< خروج 28 >

«برادر خود هارون و پسرانش ناداب، ابیهو، العازار و ایتامار را از سایر مردم اسرائیل جدا کرده، به مقام کاهنی تعیین کن تا مرا خدمت کنند. 1
परमेश्वर मोशेला म्हणाला, याजक म्हणून माझी सेवा करण्यासाठी तुझा भाऊ अहरोन व त्याचे पुत्र नादाब, अबीहू, एलाजार व इथामार यांना इस्राएल लोकांतून वेगळे होऊन तुजकडे येण्यास सांग.
لباسهای مخصوصی برای هارون تهیه کن تا معلوم باشد که او برای خدمت من جدا شده است. لباسهای او زیبا و برازندهٔ کار مقدّس او باشد. 2
आणि गौरवासाठी व शोभेसाठी तुझा भाऊ अहरोन याच्यासाठी पवित्र वस्रे तयार कर.
به کسانی که استعداد و مهارت دوزندگی داده‌ام دستور بده لباسهای هارون را تهیه کنند لباسهایی که با لباسهای سایر مردم فرق داشته باشد و معلوم شود که او در مقام کاهنی به من خدمت می‌کند. 3
ही वस्रे बनवणारे कारागीर ज्यांना मी ज्ञानाच्या आत्म्याने परिपूर्ण केले आहे त्या सर्वांना अहरोनाची वस्रे तयार करण्यास सांग. त्यामुळे तो माझी याजकीय सेवा करण्यासाठी पवित्र होईल.
لباسهایی که باید دوخته شوند اینها هستند: سینه‌پوش، ایفود، ردا، پیراهن نقشدار، دستار و شال کمر. برای برادرت هارون و پسرانش هم باید از همین لباسها دوخت تا بتوانند در مقام کاهنی به من خدمت کنند. 4
तुझा भाऊ अहरोन व त्याचे पुत्र यांनी याजक या नात्याने माझी सेवा करावी म्हणून कारागिरांनी त्यांच्यासाठी ही पवित्र वस्त्रे ऊरपट, एफोद, झगा, चौकड्याचा अंगरखा, मंदिल व कमरबंद तयार करावीत.
پس طلا و نخهای آبی، ارغوانی و قرمز، و نیز کتان ریزبافت به آنها بده. 5
त्यांनी सोन्याची जर आणि निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाचे सूत व तलम सणाचे कापड वापरून ही वस्रे तयार करावीत.
«صنعتگران باید ایفود را از کتان ریزبافت تابیده تهیه کرده، آن را ماهرانه با طلا، نخهای آبی، ارغوانی و قرمز گلدوزی کنند. 6
सोन्याची जर व निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाचे सूत तसेच कातलेल्या तलम सणाचे कापड घेऊन कुशल कारागिराकडून त्यांचे एफोद तयार करून घ्यावे;
«این جلیقهٔ بلند از دو قسمت، جلو و پشت، که روی شانه‌ها با دو بند به هم می‌پیوندند، تشکیل شود. 7
एफोदाच्या दोन खांदपट्ट्या जोडलेल्या असाव्यात, त्याची दोन टोके जोडावी.
بند کمر ایفود هم باید متصل به آن و از جنس خودش باشد، یعنی از رشته‌های طلا و کتان تابیده ریز‌بافت و نخهای آبی، ارغوانی و قرمز. 8
एफोद बांधण्यासाठी त्याच्यावर कुशलतेने विणलेली एक पट्टी असते तिची बनावट त्याच्यासारखीच असून ती अखंड असावी; सोन्याच्या जरीची, व निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाचे सुताची व कातलेल्या तलम सणाच्या कापडाची ती असावी.
«دو سنگ جزع تهیه کن و نامهای دوازده قبیلهٔ بنی‌اسرائیل را روی آنها حک کن. 9
मग दोन गोमेद रत्ने घेऊन त्यांच्यावर इस्राएलाच्या पुत्रांची नावे त्यांच्या जन्माच्या क्रमाने कोरावी.
یعنی روی هر سنگ شش نام به ترتیب سن آنها. 10
१०त्यांच्या नावांपैकी सहा नावे एका रत्नावर व बाकीची सहा नावे दुसऱ्या रत्नांवर कोरावी.
