< I Kronik 4 >
1 Synowie Judowi: Fares, Hesron, i Charmi, i Hur, i Sobal.
१यहूदाच्या मुलांची नावे पेरेस, हेस्रोन, कर्मी, हूर आणि शोबाल.
2 A Rejasz, syn Sobalowy spłodził Jahata, a Jahat spłodził Achuma, i Laada. Teć są rodzaje Zaratego.
२शोबालचा पुत्र राया त्याचा पुत्र यहथ. यहथाचे पुत्र अहूमय आणि लहद. सराथी लोक म्हणजे या दोघांचे वंशज होत.
3 Ci też są z ojca Etama: Jezreel, i Jesema, i Idbas; a imię siostry ich Selelfuni.
३इज्रेल, इश्मा व इद्बाश ही एटामाची पुत्र. त्यांच्या बहिणीचे नाव हस्सलेलपोनी होते.
4 A Faunuel ojciec Giedory, i Ezer ojciec Hosy. Cić są synowie Hura, pierworodnego Efraty, ojca Betlehemczyków.
४पनुएलाचा पुत्र गदोर आणि एजेरचा पुत्र हूशा ही हूरची पुत्र. हूर हा एफ्राथाचा प्रथम जन्मलेला पुत्र आणि बेथलेहेमाचा बाप होता.
5 A Assur, ojciec Tekui, miał dwie żony: Chelę i Naarę.
५अश्शूरचा पुत्र तकोवा. तकोवाला दोन स्त्रिया होत्या. हेला आणि नारा.
6 I urodziła mu Naara Achusama, i Hefera, i Temana, i Achastara. Cić są synowie Naary.
६नाराला अहुज्जाम, हेफेर, तेमनी आणि अहष्टारी हे पुत्र झाले.
7 Synowie zasię Cheli: Seret, Jesochar, i Etnan.
७सेरथ, इसहार, एथ्रान हे हेलाचे पुत्र.
8 A Kos spłodził Anuba, i Hasoboba, i dom Acharchela, syna Harumy.
८हक्कोसाने आनूब आणि सोबेबा यांना जन्म दिला. हारुमचा पुत्र अहरहेल याच्या घराण्यांचे कुळही कोसच होते.
9 A Jabes był zacniejszy nad braci swych, któremu matka jego dała imię Jabes, mówiąc: Bom go w boleści urodziła.
९याबेस आपल्या भावांपेक्षा फार आदरणीय होता. त्याच्या आईने त्याचे नाव याबेस ठेवले. ती म्हणाली, “कारण याच्यावेळी मला असह्य प्रसववेदना झाल्या.”
10 I wzywał Jabes Boga Izraelskiego, mówięc: Jeźli błogosławiąc błogosławić mi będziesz, a rozszerzysz granice moje, a będzie ręka twoja ze mną, a wybawisz mię od złego, abym utrapiony nie był. I wypełnił to Bóg, o co go prosił.
१०याबेसाने इस्राएलाच्या देवाची प्रार्थना केली. याबेस म्हणाला, “तू खरोखर मला आशीर्वाद देशील. माझ्या प्रदेशाच्या सीमा वाढविशील. माझ्यावर संकट येऊन मी दुःखीत होऊ नये म्हणून तुझा हात माझ्यावर राहील तर किती चांगले होईल.” आणि देवाने त्याची विनंती मान्य केली.
11 A Chelub, brat Sucha, spłodził Mechyra; ten jest ojcem Estona.
११शूहाचा भाऊ कलूब. कलूबचा पुत्र महीर. महीरचा पुत्र एष्टोन.
12 A Eston spłodził Betrafa, i Paseacha, i Techynna, ojca miasta Nahas. Cić są mężowie Rechy.
१२बेथ-राफा, पासेहा आणि तहिन्ना ही एष्टोनचे पुत्र. तहिन्नाचा पुत्र ईर-नाहाश. हे रेखा येथील लोक होत.
13 A synowie Kienazowi: Otonijel, i Seraja; a synowie Otonijelowi: Hatat i Meanataj.
१३अथनिएल आणि सराया हे कनाजचे पुत्र. हथथ आणि म्योनोथाय हे अथनिएलाचा पुत्र.
14 A Meanataj spłodził Ofra, a Serajasz spłodził Joaba, ojca w dolinie mieszkających rzemieślników; bo rzemieślnicy byli.
१४म्योनोथायने अफ्राला जन्म दिला आणि सरायाने यवाबला जन्म दिला. यवाब हा गे-हराशीम जे कुशल कारागीराचे मूळपुरुष होय. तेथील लोक कुशल कारागीर असल्यामुळे त्यांनी हे नाव घेतले.
