< I Samuela 26 >
1 I przyszli Zyfejczycy do Saula do Gabaa, a mówili: Izali się nie kryje Dawid na pagórku Hachila, przeciw Jesymon?
१जीफी लोक शौलाकडे गिबा येथे येऊन म्हणाले, “यशीमोनासमोर हकीला डोंगरात दावीद लपला आहे की नाही?”
2 Ruszył się tedy Saul, i ciągnął na puszczą Zyf, a z nim trzy tysiące mężów przebranych z Izraela, aby szukał Dawida na puszczy Zyf.
२तेव्हा शौल उठला व आपल्याबरोबर इस्राएलाच्या तीन हजार निवडक मनुष्यांना घेऊन दावीदाचा शोध करायला जीफ रानात गेला.
3 I położył się Saul obozem na pagórku Hachila, które jest przeciw Jesymon podle drogi; a Dawid mieszkał na puszczy, i dowiedział się, że przyciągnął Saul za nim na puszczą,
३शौलाने यशीमोनासमोरील मार्गाजवळ हकीला डोंगरावर तळ दिला; तेव्हा दावीद रानात राहत होता आणि त्याने पाहिले की आपला पाठलाग करायला शौल रानात आला आहे.
4 Bo posławszy Dawid szpiegi dowiedział się, że przyciągnął Saul zapewne.
४म्हणून दावीदाने हेर पाठवले आणि शौल खचित आला आहे असे त्यास समजले.
5 Przetoż wstał Dawid, i przyszedł aż ku miejscu, gdzie się położył obozem Saul; i upatrzył Dawid miejsce, gdzie spał Saul, i Abner, syn Nera, hetman wojska jego; bo Saul spał w obozie, a lud leżał około niego.
५मग दावीद उठून शौलाने तळ दिला होता त्या ठिकाणावर आला आणि जेथे शौल व त्याचा सेनापती नेराचा मुलगा अबनेर हे निजले होते ते ठिकाण दावीदाने पाहिले; शौल तर छावणीत निजला होता व त्याच्यासभोवती लोकांनी तळ दिला होता.
6 I odpowiedział Dawid, a rzekł do Achimelecha Hetejczyka, i do Abisajego, syna Sarwii, brata Joabowego, mówiąc: Któż pójdzie ze mną do Saula do obozu? Odpowiedział Abisaj: Ja z tobą pójdę.
६तेव्हा अहीमलेख हित्ती व सरूवेचा मुलगा अबीशय यवाबाचा भाऊ यांना दावीदाने उत्तर देऊन म्हटले, “छावणीत शौलाकडे खाली माझ्याबरोबर कोण येईल?” तेव्हा अबीशय म्हणाला, “मी तुझ्याबरोबर खाली येईन.”
7 A tak przyszedł Dawid i Abisaj do ludu w nocy, a oto, Saul leżąc spał w obozie, a włócznia jego była utkniona w ziemi u głowy jego; Abner też z ludem leżeli około niego.
७मग दावीद व अबीशय रात्री लोकांजवळ गेले आणि पाहा शौल छावणीत निजला आहे व त्याचा भाला त्याच्या उशाजवळ भूमीत रोवलेला व त्याच्यासभोवती अबनेर व लोक निजलेले आहेत.
8 Tedy rzekł Abisaj do Dawida: Zamknął dziś Bóg nieprzyjaciela twego w ręce twoje, a teraz niech go przebije proszę włócznią ku ziemi raz, a więcej nie powtórzę.
८तेव्हा अबीशय दावीदाला म्हणाला, “आज परमेश्वराने तुझा शत्रू तुझ्या हाती दिला आहे; तर आता मी तुला विनंती करतो मला भाल्याने एकदाच घाव मारून त्यास भूमीवर ठार करून दे, मी त्यास दुसरा घाव मारणार नाही.”
9 Ale rzekł Dawid do Abisajego: Nie zabijaj go; bo któż ściągnąwszy rękę swą na pomazańca Pańskiego, niewinnym będzie?
९पण दावीद अबीशयाला म्हणाला, “त्यांचा वध करू नकोस कारण परमेश्वराच्या अभिषिक्तावर आपला हात टाकून कोण निर्दोष राहील?”