مثل یک خاتم‌کار و حکاک ماهر نامها را روی سنگها حک کن و آنها را در قابهای طلا بگذار. 11
११रत्नावर कोरीव काम करणारा कारागीर कुशलतेने एखादी मुद्रा कोरतो त्याप्रमाणे दोन्ही रत्नांवर इस्राएलाच्या बारा पुत्रांची नावे कोरावीत आणि ती सोन्याच्या जाळीदार कोंदणात बसवावीत.
سپس آنها را روی شانه‌های ایفود نصب کن تا بدین ترتیب هارون نامهای قبایل بنی‌اسرائیل را به حضور من بیاورد و من به یاد آنها باشم. 12
१२ती दोन्ही रत्ने एफोदाच्या दोन्ही खांदपट्ट्यांवर लावावी. ती इस्राएल लोकांची स्मारकरत्ने होत, म्हणजे अहरोन त्यांची नावे परमेश्वरासमोर आपल्या दोन्ही खांद्यांवर स्मरणार्थ वागवील.
همچنین قابهای طلایی بساز 13
१३त्याचप्रमाणे सोन्याची जाळीदार कोंदणे करावीत.
و دو زنجیر تابیده از طلای خالص درست کن و آنها را به قابهای طلایی که روی شانه‌های ایفود است وصل کن. 14
१४पीळ घातलेल्या दोरीसारख्या शुद्ध सोन्याच्या दोन साखळ्या कराव्यात व त्या पीळ घातलेल्या साखळ्या त्या कोंदणात बसवाव्या.
«برای کاهن یک سینه‌پوش جهت پی بردن به خواست خداوند درست کن. آن را مانند ایفود از کتان ریز‌بافت تابیده، نخهای آبی، ارغوانی و قرمز و رشته‌های طلا بساز و روی آن را با دقت گلدوزی کن. 15
१५न्यायाचा ऊरपटही तयार कुशल कारागिराकडून तयार करावा. जसा एफोद तयार केला, तसाच तो करावा. तो सोन्याच्या जरीचा, आणि निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताचा व कातलेल्या तलम सणाच्या कापडाचा करावा;
این سینه‌پوش باید دولا و مثل یک کیسه چهارگوش به ضلع یک وجب باشد. 16
१६तो चौरस व दुहेरी असावा; व त्याची लांबी व रुंदी प्रत्येकी एक वीत असावी.
چهار ردیف سنگ قیمتی روی آن نصب کن. ردیف اول عقیق سرخ، یاقوت زرد و یاقوت آتشی باشد. 17
१७त्यामध्ये रत्ने खोचलेल्या चार रांगा असाव्या; पहिल्या रांगेत लाल, पुष्कराज व माणिक;
ردیف دوم زمرد، یاقوت کبود و الماس. 18
१८दुसऱ्या रांगेत पाचू, इंद्रनीलमणी व हिरा;
ردیف سوم فیروزه، عقیق یمانی و یاقوت بنفش. 19
१९तिसऱ्या रांगेत तृणमणी, सूर्यकांत व पद्मराग;
ردیف چهارم زبرجد، جزع و یشم. همهٔ آنها باید قابهای طلا داشته باشند. 20
२०आणि चौथ्या रांगेत लसणा, गोमेद व यास्फे; ही सर्व रत्ने सोन्याच्या कोंदणात खोचावीत.
هر یک از این سنگها علامت یکی از دوازده قبیلهٔ بنی‌اسرائیل خواهد بود و نام آن قبیله روی آن سنگ حک خواهد شد. 21
२१ऊरपटावर इस्राएलाच्या प्रत्येक पुत्राच्या नावाच्या संख्येएवढी ही रत्ने असावीत. त्यांच्या संख्येइतकी बारा नावे असावीत. मुद्रा जशी कोरतात तसे बारा वंशांपैकी एकेकाचे नाव एकेका रत्नावर कोरावे.
«برای وصل کردن سینه‌پوش به ایفود، زنجیرهایی تابیده از طلای خالص درست کن. 22
२२ऊरपटावर लावण्यासाठी दोरीसारखा पीळ घातलेल्या शुद्ध सोन्याच्या साखळ्या कराव्यात.
سپس دو حلقۀ طلایی بساز و آنها را بر دو گوشۀ سینه‌پوش بگذار. 23
२३ऊरपटावर सोन्याच्या दोन कड्या कराव्यात; त्या न्यायाच्या ऊरपटाच्या दोन्ही टोकांना लावाव्यात;
دو زنجیر را در حلقه‌های دو گوشۀ سینه‌پوش بگذار، 24
२४ऊरपटाच्या टोकांना लावलेल्या या दोन कड्यांत पीळ घातलेल्या सोन्याच्या साखळ्या घालाव्यात.
