< خروج 18 >

یترون، پدرزن موسی و کاهن مدیان شنید که خدا چه کارهایی برای موسی و قوم اسرائیل کرده و بخصوص اینکه چگونه خداوند آنها را از مصر رهانیده است. 1
देवाने मोशे व इस्राएल लोक यांच्यासाठी जे केले तसेच त्यांना परमेश्वराने मिसर देशातून सोडवून बाहेर आणले यासंबंधी मोशेचा सासरा मिद्यांनी याजक इथ्रो याने ऐकले;
پیش از این، موسی زن خود صفوره را با دو پسرش نزد یترون فرستاده بود. 2
मोशेने आपली पत्नी सिप्पोरा पूर्वी परत पाठवली होती, तिला आणि तिच्या दोन पुत्रांना घेऊन मोशेचा सासरा इथ्रो आला;
(نام پسر اول موسی جرشوم بود زیرا به هنگام تولد او، موسی گفته بود: «من در سرزمین بیگانه، غریبم.» 3
पहिल्या मुलाचे नाव गेर्षोम होते कारण त्याचा जन्म झाला त्यावेळी मोशे म्हणाला होता, “मी या देशात परका आहे.”
پسر دومش اِلعازار نام داشت، زیرا به هنگام تولد او، موسی گفته بود: «خدای پدرم یاورم بوده و مرا از شمشیر فرعون نجات داد.») 4
दुसऱ्या मुलाचे नाव एलियेजर असे होते, कारण तो जन्मला तेव्हा मोशे म्हणाला होता, “माझ्या पित्याच्या देवाने मला मदत केली व मला फारोच्या तलवारीपासून वाचवले.”
پس یترون پدرزن موسی برای دیدن موسی به صحرا آمد. او پسران و زن موسی را نیز همراه خود آورده بود. در این وقت موسی و قوم نزدیک کوه خدا اردو زده بودند. 5
तेव्हा इथ्रो रानात देवाच्या पर्वताजवळ जेथे मोशेने तळ दिला होता तेथे त्याची पत्नी सिप्पोरा व त्याचे दोन पुत्र घेऊन मोशेकडे आला.
یترون برای موسی پیام فرستاده بود که: «من، یترون، پدرزنت همراه زنت و دو پسرت می‌آییم تا تو را ببینیم.» 6
त्याने मोशेला निरोप पाठवला, “मी तुझा सासरा, इथ्रो, तुझी पत्नी व तिचे दोन पुत्र यांना घेऊन तुझ्याकडे आलो आहे.”
پس موسی به استقبال یترون رفت، به او تعظیم کرد و صورت او را بوسید. پس از احوالپرسی، آنها به خیمهٔ موسی رفتند 7
तेव्हा मोशे आपल्या सासऱ्याला सामोरा गेला; त्याने त्याच्यापुढे लवून त्यास नमन केले, आणि त्याचे चुंबन घेतले. त्या दोघांनी एकमेकांची खुशाली विचारल्यावर ते तंबूत गेले.
و موسی برای پدرزنش تعریف کرد که خداوند چه بلاهایی بر سر فرعون و مصری‌ها آورد تا بنی‌اسرائیل را رهایی دهد و چه مشقتی را در طول این سفر تحمل کردند تا به آنجا رسیدند و چگونه خداوند قوم خود را از خطرها و دشواریها نجات داد. 8
परमेश्वराने इस्राएली लोकांसाठी फारोचे व मिसरी लोकांचे काय केले, तसेच मिसराहून प्रवास करताना काय काय संकटे आली व कसा त्रास झाला परमेश्वराने त्यांना कसे वाचवले ती सर्व हकिकत मोशेने आपल्या सासऱ्याला सांगितली.
یترون به سبب احسان خداوند بر بنی‌اسرائیل و آزادی آنها از مصر بسیار خوشحال شد 9
परमेश्वराने इस्राएल लोकांसाठी ज्या चांगल्या गोष्टी केल्या त्या ऐकल्यावर आणि मिसराच्या लोकांपासून परमेश्वराने इस्राएल लोकांस स्वतंत्र केले म्हणून इथ्रोला फार आनंद झाला.