10 Nadto rzekł Dawid: Jako żyje Pan, że jeźli go Pan nie zabije, albo dzień jego nie przyjdzie, aby umarł, albo na wojnę wyjechawszy, nie zginie,
१०दावीद म्हणाला, “परमेश्वर जिवंत आहे; परमेश्वर त्यास मारील किंवा त्याचा मरण्याचा दिवस येईल किंवा तो खाली लढाईत जाऊन नष्ट होईल.
11 Tedy uchowaj mię Panie, abym miał ściągnąć rękę moję na pomazańca Pańskiego; ale weźmij proszę włócznią, która jest u głów jego, i kubek od wody, a odejdźmy.
११मी आपला हात परमेश्वराच्या अभिषिक्तावर टाकावा असे परमेश्वराने माझ्याकडून घडू देऊ नये; परंतु आता मी तुला विनंती करतो की, तू त्याच्या उशाजवळचा भाला व पाण्याचा लोटा घे; मग आपण जाऊ.”
12 Tedy wziął Dawid włócznią, i kubek od wody, który był u głów Saulowych, i odeszli, a nie był, ktoby widział, ani ktoby wiedział, ani ktoby się ocucił, ale wszyscy spali; bo sen twardy od Pana przypadł był na nie.
१२तेव्हा शौलाच्या उशाजवळून भाला व पाण्याचा लोटा हे दावीदाने घेतले मग कोणाला न दिसता व कोणाला न कळता व कोणी जागा न होता ते निघून गेले कारण ते सर्व झोपेत होते. परमेश्वराकडून त्याच्यांवर गाढ झोप आली होती.
13 I przyszedł Dawid na drugą stronę, i stanął na wierzchu góry z daleka, a był plac wielki między nimi.
१३नंतर दावीद पलीकडे डोंगराच्या शिखरावर जाऊन दूर उभा राहिला आणि त्याच्यामध्ये मोठे अंतर होते;
14 I zawołał Dawid na lud, i na Abnera, syna Nerowego, mówiąc: Nie ozwieszże się Abnerze? I odpowiadając Abner, rzekł: Któżeś ty, co wołasz na króla?
१४तेव्हा दावीदाने लोकांस व नेराचा मुलगा अबनेर याला हाक मारली. तो म्हणाला, “अबनेरा तू उत्तर करीत नाहीस काय?” तेव्हा अबनेराने उत्तर देऊन म्हटले, “राजाला हाक मारणारा असा तू कोण आहेस?”
15 I rzekł Dawid do Abnera: Azaż ty nie mąż? A któż jakoś ty w Izraelu? przeczżeś tedy nie strzegł króla, pana twego? bo przyszedł jeden z ludu, chcąc zabić króla, pana twego.
१५मग दावीद अबनेराला म्हणाला, “तू वीर पुरुष नाहीस काय आणि इस्राएलात तुझ्यासारखा कोण आहे? तर तू आपला प्रभू राजा याच्यावर पहारा का केला नाही? कारण लोकातला कोणीएक तुझा प्रभू राजा याचा घात करायला आला होता.
16 Nie dobra to, coś uczynił. Jako żywy Pan, żeście winni śmierci, którzyście nie strzegli pana waszego, pomazańca Pańskiego. A teraz, patrz, kędy jest włócznia królewska, i kubek od wody, co był w głowach jego?
१६ही जी गोष्ट तू केली ती बरी नाही; परमेश्वर जिवंत आहे. तुम्ही आपला प्रभू परमेश्वराचा अभिषिक्त याला राखले नाही, म्हणून तुम्ही मरायला योग्य आहा. तर आता पाहा राजाचा भाला व पाण्याचा लोटा त्याच्या उशाजवळ होता तो कोठे आहे?”
17 Poznał tedy Saul głos Dawida, i rzekł: Twójże to głos, synu mój Dawidzie? Odpowiedział Dawid: Głos to mój, królu, panie mój.
१७तेव्हा शौल दावीदाची वाणी ओळखून म्हणाला, “माझ्या मुला दावीदा ही तुझी वाणी आहे काय?” दावीद म्हणाला, “माझ्या प्रभू राजा, ही माझी वाणी आहे.”