و دو سر دیگر زنجیرها را از جلو به قابهای طلای روی شانه‌ها وصل کن. 25
२५पीळ घातलेल्या दोन्ही साखळ्यांची दुसरी टोके दोन्ही कोंदणात खोचून त्या एफोदाच्या दोन्ही खांदपट्ट्यांवर पुढल्या बाजूला लावाव्यात.
دو حلقهٔ طلای دیگر نیز درست کن و آنها را به دو گوشهٔ پایینی سینه‌پوش، روی لایهٔ زیرین، ببند. 26
२६सोन्याच्या आणखी दोन कड्या करून न्यायाच्या ऊरपटाच्या आतल्या दोन्ही कोपऱ्यांना एफोदाच्या बाजूला लावाव्या.
دو حلقهٔ طلای دیگر هم درست کن و آنها را در قسمت جلوی ایفود و کمی بالاتر از بند کمر نصب کن. 27
२७सोन्याच्या आणखी दोन कड्या करून त्या खांदपट्ट्याखालील एफोदाच्या समोर त्याच्या जोडाजवळील पट्टीवर लावाव्या.
بعد حلقه‌های سینه‌پوش را با نوار آبی رنگ به حلقه‌های ایفود که بالاتر از بند کمر قرار دارد ببند تا سینه‌پوش از ایفود جدا نشود. 28
२८त्या ऊरपटाच्या कड्या एफोदाच्या कड्यांना निळ्या फितीने बांधाव्या, ह्याप्रमाणे तो कुशलतेने विणलेल्या एफोदाच्या पट्टीवर राहील, आणि ऊरपट एफोदावरून घसरणार नाही.
«به این ترتیب وقتی هارون به قدس وارد می‌شود، نامهای تمام قبایل بنی‌اسرائیل را که روی سینه‌پوش کنده شده، با خود حمل خواهد کرد تا به این وسیله قوم همیشه در نظر خداوند باشند. 29
२९अहरोन पवित्रस्थानात प्रवेश करील तेव्हा त्याच्या ऊरपटावर म्हणजे आपल्या हृदयावर त्याने इस्राएलाच्या मुलांची नावे कोरलेली असतील, त्यामुळे परमेश्वरास इस्राएलाच्या बारा पुत्रांची सतत आठवण राहील.
اوریم و تُمّیم را داخل سینه‌پوش بگذار تا وقتی هارون به حضور من می‌آید آنها همیشه روی قلب او باشند و او بتواند خواست مرا در مورد قوم اسرائیل دریابد. 30
३०ऊरपटात तू उरीम व थुम्मीम ठेव. अहरोन परमेश्वरासमोर येईल तेव्हा ते त्याच्या हृदयावर असतील. त्यामुळे इस्राएल लोकांचा न्याय करण्याचा मार्ग तो नेहमी आपल्या हृदयावर घेऊन जाईल.
«ردایی که زیر ایفود است باید از پارچهٔ آبی باشد. 31
३१एफोदाबरोबर घालावयाचा झगा संपूर्ण निळ्या रंगाचा करावा;
شکافی برای سر، در آن باشد. حاشیهٔ این شکاف باید با دست بافته شود تا پاره نگردد. 32
३२त्याच्या मध्यभागी डोके घालण्यासाठी एक भोक असावे आणि त्याच्या भोवती कापडाचा गोट शिवावा म्हणजे झग्याचा तो भाग फाटणार नाही.
با نخهای آبی، ارغوانی و قرمز، منگوله‌هایی به شکل انار درست کن و دور تا دور لبهٔ دامن ردا بیاویز و زنگوله‌هایی از طلا بین آنها قرار بده. 33
३३निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताच्या कापडाची डाळिंबे काढून ती त्या झग्याच्या खालच्या घेराभोवती लावावीत आणि दोन डाळिंबाच्या मधील जागेत सोन्याची घुंगरे लावावीत;
زنگوله‌های طلا و انارها باید یکی در میان، دور تا دور لبۀ دامن ردا باشند. 34
३४त्यामुळे झग्याच्या घेराच्या खालच्या बाजूला एक डाळिंब व एक घुंगरू अशी क्रमवार ती असावीत.