و گفت: «متبارک باد خداوند که قوم خود را از دست فرعون و مصری‌ها نجات داد. 10
१०इथ्रो म्हणाला, “ज्याने तुम्हास मिसऱ्यांच्या व फारोच्या हातातून सोडवले ज्याने आपल्या प्रजेला मिसऱ्यांच्या तावडीतून स्वतंत्र केले तो परमेश्वर धन्य होय.
اکنون می‌دانم که خداوند بزرگتر از همهٔ خدایان است، زیرا او قوم خود را از دست مصری‌های متکبر و بی‌رحم نجات داده است.» 11
११परमेश्वर सर्व देवांहून श्रेष्ठ आहे हे आता मला कळले. इस्राएल लोकांपेक्षा स्वत: ला श्रेष्ठ मानत असलेल्या मिसरी लोकांचे त्याने काय केले हे मला समजले.”
یترون قربانی سوختنی و قربانیهای دیگر به خدا تقدیم کرد، و هارون و همهٔ مشایخ قوم اسرائیل به دیدن او آمدند و در حضور خدا برای خوردن گوشت قربانی دور هم نشستند. 12
१२मग मोशेचा सासरा इथ्रो याने देवाला होमबली व यज्ञ केले. नंतर अहरोन इस्राएलाच्या सर्व वडिलांसह मोशेचा सासरा इथ्रो यांच्याबरोबर देवासमोर जेवण करावयास आला.
روز بعد، موسی برای رسیدگی به شکایتهای مردم در جایگاه خود نشست و مردم از صبح تا غروب در حضور او ایستادند. 13
१३दुसऱ्या दिवशी मोशे लोकांचा न्यायनिवाडा करावयास बसला आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत लोक मोशेसमोर उभे होते.
یترون وقتی دید که رسیدگی به شکایتهای مردم، وقت زیادی را می‌گیرد، به موسی گفت: «چرا این کار را به تنهایی انجام می‌دهی؟ چرا مردم را تمام روز سر پا نگه می‌داری؟» 14
१४मोशे लोकांसाठी काय काय करतो ते इथ्रोने पाहिले तेव्हा तो म्हणाला, “तू लोकांबरोबर जे हे करतोस ते काय आहे? तू एकटाच न्यायनिवाडा करण्यासाठी बसतोस आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत सर्व लोक तुझ्याभोवती उभे राहतात ते का?”
موسی جواب داد: «من باید این کار را بکنم، زیرا مردم برای حل مشکلات خود پیش من می‌آیند تا نظر خدا را بدانند. 15
१५मोशे आपल्या सासऱ्यास म्हणाला, “देवाला प्रश्र विचारण्यासाठी लोक माझ्याकडे येतात.
وقتی بین دو نفر اختلافی پیش می‌آید، نزد من می‌آیند و من تشخیص می‌دهم که حق با چه کسی است و فرایض و شریعت خدا را به آنها تعلیم می‌دهم.» 16
१६लोकांचा काही भांडणतंटा असेल तर ते माझ्याकडे येतात तेव्हा मी त्यांचा आपसांत निवाडा करतो आणि देवाचे नियम व विधी यांचे शिक्षण त्यांना देतो.”
پدرزن موسی گفت: «این کار تو درست نیست. 17
१७परंतु मोशेचा सासरा त्यास म्हणाला, “हे तू करतोस ते चांगले नाही.
تو با این کار، خود را از پای در می‌آوری و قوم را نیز خسته می‌کنی. تو نمی‌توانی این کار سنگین را به تنهایی انجام دهی. 18
१८तुझ्या एकट्यासाठी हे काम फार आहे, त्यामुळे तू थकून जातोस व लोकही थकून जातात हे काम तुला एकट्याला करवणार नाही.
