzyście uwierzyli.
१०तुम्हा विश्वास ठेवणाऱ्यांत आम्ही पवित्रतेने, नीतिने व निर्दोषतेने कसे वागलो ह्याविषयी तुम्ही साक्षी आहात व देवही आहे
11 Jakoż wiecie, żeśmy każdego z was, jako ojciec dziatki swoje, napominali i cieszyli,
११तुम्हास ठाऊकच आहे की, पिता आपल्या मुलांना करतो तसे आम्ही तुम्हापैकी प्रत्येकाला बोध करीत, धीर देत व आग्रहपूर्वक विनंती करीत सांगत होतो की,
12 I oświadczali się, abyście chodzili godnie Bogu, który was powołał do swego królestwa i do chwały.
१२जो देव आपल्या राज्यात व गौरवात तुम्हास पाचारण करीत आहे त्यास शोभेल असे तुम्ही चालावे.
13 Przetoż i my dziękujemy Bogu bez przestanku, iż przyjąwszy słowo Boże, któreście słyszeli od nas, przyjęliście nie jako słowo ludzkie, ale (jako w prawdzie jest) jako słowo Boże, które też skuteczne jest w was, którzy wierzycie.
१३या कारणांमुळे आम्ही सुद्धा देवाची निरंतर उपकारस्तुती करितो की, तुम्ही आम्हापासून ऐकलेले देवाचे वचन स्वीकारले ते मनुष्यांचे म्हणून नव्हे तर देवाचे म्हणून स्वीकारले आणि खरे पहाता ते असेच आहे; ते तुम्हा विश्वास ठेवणाऱ्यात कार्य करीत आहे.
14 Albowiem wy, bracia! staliście się naśladowcami zborów Bożych, które są w żydowskiej ziemi, w Chrystusie Jezusie; boście i wy też cierpieli od ziomków waszych, jako i oni od Żydów.
१४बंधूंनो, यहूदीयातील देवाच्या ज्या मंडळ्या ख्रिस्त येशूच्या ठायी आहेत त्यांचे अनुकरण करणारे झाला, म्हणजे त्यांनी यहूदयांच्या हातून जी दुःखे सोसली तशीच तुम्हीही आपल्या स्वदेशीयांच्या हातून सोसली;
15 Którzy i Pana Jezusa zabili, i swoich własnych proroków, i nas wygnali, a Bogu się nie podobają, i wszystkim ludziom są przeciwni,
१५त्या यहूद्यांनी प्रभू येशूला व संदेष्ट्यांनाही जिवे मारिले आणि आमचा छळ करून आम्हास बाहेर घालविले; ते देवाला संतोषवीत नाहीत व सर्व मनुष्यांचेही विरोधी झाले आहेत;
16 Zabraniając nam, żebyśmy nie mówili poganom, żeby byli zbawieni, aby tak zawsze dopełniali grzechów swoich; albowiem przyszedł na nich gniew aż do końca.
१६परराष्ट्रीयांचे तारण व्हावे म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर बोलावे याची ते मनाई करतात; हे ह्यासाठी की, त्यांनी आपल्या पापांचे माप सर्वदा भरीत रहावे; त्यांच्यावरील देवाच्या क्रोधाची परिसीमा झाली आहे.
17 Lecz my, bracia! będąc pozbawieni was na chwileczkę obliczem, nie sercem, tem pilniejśmy się starali oglądać oblicze wasze z wielką żądnością.
१७बंधूनो, आम्ही हृदयाने नव्हे तर देहाने तुम्हापासून थोडा वेळ वेगळे झाल्याने आम्हास विरह दुःख होऊन तुमचे तोंड पाहण्याचा आम्ही फार उत्कंठेने विशेष प्रयत्न केला;
18 Dlategośmy chcieli przyjść do was (zwłaszcza ja Paweł) i raz, i drugi; ale nam przekaził szatan.
१८ह्यांमुळे आम्ही तुम्हाकडे येण्याची इच्छा धरली; मी पौलाने एकदा नाही तर दोनदा इच्छिले परंतु सैतानाने आम्हास अडविले.
19 Albowiem któraż jest nadzieja nasza, albo radość, albo korona chluby? Izali nie wy przed oblicznością Pana naszego, Jezusa Chrystusa w przyjście jego?
१९कारण आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या समक्षतेत, त्याच्या येण्याच्या वेळेस आमची आशा किंवा आमचा आनंद किंवा आमच्या अभिमानाचा मुकुट काय आहे? तुम्हीच आहात ना?
20 Wy zaiste jesteście chwałą naszą i radością.
२०कारण तुम्ही आमचे गौरव व आमचा आनंद आहात.