هارون در موقع خدمت خداوند باید ردا را بپوشد تا وقتی که به حضور من به قدس وارد می‌شود یا از آن بیرون می‌رود، صدای زنگوله‌ها شنیده شود، مبادا بمیرد. 35
३५सेवा करताना अहरोनाने हा झगा घालावा; जेव्हा जेव्हा तो पवित्रस्थानात परमेश्वरासमोर जाईल किंवा तेथून बाहेर पडेल तेव्हा तेव्हा त्या घुंगरांचा आवाज ऐकू येईल; त्यामुळे तो मरावयाचा नाही.
«یک نیم تاج از طلای خالص بساز و این کلمات را مانند مُهر، روی آن حک کن:”مقدّس برای خداوند“. 36
३६शुद्ध सोन्याची एक पट्टी बनवावी आणि मुद्रा कोरतात तशी तिच्यावर परमेश्वरासाठी पवित्र ही अक्षरे कोरावीत.
این نیم تاج را با یک نوار آبی رنگ به دستارِ هارون ببند به‌طوری که در جلوی دستار قرار گیرد. 37
३७ही सोन्याची पट्टी अहरोनाच्या मंदिलाला समोरील बाजूस निळ्या फितीने बांधावी;
این نیم تاج باید بر پیشانی هارون باشد تا او بار هر خطایی را که ممکن است بنی‌اسرائیل در حین تقدیم قربانیهای مقدّس انجام دهند، بر خود حمل کند. هارون باید همیشه این نیم تاج را روی پیشانی خود داشته باشد تا آن قربانیها مقبول خداوند واقع شوند. 38
३८ती अहरोनाच्या कपाळावर सतत असावी. ह्यासाठी की ज्या गोष्टी इस्राएल लोक परमेश्वरास पवित्र अर्पण करतील म्हणजे ज्या पवित्र भेटी त्यासंबंधीचा दोष अहरोनाने वाहावा; त्यामुळे ती दाने परमेश्वरास मान्य ठरतील.
«پیراهن هارون را از کتان ریزبافت بباف؛ همچنین دستار را. شال کمر گلدوزی شده نیز برای او درست کن. 39
३९चौकड्यांचा अंगरखा तलम सणाचा करावा व एक मंदिलही तलम सणाचा करावा आणि एक वेलबुट्टीदार कमरबंद करावा.
«برای پسران هارون نیز پیراهن، شال کمر و کلاه تهیه کن. این لباسها باید زیبا و برازنده کار مقدّس ایشان باشند. 40
४०अहरोनाच्या पुत्रांसाठीही अंगरखे, कमरबंद व फेटे करावेत; ही वस्रे गौरवासाठी व शोभेसाठी असावी.
این لباسها را به هارون و پسرانش بپوشان. با روغن زیتون آنها را مسح کن و ایشان را برای خدمت کاهنی تعیین و تقدیس نما. 41
४१तुझा भाऊ अहरोन ह्याला व त्याच्या पुत्रांना ही वस्रे घालून, त्यांना अभिषेक करावा व त्यांच्यावर संस्कार करावा आणि त्यांना पवित्र कर म्हणजे मग याजक या नात्याने ते माझी सेवा करतील.
برای پوشاندن برهنگی لگن تا ران ایشان، لباس زیر از جنس کتان بدوز که اندازهٔ آن از کمر تا بالای زانو باشد. 42
४२“त्यांच्यासाठी सणाच्या कापडाचे चोळणे कर म्हणजे कमरेपासून मांडीपर्यंत त्यांचे अंग झाकलेले राहील.
هارون و پسرانش، وقتی به خیمۀ ملاقات داخل می‌شوند، یا نزدیک مذبح می‌آیند تا در قدس خدمت کنند، باید این لباسها را بپوشند، مبادا متحمل گناه شده، بمیرند. این آیین برای هارون و نسل او یک قانون جاودانی خواهد بود. 43
४३आणि अहरोन व त्याचे पुत्र दर्शनमंडपामध्ये प्रवेश करतील व पवित्रस्थानात सेवा करण्यास जातील तेव्हा त्यांनी हे चोळणे घातलेले असावे; तसे न केल्यास, दोषी ठरून ते मरतील; अहरोनाला व त्यानंतर त्याच्या वंशाला हा कायमचा नियम आहे.”

< خروج 28 >