حرف مرا گوش کن و نصیحت مرا بپذیر و خدا تو را برکت خواهد داد. تو در حضور خدا نمایندهٔ این مردم باش و مسائل و مشکلات ایشان را به او بگو. 19
१९तर आता माझे ऐक, मी तुला सल्ला देतो, आणि देव तुला मदत करो. या लोकांचा देवाकडे तू मध्यस्थ हो आणि यांची प्रकरणे देवापाशी ने.
تو باید قوانین و شریعت خدا را به آنها تعلیم دهی و بگویی که چطور زندگی کنند و چه رفتاری داشته باشند. 20
२०तू त्यांना नियम व विधी यासंबंधी शिक्षण दे; त्यांनी कोणत्या मार्गाने चालावे व कोणते काम करावे त्यांना तू समजावून सांग.
در ضمن از میان همۀ قوم مردانی کاردان و خداترس و درستکار که از رشوه متنفر باشند انتخاب کن تا آنها در گروه‌های هزار نفره، صد نفره، پنجاه نفر و ده نفره داور و رهبر باشند. 21
२१तू लोकांमधून कर्तबगार देवाचे भय धरणारे, व विश्वासू, सत्यप्रिय, अन्याय न करणारे असे लोक निवडून घे; त्यांना हजार लोकांवर, शंभर लोकांवर, पन्नास लोकावर आणि दहा लोकांवर नायक म्हणून नेम.
آنها باید همیشه آماده باشند تا به مسائل جزئی مردم رسیدگی کنند اما مسائل مهم را نزد تو بیاورند. بگذار رهبران خودشان مسائل جزئی را حل کنند. بدین ترتیب آنها بار تو را سبکتر خواهند کرد. 22
२२या नायक लोकांनी लोकांचा न्यायनिवाडा करावा; जर अगदी महत्वाची बाब असेल तर तिचा न्यायनिवाडा करण्याकरता तो वाद नायकांनी तुझ्याकडे आणावा, परंतु लहानसहान प्रकरणांसंबंधी त्यांनी स्वत: निर्णय द्यावेत. अशा प्रकारे तुझे काम सोपे होईल तसेच तुझ्या कामात ते वाटेकरी होतील.
اگر این روش را در پیش‌گیری و خواست خدا نیز چنین باشد، آنگاه خسته نخواهی شد و قوم نیز در حالی که اختلافشان حل شده است، راضی به خانه‌های خویش باز خواهند گشت.» 23
२३तू असे करशील व देव तुला आज्ञा देईल तर तू टिकशील, आणि हे सर्व लोक शांतीने आपल्या ठिकाणास पोहचतील.”
موسی نصیحت پدرزن خود را پذیرفت و مطابق پیشنهاد او عمل کرد. 24
२४तेव्हा मोशेने इथ्रोच्या म्हणण्याप्रमाणे केले.
او مردان کاردانی را برگزید و از میان آنها برای هر هزار نفر، صد نفر، پنجاه نفر و ده نفر قضاتی تعیین کرد. 25
२५मोशेने इस्राएल लोकांतून चांगले लोक निवडले आणि त्यांना हजार हजार, शंभर शंभर, पन्नास पन्नास व दहा दहांवर नायक म्हणून नेमले.
آنها مرتب به کار قضاوت مشغول بودند و به مشکلات و اختلافات کوچکتر رسیدگی می‌کردند، ولی برای حل مسائل مهم و پیچیده نزد موسی می‌آمدند. 26
२६ते लोकांवर न्यायाधीश झाले. लोक सतत नायकांकडे आपली गाऱ्हाणी आणू लागले व मोशेला फार महत्वाच्या प्रकरणांबद्दलच निकाल देण्याचे काम करावे लागे.
پس از چند روز، موسی پدرزنش را بدرقه کرد و او به ولایت خود بازگشت. 27
२७मग थोड्याच दिवसानी मोशेने आपला सासरा इथ्रो याला निरोप दिला आणि इथ्रो माघारी आपल्या घरी गेला.

< خروج 18 >