< امثال 23 >
وقتی با حاکم سر سفره مینشینی، به خاطر بسپار با چه کسی روبرو هستی. | 1 |
१जेव्हा तू अधिपतीबरोबर जेवायला बसतोस, तेव्हा काळजीपूर्वक तुझ्यापुढे कोण आहे याचे निरीक्षण कर,
اگر آدم پرخوری هستی، کارد بر گلویت بگذار | 2 |
२आणि जर तू खादाड असलास तर आपल्या गळ्याला सुरी लाव.
و شیفتهٔ غذاهای لذیذ او نشو، زیرا ممکن است فریبی در کار باشد. | 3 |
३त्याच्या मिष्टान्नांची हाव धरू नको, कारण ती लबाडाची खाद्ये आहेत.
عاقل باش و برای به چنگ آوردن ثروت، خودت را خسته نکن، | 4 |
४श्रीमंत होण्यासाठी खूप कष्ट करू नको; तुम्ही आपल्या ज्ञानाने कोठे थांबावे समजून घे.
زیرا ثروت ناپایدار است و مانند عقاب میپرد و ناپدید میشود. | 5 |
५जेव्हा तू जो जाणारा पैसा आहे त्यावर आपली नजर लावशील, आणि अचानक ते पंख धारण करतील, आणि ते गरुडासारखे आकाशाकडे उडून जातील.
از سفرهٔ آدم خسیس غذا نخور و برای غذاهای لذیذ او حریص نباش، | 6 |
६जो कोणी तुझ्या अन्नाकडे खूप वेळ पाहतो त्या दुष्ट मनुष्याचे अन्न खाऊ नको, आणि त्याच्या मिष्टान्नाची इच्छा धरू नको,
چون او حساب هر چه را که بخوری در فکرش نگه میدارد. او تعارف میکند و میگوید: «بخور و بنوش»، اما این را از ته دل نمیگوید. | 7 |
७तो अशाप्रकारचा मनुष्य आहे जो अन्नाची किंमत मोजतो. तो तुला खा व पी! म्हणतो, परंतु त्याचे मन तुझ्यावर नाही.
لقمهای را که خوردهای استفراغ خواهی کرد و تشکرات تو بر باد خواهد رفت. | 8 |
८जे थोडेसे अन्न तू खाल्ले ते ओकून टाकशील, आणि तुमच्या शुभेच्छा व्यर्थ जातील.
آدم نادان را نصیحت نکن، چون او سخنان حکیمانه تو را خوار خواهد شمرد. | 9 |
९मूर्खाच्या कानात काही सांगू नको, कारण तो तुमच्या शहाणपणाच्या शब्दांचा तिरस्कार करील.
حدود ملک خود را که از قدیم تعیین شده، تغییر نده و زمین یتیمان را غصب نکن، | 10 |
१०जुन्या सीमेचा दगड काढू नको; किंवा अनाथाची शेती बळकावू नको.
زیرا حامی ایشان قدرتمند است و به داد آنها خواهد رسید. | 11 |
११कारण त्यांचा तारणारा समर्थ आहे; आणि तो त्यांचा कैवार घेऊन तुमच्याविरुध्द होईल.
وقتی دیگران تو را تأدیب میکنند، با تمام دل آن را بپذیر و به سخنان آموزندهشان گوش فرا ده. | 12 |
१२तू आपले मन शिक्षणाकडे आणि आपले कान ज्ञानाच्या वचनाकडे लाव.
از تأدیب کردن فرزند خویش کوتاهی نکن. چوب تنبیه او را نخواهد کشت. | 13 |
१३मुलाला शिक्षा करण्यास अवमान करू नको; कारण जर तू त्यास छडीने मारले तर तो मरणार नाही.
او را با چوب تنبیه کن که جانش را از هلاکت نجات خواهی داد. (Sheol ) | 14 |
१४जर तुम्ही त्यास छडीने मारले, तर तुम्ही त्याचा जीव अधोलाकापासून वाचवाल. (Sheol )
پسرم، اگر حکمت در دل تو باشد، دل من شاد خواهد شد | 15 |
१५माझ्या मुला, तू जर शहाणा असलास तर मग, माझ्या मनालाही आनंद होईल.
و هنگامی که دهانت به راستی سخن بگوید، وجود من به وجد خواهد آمد. | 16 |
१६तुझे ओठ योग्य ते बोलत असता, माझे अंतर्याम आनंदित होईल.
به گناهکاران حسادت نورز، بلکه اشتیاق تو اطاعت از خداوند باشد؛ | 17 |
१७तुझ्या हृदयाने पातक्यांचा हेवा करू नये, पण सारा दिवस तू सतत परमेश्वराचे भय धरीत जा.
زیرا در این صورت آیندهٔ خوبی خواهی داشت و امید تو بر باد نخواهد رفت. | 18 |
१८कारण त्यामध्ये खचित भविष्य आहे; आणि तुझी आशा तोडण्यात येणार नाही.