15 Synowie zasię Kaleba, syna Jefumi: Hyru, Ela, i Nahain; a syn Ela jest Kienaz.
१५यफुन्ने याचा पुत्र कालेब. कालेबचे पुत्र म्हणजे इरु, एला आणि नाम. एलाचा पुत्र कनाज.
16 A synowie Jehaleleela: Zyf i Zyfa, Tyryja, i Azarel.
१६जीफ, जीफा, तीऱ्या आणि असरेल हे यहल्ललेलाचे पुत्र.
17 A synowie Ezry: Jeter, i Mered, i Efer, i Jalon; a żona Merodowa urodziła Miryjama, i Samaja, i Isbacha, ojca Estemoa.
१७एज्राचे पुत्र येथेर व मरद, येफेर व यालोन. मेरेदाची मिसरी पत्नीने मिर्याम, शम्माय आणि एष्टमोवाचा पिता इश्बह यांना जन्म दिला.
18 Żona też jego Judaja urodziła Jereda, ojca Giedor, i Hebera, ojca Socho, i Jekutyjela, ojca Zanoach. Cić są synowie Betii, córki Faraonowej, którą był pojął Mered.
१८त्याच्या यहूदी पत्नीला गदोराचा पिता येरेद, सोखोचा पिता हेबेर आणि जानोहाचा पिता यकूथीएल हे झाले. हे बिथ्याचे पुत्र होते, फारोची मुलगी बिथ्या जिच्याशी मेरेदाने लग्न केले होते.
19 A synowie żony Hodyjaszowej, siostry Nahama, ojca Ceili: Garmi i Estemoa Mahatczyk.
१९होदीयाची पत्नी ही नहमाची बहीण होती. हिचे पुत्र गार्मी कईला आणि माकाथी एष्टमोवा यांचे पिता होते.
20 A synowie Symonowi: Amnon, i Rynna, Benchanan i Tylon; a synowie Isy: Zochet i Bensochet.
२०अम्नोन, रिन्ना, बेन-हानान, तिलोन हे शिमोनाचे पुत्र. इशीचे पुत्र जोहेथ आणि बेन-जोहेथ.
21 Synowie Seli, syna Judowego: Her, ojciec Lecha i Laada, ojciec Maraa; i rodzaje domów tych, którzy robili około bisioru w domu Asbeat,
२१यहूदाचा पुत्र शेला याच्यापासून लेखाचा पिता एर, मारेशाचा पिता लादा, आणि तलम कापडाचे कसबाचे काम करणारे अश्बेच्या घराण्यातली ही कुळे झाली.
22 I Joakim i mężowie Chozeby, i Joaz i Saraf, którzy panowali w Moab, i Jasubi Lechem; ale te rzeczy są dawne.
२२तसेच त्याच्यापासून योकीम, कोजेबा येथील लोक योवाश आणि मवाबीवर अधिकार चालवणारे साराफ व याशूबी-लेहेम हे जन्मले. फार जुन्या बातमीतून ही नोंद घेतली आहे.
23 Cić są garncarze, którzy mieszkali w sadach i między płotami, którzy tam przy królu dla robót jego mieszkali.
२३शेलाचे वंशज हे कुंभार असून ते नेताईम आणि गदेरा येथे राजाच्या चाकरीत होते.
24 Synowie Symeonowi: Namuel, i Jamin, i Jaryb, Zera, Saul.
२४नमुवेल, यामीन, यरिब, जेरह, शौल हे शिमोनाचे पुत्र.
25 Sallum syn jego, Mabsam syn jego, Misma syn jego.
२५शौलाचा पुत्र शल्लूम. शल्लूमचा पुत्र मिबसाम. मिबसामचा पुत्र मिश्मा.
26 A synowie Mismy: Hamuel syn jego, Zachur syn jego, Semej syn jego.
२६मिश्माचा पुत्र हम्मूएल. हम्मूएलचा पुत्र जक्कूर. जक्कूरचा पुत्र शिमी.
27 Ten Semej miał synów szesnaście, i córek sześć; ale bracia jego nie mieli wiele synów, tak, że wszystkiej rodziny ich nie było tak wiele, jako synów Judowych.
२७शिमीला सोळा मुले आणि सहा मुली होत्या. पण शिमीच्या भावांना फारशी पुत्र बाळे झाली नाहीत. यहूदातील घराण्यांप्रमाणे त्यांचे घराणे वाढले नाही.
28 I mieszkali w Beerseba i w Molada, i w Hasersual,
२८शिमीच्या वंशजातील लोक बैर-शेबा, मोलादा व हसर-शुवाल.
29 I w Bela, i w Asem, i w Etolad,
२९बिल्हा, असेम, तोलाद,
30 I w Betul, i w Horma, i w Sycelegu,
३०बथुवेल, हर्मा सिकलाग,
31 I w Bet Marchabot, i w Hasersusa, i w Betbirze, i w Saaraim. Te miasta ich były, póki królował Dawid.
३१बेथ-मर्का-बोथ, हसर-सुसीम, बेथ-बिरी व शाराइम येथे राहत होते. दावीदाच्या कारकीर्दीपर्यंत ही त्यांची नगरे होती.
