< مزامیر 93 >

خداوند سلطنت می‌کند! او خود را به جلال و قدرت و عظمت آراسته است. زمین برجای خود محکم شده و متزلزل نخواهد شد. 1
परमेश्वर राज्य करतो. त्याने ऐश्वर्याचा झगा घातला आहे; परमेश्वराने सामर्थ्याचे वस्र घातले आहे; त्याने सामर्थ्यासारखा कमरपट्टा कसला आहे. जगही असे मजबूत स्थापले आहे, ते हालवले जाऊ शकत नाही.
ای خداوند، تخت فرمانروایی تو از قدیم برقرار بوده است. تو از ازل بوده‌ای. 2
तुझे राजासन प्राचीनकाळापासून स्थापलेले आहे; तू सर्वकाळापासून आहेस.
خداوندا، سیلابها طغیان نموده و می‌خروشند. 3
हे परमेश्वरा, महासागरांनी आवाज उंचावला आहे; आपला आवाज उंचावला आहे, महासागराच्या लाटा आदळतात आणि गर्जना करतात.
اما تو که در آسمانها سلطنت می‌کنی، قویتر از تمام سیلهای خروشان و امواج شکننده دریاها هستی! 4
खूप जलांच्या, महासागराच्या प्रचंड लाटांच्या गर्जनेहून उच्चस्थानी असलेला परमेश्वर अधिक सामर्थ्यवान आहे.
ای خداوند، تمام وعده‌های تو راست است. خانهٔ تو برای همیشه با قدوسیت آراسته شده است. 5
तुझे नियम अतिसत्य आहेत; हे परमेश्वरा, तुझ्या घराला पवित्रता सदासर्वकाळ शोभते.

< مزامیر 93 >