18 Nadto rzekł: Czemuż pan mój prześladuje sługę swego? bo cóżem uczynił? a co jest złego w ręce mojej?
१८तो म्हणाला, “माझा प्रभू आपल्या दासाच्या पाठीस का लागला आहे? मी तर काय केले आहे? माझ्या हाती काय वाईट आहे?
19 Przetoż teraz niech posłucha proszę król, pan mój, słów sługi swego; jeźli cię Pan pobudził przeciwko mnie, niech powonia ofiary; ale jeźli synowie Judzcy, przeklęci są przed Panem, którzy mię dziś wygnali, abym nie mieszkał w dziedzictwie Pańskiem, jakoby rzekli: Idź, służ bogom cudzym.
१९तर आता मी तुम्हास विनंती करतो माझ्या प्रभू राजाने आपल्या दासाचे बोलणे ऐकावे: परमेश्वराने तुम्हास माझ्यावर चेतवले असले तर त्याने अर्पण मान्य करावे. परंतु मनुष्याच्या संतानांनी चेतवले असले, तर ती परमेश्वराच्यासमोर शापित होवोत. कारण आज मला परमेश्वराच्या वतनात वाटा मिळू नये म्हणून त्यांनी मला बाहेर लावून म्हटले की, जा अन्य देवांची सेवा कर.
20 A teraz niech nie będzie wylana krew moja na ziemię przed obliczem Pańskiem; bo wyszedł król Izraelski szukać pchły jednej, jakoby też kto gonił kuropatwę po górach.
२०तर आता माझे रक्त परमेश्वराच्या समक्षतेपासून दूर भूमीवर पडू नये; कारण जसा कोणी डोंगरावर तितराची शिकार करतो तसा, एका पिसवेचा शोध करण्यास इस्राएलाचा राजा निघून आला आहे.”
21 Tedy rzekł Saul: Zgrzeszyłem. Wróćże się, synu mój Dawidzie, boć już nic złego nie uczynię więcej, ponieważ droga była dusza moja w oczach twoich dnia tego; otom głupio uczynił, i zbłądziłem nader bardzo.
२१तेव्हा शौल म्हणाला, “मी पाप केले आहे; माझ्या मुला दावीदा माघारा ये; माझा जीव आज तुझ्या दृष्टीने मोलवान होता, म्हणून मी यापुढे तुझे वाईट करणार नाही; पाहा मी मूर्खपणाने वागून फार अपराध केला आहे.”
22 A odpowiadając Dawid rzekł: Oto włócznia królewska; niech sam przyjdzie kto z sług, a weźmie ją.
२२मग दावीदाने असे उत्तर केले की, “हे राजा पाहा हा भाला, तरुणातील एकाने इकडे येऊन तो घ्यावा.
23 A Pan niech odda każdemu sprawiedliwość jego, i wiarę jego. Albowiem podał cię był Pan dziś w ręce moje; alem nie chciał ściągnąć ręki mojej na pomazańca Pańskiego.
२३परमेश्वर प्रत्येक मनुष्यास त्याचा न्याय व त्याचे विश्वासूपण याप्रमाणे परत करो. कारण आज परमेश्वराने तुम्हास माझ्या हाती दिले असता मी आपला हात परमेश्वराच्या अभिषिक्तावर टाकला नाही.
24 Przetoż jako dziś poważona była dusza twoja w oczach moich, tak niech będzie poważona dusza moja w oczach Pańskich, a niech mię wyrwie Pan ze wszego ucisku.
२४पाहा जसा तुमचा जीव माझ्या दृष्टीने मोलवान होता, तसा माझा जीव परमेश्वराच्या दृष्टीने मोलवान होवो; आणि तो सर्व संकटातून सोडवो.”
25 I rzekł Saul do Dawida: Błogosławionyś ty, synu mój Dawidzie; tak czyniąc dokażesz, a tak się wzmacniając, mocnym będziesz. Odszedł potem Dawid w drogę swą, a Saul się wrócił na miejsce swoje,
२५तेव्हा शौल दावीदाला म्हणाला, “माझ्या मुला दावीदा तू आशीर्वादित हो” तू मोठी कार्ये करशील व प्रबल होशील. मग दावीद आपल्या वाटेने गेला आणि शौलही आपल्या ठिकाणी परत गेला.