32 A wsi ich były: Etam, i Hain, Remnon, i Tochen i Asan przy tych pięciu miastach;
३२त्यांचे गांव एटाम, अईन, रिम्मोन, तोखेन आणि आशान अशी या पाच नगरांची नावे.
33 I wszystkie wsi ich, które były około tych miast aż do Baal; teć były mieszkaniem ich według narodu ich.
३३बालापर्यंत त्याच नगरांच्या आसपासच्या खेड्यापाड्यांमधूनही ते राहत होते. आपल्या वंशावळींची नोंदही त्यांनीच ठेवली.
34 A Mosobab, i Jamlech, i Josa, syn Amazyjaszowy;
३४त्यांच्या घराण्यातील वडिलाची नांवे मेशोबाब, यम्लेक, अमस्याचा पुत्र योशा,
35 I Joel, i Jehu, syn Josabijasza, syna Serajaszowego, syna Asyjelowego;
३५योएल, येहू हा योशिब्याचा पुत्र, सरायाचा पुत्र योशिब्या, असिएलचा पुत्र सराया,
36 I Elichenaj, i Jakóba, i Jesochaja, i Asaja, i Adyjel, i Jesymijel, i Banajas;
३६एल्योवेनाय, याकोबा, यशोहाया, असाया, अदीएल, यशीमिएल, बनाया,
37 I Sysa, syn Syfy, syna Allonowego, syna Jodajaszowego, syna Symry, i syna Semajaszowego.
३७जीजा हा शिफीचा पुत्र. शिफी हा अल्लोनचा पुत्र, अल्लोन यदायाचा पुत्र, यदाया शिम्रीचा पुत्र, आणि शिम्री शमायाचा पुत्र.
38 Ci mianowani postanowieni są za książęta w narodach swych, a domy ojców ich rozmnożyły się bardzo.
३८ज्यांची नावे येथे दाखल केली आहेत ते सर्व आपआपल्या कुळांचे प्रमुख होते. त्यांच्या घराण्याची झपाटयाने वाढ झाली.
39 Przetoż ruszyli się, aby szli do Gador, aż na wschód słońca onej doliny, aby szukali paszy bydłu swemu.
३९ते खोऱ्याच्या पूर्वेला गदोरच्या सीमेबाहेरही जाऊन पोहोंचले. आपल्या कळपांना चरायला गायराने हवे म्हणून जमिनीच्या शोधात ते गेले.
40 I znaleźli obfite i wyborne pasze, a ziemię przestronną i spokojną i rodzajną; bo tam naród Chamów mieszkał przedtem.
४०त्यांना विपुल व चांगली गायराने मिळाली. तो देश मोठा असून शांत व स्वस्थ होता. हामाचे वंशज पूर्वी या भागात राहत असत.
41 Przetoż przyszedłszy ci z imienia opisani za dni Ezechyjasza, króla Judzkiego, poburzyli namioty ich i przybytki ich, które tam były znalezione; a wymordoealiich, i nie masz ich aż do dnia tego, i osiedli miejsce ich; bo tam mieli paszy dla bydeł swoich.
४१हिज्कीया यहूदाचा राजा होता त्यावेळची ते लोक गदोरपर्यंत आले आणि हामच्या लोकांशी त्यांनी लढाई केली. हामच्या लोकांच्या राहुट्या त्यांनी उद्ध्वस्त केल्या. तेथे राहणाऱ्या मूनी लोकांसही त्यांनी ठार केले. आजही या भागात मूनी नावाचे लोक आढळत नाहीत. तेव्हा या लोकांनी तेथे वस्ती केली. मेंढरांसाठी गायराने असल्याने ते तेथे राहिले.
42 A z onych synów Symeonowych niektórzy szli na górę Seir, pięć set mężów, a Faltyjasz, i Necharyjasz, i Rafajasz, i Husel, synowie Isy, byli wodzami ich.
४२शिमोनाच्या घराण्यातील पाचशे माणसे सेईर डोंगरावर त्याच्या नेत्याबरोबर गेली. इशीचे पुत्र पलट्या, निरह्या, रफाया आणि उज्जियेल हे होते.
43 I wymordowali ostatki, które były uszły z Amalekitów, a mieszkali tam aż po dziś dzień.
४३काही अमालेकी लोकांचा त्यातूनही निभाव लागला ते तेवढे अजून आहेत. त्यांना शिमोन्यांनी ठार केले. तेव्हापासून सेईरमध्ये अजूनही शिमोनी लोक राहत आहेत.