< استر 5 >

سه روز بعد، استر لباس سلطنتی خود را پوشید و وارد تالار مخصوص پادشاه شد. روبروی تالار، اتاقی قرار داشت که در آنجا پادشاه روی تخت سلطنتی نشسته بود. وقتی پادشاه استر را در تالار ایستاده دید، او را مورد لطف خود قرار داده، عصای طلایی خود را به سوی او دراز کرد. استر جلو رفت و نوک عصای او را لمس کرد. 1
तिसऱ्या दिवशी एस्तेरने आपली राजवस्त्रे परिधान केली आणि ती राजमहालाच्या आतल्या भागात जाऊन उभी राहिली. राजमंदिरात घराच्या दरवाजासमोर राजा सिंहासनावर बसला होता.
2
त्यामुळे राजाने एस्तेर राणी चौकात उभी राहिलेली पाहिली. तेव्हा तिच्यावर त्याची कृपादृष्टी झाली. आपल्या हातातला सोन्याचा राजदंड त्याने तिच्या दिशेने पुढे केला. तेव्हा एस्तेरने जवळ जाऊन राजदंडाच्या दुसऱ्या टोकाला स्पर्श केला.
آنگاه پادشاه پرسید: «ملکه استر، درخواست تو چیست؟ هر چه بخواهی به تو می‌دهم، حتی اگر نصف مملکتم باشد!» 3
मग राजाने तिला विचारले, “एस्तेर राणी तुला काय पाहिजे? तुझी विनंती काय आहे? अगदी अर्ध्या राज्याएवढी तुझी मागणी असली तरी ती मिळेल.”
استر جواب داد: «پادشاها، تمنا دارم امشب به اتفاق هامان به ضیافتی که برای شما ترتیب داده‌ام تشریف بیاورید.» 4
एस्तेर म्हणाली, “महाराजांच्या मर्जीस आले तर मी आज आपल्यासाठी भोजन तयार केले आहे. त्यास राजाने हामानास घेऊन यावे.”
پادشاه برای هامان پیغام فرستاد که هر چه زودتر بیاید تا در ضیافت استر شرکت کنند. پس پادشاه و هامان به مجلس ضیافت رفتند. 5
तेव्हा राजा म्हणाला, “हामानाला ताबडतोब घेऊन या म्हणजे आम्हास एस्तेरच्या म्हणण्याप्रमाणे जाता येईल.” राजा आणि हामान मग एस्तेरने तयार केलेल्या भोजनास गेले.
موقع صرف شراب، پادشاه به استر گفت: «حال بگو درخواست تو چیست. هر چه بخواهی به تو می‌دهم، حتی اگر نصف مملکتم باشد!» 6
ते द्राक्षरस घेत असताना पुन्हा राजाने एस्तेरला विचारले “तुझी विनंती काय आहे? ते तुला मिळेल. तुझी मागणी काय आहे? ती अर्ध्या राज्याएवढी असली तरीसुध्दा ती मान्य होईल.”
استر جواب داد: «خواهش و درخواست من این است: اگر مورد لطف پادشاه قرار گرفته‌ام و پادشاه مایلند که درخواست مرا اجابت نمایند، فردا نیز به اتفاق هامان در این ضیافت شرکت کنند. آنگاه درخواست خود را به عرض خواهم رسانید.» 7
एस्तेरने उत्तर दिले, “माझे मागणे आणि माझी विनंती हीच आहे की,
8
जर महाराजाची माझ्यावर कृपादृष्टी झाली असेल तर राजा आणि हामान यांनी उद्याही यावे. उद्या मी राजासाठी आणि हामानासाठी आणखी एक मेजवानी देईन आणि मग राजाने म्हटल्याप्रमाणे मला जे काय मागायचे ते मी उद्या मागेन.”
هامان شاد و خوشحال، از ضیافت ملکه برگشت. ولی همین که در کاخ چشمش به مردخای افتاد که نه پیش پای او بلند شد و نه به او تعظیم کرد، به شدت خشمگین شد؛ 9
हामान त्यादिवशी अतिशय आनंदात आणि चांगल्या मन: स्थितीत निघाला. पण राजवाड्याच्या दरवाजाजवळ आपणास पाहून मर्दखय उठला नाही की थरथर कांपला नाही, हे हामानाने पाहिले तेव्हा त्यास त्याचा अतिशय संताप आला.
اما خودداری کرده، چیزی نگفت و به خانه رفت. سپس تمام دوستانش را به خانه خود دعوت کرده در حضور ایشان و زن خود «زِرِش» به خودستایی پرداخت و از ثروت بی‌حساب و پسران زیاد خود و از عزت و احترامی که پادشاه به او بخشیده و اینکه چگونه والاترین مقام مملکتی را به او داده است، تعریف کرد. 10
१०तरीही आपल्या रागाला आवर घालून हामान घरी आला. मग आपले मित्र आणि त्याची पत्नी जेरेश यांना त्याने बोलावले.
11
११आपल्या ऐश्वर्याची बढाई मारायला हामानाने सुरुवात केली आणि आपली पुत्रसंतती, राजाने केलेले आपले अनेक प्रकारचे सन्मान, राजाने आपल्याला दिलेले सर्वोच्च अधिकाराचे स्थान या सगळ्यांची तो बढाई मारु लागला.
سپس گفت: «از این گذشته، ملکه استر نیز فقط مرا همراه پادشاه به ضیافت خصوصی خود دعوت کرد. فردا هم قرار است همراه پادشاه به ضیافت او بروم. 12
१२हामान म्हणाला, “एवढेच नाहीतर एस्तेर राणीने आज दिलेल्या मेजवानीला राजाबरोबर माझ्याशिवाय कोणालाच बोलावले नाही. आणि पुन्हा उद्याही राणीने मला राजाबरोबर बोलावले आहे.
اما وقتی در دربار، این مردخای یهودی را می‌بینم همهٔ اینها در نظرم بی‌ارزش می‌شود.» 13
१३पण तो यहूदी मर्दखय जोपर्यंत राजद्वाराशी बसलेला पाहत आहे तोपर्यंत हे सर्व व्यर्थ आहे.”
دوستان و همسر هامان به او پیشنهاد کردند که چوبهٔ داری به بلندی بیست و پنج متر درست کند و فردا صبح از پادشاه اجازه بگیرد و مردخای را روی آن به دار بیاویزد. سپس با خیال راحت همراه پادشاه به ضیافت برود. هامان این پیشنهاد را بسیار پسندید و دستور داد چوبهٔ دار را آماده کنند. 14
१४मग हामानाची पत्नी जेरेश आणि त्याचे सगळे मित्र त्यास म्हणाले, “त्याला फाशी देण्यासाठी एक खांब उभारायला सांग, तो पन्नास हात उंच असावा. मग सकाळी राजाला त्यावर मर्दखयाला फाशी द्यायला सांग. त्यानंतर राजाबरोबर खुशाल मेजवानीला जा म्हणजे तुला आनंद होईल.” हामानाला ही गोष्ट आवडली म्हणून त्याने फाशीचा खांब करून घेतला.

< استر 5 >