ای پسرم، عاقل باش و به سخنانم گوش فرا ده. در راه راست گام بردار | 19 |
१९माझ्या मुला माझे ऐक, आणि सुज्ञ हो आणि आपले मन सरळ मार्गात राख.
و با آدمهای میگسار و شکمپرست معاشرت نکن، | 20 |
२०मद्यप्यांबरोबर किंवा खादाडपणाने मांस खाणाऱ्याबरोबर मैत्री करू नकोस.
زیرا کسانی که کارشان فقط خوردن و خوابیدن است، فقیر و محتاج خواهند شد. | 21 |
२१कारण मद्य पिणारे आणि खादाड गरीब होतात, झोपेत वेळ घालवणारा चिंध्यांचे वस्त्र घालील.
نصیحت پدرت را که تو را به وجود آورده گوش بگیر و مادر پیرت را خوار مشمار. | 22 |
२२तू आपल्या जन्मदात्या पित्याचे ऐक, तुझी आई म्हातारी झाली म्हणून तिचा तिरस्कार करू नको.
در پی حقیقت باش و حکمت و ادب و فهم را کسب کن و به هیچ قیمت آنها را از دست نده. | 23 |
२३सत्य विकत घे, पण ते विकू नको; शहाणपण, शिक्षण आणि समजूतदारपणा ही विकत घे.
فرزندی درستکار و دانا باش تا مایهٔ شادی و خشنودی پدر و مادرت شوی. | 24 |
२४नीतिमानाचा पिता फार उल्लासेल, आणि सुज्ञ मुलास जन्म देणारा त्याच्याविषयी आनंदित होईल.
२५तुमच्या आई आणि वडिलांना तुमच्याबरोबर आनंदी होऊ द्या. जिने तुला जन्म दिला तिला आनंद घेऊ दे.
ای پسرم، به من گوش بده و از زندگی من سرمشق بگیر. | 26 |
२६माझ्या मुला, तू आपले हृदय मला दे, आणि तुझे डोळे माझ्या मार्गाचे निरीक्षण करोत.
بدان که زن بدکاره دام خطرناکی است. | 27 |
२७कारण वेश्या ही खोल खड्डा आहे आणि दुसऱ्या मनुष्याची पत्नी ही अरुंद खड्डा आहे.
او مانند راهزن در کمین قربانیان خود مینشیند و باعث میشود مردان زیادی خیانتکار شوند. | 28 |
२८ती चोरासारखी वाट बघत असते, आणि ती मनुष्यजातीत विश्वासघातक्यांची संख्या वाढवते.
مصیبت و بدبختی گریبانگیر چه کسی میشود؟ آن کیست که دائم نزاع به پا میکند و مینالد، بیجهت زخمی میشود و چشمانش تار میگردد؟ | 29 |
२९कोणाला हाय? कोणाला दुःख? कोणाला लढाई? कोणाला गाऱ्हाणी? कोणाला विनाकारण जखमा? कोणाला आरक्त डोळे आहे?
کسی که دائم شراب میخورد و به دنبال میگساری میرود. | 30 |
३०जे मद्य पीत रेंगाळतात, जे मिश्र मद्याचा आस्वाद घेण्याचा प्रयत्न करतात.
پس فریفتهٔ شراب قرمز نشو که در پیاله به تو چشمک میزند و سپس به نرمی از گلویت پایین میرود؛ | 31 |
३१जेव्हा मद्य लाल आहे, जेव्हा तो प्याल्यात चमकतो, आणि खाली कसा सहज उतरतो तू त्याकडे पाहू नको.
زیرا در پایان، مثل مار سمی تو را نیش خواهد زد و چون افعی تو را خواهد گزید. | 32 |
३२पण शेवटी तो सापासारखा चावतो, आणि फुरशाप्रमाणे झोंबतो.
چشمانت چیزهای عجیب و غریب خواهند دید و گرفتار وهم و خیال خواهی شد. | 33 |
३३तुझे डोळे विलक्षण गोष्टी पाहतील; आणि तुझे मन विकृत गोष्टी उच्चारील.
مانند کسی خواهی بود که بر سر دکل کشتی که دستخوش امواج دریاست خوابیده باشد. | 34 |
३४जो समुद्रामध्ये आडवा पडला त्याच्यासारखा, अथवा डोलकाठीच्या माथ्यावर जो झोपला त्याच्यासारखा तू होशील.
خواهی گفت: «مرا زدند ولی دردی احساس نمیکنم. کی به هوش میآیم تا پیالهای دیگر بنوشم؟» | 35 |
३५तुम्ही म्हणाल, “त्यांनी मला तडाखा दिला! पण मला काही लागले नाही. त्यांनी मला पिटले पण मला ते जाणवले नाही. मी केव्हा जागा होईल? मी पुन्हा त्याचे सेवन करीन.”